|
Maitreyee
| |
| Sunday, December 24, 2006 - 3:15 pm: |
| 
|
बघितला एकदाचा उमराव जान. ऐश ने खरच प्रयत्न केलाय अभिनयात, हे पटलं, पण तिचे ते अति घारे डोळे थंडगाSSर, काचेचे वाटतात. डोळ्याला त्रास होतो बघताना तरीही ऐश हीच एक त्या चित्रपटाची 'saving grace' आहे हे मात्र खरे! तिच्या कपड्यात अशा फ़िक्या, डिझायनर पेस्टल शेड्स का घेतल्यात? खोटे वाटतात त्यामुळे ते. जरा भडक रंग असते तर character, plot च्या दृष्टीने खरे वाटले असते कपडे.. अभिषेक..!! रचना मला माफ़ कर महाबथ्थड दिसलाय! थिजलेल्या डोळ्यांनी बघत रहातो नुस्ता! कसले म्हणता कसलेSS ही भाव नाहीत चेहर्यावर! तो सुनिल शेट्टी पण बरा वाटला त्याच्यापेक्षा मला त्यात!! ते पुरु राजकुमार चे पात्र आहे का जुन्या उमराव मधे? कशाला घेतलेय ते, काही आगा पिछा नाही त्याला.. आधी negative आणि नन्तर क्रान्तिकारी वगैरे दाखवण्यात काय मतलब ते कळले नाही मला!शबाना फ़ारशी effective नाही वाटली.. माया अलग, कुलभूषण खरबन्दा, शबाना सगळेच दिसण्यात, बोलण्यात वयस्क, थकलेले वाटतात! त्या मानाने परीक्षित सहानी, हिमानी शिवपुरी बरे वाटले. गाणे एकच बरे वाटले, बाकी टुकार. नृत्ये ऐश ने नाजूक, ग्रेसफ़ुल केली आहेत पण तवायफ़ च्या शृंगारिक अदा नाहीत! बाकी खय्याम, आशा, रेखा यांच्याशी तुलना करत नाही.. नाहीतर एवढेही चांगले(?) points लिहिता येणार नाहीत 
|
खि खि खि माझ्या सगळ्या भावाना पोचल्या तर उमरावजान पहाताना ! म्हणूनच मला अता अभिषेक ऍश प्रकरणात ऍश किती तरी उजवी वाटायला लागलीये अता पुरु राजकुमार ऐवजी नासिरुद्दिन शाह अहे असे वाचले होते , पण अजिबात आठवत नाहीये ते character मला .
|
काल रात्री Blood Diamand पाहीला. दिग्दर्शक ऐडवर्ड झीविक हा त्याचा वैशीष्ट्यपुर्ण पिक्चर्स मुळे ओळखला जातो. ब्लड डायमंड हा पिक्चर पण त्याला अपवाद नाही. एक अतिशय चित्तवेधक, थरारक, नाटय्पुर्ण नी सामाजीक असा हा पिक्चर आहे. सिऐरा लिओन मधील डायमंडस साठी असनारा हा संघर्ष हा फक्त त्या देशापुरता नसुन त्यात अनेक देश कसे गुंतलेले आहेत व त्याच वेळेस त्या देशातील जनतेला कशा प्रकारच्या संघर्षातून जावे लागते ह्याचे चित्रन ह्या पिक्चर मध्ये आहे. मुख्य भुमीकेत आहेत Leonardo DiCaprio, Djimon Hounsou, Jennifer Connelly. Must See Movie .
|
Daku
| |
| Monday, December 25, 2006 - 5:40 am: |
| 
|
tamil picture farach bhadak asatat. mala watate 'Run' ha pan picture tamil cinema hun ghetala asel karan yat pan barech bhadak scene aahet. maramari, heroine cah attitute, comedy. ( tamil madhe hi farach kilaswani asate. agadi pahawat nahi. ya lokanna ti karawate kashi kunas thauk). tamil hero mostly anyayacha pratikar karanara aani bedam marnara asato. Ghan, rakta, anyay, bhadak dance, ghaneradi comedy, ati hatake sanwad, aagau heroine, self destructive prem ashya gosti milun tamil cinema banato. aani lok aawdine pahatat. khup bolanyasarkha vishay aahe. tumhla kahi ajun mahit asel tar sanga. Rajanikant che picture changale asatat. maramari chya action sodalya tar baki sagale mild asate.
|
विवाह म्हणजे फ़ारच typical बडजात्या mix! अतिशय लाजाळु hero-heroine त्यातल्या lover boy hero हा ' प्रेम ' च हवा आणि त्याला आई नाही पण साक्षात रामा सारखा मोठा भाउ आणि आई सारखे लाड करणारी भाभी तर हवीच , अत्यंत उदात्त असा जगातला सर्वात ideal सासरा - बाप अनुपम खेर हवाच . जमिनीकडे पाहून संवाद म्हणणारी अतिशय लाजाळु - देवभक्त - लहान शहरातली , भाजीच्या गड्ड्या हातात धरून धावणारी , अत्यंत वाईट make up sense असलेली heroine, जी पहाण्याच्या कार्यक्रमला लाल भडक लिप स्टिक लावते .. तिचे अत्यंत कनवाळु वडिलांपेक्षा प्रेमळ असे काका - अलोक नाथ , नटखट लहान बहिण , लग्नाचा मध्यस्थ , एक मुनीमजी सगळे काही ! शिवाय निरनिराळ्या functions ची गाणी तर हवीच ! अगदीच अडीच तास काहीच होत नाही म्हंटल्यावर शेवटचे वीसेक मिनिटे काहीतरी climax!
कुत्रं टफ़ी मात्र नाही यात ! रविंद्र जैन चे lyrics त्यातल्या त्यात वेगळे " ओ जिजी तेरे ' जी ' का हाल जिजा को मै जाके बताउंगी ओ जिजी ' सारखी खुसखुशीत तर कधी कधी एकदम ' दिव्य वातावरण ' सारखे जड शब्द romantic गाण्यात पण आहेत ! एकदा का विवाह होउन समर्पण कि घडी आली कि नेमक्या ठिकाणी संपतोच सिनेमा ! 
|
'दुसर्याच्या लग्नाची कॅसेट' पाहून आपल्याया किती आनंद होईल, तेवढाच आनंद बडजात्यांचे चित्रपट पाहून होतो... माझा एक मित्र म्हणतो... त्यांचे चित्रपट म्हणजे, लग्नाच्या 'Extended Cassettes' असतात नाहीतरी.. 
|
काल 'भागम भाग' पाहिला.... प्रियदर्शन करून काही अपेक्षा होत्या.. तो पण कधी कधी जागा असल्याची जाणीव देतो, बाकीचा चित्रपट बेपत्ता.. परेश रावळ पुन्हा एकदा 'बाबूराव आपटे' केल्यागत वाटतो. गोविंदा तर बघवत नाही... सस्पेंस ठेवलाय, पण लॉजिक मात्र बर्याच वेळा निसटलय... या चित्रपटात कोणीही कुठेही उपटतो.. खरं तर गुरू, हक्का आणि कंपनीचा सम्बंध गुरूचा दुसरा पाय तोडल्यावर संपवायला हवा होता, पण ते शेवट पर्यंत बोर करतात... अनेक उपकथा आणि पात्रं घालून चित्रपट विनोदी करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, मुळ कथेला धरून विनोदी वळण दिलं असतं तर... असो, प्रियदर्शनने निराशा केली...
|
Dineshvs
| |
| Saturday, December 30, 2006 - 1:36 am: |
| 
|
मी पण कालच बघितला भागमभाग. मला फक्त कोरीओग्राफी आणि अक्षय आवडला. गाणी अजिबात लक्षात रहात नाहीत. लंडन शहराचे अनोखे दर्शन आहे.
|
Sayuri
| |
| Saturday, December 30, 2006 - 2:04 am: |
| 
|
भागंभाग पाहताना मराठी चित्रपट 'बिनधास्त'ची आठवण झाली.
|
Sashal
| |
| Tuesday, January 02, 2007 - 6:22 pm: |
| 
|
बाबुल : अगदीच फ़ालतू All the king's men: चांगला आहे .. कोणी बघितला का? ..
|
Disha013
| |
| Wednesday, January 03, 2007 - 1:01 am: |
| 
|
डोर बघितला. छान वाटला.आयेशा आणि गुलची कामे छान. वेगळा विषय. पण music मात्र कथेला विजोड वातले. art film ला pop music असावे तसे. बाकी movie छान. बाबुल्: डब्यात गेलाय. big B आनि हेमाचे नाच बागबान मधे कौतुकाने पाहिले सगल्यांनी. आता irritate करतात. सलमान झोपेतुन उठुन आल्यागत दिसतो. म्हताराही झालाय. राणि त्यातल्या त्यात बरी. जाॅन ही छान. बच्चन बोलेल ते ऐकतो बिचारा. गाणी अजिबात चांगली नाहीत. भांगडा धांगड्धींगा नुसता वैताग आणतो.
|
कोणि फाइट क्लब बघितला आहे काय? (ब्राड पीट आणि एडवर्ड नॉर्टन यांचा.. हिंदी फाइत क्लब नाही).. काल फार वैतागलो होतो.. त्यामुळे परत कितव्यांदा बघितला माहिती नाही. पण मस्त सिनेमा आहे. एक एक संवाद, स्वगते मस्त आहेत. जसे your life is ending one minute at a time.
|
Sayuri
| |
| Wednesday, January 03, 2007 - 6:57 pm: |
| 
|
रसिका जोशी आणि केदार शिंदेचा 'यंदा कर्तव्य आहे' एकदा पाहण्यासारखा आहे. अंकुश चौधरी, नवोदित स्मिता शेवाळे यांची जोडी चांगली दिसते. गाणीही चांगली आहेत. विशेषत: 'आभास हा' गाणं फ़ारच सुंदर. सोनू निगमने गायल्याचा आभास होतो 
|
Nkashi
| |
| Thursday, January 04, 2007 - 1:19 pm: |
| 
|
हो खुपच छान पिक्चर आहे... "कायद्याच बोला" सुद्धा खुप छान आहे.
|
Mbhure
| |
| Thursday, January 04, 2007 - 5:18 pm: |
| 
|
मध्यंतरी IFC-USA वर मजिद मजिद ह्या इराणी दिग्दर्शकाचा Childern of the Heaven पाहिला. साध्या कथेवर देखिल किती छान चित्रपट काढता येतो ह्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्याकडच्या एखाद्या आर्ट मुव्हीवाल्याने चित्रपटातील कुटुंबाचे गरीबेचे भांडवल केले असते. पण ह्यात दिग्दरशकाने तसे कोठेही न दर्शवता आणि लहान मुले मुख्य पात्रे असुन्ही आगावू संवाद त्यांच्या तोंडी न देता एक छान चित्रपट काढला आहे. कधीही संधी मिळाल्यास जरुर पाहा.
|
Mepunekar
| |
| Friday, January 05, 2007 - 2:15 am: |
| 
|
Sayuri तू US ल पहिलास क तो movie? DVD मिळतिये का त्या movie ची?
|
Madhura
| |
| Friday, January 05, 2007 - 5:18 pm: |
| 
|
भुषण, 'children of heaven' खासच आहे . मी 'children of heaven' बघुन त्या director चे मिळतील ते movies public library मधुन आणून बघितले आहेत. "The Color Of Paradise" , "Baran" वगेरे.
|
Mansmi18
| |
| Friday, January 05, 2007 - 5:52 pm: |
| 
|
Guys, Some movies I recommend: 1. March of penguins 2. My cousin vinny - (kayadyache bola cha original) 3. Legally Blonde - (Trust me it is a very intelligent movie) 4. Sant Tukaram - always a classic 5. Gammat Jammat/Banvabanvi and best of all natak "vasuchi sasu" with Dileep prabhavalkar.. regards
|
Sayuri
| |
| Friday, January 05, 2007 - 6:57 pm: |
| 
|
Mepunekar, Yes I watched it here in US but at friends place. I think someone who recently came here from India had brought CD for them. I have no idea if we can get DVD of it anywhere here. Barech marathi chitrapat tyamulech pahun hot nahit.
