|
Adi787
| |
| Tuesday, March 13, 2007 - 3:13 am: |
| 
|
रविवारी ३०० बघितला.. काही विशेष नाही वाटला.. आज बातमी वाचली, वीकेन्ड ला त्याच मुव्ही ने BO record break business केला... $70M .. Whole movie is just about 300 spartan's fighting with great world armies.
|
DJ, mi mhananar hoto vahun jail ki post. pan var baghitale tar ha BB archive hotoy 
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 13, 2007 - 6:41 pm: |
| 
|
DJ मला तो सिनेमा जास्त आवडल्याचे कारण, त्यातल्या बहुतेक जागा रोजच्या बघण्यातल्या आहेत. शिवाय ती डॉल्फ़िन्सची मजा बघताना सगळे थिएटर हसत होते.
|
Bee
| |
| Wednesday, March 14, 2007 - 2:22 am: |
| 
|
आसपास, यादीबद्दल धन्यवाद. अजून इतर भाषेतील माहिती असलेली चित्रपट देखील लिहा. हे असे चित्रपट मिळवताना देखील एक मजा असते. मी खूपशे हिंदी Art movies गोळा केले आहेत. त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले.
|
Disha013
| |
| Thursday, March 15, 2007 - 2:16 pm: |
| 
|
हनीमुन ट्रॅवल्स पाहीला. जाम आवडला. सगळ्यांचीच कामे छान झालियेत. हलकेफ़ुलके मनोरंजन आहे. जरुर बघावा असा. नि:शब्द-- अतिशय boring आहे. कथा जराही पटत नाही. ती जिया खान तर irritate करते. बच्चन,रेवती बेस्ट. पण बच्चनच्या fans पण आवडणार नाही असा चित्रपट.
|
Aaspaas
| |
| Thursday, March 15, 2007 - 4:39 pm: |
| 
|
बी, तुझे अगदी खरे आहे, हे चित्रपट शोधायला फारच मजा येते. पण या चित्रपटांची फारच वानवा आहे. तुझी समांतर चित्रपटाबद्द्ल वाक्य वाचून उडीच मारली [बसल्याबसल्या]. तू विकत घेतलेस की, तुला कोणती लायब्ररी सापडलीय? तु कुठे आहेस?
|
Chinnu
| |
| Thursday, March 15, 2007 - 8:50 pm: |
| 
|
३०० ओके आहे. नाही पहिला तरी चालेल.
|
Ajjuka
| |
| Friday, March 16, 2007 - 8:47 am: |
| 
|
१९७१ पाह्यला. चांगला विषय आणि खरंतर बरा ग्राफ असलेली कथा.. आणि या सगळ्याची सुंदर वाट कशी लावावी याचे उत्तम वर्कशॊप म्हणजे ही फिल्म.. स्क्रीनप्ले आणि दिग्दर्शकाची ट्रीटमेंट... किती उथळ याला काही मर्यादा!! लहानपणी नाही का युद्ध युद्ध खेळताना.. पाकिस्तानी सैनिक कसले पावटे असतात अश्या स्टोरीज असायच्या तसली सगळी ट्रीटमेंट होती. मनोज वाजपेयी as usual डोक्यात जातो. चित्तरंजन गिरी (फिल्ममधला सुभेदार अहमद) अप्रतिम अभिनय. भोजपुरी तारा.. रवी किशन ही बरा वाटतो. कुमुद मिश्रा, मानव आणि तो दोडीया हे तिघेही बरे वाटतात. आणि चक्क सागर कॆम्पची फिल्म असून दोन्हीकडून गोळ्या सुटल्या आणि त्या समोरासमोर येऊन झ्झ्झ्झ्झ्झ्झ असं करून मग निघून गेल्या असं नव्हतं... 
