|
Mandard
| |
| Wednesday, March 28, 2007 - 6:24 am: |
|
|
हरिद्वार ह्रुषिकेश यात्रा आम्ही (मी,पत्नी अणि आमचा दोन वर्षाचा मुलगा) २४,२५ आणि २६ मार्च ला हरिद्वार ह्रुषिकेश यात्रा केली. २४ मार्चला पहटे दिल्ली देहराडुन शताब्दी ने निघालो. माझ्या मुलाचा हा पहेला रेल्वे प्रवास. पन त्याने तो एन्जोय केला. मुझ्हफ़रनगर, सहरानपुर असा पानीपत च्या नजीबाचा प्रदेश पार करीत बाराच्या दरम्यान हरिद्वारला पोचलो. होटेल वर जावुन चेक इन करुन जेवलो. सन्ध्याकाळी घाटावर गन्गेच्या आरती साठी गेलो. घोंघावत वाहणारी गन्गा पाहुन मन प्रसन्न झाले. तेथेच थोडावेळ पाण्यात पय सोडुन बसलो. हळुहळु घाटावर आरतीसठी गर्दी वाधत होती. थोडासा अन्धार पडल्यावर आरती चालु झाली. बायका गन्गेची पुजा करुन नदीत दिवे सोडत होत्या. वातावरण खुप मन्गलमय होते. आरती झाल्यावर होटेल मधे आलो. चक्क तीन चार मराठी कुटुम्बे भेटली आणि चक्क मरठीत बोलत होती. दुसर्यादिवशीचा ह्रुषिकेशचा बेत करुन झोपी गेलो. दुसर्यादीवशी सकाळी ११ वाजता ह्रुषिकेशला जाण्यास निघालो. ह्रुषिकेश हे साधारण २५ की मी लाम्ब आहे. तेथे प्रसिध लक्षम्ण झुला येथे गेलो. गाइड घेतला आणि श्री राम, लक्षम्ण यान्च्या वास्तव्याने पवित्र झालेल्या भुमीत फ़िरलो. लक्षम्ण झुल्या खाली गन्गा वाहत होती पण पाणि थोडे कमी होते. टिहरी धरणासाठी पाणि आडवले आहे. पाण्यात राफ़्टिंग करुन येणारे लोक दिसत होते. नन्तर तेथे जवळच असलेल्या उत्तरांचल सरकारच्या दुकानातुन एक मुखी रुद्राक्ष घेतला. उन चांगलेच लागत असल्यामुळे भोजन करुन हरिद्वारचा रस्ता धरला. सन्ध्याकळी हरिद्वारमधील देवळांना भेट दिली. तिसर्यादिवशी अष्टमी होती. सध्या येथे नवरात्र चालु आहे त्या निमित्ताने येथील चंडीदेवी आणि मनसादेविचे दर्शन घ्यायचे ठरवले. दोन्ही देवि डोन्गरावर गन्गेच्या अल्ल्याड पल्ल्याड आहेत. वर जण्यासठी उडन खटोला (रोप वे) आहे. भरपुर गर्दी मुळे दर्शनाला थोडा वेळ लागला. येथे माकडे भरपुर आहेत त्यामेळे ओम (माझा मुलगा) खुष झाला. नन्तर ठोडा वेळ गन्गा किनारी भटकुन पर होटेल वर आलो. जेवुन थोडावेळ विश्रांती घेवुन सन्ध्याकाळची शताब्दी पकडुन परत दिल्लील आलो. एक सुखद आणि पवित्र अनुभव घेवुन.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|