|
Dinesh77
| |
| Thursday, December 28, 2006 - 6:24 pm: |
| 
|
१९०७ साल कसे काय????????????????????????????????
|
Vijay3845
| |
| Friday, December 29, 2006 - 9:49 am: |
| 
|
साॅरी, मला २००७ म्हणायचं होतं. १०० वर्षे मागे गेलो की.
|
नमस्कार, मि रविन्द्र, मला बरेच बोलायचे आहे, पण सुरवात कशी करावी तेच समजत नाही. मला तुमचा मित्र बनायला फार आवडेल.
|
Zakki
| |
| Friday, December 29, 2006 - 2:12 pm: |
| 
|
वा, वा सुस्वागतम. 'बोलायचे आहे' म्हणजे तुम्ही Audio upload करणार का? जरा Admin ना विचारून घ्या! एक अनाहूत सल्ला! इथे हे असेच चालते. परवडणार असेल तर या. उगाच सिरिअस वगैरे होऊन आलात तर मजाच जाईल.

|
Namaskar mandali, tar mi prachi. ithe aajach join jhali aahe. mala phar avdel tumha saglyanshi maitri karyala. ani tumchya barobar ithe bolayala.
|
are vijay, tu kay jhakaas lihitos re. agdi vachatach rahava asa vatata. chhan keep it up.
|
Vijay3845
| |
| Sunday, December 31, 2006 - 5:09 pm: |
| 
|
प्राची, तुझं मनापासून स्वागत! माझ्या लिहिण्यावरच्या अभिप्रायाबद्दल आभार. तुला इथे चांगले मित्र मिळतील. नववर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!!
|
Chetnaa
| |
| Monday, January 01, 2007 - 5:25 am: |
| 
|
sarvanna navin varshachya shubhechha.
|
Chetnaa
| |
| Friday, January 05, 2007 - 7:29 am: |
| 
|
are Prasik, yijay,prachi,zakki sarvach gayab zale ki kay?Barach shukshukat disatoy eethe.ya balanno ya re ya, lovekar bharbhar sare ya,maja kara re maja kara,ha bb majecha samaja.Waiting for all of u.
|
Rahulbaba
| |
| Saturday, January 06, 2007 - 1:36 pm: |
| 
|
विजु कथा वाचली. आज काहि काम नाहि म्हणुन मायबोलीवर आलो अनि कातरवेळी अशी कथा वाचुन मन भरुन आले.
|
Vijay3845
| |
| Sunday, January 07, 2007 - 3:01 pm: |
| 
|
मित्रांनो, काही दिवस शेजारच्या देशात जातो आहे. तिथून मायबोलीवर येता आले तर ठीकच. नाहीतर २२ जानेवारीनंतर भेटूच. चेतना, प्रसीक, प्राची, राहुल, दिनेश सर्वांना नमस्कार.
|
मि नितिन तुमचय्शि मैत्रि करय्ल मला आवडेल तुम्हि खुप चन लिहित
|
देव्नग्रि निट जमत नहि मन जमेल तुम्हा सर्वान्ना नविन वर्श्याच्या मनपसुन सुभेच्या
|
Mahe
| |
| Monday, January 08, 2007 - 2:39 pm: |
| 
|
सर्व मंडळीना नमस्कार आणि नविन वर्षाच्या शुभेच्छा!! मी नविनच आहे. मला तुम्हासर्वांशी ओळख मैत्री करायला फ़ार आवदेल. विजय तुम्ही खुप छान लिहीलय, मला खुप आवडले. धन्यवाद.
