|
सलाम - ए - इष्क : सहा love stories पैकी एकही appealing नाही वाटली . बघण्या सारखे काही असेल तर गोविंदाचा खूप दिवसांनी पुन्हा एकदा जबरदस्तं rocking performance, अक्षय खन्ना चा अभिनय आणि जॉन अब्राहम . सहा कथां पैकी बर्याचशा घीस्यापीट्या : अनिल जुही : ही सर्वात भंकस स्टोरी , जुही आणि अनिलचे एकापेक्षा एक बकवास performances!! काहीही नवीन नाही , पुन्हा एकदा नो एंट्री theme, पण नोएंट्री मधे कॉमेडी छान घेतली होती , यात नुसतेच लफ़डे ! सलमान - प्रियांका : हे पण अतिशय डोळ्यात खुपतात ... सलमान खान अतिशय म्हातारा , अत्यंत टुकार अभिनय (?) करतो , प्रियांका चोप्रा पण irritate करते , फ़टाकडी item girl म्हणून अज्जिबा sss त शोभत नाही , साधी glamerous पण दिसत नाही . शिल्पा शेट्टी , बिपाषा , कोयना , श्वेता साळवी किती तरी options होत्या या role साठी सुहेल - इषा : यांची स्टोरी तर मधेच सोडून च दिली , सुरवातीला वाटले चांगली कॉमेडी असेल पण नंतर त्यांना गायबच केले ! अक्षय - आयेशा : पुन्हा एकदा सलाम नमस्ते , प्यार के side effects ची theme, nothing impressive! अक्षय खन्ना चांगला वाटला , आयेशा ताकियाला काही काम नाहीये . गोविंदा - कोणी तरी blonde मुलगी : त्यातल्या त्यात entertraining आहे पण पुन्हा एकदा राजा हिंदुस्तानी -french kiss- हम दिल्दे चुके सनम ची मिसळ . गोविंदा मात्र झक्कास , एकदम भाव खाउन जातो ! जॉन - विद्या : ही स्टोरी फ़क्त जॉन आहे म्हणून सुसह्य . कदाचित जरा वेगळी वाटली असती जर अजुन चांगली रंगवली असती तर ! पण ही सुध्दा शेवटी गुंडाळून च टाकली ! विद्या बालन नाही आवडली या वेळी , दिसत पण नाही खास !.. तिचे long tops with skirt एकदम dull वाटले . आणि जॉन सारखा तिच्या गालावरचे मळकट आश्रु चाटतो ते पाहून मळमळायला लागलं ! Oveall भट्टी काही जमली नाही !
|
Maitreyee
| |
| Sunday, February 04, 2007 - 10:32 pm: |
| 
|
हो हो असंच काही तरी लिहायला आले होते मी फ़ाल्तू movie एकदम! महा बोरिन्ग!शिवाय रटाळ गाणी! आणि एवढं जॉन ला घेतलं तर त्या सारखं बदाबदा रडत बसायच्या रोल मधे का! शाहरुख वगैरे टाईप एखादा हातखंडा रड्या घ्यायचा की तिथे! आणि या सहा एक से एक टुकार कथा एकत्र करण्याचं काही कारण पण कळलं नाही मला!
|
Zakki
| |
| Monday, February 05, 2007 - 1:28 am: |
| 
|
हे एव्हढे सगळे सांगीतले तरी आमच्या घरी तो सिनेमा विकत आणण्यात येईलच! कारण कुठलाहि हिंदी सिनेमा हा वाईट नसतो, असे आमच्या घरी म्हणतात. मी अत्यंत शहाणपणाने कुठलाहि हिंदी सिनेमा बघतच नाही, म्हणजे काही बोलायला नको नि भांडणे व्हायला नकोत. (सुखी संसाराचे रहस्य?!)
|
त्यात नशीब की त्या सोहेल आणि इषाचा अचरटपणा मध्येच कापला, नाहीतर चित्रपट पाच तासांचा झाला असता...
|
Dineshvs
| |
| Monday, February 05, 2007 - 4:06 pm: |
| 
|
हे असे खिचडि सिनेमे कश्याला काढतात ? एक ना धड !!! अजुन हनीमुन एक्सप्रेस नावाचा सिनेमा येतोय. त्यातहि अशीच जोडपी आहेत. अगदी शबाना आझमी, बोमन ईराणी, पासुन आहेत सगळे. बघुया काय उजेड पाडताहेत ते.
|
शाहरुख वगैरे टाईप एखादा हातखंडा रड्या >>>>मैत्रेयी ह ह पु वा.
