|
Ekrasik
| |
| Thursday, February 08, 2007 - 9:52 pm: |
| 
|
काही दिवसापुर्वी घडलेला किस्सा. मला व हेनरी (माझा सहकारी) ला कामासाठी अटलान्टा ला जायचे होते. हेनरी रात्री निघणार होता कारण त्याला साकळी ९ वजता मीटिंग होती. आणि मी दुसर्या दिवशी सकाळी. मझे विमान थोडे उशिरा निघाल्यामुळे मी सधारण सकाळी ११.३० ला अटलान्टा ला पोचलो. बॅग घेतली आणि हेनरी चा फ़ोन आला, मी विचारल मीटिंग कशी झाली, तर म्हणाला मीटिंग कसली, मी पण ऐरपोर्ट वरच आहे. मला कळेना, काल रात्री निघालेला हा आजुन इथेच कसा? तर झाल काय की, रात्री स्नो स्टोर्म मुळे हेनरी चे विमान उशीरा सुटले. आणि एन वेळी गेट पण बदलले. (हे त्याच्या लक्शात आले नाही) आणि हा विमानात जाउन बसला. आणि बरीच रात्र झाल्याने लगेच झोपला. विमान लॅन्ड झाले, आणि कप्टन ने स्वागत केले "welcome to Raleigh " हेनरी ची हवा तंग. हा गडी भलत्याच विमानात बसुन अटलान्टा एवजी "Raleigh, NC" ला पोचला होता हे कळल्यावर माझी हसुन हसुन पडायची वेळ आली. :D :D all of us in the office are still wondering "how in the world did the airport staff at the gate NOT check his boarding pass" and the coincidence that there was no seat conflict!!!!
|
Runi
| |
| Friday, February 09, 2007 - 5:33 pm: |
| 
|
हा किस्सा माझ्या बहीणीचा आहे, इथे कुठे दुसरा वेंधळेपणाचा बी बी सापडला नाही म्हणुन इथे टाकतेय हा किस्सा. कुणाच्याही कुठल्या व्यंगावर हसण्यासाठी हा किस्सा लिहीत नाहिये मी, फक्त वेंधळेपणा साठी लिहीतेय. माझी बहीण सध्या बी. एड. करतेय, त्यांना त्यासाठी वेगवेगळ्या शाळांमध्ये जावुन एखाद्या वर्गावर पाठ घ्यायचा असतो (जावुन शिकवायचे). त्याप्रमाणे माझी बहीण वर्गात गेली आणि शिकवायला सुरुवात केली. तिला हा वर्ग नेहमी पेक्षा जरा जास्त शांत वाटला त्यामुळे ती खुष की अरे वा मुले आपले बोलणे मन लावुन ऐकताहेत, तिचे शिकवणे संपत आले असताना त्या शाळेतले एक शिक्षक पळत वर्गात आले आणि तिला म्हणाले अहो बाई तुम्ही चुकीच्या वर्गावर पाठ घेताय, हा वर्ग कर्णबधीर मुलांचा आहे.
|
Ekrasik
| |
| Friday, February 09, 2007 - 8:57 pm: |
| 
|
कामा निमित्त u.s. ला गेलो होतो. airport वरुन एक फ़ोन करायचा होता, नेमका मोबाइल मेला होता. public fon गाठला. quarter टाकला, पण परत आला. आस ४-५ वेळा झाल, मला कळेना काय गडबड आहे... मला वाटल फ़ोन खराब आहे. दुसरी कडे गेलो. तिथेही हाच प्रकार. मग लक्शात आल, US fon मधे Canadian नाणी चालत नाहीत.
|
एकदा ईलेक्ट्रिकलचे प्रत्याकशित चालु होते सर आम्हाला व्होलटेज घ्यायला शिकवत होते . वायर मध्ये सप्लाय नव्हता त्या मुळे ते बिनधास्त वायर हातात घेउन समजावत होते ति वायर पंख्याच्या बटना मधुन घेतलि होति. माहिति सांगण्याच काम चालु होत. मि जरा उशिरा पोहोचलो प्रक्टिकल चालु होत. जरा उकाडा होतो म्हणुन आल्या बरोबर पंखा चालु केला. तशे सर हलायला लगले कुनाला कहि कळलच नाहि काय होत आहे . जोरात ओरडुन वायर हातातुन सुडलि मजबुत दनका खाल्ला मस्तरांनि. व्होलटेज घेन बाजुलाच राहिल कोफ़ि , चहा ............. नंतर कळाल कि हे सगळ माझ्या मुळे झाल. पुढे कधिहि प्रक्टिकल आसेल तेव्हा मला पहिले शोधायचे. आरे नितिन कुठे........