|
Prasik
| |
| Monday, January 08, 2007 - 9:43 pm: |
| 
|
चेतना, प्राची, राहुल, दिनेश, विजय, नितीन, माहे आणि सर्व मायबोलीकरानां नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा. विजय तुझी यात्रा सुखरूप होऊदे, आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
|
Prasik
| |
| Monday, January 08, 2007 - 9:50 pm: |
| 
|
नविन वर्ष आले कि मला एक १९९८ ची घटना आठवते. तेव्हा मी कॉलेज साठी बसने प्रवास करायचो. तर तीची आणि माझी पहिली भेट ३०-१२-१९९८ ला (मला तारखा बरोबर लक्षात राहतात) बसस्टॉपवर झाली. सध्यांकाळी बस नेहमीप्रमाणे लेट झाली होती. ती तीच्या मैत्रीणींसोबत कॉलेजमधुन घरी जायला आली होती. बहुदा हॉस्टेल मधे त्या रहात असाव्यात आणि न्यु-ईअर सेलिब्रेशनसाठी तिच्या घरी जात असाव्यात. बसस्टॉपवर आणि नतंर बसमध्ये तीच्या व माझ्या ग्रुपचे एकमेकांवर कमेन्टस् सारखे चालूच होते. माझा स्टॉप आल्यावर मी माझ्या मित्रांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दिल्या म्हणजे जोरात ओरडून दिल्या, जेणेकरून त्या तीच्या ग्रुपपर्यंत देखिल पोहोचल्या. नतंर एक आठवड्याने ती पुन्हा बसमध्ये दिसली. या वेळेस एकटीच होती. माझ्या एका मित्राने कन्डक्टर कडून सहजतेने तिच्या स्टॉपचे नाव काढून घेतले. तीची तिसरी भेट मकर सक्रातींच्या दिवशी झाली. माझ्याकडे तिळगूळ होते. आणि आमचा तिळगुळ समारंभ बसमध्येच सुरू झाला. बसमध्ये इतरांसारखेच तिचेही तोडं गोड केले. इतके होऊन आमच्यामधे संभाषण नावाची कोणतीही गोष्ट नव्हती. आमची चौथी भेट त्यानतंर आठवड्यानेच झाली. आता मला देखिल समजायला लागले होते कि ही दर शनिवारी तिच्या घरी जाते. त्यादिवशी मी व माझा मित्र तिच्या समोरच्याच सिटवर जाऊन बसलो. तेव्हा ती फिल्मफेअर मॅगेझीन मधे डोके खुपसुन बसली होती. बस सुरू झल्यानतंर पाच मिनीटाने माझ्या मित्राने ते तिच्याकडून मागुन घेतले आणि तीने माझ्याकडचा मिड-डे घेतला. आणखी पाच मिनीटे गेल्यावर ती तीच्या पायाने माझ्या पायानां चाळा करायला लागली. प्रथम मला वाटले चुकून पाय लागला असेल, पण पाच मिनीट गेली, सात गेली, दहा गेली, तरी हिचे कामचालूच होते. बर मी तीच्याकडे बघीतले की ती नजरेला नजरही द्यायला तयार नव्हती. थोड्या वेळाने मी न राहऊन तीला विचारले- काय ग! लाथा कशाला मारतेस. त्यावेळेस त्या बिचारीने झालेल्या फजितीबद्दल सॉरी बोलून काम निभावले. मला नतंर वाटले कि तीची अशी फजिती करायला नको होती. परत ती मला बस मध्ये कधीच दिसली नाही. तिन वर्षे गेल्या नंतर ती पुन्हा एकदा दिसली. माझ्या कझनचे लग्न तिच्या शहरातच होते. तेव्हा ति तिच्या आईसोबत आली होती. तीची आई मला शाळेत मी सहावीला असताना शिकवायला होती. मी त्यानां जुनी ओळख दाखवल्या नतंर त्यानींही जरा गप्पा मारल्या. ती देखिल आमच्या सोबतच होती पण अबोलच. थोड्या वेळाने तीच्या आईचे लक्ष नाही पाहून मी त्या बसमधल्या प्रसंगाबद्दल तीला सॉरी बोललो. तर ती हसायला लागली. म्हणाली- ते आठवल्यावर मलाही देखिल खुप हसायला येते. आणि आम्ही दोघेही खळखळून हासलो. त्या नतंर पुन्हा कधी तीची भेट झाली नाही.