|
Zakasrao
| |
| Tuesday, February 06, 2007 - 4:40 am: |
| 
|
कालच मातीच्या चुली पाहिला. घरोघरी मातीच्या चुली ह्या म्हणीवरुन हे title घेतल आहे. श्रीरंग दांडेकर (सुधीर जोशी ) आणी सुनंदा (वंदना गुप्ते) त्यांचा मुलगा विशाल (अंकुश चौधरी) त्याची बायको (मधुरा वेलणकर) विशाल soft. engg. आहे.मधुरा MBA असुन manager post वर काम करत आहे. त्यांच love marriage आहे. सासु सुनेच पटत नाही. घरात होणारी भांडण, त्यांचे relations , घरातिल ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करणारे श्री, अनेक बारिक सारिक गोष्टी मस्त टिपलेल्या आहेत. मधुराचे वडिल (कर्नल भोसले) म्हनुन संजय मोने आहेत. मला हा आवडला एकद पाहण्यासारखा नक्कि आहे. शेवट गोड आहे. पण वाइटातुन चांगल कस निघत ते छान वाटल. वंदना गुप्तेंची सासु लाजवाब. सुधिर जोशी पण छान वाटले. संजय मोने भाव खावुन जातात. अंकुश व मधुरा ठिक. सुधिर जोशी गेल्यामुळे काही प्रसंगात त्यांच्या ऐवजी आंनद अभ्यंकर आहेत. माझी सुरवात पहायला चुकली. त्यामुळे दिग्दर्शक कोण ते माहित नाही.
|
Maku
| |
| Tuesday, February 06, 2007 - 5:17 am: |
| 
|
महेश मान्जरेकर आहे बहुतेक.
|
Bee
| |
| Tuesday, February 06, 2007 - 9:37 am: |
| 
|
हे असे खिचडि सिनेमे कश्याला काढतात ? एक ना धड !!! >>>ते तर चालणारच. पण पब्लिक अशाही चित्रपटांना तुफ़ान प्रतिसाद देते हे अगदी नवल वाटण्याजोगे आहे. माहिती आहे, आजचे चित्रपट बकवास आहेत. खुद्द review लिहिणारे हे नियमित सांगत असतात. पण तेच नंतर चित्रपटही बघतात (हा इथल्या कुणालाच टोमणा नाही.. just general मत मांडत आहे..) झक्कासराव बघायला हवा हा चित्रपट..
|
Sakhi_d
| |
| Tuesday, February 06, 2007 - 9:44 am: |
| 
|
झकासराव, खरय हा सिनेमा छानच आहे. वंदना गुप्ते आणि सुधीर जोशीची काम खुपच छान झली आहेते. कुठेच कंटाळवाणा होत नाही आणि टिपिकल मराठी रडारड नाही मला आवडला.... छान आहे.
|
Mahaguru
| |
| Tuesday, February 06, 2007 - 10:21 pm: |
| 
|
आजचे चित्रपट बकवास आहेत. खुद्द review लिहिणारे हे नियमित सांगत असतात. >> बघितल्यशिवाय बकवास आहे का नाही ते कसे कळणार?
|
Bee
| |
| Wednesday, February 07, 2007 - 2:43 am: |
| 
|
हल्ली झीवर आणि सोनी वर ट्रेलर दाखवतात. त्यावरुन कळतं त्यातली गाणी कशी आहेत. आजकाल अंग उघडनागडं टाकणार्यांची काही कमी नसते. त्यावरुनही कळतं नक्की चित्रपटाचा उद्देश काय आहे. गाणी संगीत हेही सडकछाप असतात. कलाकार तेच तेच, त्याच जोड्या, तोच त्यांचा get-up & make-up असतो. चित्रपटाचा आशयही असातसाच असतो. म्हणजे एकूण चित्रपट हे सुमार म्हणण्यालायकही नसतात. चार चित्रपट लगातार बघितले की कळतं की हल्लीचे चित्रपट काहीच देऊ शकत नाही. मनोरंजनही देऊ शकत नाही. दिशा, प्रेरणा, संवेदनाची बातच नको मग.. मी तरी हेच logic वापरतो की कुठलाही चित्रपट आला की निदान एक वर्ष तरी तो बघू नये. मग इथे तिथे लोकांच्या प्रतिक्रिया कळतात त्यावरुन आपण आपले ठरवावे. ज्यांची नोकरी review शी related आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे.. हे पोष्ट देखील कुणालाच टोमणा म्हणून लिहिलेले नाही
|
Mahesh
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:49 am: |
| 
|
बी, अगदी पुरेपुर सहमत आहे. माझेपण या विषयावरून मित्रमंडळींबरोबर वाद होतात. पाहिल्याशिवाय कसे कळणार याला काही अर्थ नाहीये. कारण टुकार गोष्टी पहाण्यासाठी वेळ घालवायची काही गरज नाही. ट्रेलरवरूनच कळते. शितावरून भाताची परिक्षा. सगळेच चित्रपट वाईट असतात असे नाही. कायद्याच बोला सारखे चांगले पण असतात. पण त्याची संख्या खुपच कमी आहे. परवा हौसेने डोंबिवली फास्ट पहायला सुरूवात केली. त्याची सुरूवातच एवढी विचित्र भाषेत आहे. माझी मुलगी हल्ली जे कानावर पडते ते बोलुन पहाण्याच्या वयात आहे. त्यामुळे पहिल्या २ मिनिटात बंद केला.
