|
Sami
| |
| Thursday, January 04, 2007 - 8:07 pm: |
| 
|
माझा मुलगा आता २ वर्षाचा झाला. तसा वेळ आहे पण हळूहळू त्याला कशात तरी गुंतवायचा विचार चालला आहे. सध्या little gym मधे जातो. अमेरिकेत शाळेमधलं वातावरण कसं असतं? म्हणजे इथे racism वगैरे होतो का? आपली मुलं अमेरिकन मुलांमधे चांगली mix up होतात का? उलटपक्षी विचारायचं तर ती मुलं आपल्या मुलांशी चांगली खेळतात का? जर तसा भेदभाव होत असेल तर तुम्ही (किंवा तुमची मुलं) ते कसं handle करता? मला यावर हितगुज शिवाय कुठेच चांगला प्रतिसाद मिळणार नाही असं वाटलं. मनात खूप anxiety आहे. अनुभवी लोक आपले अनुभव इथे share करतील अशी अपेक्षा आहे. mod या विषयावर आधीच BB असेल तर तिथे हे पोस्ट हलवलेत तरी चालेल. धन्यवाद.
|
Anupama
| |
| Thursday, January 04, 2007 - 9:42 pm: |
| 
|
समि, माझ्या मुलीच्या शाळेत (प्रिस्कुल)मध्ये तर ती एकटीच non white आहे पण मला कधीच काही भेदभाव दिसला नाही. सगळी मुले एकत्र खेळतात, भांडतात, ती non white म्हणुन कोणी वेगळे वागवलेले मला तरी दिसले नाहिये. कदाचित लहान मुलांच्या निरागस मनाला भेदभाव माहित नसावा. हं आता काही आया असतात अगाऊ पण त्यांच्याकडे कोण लक्श देतय!
|
Mrinmayee
| |
| Friday, January 05, 2007 - 1:26 am: |
| 
|
समी, मला तरी असा अनुभव आला नाही. माझा मुलगा डे केअरला जायचा आणि त्यानंतर शाळेत. सुरवातीला युनिवर्सिटीच्या कँपसमधलं डे केअर असल्याने डायवर्सिटी बरीच होती. पण शाळेत प्रीडॉमिनंटली गोरी मंडळी. पण सगळी खूप छान वागली. आताही वागतात. काही देशींची तक्रार आहे 'गोरे किंवा इतर अमेरिकन चांगले वागत नाहीत'. पण अश्या लोकांचा एक मेजर प्रॉब्लेम म्हणजे ही कुटुंब कायम इतर देशींच्या शोधात असतात. म्हणजे मुलांच्या प्ले डेट्स करायच्या तर फक्त भारतीय मुलांशी. असं वागून कसं होणार? माझ्या मुलाला भारतीय आणि त्याहीपेक्षा जास्त इथले अमेरिकन मित्र आहेत. त्याचे जिवश्च कंठश्च मित्रही इथलेच आहेत. आता इतक्या वर्षांनी ज्या अमेरिकन कुटुंबांबद्दल खात्री वाटते, विश्वास वाटतो त्यांच्या मुलांचे आणि ह्याचे एकमेकांकडे अगदी स्लीप ओवर्स पण चालतात. तेव्हा शाळेतलं वातावरण साधारण थोड्याफार फरकानं तसंच असावं! अनुपमा म्हणते तसं काही अमेरिकन आई-वडील रेसिस्ट असतातही. पण आपल्याला पण तर चॉइस असतो! जे चांगले वाटतील स्वभावानं, अश्या पॅरेंटसच्या मुलांबरोबर आपल्या मुलाची मैत्री होऊ द्यावी.