|
prasik tu 1 chance ghalawla aasa nahi watat tula, tula ti awdat hoti na ka jaudilas ?tila wedach aahes
|
Geetai
| |
| Tuesday, January 09, 2007 - 7:42 am: |
| 
|
Prasik, bhetnyacha prayatn kela nahit ka?
|
Sas
| |
| Tuesday, January 09, 2007 - 11:33 pm: |
| 
|
कुणी तरी आपल्यावर निरागस पणे जीव टाकत असत आणी आपल्याला मात्र त्याची झुळुक हि लागल नाही आणि जेव्हा आपल्याला समोरच्याच्या वागण्याचि, नजरेचि, जाणिव होते तेव्हा वेळ निघुन गेलेलि असते. हे असच माझ्या सोबत झालय १ दा, २ दा नाही ३ दा. आपल्या कडे येवु पहाणार्या प्रेमाचि जाणीव कशि झालि नाहि, होत नाहि आपल्याला हे बोचत खुप कधि कधि आणि आपण का त्या गोष्टिंना महत्व देतो ज्या खरच महत्वाच्या नसतात पण आपल्याला महत्वाच्या वाटत असतात; ह्याच दु:ख होत. लहानपणी आम्ही रहायचो त्या बिल्डिंग ज्या जवळच "पोतदारांची " मोठी ईमारत होती. पोतदारांचि व्यावसाईक-श्रिमंत-एकत्र कुटुंबाची. आजही आहे. सार्या पोतदार कुटुंबाची आमच्या "बिल्डिंगच्या" सार्यांशि चांगलि ओळख होती, येण-जाण होत. ह्या कुटंबातिल दुसर्या काकांचा दुसरा मुलगा "स्वपनिल"आम्ही एकाच शाळेत आणि नंतर एकाच वर्गात होतो. आम्हि एकाच वर्गात आल्यापासुन आम्हाला आमच्या बिल्डिंग मघले सारे मित्र मैत्रिणि एकमेकांच्या नावाने चिडवायचे. मला ते अजिबात आवडायच नाहि. आमच्या "बिल्डिंग" मधलि चार-पाच सोडलि तर बाकि सारी मुल एकाच शाळेत होती. खालि रहणार्या एका काकांना कंपनी कडुन गाडि मिळालि होति कधि कधि आम्हि सारे त्यांच्या गाडितुन शाळेत जायचो त्यांच्या मुलांन बरोबर कारण ज्या कंपनित ते काका होते त्या कंपनितच दुसरे सारे होते. It was Apartment Complex of one company and Flats were owned by Employees of company. तेव्हा गाडि त्यांना मिळालि असलि तरि ती कंम्पनिचि असल्याने सार्यांचि मुल पायी शाळेत जाण्या पेक्षा त्या गाडितुनच दाटि-वाटिने एक-मेकांवर बसुन शाळेत जायची जेव्हा जेव्हा त्यांचि मुल गाडितुन जायचि. मी २-३ रि त असतांनाचि गोष्ट. आमचि १ लि ते -४ थि ची शाळा सकाळचि होती.असच एकदा आम्हि दाटि-वाटिने गाडित कोंबत असतांना स्वपनिलहि तिथे आला व गाडित बसु लागला तेव्हा "मी नाहि बसणार त्याच्या जवळ" म्हणुन मी मागच्या सिट वर बसण्यास नकार दिला. मग मी शाळेत पायि गेले की गाडितच की बाबांच्या स्कुटर वर हे आता आठवत नाही.आठवतो तो त्याचा शांत चेहेरा, माझ्या कडे बघणार्या नजरा जणु त्या सांगत होत्या "मी काय वाईट केलय, माझा राग का" बालपण सरल. आम्हि ८ वि ते १० वि एकाच वर्गात होतो हे आठवत पण त्या आधि आम्हि कधि एकाच वर्गात होतो आठवत नाहि कारण मी कधी त्याच्या कडे लक्षच नाहि दिल.पण येता जाता गल्लित-रस्त्यावर तो दिसायचा. मी आठवित असतांना आमच्या वर्गात एक मुलगि होती तिच वर्गात कोण कुणाकडे बघत, कोण-कोण एकमेकांकडे बघत ह्या गोष्टिंकडे बारिक लक्ष असायच आणि ति माझ्या मागच्याच बाकावर बसायची. त्यावेळि क्रांति माझि खास मैत्रिण होती, आम्हि सोबत शाळेत जायचो-यायचो, एकाच बाकावर बसायचो. सुप्रिया ही आमच्याच बाकावर बसायची. क्रांति खुप सुंदर, गोरि, काळे मोठे डोळे, गोबरे गाल खुप आकर्षक. त्या वर्षि रक्षा-बंधन च्या आधि मला सुप्रिया कि क्रांति कुणितरि म्हणाल "तू रक्षा-बंधनला स्वपनिलला राखि बांध, वर्गातल्या मुलि तुमच्या बद्दल बोलतात " मला कळालच नाही क्षणभर.
