Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
झुळुक

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कथा old classics » झुळुक « Previous Next »

Suvikask
Friday, January 12, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकताच T.V. वर झुळुक हा ऐश्वर्या नारकर व श्रेयस तळपदे चा सिनेमा बघण्यात आला.
अरु तीचा डॉ. नवरा आणी एक MBBS college मध्ये शिकत असलेली त्यांची एकुलती एक कन्या अशी त्रिकोणी कुटुंबाची ही कथा. डॉक्टर सर्वकाळ आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रचंड busy . कामाचा एवढा व्याप वाढलेला की बायकोसाठी, मुलीसाठी वेळ देणे केवळ अशक्य!!! काही काळानंतर मुलगीही मेडिकलच्या शिक्षणासाठी घराबाहेर पडते. त्यामुळे तर अरुला घर खायला ऊठते. वेळ कसा घालवावा, हिच चिन्ता. त्यामुळे साहजिकच तिच्या शरीराची, मनाची कुचंबणा होते. कधी मधी मग गाण्याचा वेळ मिळेल तेव्हा रियाज करून वेळ घालवणे एवढेच ती करते.

एकदा एका संस्थेकडुन गाण्याचा जाहिर कार्यक्रम करण्याचे आमंत्रण ती स्विकारते. कार्यक्रमाला डॉक्टर येतात, पण त्यांचे लक्ष गाणे ऐकण्यात नसतेच. ते त्यांच्याच कामाचे phone calls घेत असतात. कार्यक्रमाचे फोटो काढणारा फोटोग्राफर मात्र तिच्या चेह्-यावरचे बारीक सारीक हावभाव टिपण्यात मग्न असतो. कार्यक्रम संपल्यानंतर त्याने काढलेले फोटो लगेचच display केलेले असतात. ते फोटो बघुन अरु खुश होते. बोलताना डॉक्टरांना कळते की हा चैतन्य त्यांच्या बालमित्राचाच भाउ आहे व एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी ईथे आलेला आहे. ते त्याला आग्रहाने आपल्या घरी राहायला घेऊन जातात.
..contnd..


Suvikask
Friday, January 12, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चैतन्य घरी आल्यानंतर घरातले वातावरण बदलते. त्या बदलाची जाणीव फक्त अरुलाच होते...कारण तिला एकटेपणाने घेरलेले असते.. ती त्याच्याबरोबर हळुहळु गुंतत जाते, तो वयाने लहान असतानादेखिल त्याच्या प्रति तिच्या हळुवार भावना जाग्या होतात... त्यच्याकडुन ती तशा अपेक्षाही करते..पण न बोलता.. सतत त्याच्याविषयीच बोलणे, त्याच्या आवडीनिवडी जपणे, हेच जणु अरुचे जग होऊन जाते. बर्‍याच दिवसाने घरी आलेल्या मुलीलाहि हे खटकते. त्याच्या सांगण्याप्रमाणे घरच्या इंटेरीअर मध्ये केलेले बदलही मुलीला खटकतात. तिचे त्याच्याशी एवढी जवळीक साधणे, सतत बोलण्यात त्याचाच विषय असणे, ह्या गोष्टी डॉक्टरांच्या देखिल लक्षात येतात.
एके दिवशी रात्री तर अरु भावनेच्या आहारी जाऊन चैतन्याच्या खोलीत जाउन त्याच्या चेहर्‍याचे चुंबन घेते, आणी हे अरुच्या नकळत मुलगी बघते. चैतन्यही या गोष्टीमुळे वेळीच सावध होतो. त्या क्षणीच त्या घरातुन निघुन जाण्याचे ठरवतो. असे काही होईल असे त्याला कधी वाटलेच नाही. कारण तो तिला वहिनीच्या नात्यातुनच बघत असतो.
दुसर्‍या दिवशी दोघीजणी बोलताना, मोहरलेली अरु वा-याची झुळुक अंगावर कशी हवीहवीशी वाटते हे सांगत असते. पण मुलगी तिला समजावते की "वारा सावकाश वाहत असेल तरच तो अंगावर हवाहवासा वाटतो. तो जर जोरात, आपल्या मर्यादा सोडुन वाहु लागला ना तर झुळुकेचे वादळात रूपांतर होते. आणी एकदा का हे वादळ दार उघडुन घरात शिरले तर बरोबर सगळा कचरा, धुळ घेऊन येते. सगळे घर घाण करते. तेव्हा तुच ठरव या वादळाला दार उघडुन घरात घ्यायचे कि दाराबाहेरच थोपवून परतवायचे ते." यामुळे अरु एकदम भानावर येते. आपण कुठे आणी कसे वाहावत चाललो होतो, याचा तिला पश्चाताप होतो. आणी हे आपल्या लहनग्या मुलीने आपल्या लक्षात आणुन दिले यचा तिला अभिमान वाततो. ठर्ल्याप्रमणे चैतन्य लगेचच घर सोडुन जातो. आणी आई वेळीच सावरली म्हणुन मुलगीही खुष होते.
पुन्हा एकदा तिघांचे जग सुरु होते...पण अता बाप लेक अरुसाठी मुद्दाम वेळ काढन्याचे ठरवतात..तिचा एकतेपना नाहिसा करण्यासाठी. end


Milindaa
Friday, January 12, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला माहिती नव्हतं की हा चित्रपट पण classics मध्ये येतो :-)

Sneha21
Monday, May 21, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुवासिक,
हा सिनेमा पहावसा वाट्तोय
आता....

Nandini2911
Monday, May 21, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही माहित नव्हतं की हा चित्रपट old classics मधे येतो :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators