|
नितीन, न्युटनबरोबर तू काय करत होतास बाबा? कारण तुझ्या वेंधळेपण्नत अचानक न्युटन आणि त्याची मांजरीचे इतके अचूक वर्णन आहे म्हणून विचारले.. दिवे घे रे बाबा..
|
Chyayla
| |
| Monday, January 22, 2007 - 7:43 pm: |
| 
|
सन्घमित्रा... अगदी अगदी तो कार मधे किल्ली विसरण्याचा वेन्धळेपणा केला खुपदा कितिदा तर कारच्या दरवाज्याला किल्ली आणी आतमधे गाडी चालु करायला जातो तर किल्ली ची शोधाशोध. हा माझा नेहमीचा वेन्धळेपणा. अरे त्या न्युटनचेच अवतार या मायबोलिवर आलेत. तरीच मला ते गुरुत्वाकर्षण वैगेरे ओळखिचे वाटत होते... गणेश म्हणतो त्या प्रमाणे त्या मान्जरीचे पण.... गणेश सही
|
च्यायला.. माझ्या रूम मेटला पण गुरुत्वाकर्षणाचे विलक्षण आकर्षण आहे.. बघावं तेव्हा नियम पाळल्यासारखी धपकत असते... पण आजचा हा माझा धमाल वेंधळेपणा कालच्या पोळ्या शिल्लक होत्या. म्हटलं ब्रेकफ़ास्टला फ़ोडणीची पोळी करू.. पोळ्या कुस्करून झाल्यावर शमिका म्हणाली त्या आज सकाळी आणून दिलेल्या पोळ्या आहेत. शिळ्या पोळ्या दुसर्या डब्यात ठेवल्यात. काय करणार खाल्ली ताज्या पोळ्याची फ़ोडणी करून. लंचला हॉटेलात..
|
नंदिनि मि न्युटन बरोबर आसतो तर तुमच्या बरोबर कशाला आसतो माय बोलिवर आणि ते पण वेंधळ्यांमध्ये..........
|
नितीन, हाच तुमचा वेंधळेपणा.. चांगलं न्युटनबरोबर सफ़रचंद खायचं सोडून इथे आगमन पावलात.
|
Sheshhnag
| |
| Tuesday, January 23, 2007 - 11:42 am: |
| 
|
आजचीच गोष्ट. सकाळी बायकोने बाजारात सामान आणायला पाठवले. सहकार भांडारात गेलो तर दुकान बंद. साडेआठ वाजता उघडणार. शर्टाची बाही मागे सारून पाहिले तर हातात घड्याळ नाही, मोबाईलवर वेळ पाहावी म्हणून खिशात हात घातला, मोबाईल नाही, मग इकडे तिकडे फिरत, दर पाच मिनिटानी दुकानाचे कुलूप पाहून बाईकवरून चकरा मारत होतो. शेवटी सहकार भांडार उघडले, सामान खरेदी केले. परत निघालो, येताना किती वेळ गेला पाहण्यासाठी हातातल्या घड्याळात पाहिले, सव्वा नऊ वाजले होते. मग लक्षात आले, आपण नुसतीच हाताची बाही मागे सारली होती, मनगटावरचे घड्याळ पाहिलेच नव्हते. आणि या BB ची आठवण आली...
|
शेषनाग लई भारी...... आमच्या सोबत पण मागच्या आठवड्यात असेच काहि तरि झाले, आमच्या ऑफ़िस मध्ये २ तासासाठी पॉवर कट होणार होता, तसा सकाळीच ईमेल आला होता....., मी माज्या Laptop वर त्याच दिवसी Due असलेले Presentation चे काम घाई घाई करत होतो, परत अक्च्युल पॉवर कट करण्याच्या ५ मिनिट आधि (कारण सगळे माहगडे Instrument, Computer ला Connected असतात, व ongoing experiments मध्ये व्यत्यय येउ नहि म्हणुन ते लोक काळजी घेत होते) ते लोकं सुचना देण्यासाठी आले , मनातल्या मनात दोन -तिन शिव्या दिल्या आणि पटकन Computer shut down केले, आणि आता २ तास काय करावे म्हणुन आम्हि सगळे कॉफ़ी ढोसलायला गेलो, कॉफ़ी पित असतांना लक्षात आले, पॉवर विना आपण ब्यटरी वर काम करु शकतो, तसाच पळ्त आलो आणि कामाला लागलो........ 