|
आत्ता मागल्या आठ्वड्यातली गोष्ट. आम्च्या शाळेत स्नेह्स्म्मेलनाचे काम सुरु आहे त्यामुळे आम्हा शिक्श्कांना बरेचदा शाळेनंतरही खरेदी साठी जावे लागते. त्या दिवशी देखिल आम्ही खरेदीला गेलो होतो, अन मूड अजीबात नव्हता. जरा कंटाळतच काम सुरु होत. अर्थात प्रिन्सिपल वर फ़ायरिन्ग देखील सुरुच होत. इतक्यात मझा सेल वाजला, बघते ते प्रिन्सिपल्चा फ़ोन. मी अगदी अदबीन गुड आफ़्टर्नून वगरे विश केलं. तिकडून रिप्लाय आला तो असा. suruchi,from next time make sure that keypad of ur cell is locked so that it will not make call to last dialed number and yes, be sure that ur cell is not connected to the person while u talk abt him with someone eles
|
हा वेंधळेपणा म्हणता येनार की नाही माहीती नाही पण मला बगळ्यांची माळ फुले हे गाण डाऊन लोड करायच होत. मी तिथे लिहिल bagaLyaa.nchee maaL मायबोलीचा एक परिनाम.
|
Zakki
| |
| Tuesday, February 13, 2007 - 11:22 am: |
| 
|
अहो, या मराठीच्या प्रेमामुळे, मायबोली मुळे, मी पण इंग्रजीत लिहीताना सुद्धा मायबोलीसारखे लिहू लागलो आहे. पण माझे कोण ऐकणार, वाचणार? म्हणून फरक पडत नाही. कारण मला फक्त क्रेडिट कार्ड विकणारे, नि आमच्याकडे पैसे गुंतवा म्हणणारे फोन करतात, त्यांना मी शिव्या दिल्या तरी त्यांना चालतात.
|
Rahul16
| |
| Tuesday, February 13, 2007 - 12:37 pm: |
| 
|
suruchi nanatar kay zale te pan sang.... kharedi mahagat padali ka?...
|
काल दुसर्या डीपार्टेमंटमधल्या देशपांडेकडून माहिती आणायची होती. देशपांडे चांगले साठिचे ग्रुहस्थ आहेत. व्यवस्थित गप्पा क्झाल्या. त्यानी चहाही मागवला. नेमके ते माझ्या आईच्या माहेरच्या भागातले निघाले. आज दुपारी दोन वाजता त्याच डीपार्टमेंटच्या केळकराकडे गेले होते. त्याच्या केबिनमधे अजून एक कोणतरी होतं. केळकरानी मला काल दिलेली माहिती परत द्यायला सुरुवात केली. "सर, हे सगळी इन्फ़ो मला मिळाली..." "कुणी दिली?" "तुमच्याच डीपार्टमेंटचे देशपांडे आहेत ना.. त्यानी,,," केळकराच्या बाजुला बसलेले म्हणाले. "अहो, मीच तो देशपांडे..."
|
नंदिनि तु आता डोळे तपासुन घे , असा मानस न ओळखायचा प्रोग्राम घरि करु नकोस नहि तर पक्का घोटाळा करशिल............
|
अरे, नितीन वरच्या archives मधे वाच. माझ्या चष्म्याचे आणि लेन्सचे भरपूर किस्से आहेत,आणि मी त्याना बघितले नाही असे नाही तर त्याचा चेहरा विसरले.
|
Sia
| |
| Saturday, February 17, 2007 - 8:06 am: |
| 
|
ह्या लेन्स वरन माझा १ किस्सा आठवला, मी तेव्हा नविन लेन्स घालायला लागले होते. सकाळी लेन्स घालायची होति बघितल तर लेन्स चा डब्बा नेहमीच्या जागेवर नव्हता. आणी मला अशी सवय आहे हरावा हारवी कराय्ची त्या मुळे सवयी प्रमाणे लेन्स शोधायला चालू केल, पण मग कोलेगे ला जायला उशीर होत होता म्हणून मग चष्मा घालून जायच ठरवल, चष्मा घातला आणी काही दीसेनास झाल. मग डोक्याला हात मारून घेतला काराण मी रात्री लेन्स घालूनच झोपले होते.