|
Bee
| |
| Friday, March 16, 2007 - 9:47 am: |
| 
|
आसपास, अरे हा शोधा काही एक दोन आठवड्यांचा नाही. एखादा चित्रपट चांगला आहे असे कळले की तो बघायचाच असे मन ठरवून टाकले. पण हा चित्रपट मिळवणे किती दुर्मिळ हेही ठावूक असते. त्यामुळे एक पेशन्स निर्माण होतो. तुला सांगतो, स्पर्श चित्रपट मिळणे खरे तर खूप दुर्मिळ नाही पण मला हा चित्रपट ७ वर्षानंतर त्याची सीडी मिळाली तेंव्हा बघायला मिळाला. मुंबईमधे, जिथे टाईम्स ऑफ़ ईंडीयाची इमारत आहे त्याच्याच खाली एक जुन्या नविन मधल्या काळातील चित्रपट मिळण्याचे एक भव्य दुकान आहे. मी तेथून काही चित्रपटांच्या सीड्या विकत घेतल्यात. तपन सिन्हा, रितुपर्नो घोष ह्यांचे काही नविन चित्रपट मला मिळाले. NFDC निर्मित चित्रपट देखील मला तेथेच मिळाले. त्यानंतर मुंबईला दादरलाही एक mall सुरु झाला तेथे काही VCDes मिळाल्यात. अकोल्या सारख्या छोट्या शहरात 'मंडी', 'भुमिका', 'धारावी' ह्या सारखे चित्रपट मिळू शकले. मी कित्येक दुकानात पाय ठेवलेत, कित्येक वेबसाईट्स वाचल्यात. तेंव्हा कुठे मला हवे असलेले चित्रपट मिळू शकले. माझी स्वतचीच आता एक library काढायची आता इच्छा आहे. नाहीतरी काय करणार मी ह्या सर्व संग्रहाचे? पण असा विचार करण्यात असा एक प्रश्न आहे की आजच्या काळात धांगळधिंगा घालणारे चित्रपट इतके चालतात की art movies आवडणार्यांची संख्या खूप कमी आहे. तेंव्हा मीच ते आलटून पालटून बघत असतो.
|
Peshawa
| |
| Friday, March 16, 2007 - 11:39 am: |
| 
|
अहो बी हे art movie dime a dozen बनतात विशय वेगला म्हणजे movie मधे art येते असा आपला उगाच बेनेगल अणि socialist फ़िल्लम्वाल्यानि करुन दिलेला समज असा माझा गैर्समज आहे. तशि art movies चि चळवळ भरपुर मोठि आहे नुसते विशय "सव्तंत्र साम्जैक" म्हणजे सिणोमा art अस नाही. बकि मला ह्यातले जास्त कळत नाही पण जिथे कळत नाही तिथे हात्भर बोलावे ह्या नियमाला अनुसरुन बोल्लो...
|
पेशवा, हातभरच बोलायच तर मग इतक्या जोडाक्षरात कशाला? चांगले भो हो रि हि क ह र स्टाईलने बोल ना
|
hmmm का बर आवडला तुम्हाला सगळ्यांना HTPL इतका? काही द्रुष्य सोडली तर तसा बोरच होता की.
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 20, 2007 - 3:42 am: |
| 
|
रचना, गेल्या साप्ताहिक सकाळ मधे या चित्रपटाचे समीक्षण आलेले आहे. त्यात लिहिले आहे कि हा सिनेमा करताना दिग्दर्शिकेने, सर्वच रुढ संकेताना झुगारले आहे. नायक नायिका ईतकेच नव्हे तर कथा हि तिला आवश्यक वाटली नाही. केवळ पात्रं आणि प्रसंग यावरच या सिनेमाचा डोलारा उभा आहे. थोडे सरप्राईज एलीमेंट्स सोडले तर सगळीच पात्रे अगदी सामान्य आहेत. त्यातले प्रसंगहि बहुतांशी घडु शकतील असे आहेत. एक मेड फ़ॉर ईच अदर असे जोडपे आहे तर एक नॉट मेड फ़ॉर ईच अदर असे आहे. एक तरुणपणी अट्टाहासाने परंपरा जपणारे आहे तर एक उतारवयात परंपरा जुगारणारे आहे. जोडीदाराच्या बाबतीत एकच समस्या असुनहि एक बायको त्याला समंजसपणे सामोरी जाते तर दुसरीच्या ते लक्षातहि येत नाही. आणि या सगळ्या सिनेमात कुणी अभिनय करतेय असे वाटतच नाही. अगदी अमिशाचा बालिशपणाहि नाटकी वाटत नाही.