|
Athak
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:13 am: |
| 
|
बायको देशात जाणाच्या आधी मला चारदा बजावुन गेली , ' अहो त्या Samsonite च्या बॅगेचे लॉक खराब आहे दुरुस्त करुन घ्या म्हणजे तुम्ही येतांना आणु शकाल ' नेहमीप्रमाणे विसरलो , अगदी जाण्याच्या दिवशी बॅगेत कपडे भरतांना आठवले . भरलेली बॅग रिकामी करुन २ तास मार्केट मधे घालवले सगळीकडे फिरुन samsonite workshop वाले म्हणाले २ दिवस लागतील . श्याऽऽऽ ... शेवटी एक चेनवाली soft बॅग विकत घेतली . भराभर कपडे भरले , चेन बंद करुन त्याला लावण्यास एक छोटे लॉक शोधले , टिक करुन लॉक बंद केले , अरेच्चा पण चावी कुठाय ? शोधली एकदाची , तिच चावी आहे की नाही याची खात्री करुन घेण्यासाठी लॉक उघण्याच्या प्रयत्नात चावी आंतमधे तुटली , श्याऽऽऽ ... वैताग नुसता .. बायकोची hair pin शोधली लॉक उघडायला म्हणजे दुसरे लावता येईल , इकडे flight ची वेळ झालेली .. धावपळ नुसती , मनातल्या मनात स्वतालाच शिव्या , hair pin ने खुप प्रयत्न करुनही लॉक काही उघडत नव्हते शेवटी तिच hair pin चेनच्या दोन्ही टोकात घालुन twist करुन लॉक म्हणुन उपयोग केला अन airport कडे प्रयाण
|
Chyayla
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:48 am: |
| 
|
तुमच्या पैकी कोणी पायात वेगवेगळी चप्पल घालुन कुणाकडे गेलात का आणी येताना गोन्धळुन भलतीच चप्पल घालुन आला आहात का? तो पराक्रम घडलाय माझा पायातुन (हातुन ला पर्याय).
|
Sayuri
| |
| Wednesday, January 24, 2007 - 2:15 am: |
| 
|
लग्नाचं आमंत्रण वेळेअभावि इमेलने पत्रिका धाडून आणि मग फ़ोनवरुन करुया असं ठरवलं. 'श्वेता'...सेलफ़ोनमध्ये नंबर होताच. फ़िरवला. श्वेताने 'हॅलो' म्हटलं. (आवाज वेगळा वाटला मला. पण म्हटलं तिला सर्दी वगैरे झाली असेल.)लग्नं कुठे, कितीवाजताचा मुहुर्त वगैरे सर्व सांगून झालं. म्हटलं, राहुल (श्वेताचा नवरा) आणि तू दोघांनीही नक्की यायचं हं. "कोण राहुल?" श्वेता. "म्हणजे.....?!" मला जरा शंका आली मग. "तू आपल्या शाळेजवळच्या 'प्रियांका' मधलीच श्वेता ना?" मी. "नाही" ती म्हणाली. मग लख्खकन ट्युब पेटली. ही श्वेता म्हणजे आत्ताच ओळख झालेली..ऑफ़िसमधली न्यू जॉईनी. लग्नाला बोलवण्याएव्ह्ढी मैत्री नाही. शिवाय लग्नही मोजक्या जवळच्या मंडळीतच करायचं असं ठरलेलं. मी जीभ चावली. मग "ओह! अगं मला वाटलं मी माझ्या स्कूलफ़्रेंड श्वेताचा नंबर लावला...तर तुझाच लागला ग.." मी. "आलं आलं लक्षात माझ्या ते. एनीवे अभिनंदन." ती हसत म्हणाली. फ़ोन ठेवला. एव्ह्ढं होऊनही तिला आमंत्रण काही मी दिलं नाही. तेव्हापासून कानाला खडा. हा वेंधळेपणा पुन्हा नकोऽऽ. नंबराची व्यवस्थित खात्री करुनच नंबर फ़िरविणे.
|
Athak
| |
| Wednesday, January 24, 2007 - 2:23 am: |
| 
|
हा वेंधळेपणा पुन्हा नकोऽऽ आयुष्यात एकदाच करायचा असतो तो
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 24, 2007 - 2:57 am: |
| 
|
च्यायला, हल्ली वेगवेगळे चपलांची जोडी घालायची फ़ॅशन आहे, घरीपण असलाच एक जोड अजुन आहे, असे सांगुन वेळ निभावुन न्यायची कि.
|
Chyayla
| |
| Wednesday, January 24, 2007 - 8:50 am: |
| 
|
दिनेश... वा वा मस्त आयडिया आहे.