|
सिया, मी पण लेन्स घालून चष्मा शोधलाय बर्याचदा. पण डोळ्यात लेन्स घालून झोपणे हे धोकादायी आहे. त्याने कदाचित डोळे कायमचे जाऊ शकतात. नीट काळजी घे
|
Sia
| |
| Saturday, February 17, 2007 - 2:27 pm: |
| 
|
हो ग नन्दिनी लेन्स घालून झोपण खूप धोकादायक आहे. त्या दिवसा पासन कानाला खाडा लावला आणि अस परत कधी केल नाही.
|
Chyayla
| |
| Sunday, February 18, 2007 - 12:59 am: |
| 
|
त्या दिवसा पासन कानाला खाडा लावला आणि अस परत कधी केल नाही सिया हे कानात खाडे बिडे घालणे पण धोक्याच असत असे म्हणतात, असल काही कानाला पण लावु नकोस...
|
Chyayla
| |
| Sunday, February 18, 2007 - 1:34 am: |
| 
|
स्वामी आहे ना माझ्या रुम पार्टनरचा सहकारी आणी टिपिकल तामिल. मी ना त्याच्या नावाचा उल्लेख "अय्यो स्वामी" म्हणुनच जोरात ओरडुन करतो. हा माझा नेहमीचा ईब्लिसपणा... पण कोण जाणे त्याच नाव घेतला ना की नेमका टपकतोच अचानक. नवीन वर्षाची पार्टी होती सगळ्या देशीन्नी मिळुन अपार्टमेन्टच्या क्लब हाउस मधे साजरी करणी चालु होती. माझे समोसा खाणे आणी ज्युस पिणे चालु होते आणी समोर व्रुषान्क त्याचा हातात मदीरा पेला घेउन बसला होता. टिपिकल लोकान्च्या BB वर तामिळ लोकानबद्दल जी माहिती दीली ती मी त्याला देत होतो. "you know how to recognise if someone is tamil? if you see someone wearing Typical monkey cap....." आणी पहातो तो काय समोरच नेमका स्वामी आणी तो ही माकड टोपी घालुनच हजर झाला आणी माझी बोलती बन्द झाली. कदाचित त्याला काही ऐकु गेले नसावे तो फ़क्त " Hi Samir" म्हणुन पुढे चालला गेला. व्रुशान्क सुरु झाला "अबे तेरा न्यु इयर तो हो जाता पर वो ह्याप्पी नही होता, बच गया बेटा, पर तेरी बात एकदम सही निकली". असाच एक दीवस सुट्टीच्या दीवशी लहर आली म्हणुन मी जोरात ओरडत होतो "अय्यो स्वामी..." आणी दारावर ठकठक झाली आणी हे स्वामी महाशय हजर आणी परत एकदा माझा MTv वाहिनीचा, दुरदर्शन वाहिनी झाली. परत एक दीवस असाच ओरडलो आणी समोर रन्गा मोबाईल वर बोलता बोलता हातवारे करुन चुप बसायला विनन्ती करत होता. बोलणे झाल्यावर तो म्हणाला " अबे फ़ोन पे वो स्वामी ही था " मी जीभ चावली आणी बाहेर फ़िरायला पडलो तर नेमका हा "अय्यो स्वामी" मला सामोरा... परत एकदा "Hi Samir" आणी मी आपला मनातल्या मनात मला हसु आवरेना. कुणास ठाउक त्याला कधी तरी कळाले असेल की हा आपल्या नावाचा असा उद्धार करत असतो म्हणुन... पण ईब्लिसपणा करणे आमचा हक्क आहे आणी तो मी घेउनच रहातो... तर बोला अय्योSSS स्वामीSSS...
|
Shree123
| |
| Monday, February 19, 2007 - 7:31 am: |
| 
|
मित्र हो मी इथे नवा आहे पण तुम्हा सर्वान्चे किस्से ऐकुन खरोखरच खुपच हसायला आल एवडि मराठि मन्ड्ळी पाहुन खुप बर वाट्ल.
