Ultima
| |
| Friday, March 16, 2007 - 7:14 am: |
| 
|
अरेच्या तुम्ही सगळ्यानी एकमतानी आमच्याविरुद्ध कट केलेला दीसतोय ........... च्यायला तुला नक्की काय म्हणायचय रे?
|
म्हणजे... च्यायला ला म्हणायचय की तुम्ही सगळे जण मिळून आमच्याविरुद्ध इब्लिसपणा करताय. बिच्चारे मी आणि च्यायला..
|
Ultima, तुमचा मेसेज इथुन विनोद च्या बी बी वर हलवला आहे. कृपया तुमचे मेसेज योग्य त्या बी बी वर टाकावेत हि विनंती.
|
Chaffa
| |
| Friday, March 16, 2007 - 2:59 pm: |
| 
|
झकासराव, सुचना आवडली पण माझी लायकी नाही हो तेवढी. पण एकुण लोकमत पहाता कुणितरी द्यायलाच पाहीजे म्हणुन: नंदिनी तुल A\ देतो. आणी च्यायला तुला: /K देतो आता झाले का विभागुन पदविदान.? पण तुमची एकंदरीत कारकीर्द पहाता तुम्ही दोघेही संपुर्ण AVK या पदवीस पात्र आहात हे नक्की. आणी च्यायला तुला तर ईब्लीसानंद ही पदवी आधी मिळालीच आहे तर आत नंदिनीला आपण महाराणी ईब्लीसाबेथ म्हणुया कसे.??
|
Chyayla
| |
| Friday, March 16, 2007 - 11:44 pm: |
| 
|
नंदिनीला आपण महाराणी ईब्लीसाबेथ म्हणुया कसे.??
... खरच ही अफ़लातुन पदवी पाहुन तर ह. ह. पु. वा. झाली... माझे अनुमोदन हो. आणी महाराणी इब्लीसाबेथचे अभिनन्दन
|
नंदिनीला आपण महाराणी ईब्लीसाबेथ म्हणुया कसे.?? ============ काय हे? आता सगळे मिळून माझ्याविरुध्द इब्लिसपणा करणार का?
|
Zakasrao
| |
| Saturday, March 17, 2007 - 5:57 am: |
| 
|
ईब्लीसानंद ही पदवी आधी मिळालीच आहे तर आत नंदिनीला आपण महाराणी ईब्लीसाबेथ >>>>>     
|
Sakhi_d
| |
| Saturday, March 17, 2007 - 7:27 am: |
| 
|
आत नंदिनीला आपण महाराणी ईब्लीसाबेथ >>>>> नंदिनी "महाराणी ईब्लीसाबेथ " अभिनंदन
|
Ultima
| |
| Saturday, March 17, 2007 - 8:47 am: |
| 
|
नंदिनीला आपण महाराणी ईब्लीसाबेथ म्हणुया कसे.?? खराचं... एक नंबर चाफ़ा मान गए आपको..... एखाद्या युनिवरसिटीत पदवीदान कमिटीत तर नाहीस ना.....
|
Sheshhnag
| |
| Saturday, March 17, 2007 - 10:11 am: |
| 
|
महाराणी ईब्लिसाबेथ कि जय हो
|
धन्यवाद मंडळी.. आता हा पुरस्कार जाहीर झालेलाच आहे तर मी स्विकारते.. माझ्या या यशासाठी ज्यानी अविरत श्रम घेतले त्या सर्वाचे मन्:पूर्वक धन्यवाद यामधे, माझी आई (कित्येक इब्लिसपणा बाबापासून लपवले) माझे बाबा. (इब्लिसपणा कसा करावा याचे प्राथमिक धडे इथेच गिरवले) माझे गुरू अनिकेत महाराज आणि योगेश बापू (माझे लहान बंधू) मायबोलीकर चाफ़्फ़ा आणि च्यायला (याचे प्रयोग बर्याचदा माझ्यवरच उलटले आहेत.. तरि शिष्टाचार) आणि सर्व मायबोलीकरानो, तुम्हालाही असेच पुरस्कार मिळत राहोत ही अपेक्षा. इरसालपणा आणि वेंधळेपणा हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.. मग भले कुणी मला पुरस्कार देवो न देवो..
|
By the way हे हसणारे चेहरे कसे आणता हो तुम्ही?
|
Dhulekar
| |
| Sunday, March 25, 2007 - 5:16 pm: |
| 
|
ईकडे क्लिक करा /cgi-bin/hitguj/board-image-lister.cgi
|
Ultima
| |
| Monday, March 26, 2007 - 4:32 pm: |
| 
|
आरेच्या...सगळं ओसाड का पडलय बरं च्यायला, सखी, शेष, सुवी, नंदु, झकासराव.......लोक हो आहात कुठे सगळे???????????