|
Sakhi_d
| |
| Wednesday, January 24, 2007 - 10:06 am: |
| 
|
माझा एक मित्र U.S मधे असतो. त्याला तसे नेहमीच मेलणे चालू असते. त्याचे नाव B वरून चालू होते आणि माझ्या Address book मधे तो एकच B होता पण आमच्या office मधे नवीन M.D आलेल्या त्यानचा ID पण B वरुनच चालू होतो. मित्राला नेहमीच्या वाह्यातपणे मेल केला आणी दुस-यदिवशी Sent Item मधे MD चे नाव बघितले. आधी आठवलेच नाही आपण काल कुठल report मेल केला.....म्हणुन उघडले......... नशीब गुरवार होता. गुरवारी त्या पुण्याला असतात. त्यामुळे घोळ निस्तरायला वेळ मिळला..... तात्पर्य :- मेल पाठवताना कोणाला करतोय ते नीट बघणे. नाहीतर नंतरचे घोळ निस्तरणे....
|
Nkashi
| |
| Wednesday, January 24, 2007 - 11:07 am: |
| 
|
हा हा हा... याच सारखा वेंधळेपणा मी पण केला होता... आमच्या Project मधला issue investigate कर म्हणून आमच्या VP ला mail टाकली होती...
|
सकाळी नऊ वाजता मीइ झोपेत. बॉसचा फ़ोन आला. झोपेतच कॉल अटेंड केला... वाटलं माझा मित्र आहे. आनि सुरुवात केली.. "हाय, जान...बोलो... आज सुबह सुबह याद किया...."
|
Sunidhee
| |
| Wednesday, January 24, 2007 - 10:09 pm: |
| 
|
मैत्रेयी आता तु स्वत:चा वाढदिवस विसरशील पण MLK ह्यांचा नाही विसरणार बहुतेक.. मस्तच वें. पणा होता... (ह्या हसर्याला गरगर कसे फिरवायचे??) पुर्वी मी अपार्टमेन्ट मधे रहात असताना तिसर्या मजल्यावर रहायची. रोज कामावरुन आले की गाडी लावुन ३जिने चढुन जायचे आणि घर उघडायचे हे अगदी यांत्रिक झाले होते. तेव्हा लग्न नव्हते झाले त्यामुळे घरात तसा पसारा असायचा.. फ़र्निचर वगैरे काही घेतले नव्हते. एकदा चावीने नेहमीप्रमाणे दार उघडुन आत शिरले तर खोली एकदम स्वछ्छ. इतकेच नाही तर hall मधे छानसा सोफ़ासेट, बाजुला डायनिंग टेबल आणि बाकी गोष्टी दिसल्या. मला कळेना ही कृपा कोणी केली बुवा?? माझं घर कोणी सजवलं? आणि का सजवलं??? जरा भिती पण वाटली....... आणि एकदम लक्षात आले, आमच्या बिल्डिन्गला बेसमेंटला पण अपार्ट्मेन्ट होत्या आणि तिथुन पण entrance होता. पण मी नेहमी दुसरा entrance वापरायचे, ज्याने मेनरोड वरुन डायरेक्ट पहिल्या मजल्यावरुन वर जाता यायचे.. तर त्या दिवशी काही कारणामुळे बेसमेंट मधुन आले होते आणि तंद्रीत ३जीने चढुन 'दुसर्या' मजल्यावरचे घर 'माझ्या' किल्लीने उघडुन आत शिरले होते मग उडाली घाबरगुंडी, एकतर माझी किल्ली पण डुप्लिकेट होती माझ्याच घराच्या मुळ किल्लीची आणि ती खालच्या घराला आरामात लागली होती. आणि तो घरमालक आला असता तर पण नशिबाने मी पटकन बाहेर आले आणि lock करुन वर गेले.
|
Storvi
| |
| Wednesday, January 24, 2007 - 11:08 pm: |
| 
|
बापरे, नंतर कुलुप बदलले कि नाही?
|
Sunidhee
| |
| Wednesday, January 24, 2007 - 11:38 pm: |
| 
|
मी leasing office ला सांगितले पण त्यानी काही केले नाही..
|
Sakhi_d
| |
| Thursday, January 25, 2007 - 6:24 am: |
| 
|
एकदा ट्रेक टरवत होतो म्हणुन एका मित्राला फ़ोन लावत होते पण त्याचा फ़ोनच लागत नव्हता आणि त्याने २ वेळा प्रयत्न केला तर मला नीट ऐकायला येत नव्हते..... इथपर्यन्त ठिक आहे. ३रा फ़ोन माझ्या GM चा आला आणि मी "अरे यार किती वेळ फ़ोन करतेय.....कुठे तडमडलेलास....."
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|