|
लालु , Prada पहाण्या आधी Rodeo ला जाउन purse रिकामी करावी म्हणते ! माझा नवरा मग म्हणेल 'Devil wears Prada' 
|
Asami
| |
| Monday, January 29, 2007 - 5:01 pm: |
| 
|
एमिली ब्लन्ट नाही आवडली कारे?>> Thik aahe ga. aamhI Keira आणी Scarlett भक्त मलापण त्यातल्या प्रत्येक snake चे character एकसुरी आणि irritating वाटले रे >> असेल कि पण त्यातल्या एकाही सापाला oscar nomination नाहिये for sure
|
Lalu
| |
| Monday, January 29, 2007 - 5:21 pm: |
| 
|
>>Scarlett भक्त 'Match point' पाहिलास की नाही मग? ते ऑस्कर चे मात्र खरे आहे, तिला गोल्डन ग्लोब का दिले ते पण नाही कळले. त्या डेन्च, स्ट्रीप, मिरेन, बेनिन्ग सगळ्याना एकदा लाईफटाईम देऊन टाकावे. आणि त्या राणीसाहेबांवरच्या मूव्ही ला एकदा देऊन टाकावे. मी केट ( Winslet ) फॅन, तिला मिळावे एकदा.
|
Asami
| |
| Monday, January 29, 2007 - 6:18 pm: |
| 
|
'Match point' पाहिलास की नाही मग? >> जुना झाला कि ग तो. पण twist मस्त आहे त्याचा त्या डेन्च, स्ट्रीप, मिरेन, बेनिन्ग सगळ्याना एकदा लाईफटाईम देऊन टाकावे.>>चोक्कस बोललीस Inconvinient Truth पाहिला कि बाकी सगळे भंपक वाटते राव . ह्याला oscar मिळाले तर बरे होइल. त्यानिमित्ताने तरी लोक पाहतील नि थोडा फ़रक पडेल.
|
Storvi
| |
| Monday, January 29, 2007 - 8:55 pm: |
| 
|
inconvinient truth बद्दल एकदम बरोबर बोललास असाम्या... Match point जबरदस्त twist आहे... पण मी आपली वाट बघत बसले, आता टेनीस खेळतील मग खेळतील कसल काय नी फ़ाटक्यात पाय ..
|
Asami
| |
| Monday, January 29, 2007 - 10:19 pm: |
| 
|
पण मी आपली वाट बघत बसले, आता टेनीस खेळतील >> खेळले कि सुरूवातीला टेनीस
|
Farend
| |
| Tuesday, January 30, 2007 - 3:56 am: |
| 
|
Lalu त्या लिस्ट मधे Lion King राहिला का? ( animated movies ) Akeelaah and the Bee खूप छान आहे, जरूर पाहा. पुढे काय होणार याचा अंदाज जरी आधीच आला तरी चित्रीकरण सुंदर केले आहे, विशेषत: क्लायमॅक्स. मलाही धूम २ फार आवडला नाही. ती पहिली बिपाशा बासू नंतर कोठे गायब झाली? आणि जर त्या ब्राझील मधल्या बिपाशाचा पहिल्या बिपाशाशी काही संबंध नसेल तर डबल रोल ची काय गरज होती? कारण तिला (पहिली) बिपाशा समजल्याने या लोकांचा काही फार गोंधळ होतो असेही नाही. मला एक डुलकी लागली होती, त्यामुळे मी काही हुकवले असेल तर सांगा. नाहीतर हा पहिला डबल रोल असेल की जो दोन वेगवेगळ्या नायिकांनी केला तरी चालले असते (बिपाशा ने buy 1 get 1 free ऑफर दिली असेल तर माहेत नाही ) आणि हृतिक आणि ऐश्वर्या ला लहान मुलांचा बास्केटबॉल दिला होता का? कारण तो बराच मोठा असतो ना? हृतिक च्या एका हातात बसतो ठीक आहे, पण ऐश्वर्या च्या ही? AB ला कोणीतरी full sleeve वाले शर्ट का दिले नाहीत? आणि मुळात एव्हढी सर्वात महागडी वस्तू म्युझियम मधे वगैरे ठेवलेली असताना सगळे वॉचमन ती खोली सोडून इतरत्र का बसतात कळत नाही. आणि मग उगाच क्लोज सर्कीट टीव्ही वगैरे. इतर देशांत ठीक आहे, पण भारतात जोधपूर मधे एव्हढा हिरा जर ठेवला तर त्या खोलीत दोन पगारी वॉचमन ठेवता येत नाहीत एक blooper वाटलेला शॉट म्हणजे बिपाशा उदय आणि अभिशेक बरोबर उघड्या मोटारीतून जात असते, त्यांच्या पेक्षा उंचावर बसली असते आणि तिचे केस जराही हलत नाहीत (आणि एन्ट्रीला तर कोठेही पंखा नसताना प्रत्येकाचे केस उडत असताअत). हे दृश्या अगदी मागे रस्त्यावरची फिल्म पळवल्यासारखे वाटत नाही, पण मग हे कसे घेतले कोणास ठाऊक?