|
Bee
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:57 am: |
| 
|
पण मी तर डोम्बीवली फ़ास्टबद्दल खूप काही चांगले ऐकूण आहे. इथे सिंगापोरधे आत्ता कसलातरी film festival झाला होता त्यात म्हणे हा चित्रपट दाखवला. हे मला दुसर्या दिवशी कळले तेंव्हा खुप कळवळलो मी..
|
Maitreyee
| |
| Wednesday, February 07, 2007 - 11:58 am: |
| 
|
महेश, डोंबिवली फ़ास्ट लेक झोपलेली असताना परत नेटाने बघ खरच छान आहे, मला तरी आवडला
|
Yogibear
| |
| Wednesday, February 07, 2007 - 2:36 pm: |
| 
|
सुरेख चित्रपट आहे 'डोंबिवली फ़ास्ट', नेहेमीपेक्षा वेगळा, एका सामान्य माणसाची रोजच्या जीवनातली आन्याया विरुद्ध काहितरी करायाची धडपड आणि त्यातुन आलेले frustration .... जरुर बघावा....
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, February 07, 2007 - 4:20 pm: |
| 
|
मलाही आवडला डोंबीवली फास्ट.सत्य परिस्तिथी वर आधारीत. पण शेवटी चंद्रकांत गोखले येऊन जे सांगतात की तु निवडलेला मार्ग चुकीचा आहे हे मात्र खरेच पटले नाही. शांततेने किती लोकांना सामोरे जायचे. (त्या मुलीला तो tanker वाला ज्या नजरेने पाहातो ते काय त्याला शांत पण सांगीतले की पाहु नको, तो काय पाहाने थांबवनार काय?) कधी कधी बॅट हातात घ्यावीच लागते.
|
Suyog
| |
| Wednesday, February 07, 2007 - 5:54 pm: |
| 
|
Some of the good movies I saw recently: dombivali fast, kaydyayche bola, yanda kartavya ahe, dor, saudagar (amitabh)
|
Sas
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:09 pm: |
| 
|
'देख कबीरा रोया' जुनी B&W must see comedy परवाच पाहीला मस्त आहे, गाणी, कलाकार सार छान. धांगडधिंगा, कर्कश आवाज, भडक मेकप चित्रपटांचा कंटाळा आला असेल तर जरुर पहावा. "मालगुडि डेज" (Malgudi Days) च्या DVDs चा सेट Fremont CA लायब्ररित मिळाला. Total 13 Episoes आहेत. सार तसच आहे फक्त भाषा English ; सही अनुभव आहे बघण्याचा. Pls Note: Fremont मध्ये असाला तर निदान पुढचे ७-८ दिवस Malgudi Days लायब्ररीत मिळणार नाही कारण सध्या मी आणल्या आहेत त्या Dvds
|
Zakki
| |
| Thursday, February 08, 2007 - 12:06 am: |
| 
|
नुकतेच एकापाठोपाठ 'बिनधास्त' नि 'सातच्या आत घरात' असे दोन सिनेमे पाहिले. दोन्ही सिनेमात कॉलेजमधल्या मुली, मुले, त्यांचे 'विश्व' नि इतर खरी बाहेरची दुनिया यात किती फरक असतो हे दाखवले आहे. त्या मुलींची मला अतिशय दया आली. श्रीमंताच्या मुली, कॉलेजमधे शिकणार्या, पार्टी, मित्र, धम्माल, एव्हढेच त्यांचे विश्व! बरे अक्कल म्हणावी तर आधीच मुली, त्यातून श्रीमंत, नि त्यातून कॉलेजमधल्या. त्यांना खर्या जगाची काय कल्पना? त्यांनी आपले ठरवले की virginity is overrated, याऽर वगैरे वगैरे. पण त्यांनी जरी असे ठरवले तरी बाकीचे जग अजून black & white सिनेमा च्या जगात, व्हॅलेंटाईन डे ला विरोध करणारे! ( तो भाग मुद्दाम रंगीत न दाखवण्यात दिग्दर्शकाची हुषारी दिसून येते? की आमची टेप खराब होती?!) शिवाय कितीहि तुम्ही म्हणालात की आम्ही मोठ्ठे झालो, आम्हाला कळतं, तरी मुली नि मुले यांच्यात बराच फरक आहे. मुले अगदी वाट्टेल तशी वागली तरी चालते (खर्या जगात). पण मुली तश्या वागायला गेल्या तर खर्या जगात त्यांना काय प्रॉब्लेम येऊ शकतो ते त्यांच्या लक्षात येत नाही. खुद्द त्यांचाच कॉलेजमधला मित्र कसा वागतो त्या नंदिनीशी? तो तर त्यांच्यासारखाचा मॉडर्न ना? का तो आजकालच्या खर्या दुनियेत? तर हे कसे कळणार लहान वयात? म्हणून तर मी म्हणतो, वयाची चाळीस, पंचेचाळीस वर्षे झाल्याशिवाय तुम्हाला काऽही अक्कल नसते!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|