|
Chyayla
| |
| Monday, March 26, 2007 - 10:41 pm: |
| 
|
अल्टीमा तु पण माझ्याच लायनीत आली का? मी तुझा उल्टीमा केला होता आणी तु आता नन्दिनी ईब्लिसाबेथला चक्क नन्दु म्हणतेस... हा हा हा बघा बघा काय पण मस्त ईब्लीसपणा केला हो हीने ... आणी आता मला ईथे चौकटच्या राजाची आठवण आली... असा कसा.. असा कसा वेगळा... नन्दु. चाफ़्फ़ा कदाचित हनुमानला गेलेला दीसतोय... कुणाला काही पत्ता?
|
Chaffa
| |
| Tuesday, March 27, 2007 - 2:02 am: |
| 
|
च्यायला, नाही आहे मी इथेच. पण आता ह्या वरुनच एक आठवण झाली. जराऽऽऽऽ हट के आहे पण समजुन घ्या. आम्ही बंगलोरला जायचे म्हणत होतो तेव्हा मित्रमंडळात हा किस्सा ऐकला. माझा एक मित्र बंगलोरला जाणार होता ( एकटाच ) त्याच्या ऑफ़िस मधल्या एका दोस्ताने( तो मी नव्हेच ) त्याची पार दैना करुन टाकली म्हणजे तो निघायच्या तयारीत असताना त्याला एका पठ्ठ्याने सांगीतले की तिकडे गेलास की सोनागच्ची नक्की बघुन ये खुप छान आहे. हे महाराज गेले, सगळी कामे आटोपल्यावर ह्याला मित्राच्या सल्ल्याची आठवण झाली, आता नक्की पत्ता दिलेला नव्हता मग आपली नेहमीची सवय! याला विचार त्याला विचार चालु,! पण हळुहळु त्याच्या लक्षात यायला लागले की सोनागच्ची कुठाय? असे विचारले की लोकं आपल्याकडे विचीत्र नजरेने पहातायत आणी उत्तर तर देत नाहीयेत. शेवटी त्याला हा काहीतरी संशयास्पद प्रकार आहे याचा साक्षात्कार झाला. मग त्याने हॉटेलच्या मॅनेजरला विचारले. त्याने जेंव्हा हे सोनागच्ची काय प्रकरण आहे ते सांगीतले! तेंव्हा या बहाद्दराने त्याच दिवशी चेक आउट केले. परत आल्यावर त्याने हे सांगणार्या मित्राशी मारामारी करायचीच बाकी ठेवली होती.
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 27, 2007 - 4:45 am: |
| 
|
सोनागच्ची काय प्रकरण आहे ते सांगीतले> म्हणजे पुण्यातील बु. पे. अस काही आहे का? चौकट राजा नन्दु. आता नन्दु आली की तुझा बदला घेइल बघ. ती गावी गेल्याचा फ़ायदा घेतोयस काय? चाफ़्या तु हनुमानला गेला नाहिस का? 
|
Ultima
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:29 am: |
| 
|
आणी आता मला ईथे चौकटच्या राजाची आठवण आली... असा कसा.. असा कसा वेगळा... नन्दु. आरे मला तर "हम दिल दे चुके सनम" मधली ऐश्वर्या राय म्हणायचं होतं. नंदु तु नको ग फ़ार मनावर घेउ.....
|
Ultima
| |
| Tuesday, March 27, 2007 - 7:22 am: |
| 
|
चाफ़ा? आणि हनुमानाला काय?? दुसरे देव काय बिझी आहेत का?.... नवविवाहीत चाफ़्या तु माझा सल्ला ऐक रे....तु ब्रम्हचारी देवा ऐवजी तु किशन कन्हैया ची भक्ति कर
|
Runi
| |
| Tuesday, March 27, 2007 - 7:12 pm: |
| 
|
चाफ़्फ़ा तुझ्या त्या मित्राने कमल हसन चा महानदी बघितला नसेल त्यामुळे त्याला चमकले नसेल हा काय प्रकार आहे ते. मला त्या सिनेमा मुळेच हे सोनागाच्छी नाव कळले होते. (थोडे विषयांतर) पण हा भाग तर कलकत्यात आहे ना, म्हणजे महानदीत तसे दाखवलय, की बंगलोर ला पण याच नावाचा भाग आहे? अल्टिमा, तु नंदिनीने लिहीलेला किस्सा नाहीस का वाचलास? तिचा भाचा हनिमुन ला हनुमान म्हणाला, त्यामुळे बहुदा झकासरावानी मुद्दाम तसे लिहीलय. रुनि
|