|
Jadhavad
| |
| Tuesday, January 30, 2007 - 10:15 am: |
| 
|
एक विशेष सुचना: सलाम्-ए-इश्क बघणार्यांसाठी, कृपया आपल्या कडे ४ तास असतील, तर एक छान झोप घ्या, संध्याकाळी पाय मोकळे करुन या, पण असल्या डब्बा मुव्हीमध्ये पैसे वाया घालवु नका. अथवा मित्रांना पेँडिग पार्टी द्यायची असेल, तर त्यांना ह्या मुव्ही चे तिकीट देवुन तेथुन कटा. मी ६ लोकांचे १२ डॉलर प्रमाणे पैसे घालवुन एक तद्दन, खिचडी चा सिनेमा बघितला. त्या पेक्षा माझी LOVE ACTUALLY ची DVD आली असती. त्या मुव्ही च्या शॉक मधुन ३ दिवसानंतर recover झालो, आणी लगेच पोस्ट करतोय. एक दुखी आत्मा. अमित
|
Tulip
| |
| Tuesday, January 30, 2007 - 11:01 am: |
| 
|
मला आवडला सलाम्-ए-इश्क. पसरट झालाय खरा पण त्यासाठी सल्लूचे सगळे शॉट्स एडीट (खरंतर डिलीटचं) करायला हवे होते. but i enjoyed this movie . अनील्-जुही, गोविंदा-म्याडम आणि जॉन-विद्या ह्या तिघांचे story tracks छान आहेत. उलट मला निखील अडवानीच्या KHNH पेक्षा हा आवडला. काही काही शॉट्सच त्याचं टेकींग तर अफलातून आहे.
|
Zakki
| |
| Tuesday, January 30, 2007 - 2:45 pm: |
| 
|
पसरट झालाय अरे राम, मग आता 'extra wide screen TV' घ्यावा लागणार की काय बघायला? जरा नॉर्मल साईझ मधे बसेल असले सिनेमे का काढत नाहीत हे लोक?

|
Mbhure
| |
| Tuesday, January 30, 2007 - 5:10 pm: |
| 
|
" प्यार के साईड ईफेक्ट " पाहिला. चांगला TP आहे. जरा चावट(किंवा पांचट) विनोद चालत असतील तर बघण्यास हरकत नाही. राहुल बोस नेहमीप्रमाने सहज काम करतो. बाकी ठीक आहे. Sony TV वर ऍंथॉनी कौन है? पाहिल. चगला विषय आहे पण उगाचच अनावश्यक स्टोर्या आणि गाणी टाकुन चित्रपट स्लो केला आहे. अर्शद वारसीचे काम चांगले आहे.
|
Asami
| |
| Tuesday, January 30, 2007 - 6:23 pm: |
| 
|
anthony मधे जो slapstick comedy चा भाग केलाय तो भन्नाट आहे. बबन प्रभू नी अशोक सराफ़ ह्यांची आठवण झाली एकदम
|
Sayuri
| |
| Tuesday, January 30, 2007 - 6:45 pm: |
| 
|
'अगं बाई अरेच्चा!' मध्ये श्रीरंग (संजय नार्वेकर)च्या पत्नीचं काम केलेल्या अभिनेत्रीचं काय नाव आहे? बाकी अलिकडेच मराठीतारका.कॉम साईट पाहिली.http://www.marathitaraka.com/ (नुकतंच माधुरीच्या हस्ते 'मराठी तारका' पुस्तकही प्रसिद्ध केलं गेलं.) पण त्या सबंध साईटमध्ये माधुरीच नाव मला तरी काही दिसलं नाही.(पुस्तकात असलं तर माहित नाही) even मातोंडकरचंही नाही. जरी त्या हिंदी चित्रसृष्टीत नांदत असल्या तरी मूळ मराठीच असल्याने त्यांचं नाव असायला हवं होतं असं वाटतं.
|
Ami79
| |
| Wednesday, January 31, 2007 - 6:41 am: |
| 
|
गुरू पहिला. ठिक वाटला. त्यात विद्या बालन चे पात्र का घातले असावे याचा उलगडा झाला नाही.
|
Bee
| |
| Wednesday, January 31, 2007 - 8:31 am: |
| 
|
मी ह्यावेळी खूप खूप आर्ट चित्रपट घेऊन आलो. एकाच दिवशी चक्र, सलिम लंगडेपे मत रो, पेष्टोनजी, अंकुर हे चित्रपट बघितले. नंतर खूप दिवस काहीच बघू शकलो नाही अशी माझी अवस्था झाली होती.
|
Ami79
| |
| Wednesday, January 31, 2007 - 11:00 am: |
| 
|
यातला अंकुर मी पाहिला आहे. तो खुपच छान आहे
|
Milindaa
| |
| Wednesday, January 31, 2007 - 12:28 pm: |
| 
|
अंकुर इथे आला तेव्हा सर्वांनीच पाहिला होता
|
मी नुकताच गुरु पाहीला. अभिषेक ने एकदम सही काम केल आहे. एश नेहमी प्रमाणे नाटकी वाटली मला. एकदा बघण्यासाठी ठीक आहे.
|
Mpt
| |
| Saturday, February 03, 2007 - 6:21 pm: |
| 
|
ही लिन्क पहा. गुरु मधे कुठे आणी कसा मसाला टाकला आहे ते कळेल http://en.wikipedia.org/wiki/Dhirubhai_Ambani
|
Upas
| |
| Sunday, February 04, 2007 - 12:05 am: |
| 
|
चित्रपटप्रेमींनो, जरा इथे लक्ष देणार का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|