|
Tulip
| |
| Tuesday, January 09, 2007 - 5:30 pm: |
| 
|
नुकताच मुंबईत 'रेस्टॉरेन्ट' हा मराठी सिनेमा पाहीला. अत्यंत आवडला. चित्रपटाचा एकंदरच look , हाताळणी, स्टोरी, स्क्रीप्ट, लोकेशन, कलाकारांची कामे सर्वच अतिशय वेगळ आणि वरच्या दर्जाच. खूप शांत, संथ लयीत उलगडत जाणारा हा चित्रपट पहाताना इंगमारच्या वाईल्ड स्ट्रॉबेरीज किंवा इतर काही युरोपियन पिक्चर्सची आठवण झाली. शहराबाहेर एका शांत ठिकाणी स्वत्:च्या हिमतीवर घरगुती, उत्तम जेवण देणारी खाणावळ उघडून पद्माक्का (उत्तरा बावकर) आपला आणि आपल्या भाचीचा चरितार्थ चालवते. जिनी (सोनाली कुलकर्णी) मोठी झाल्यावर केटरींग कॉलेजात शिकून येते आणि त्या खाणावळीचा कायापालट करुन तिथे एक वेगळ्या धर्तीच रेस्टॉरेन्ट उघडते. तिला खूप काही बदल, नव्या गोष्टी आणायच्या असतात. त्यासाठी ती खूप धावपळही करत असते. पण तिच मन त्यात नसत. तिला अगदी लहानपणापासून असलेली स्वयंपाकाची आवड लक्षात घेता ती स्वत्: ह्या रेस्टॉरेन्ट च किचन सांभाळेल ही सर्वांची अपेक्षा असताना जिनी मात्र अनपेक्षितपणे तिथे फ़िरकतही नाही. पद्माक्का तिला खूप समजवायचा प्रयत्नही करते की अगं तुझ्या मनातल्या आवडीच काम न करता तु बाकी कामात जी उर्जा घालवत आहेस त्यामुळेच तुला समाधान नाही मिळतय. पण जिनी काही बोलायलाच तयार नसते त्या बाबतीत. नव्या शेफ़ साठी दिलेल्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून समीर धर्माधिकारी येतो. तो जिनीच्याच कॉलेजमधला मित्र. त्याच्या आगमना नंतर जिनीच्या वागण्यामागचे गूढ उलगडते खरे पण त्यातून मार्ग काढणे, भूतकाळातल्या कटू स्मृतींना मागे सारुन परत आपला स्वत्:चा शोध घ्यायला जिनी ला जमत ते समीरच्या प्रयत्नांमुळे आणि पद्माक्कांसहीत रेस्टॉरेन्तमधील इतर सर्व कुटुंबासारख्याच असलेल्या कर्मचार्यांच्या मदतीने. ज्या घरात हे रेस्टॉरेन्ट त्यांनी उभारलेले असते ते घरही इस्टेटीच्या कोर्टकेसमधे बरीच वर्षे सापडले असते. तो गुंता आणि जिनीचा स्वत्:चाच स्वत्:शी चाललेला झगडा दोन्ही एकाच वेळी उलगडत, निस्तरत जातो. हा साराच प्रवास सचिन कुंडलकरने पडद्यावर खूप छान मांडला आहे. चित्रपटात पार्श्वसंगीत म्हणून रेस्टॉरेन्टच्या सभोवतीच्या झाडांची सळसळ, पक्षांचे आवाज, तेथे वाजल्या जाणार्या गीटारचे सुरेख पीसेस ( ह्या गिटार वाजवणार्या मुलाचेही काम पण इतके छान झालेय, दिसतोही अगदी क्यूट :P ) हे सर्वच चित्रपटाच्या मूडला complimentary आहे. मुंबईतल्या माझ्या recent short stay मधेही हा कलात्मक चित्रपट मला पाहता आला ह्याचे समाधान नक्कीच झाले.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|