Sakhi_d
| |
| Monday, December 25, 2006 - 10:08 am: |
| 
|
म्हणजे ढगासारखे आहे अंग तुझे?? गेलीस ढगात......
|
Kiru
| |
| Tuesday, December 26, 2006 - 1:15 pm: |
| 
|
ढगासारखं अंग नाही सखी.. शरीर.. 'भारदस्त'.. असं 
|
Shyamli
| |
| Tuesday, December 26, 2006 - 1:38 pm: |
| 
|
आई ग काय चाललय  ............. तंतेरा काय ढग काय बाकी धमाल आली वाचुन कोण ती शेरावत तीला तरी कळली असतील कि नाही कोण जाणे.... बाकी तीला शब्दांशी काय घेण देण म्हणा
|
Dineshvs
| |
| Tuesday, December 26, 2006 - 4:59 pm: |
| 
|
अस काय श्यामली, तिला कश्याचेच काहि देणे घेणे नसते. अगदी सुतळीच्या तोड्याचा देखील मोह नाही तिला.
|
Zakki
| |
| Wednesday, December 27, 2006 - 1:37 am: |
| 
|
हे असले काही होऊ नये म्हणून मी आजकाल हिंदी, उर्दू अशी गाणीच ऐकत नाही. बाकी मराठीत तरी काही कमी गंमत होते का? ' डोळ्यात सांजवेळी आणू नको सपाणि' हे ऐकून मी विचारात पडलो होतो की 'सपाणि' म्हणजे काय?
|
Rajeshad
| |
| Wednesday, December 27, 2006 - 7:47 am: |
| 
|
आनंदी आनंद गडे हे गाणं मला लहानपणी (गडे हा शब्द माहिती होण्यापूर्वी) आनंदी आनन दगडे असं काहीतरी ऐकू यायचं व आनंदी नावाच्या स्त्रीला कोणीतरी दगडं आणायला सांगत आहे असं वाटायचं.
|
Rajeshad
| |
| Wednesday, December 27, 2006 - 7:54 am: |
| 
|
अजुन एक आठवलं. "कही आग लगे लग जावे...कभी गगन गिरे गिर जावे" असं काहीतरी गाणं आहे ताल मधे ते बरेच दिवस मला कभी गगनगिरी (म्हणजे गगनगिरी महाराज) गिर जावे असं ऐकू यायचं व एक दिवस अचानक साक्षात्कार झाला खय्रा वाक्याचा.
|
Jdkulkarni
| |
| Thursday, December 28, 2006 - 10:46 am: |
| 
|
अजुन एक सुन्दर गाने मे चुकीचे ऐकत होतो. ओरिजीनल गाने: सखी मन्द झाल्या तारका.. मी ऐकत होतो: सखी बन्द झाल्या तारखा...
|
गेली २० वर्षे मी ही आरती रोज सकाळी ऐकत आहे.आमचे सुरीले(?) शेजारी सकाळी सकाळी हे पाप करतात आणि आम्हालाही त्याचे जबरदस्ती वाटेकरी बनवतात गणराया,रोजच्याप्रमाणेच आजही माफ़ कर. जय देव जय देव जय मंगलमुर्ती दर्शन मात्रे माने ताम्हणापुरती जय देव जय देव. रत्नखचित हारा तुज गवरी कुमरा चंदनाची ऊटी कुमकुम केसडा हिरेजडीत मुकुट शोभ तोबरा रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया लंबोदर्पी तांबर परीवारवंदना सरळ सोंडवक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सजणा संकष्टी पावावे निर्वाणी रक्शावे सुरीवरगजवदना जयदेव जयदेव कल्पना करा.इतक्या वर्षांनी मला चुकून तरी खरी आरती म्हणता येइल का?आणि त्या बिचार्या गजाननाचे काय हाल होत असतील?
|
Jo_s
| |
| Friday, December 29, 2006 - 10:43 am: |
| 
|
मला लहान पणी हे गाणं अस वाटायच, दोन शब्दातल्या गॅप मुळे "जिवलगा राहीले दूर् घर माझे पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे" ...... हे माथ्यावरचे पाऊल म्हणजे काय ते कळायचं नाही.
|
काय सोनु, देव भावाचा भुकेला असतो माहित नाही का तुला? आणि जे २० वर्षात बदलले नाही ते बदलून दाखवीणार का तु?
|
दास रामाचा वाट पाहे सजणा..
|
HE HI EK GANE MI CHUKICHE MHANTE MAAY BHAVANI TUJHE LEKRU KUSHIT TUJHIYA YEI DEVAA MANUN GHE AAI ACTUALLY TE SEVA MANUN GHE AAI ASA AHE.
|
"प्रेमास्वरूप आई" मधली एक ओळ मी आत्तापर्यंत अशी म्हणत होतो "ह्रस्कंद मंद झोके". अगदी परवाच कळलं की ते ह्रत्स्पंद मंद झोके म्हणजे ह्रदयाच्या स्पंदनांवरती घेतलेले झोके असं आहे.
|
toch chndrama nabhat ya ganyacha artha mi lahapani weglaach lavla hota toch chndra man ani bhat..mala manecha ani bhatacha sandrabha kalallach nahi kadhi ajunahi barech lok aarti kartana sukhkarta dukhkarta ashi kartana mi aikali ahe
|
sadhya cable tv var gajlela "e ante amalapura"he gana mala ajunahi weglach aikayla yeta te asa e anre amlapura, hi mhante hicha bara, thumak thunak ke jana bara..asa vichitra kahi tari...nakki wordings ajunahi kalele nahi
|
Sas
| |
| Tuesday, January 09, 2007 - 6:44 pm: |
| 
|
मैं तो भुल चली बाबुल का देस 'याप्पा' घर प्यारा लगे कोई मैके को दे दि संदेस 'याप्पा' घर प्यारा लगे आमचि मावशी पियाका घर ला याप्पा घर म्हणयची आई नेहमि सांगायचि तुज्या इंदु मावशिला गाण्यांच भारि वेड, कपडे धुवायला विहिरिवर जायचि तेव्हा ही रेडियो घेवुन जायचि सोबत आणि इतकि गाणि एकुन तरिहि "चुक चुक गाणि म्हणायचि" आमच्या आईला गाणे हा प्रकारच आवडत नाही ह्याच मला नेहमिच आशचर्य वाटत. असो. इतरांच्या गाण्यातल्या चुका मात्र ती बरोबर काढते.विषयांतरा साठि क्षमस्व.
|
दास रामाचा वाट पहा सजणा? सोनू तुझे शेजारी साक्षात हनुमानाला (रामाचा दास) साजणाची वाट पहायला लावतायत. त्यांना सांग मारूतीचा कोप होइल म्हणून. म्हणजे बंद होईल तुमचा ताप.
|
Kandapohe
| |
| Saturday, January 20, 2007 - 8:36 pm: |
| 
|
दास रामाचा वाट पहा सजणा? अचानक एक चुकीचे म्हणले जाणरे गाणे आठवले म्हणून इथे आलो तर हसुन हसुन पोट दुखायला लागले. चांद सी महबूब बाहो मेरी होगी ऐसा मैने सोचा था. हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था खरे असे आहे. (बहुतेक) चाँद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था
|
संघमित्रा, तो "दास रामाचा" म्हणजे हनुमान नसुन समर्थ रामदास स्वामी आहेत! ही आरती त्यांनी लिहिली आहे!
|