|
Sas
| |
| Wednesday, January 10, 2007 - 12:01 am: |
| 
|
मला कळलच नाहि क्षण भर नेमक काय झालय ते मग समजल की "स्वपनील सारखा माझ्या कडे बघत असतो" हे वर्गालत्या मुलिंच Obsevation आहे. झाल त्या दिवसा पासुन मी ही तो आपल्या कडे बघतो का हे मधुन मधुन check करायला लागले. मला वाटायच सार्यांचा गैर समज आहे; क्रांति सारख्या सुंदर मुलिला सोडुन हा काय माझ्या कडे बघत असणार?? मी क्रांतिला एक-दोनदा सांगितलही तस. क्रांति ही आमच्याच गल्लित रहायची. एकदा स्वप्निल तिच्या चुलत भावा बरोबर त्यांच्या बंगल्याच्या गच्चिवर पतंग ऊडवायला गेलेला तेव्हा तिने त्याला तिथुन काढल चक्क पण त्याने "हा हिच्याच मागे आहे" हा विश्वास ठाम झाला; पण नंतरच्या काही दिवसात सोपान आपल्याच कडे बघतो हे जास्त ठाम वाटायला लागल. (सोपान अस त्याचि आई व घरचे त्याला बोलवायचे कदाचित) शेवटि वर्गातल्या मुलिंच्या आग्रहा खातर मी त्याला राखि बांधलि. त्यला राखि बांधण्यात मला काहिच problem नव्हता. तो हि बिचारा "स्वपनिल मला तुला राखि बांधायचि आहे म्हटल्यावर तो गुमान पुढे आला व त्याने काहि न बोलता हात पुढे केला. सार्या वर्गा समोर हा सोहळा पार पडला. (विषेश म्हणजे "आम्हाला तुला त्याला राखी बांधतांना पहायचय तेव्हा आम्हि Restroom ला जावुन येतो मग तु त्याला बोलाव अस 'त्या' मुलिने व तिच्या मैत्रिणिंनी सांगितल्याने मला त्यांच्या साठि थांबुन मग हा कर्यक्रम करावा लागला असो.) माझ्या बाकाच्या Parallel बसण, माझ्या Pensil सारखि Pensil वापरण, वहिवर S गिरवत रहाण हे स्वपनिलच राखि कार्यक्रमा नंरत सुरु झाल की आधिपासुनच सुरु होत हे मला महित नाहि. "ए बघ त्याने तुझ्या pensil सारखिच Pensil आणलिय" अस मागचा बाक व क्रांति हि कधिकधि चिडवायचि. ८ वि पासुन मी सायकल वर शाळेत जायचे, क्रांति ही सायकल आणायचि. व अर्थात सोपन हि.एकदा त्याचि मजा करायचि म्हणुन व तो खरच माझ्यासारख करतो का हे पडताळुन बघण्यास, शाळा सुटल्यावर , सायकल Stand कडे जातांना आमच्या मागे येणार्या सोपान ला एकु जाईल अश्या आवाजात मी म्हणाले "क्रांति, उद्या मी शाळेत येणार नाहि" दुसरे दिवशि मी गेले शाळेत पण तो नाही आला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|