|
Sas
| |
| Tuesday, March 20, 2007 - 5:35 pm: |
| 
|
दिनशदा बरोबर आहे no story but good time pass movie. HTPL एकदा पहाण्या सारखा आहे. काही काल्पनिक पात्र ही उगाच घातल्या सारखी न वाटता मस्त हसवितात. मधे मधे धमाल येते विशेषता त्या गाण्यात जिथे बंगाली होश में नही होता. काही त्रुटी आहेत but no movies is perfect
|
लहानपणचे superhit movies पहायची हुक्की आली म्हणून " लव्ह स्टोरी " आणि " रॉकी " आणून पाहिले . दोन्ही movies मधली R.D. ची अतिशय आवडती गाणी सोडली तर कसले फ़डतुस आहेत दोन्ही movies! कथा ! संवाद , direction अत्यंत टुकार खरे तर इतकी चांगली गाणी वाया घालवली आहेत दोन्ही मधे ! " आ देखे जरा " सारख्या catchy गाण्या वर कसले भयंकर हात पाय मारले आहेत संजु बाबा आणि शक्ती कपूर नी .. पण तरीही मज्जा वाटली त्या वेळचे hit movies पहाताना .
|
Sashal
| |
| Thursday, March 22, 2007 - 4:26 pm: |
| 
|
Traffic Signal चांगला आहे .. पण मुंबईचं ते चित्र बघून वाईटच जास्त वाटलं ..
|
Divya
| |
| Thursday, March 22, 2007 - 4:45 pm: |
| 
|
कोणी इथे रेखा आणि विनोद मेहेराचा घर बघीतला आहे का? मला इथे dvd/video rent मिळाली नाहि.. कोणी पाहिला असल्यास संगेल का थोडक्यात review ....
|
Sashal
| |
| Thursday, March 22, 2007 - 4:49 pm: |
| 
|
acting साठी बघण्यासारखा आहे .. गुलजार -R.D. combination मग आणखी काय हवं? नवरा - बायकोवर एक संकट कोसळतं, भावनिक गुंतागुंतीकडे घेऊन जाणारं .. विषय चांगला आहे आणि चित्रपटही चांगला आहे ..
|
Dineshvs
| |
| Thursday, March 22, 2007 - 5:00 pm: |
| 
|
दिव्या, आजकल पाव जमीपर नही पडते मेरे, सारखी सुंदर गाणी आहेत त्यात. जुन्या सिनेमापैकी मला पाकिजा, दुश्मन, बंदिनी, खामोशी, जाने भी दो यारो परत परत बघावेसे वाटतात. खरे तर एकदा वेळ काढुन सगळ्या सिनेमाची यादी केली पाहिजे.
|
मला पण ट्रॅफ़िक सिगनल चांगला वाटला . नुक्कड serial पहाताना जसे वाटायचे तसे अंतर्मुख करणारा आहे , यातली characters पण थोडी नुक्कड मधल्या characters सारखी वाटली . कोणी अभिनय करतय असं वाटतच नाही , कुणाल खेमू , रणभीर शौरी , नीतु चन्द्रा , सर्व बाल कलाकार आणि इतर अनेक लहान मोठ्या पात्रांची कामगिरी खरच लाजवाब आहे . Dialogs पण एकदम लक्षात रहाणारे आहेत .. कुनाल खेमूच्या सुरवातीच्यास्वगता मधे " सिगनल पे रुकने वाली हर छोटी बडी गाडी अपनी model की उच नीच छोड कंधे से कंधा मिलाकर ऐसी खडी रहती मानो कि आपुन के सिगल को सलामी दे रही है " किंवा नव शिकाउ भिकार्यांना training देतानाचे dialog.." हक्क से मांगनेका क्या , सोचन्केआ के आपुन लोग भिक मांगते है तो इन लोगोंके पाप धुलते है " मधुर भांडारकर ने ट्रॅफ़िक सिगनल ला थांबणार्या गाड्यां मधले लोक दाखवताना page-3 style सगळी characters ही दाखवून घेतली आहेत ... typical alcoholic women,Gay fashion designer, लंपट म्हातारे , taxi drivers etc.. आयटम नंबर मधली वैशाली सामंत ची लावणी OK आहे , डान्स काही खास नाही . " वोह जिस दिन तेरी मेरी बात होती है " गाण्यात माझी शालेय मैत्रीण योगिता गोडबोले - पाठक हिचा आवाज एका गाण्यात ऐकून एकदम surprising वाटल , छान गायलीये . ट्रॅफ़िक सिग्नल ही किती मोठी business indisrty आहे आणि त्यात किती लोक involved असतात हे दाखवण्याचा चांगला प्रयत्न केलाय मधुर ने . अर्थात मधुर भांडारकर च्या movies चा उतरता ग्राफ असला तरी पण एकदा पहाण्या सारखा आहे ट्रॅफ़िक सिगनल .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|