|
Shree123
| |
| Monday, February 19, 2007 - 12:21 pm: |
| 
|
माझा हि एक वेन्धळेपना मी इथे लिहित आहे दुसरीत असताना ची गोश्ट आहे.दिवाळी च्या किल्ल्यासाठी मला रोड बनवायचा होता आणि आमच्या शाळेसमोरील रोडचे डाम्बरीकरण चालु होत. मित्रा ना मी मोठ्या फुशारकी ने सान्गितले की रोड मी बनवणार आणी काय दुसर्यादिवशी डाम्बराचा गोळा तयार करुन घेतला शाळेच्या मधल्या सुट्टीत.... पण ठेवनार कुठे??? ठेवला दप्तरात घरी गेल्यावर मारे खुशी खुशी डाम्बराचा गोळा काढायला गेलो तर सगळी वह्या पुस्तके पाटी डबा डाम्बराने माखुन गेलेले. काही करण्याच्या आत आईचा धपाटा पाठीत. लागलेल डाम्बर काढण्या साठी किती रॉकेल गेल हे सान्गण्यात काही अर्थ नाही.
|
लहानपणी सुरकुतलेल्या कपड्यांना इस्त्री करताना पाहिले होते. एकदा बेदाण्यावरील सुरकुत्या बघून त्यावर गरम इस्त्री फिरवायचा प्रयोग केला होता. त्या प्रयोगात इस्त्रीवर पडलेले बेदाण्याचे डाग कित्येक वर्षे टिकून होते.
|
Zakasrao
| |
| Tuesday, February 20, 2007 - 6:04 am: |
| 
|
मी ७वी ८वी त असेन. त्यावेळी मी मे महिन्याच्या सुटीत मावशीच्या गावाला गेलो होतो. गाव पन्हाळा तालुक्यात आहे. तेथुन कोल्हापुरला फ़क्त येकच ST असायची सकाळी. तर मामाच्या गावची जत्रा होती. तिकडे जायचे होते. मी व माझा मावसभाउ दोघे ST च्या आधी जाण्यासाठी दूध घेउन जाणार्या tempo मधुन निघालो. टेंपोचालक माझ्या भावाचा मित्र होता. ते बोलले कि मी तुम्हाला केर्ली येथे सोडतो तुम्ही तेथुन कोतोली फाटयाला चालत जा तेथुन काहितरी वाहन मिळेल. मावसभाउ माझ्यापेक्षा फ़क्त १ वर्षाने मोठा होता. दोघेही जास्त कोठे न फ़िरलेले. त्यामुळे solid गोची झाली होती. आम्ही टेंपोमधुन उतरलो ते केर्ली या गावी. ते जोतिबाच्या पायथ्याशी आहे. आणि तेथुन कोल्हापुरच्या दिशेला तोंड करुन चालत राहिलो. तब्बल ४ ते ५ कि.मी. चालुनही कोतोली फाटा येत नाही उलट कोल्हापुरज़वळ आल्याच्या ओळखीच्या खुणा दिसत होत्या म्हणुन एका माणसाला विचारले तर त्याने एकदा नीट न्ह्याहळुन पाहिले व म्हणाला तुम्ही उलट्या दिशेला जात आहात. कोतोली फाटा तर तिकडे आहे. मग काय? खिश्यामधे कमी पैसे त्यामुळे परत चालत चालत गेलो. फाट्यावर आमच्या आधी मावशी व माझा दुसरा एक भाउ आमच्या आधीच पोहोचले होते. त्याच भावाला आम्ही दोघांनी मिळुन खुप चिडवले होते की आम्ही तुज़्या आधी जाणार असे. तो मात्र आता खुश झाला होता. नेमका problem असा होता की तेथे दोन गाव आहेत ज्यांची नाव confusing आहेत. केर्ली आणी केर्ले. ह्या दोन गावंच्या मधे कोतोली फाटा येतो. आम्हाला फ़क्त येवढेच माहित होते की केर्ल्याला उतरायचे आणि कोल्हापुरच्या दिशेला चालत जायचे. आम्हाला हे दोन गाव आणि नाव माहित नव्हते. घरि गेल्यावर सर्व नातेवाइकांनी मस्त खिल्ली उडवली होती. आम्ही आजही ते आठवले कि खुप हसतो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|