|
Seema_
| |
| Friday, January 05, 2007 - 7:18 am: |
| 
|
माझा अनुभव तरी 'नाही' असाच आहे . फ़क्त खाण्यापिण्याच्या बाबतीत जर शाकाहारी असाल तर कधी कधी प्रश्नार्थक किंवा confusing भाव असतात . पण तेही तेवढ्या पुरतेच . समी , मी तरी , शाळा चांगली आहे कि नाही किंवा teacher चांगली आहे कि नाही किंवा तीथला program चांगला आहे कि नाही हेच सध्या पाहिल . racism वैगरे चा विचार सध्या तरी इतका केलाच नाही . कारण एकदा तस काही डोक्यात आल तर आपण प्रत्येक गोष्टीशी त्याचा संबंध जोडायला लागतो . त्या पेक्षा always go with the clear mind. पुर्वग्रह बाळगायचेच नाहीत . डोक्याला कमी त्रास होतो .
|
पण अश्या लोकांचा एक मेजर प्रॉब्लेम म्हणजे ही कुटुंब कायम इतर देशींच्या शोधात असतात.>>>>अगदी मृ.. उलट इथे काही south indian families आहेत त्यांचा अनुभव मला फ़ारसा चांगला नाही.. माझ्या मुलाला शाळेत खुप चांगली वागणुक मिळालि. आम्ही जरा रीमोट place ला आहोत इथे त्याच्या शाळेत तो फ़क्त तीसरा non white आहे. आणि पुर्वि सुध्दा फ़ार कोणी इथे nonwhite शिकले नाही हे पहिल्याच दिवशी कळले. तो आज शालेत prefect आहे. chirtsmas च्या करोल singing night ला तर त्याच्या prnicipal ने procession मध्ये त्याला leader केले आणि cross त्याच्या हातात दिला होता. शिवाय घरी फोन करुन तुमच्या धार्मिक बाबतीत ही धवळाधवळ नाही ना.. त्याच्या हातात cross दिला तर चालेल ना हे ही विचारले होते. आणि बर्याच मित्रांच्या घरी तो गेल्यावर त्यांच्या आया मला फोन करुन विचारतात. त्याने आमच्या घरी nonvege खाल्ले तर चालेल का? अजुन खुप काही चांगले अनुभव आहेत वाईट अनुभव नाहितच असे म्हटले तरी चालेल. माझ्या मते Indian बद्दल या लोकांन्चे चांगले मत आहे. ( मी uk बद्दल सांगितले.. )
|
Sami
| |
| Friday, January 05, 2007 - 8:36 pm: |
| 
|
thanks anupama, mrinmayee, seema, lopamudra. , खरंच तुमचे अनुभव वाचून खूप बरं वाटालं. सीमा तू म्हणतेस तेच बरोबर आहे पूर्वग्रह बाळगून राहिलं तर आपल्यालाच त्रास होतो. तसा college मधे मला ४ वर्षात कधी वाईट अनुभव आला नाही.. पण शाळेत कसं वातावरण असतं याची कल्पना नव्हती. मात्र तुमची पोस्ट्स वाचून थोडीशी धाकधूक होती मनात ती दूर झाली. thanks again.
|
Skdeep
| |
| Thursday, October 18, 2007 - 7:15 pm: |
| 
|
माझ्या ५ वर्षाच्या मुलाला मला लन्च साठी काय द्यायचे हा मोठा प्रश्न आहे कारण इथे आम्ही राहतो तिथे आणी त्याच्या शाळेत फार इन्डियन्स नाहीत एक दोन वेळा पराठे धिरडे दिले मसाले न घालता तरी इतर मुलाना त्याचा वास आवडला नाही, नाके बन्द केली रोज पिझ्झा किन्वा चिकन नगेट्स देणे मनाल पटत नाही कारण चीज़ ने इथल्या मुलान्मध्ये दिसणारा लठ्ठपणा नगेट्स ही फ़्रोज़न असतात कोणी आपले अनुभव सान्गू शकेल का?
|
Uday123
| |
| Thursday, October 18, 2007 - 8:26 pm: |
| 
|
रोज डब्यात काय द्यावे हा आमच्याकडे पण प्रश्नच आहे. आम्ही पास्ता, उपमा, पिझ्झा, ब्रेड जाम, सलाड इ. देतो. थोडे सुटसुटीत (करायला लवकर) आणी इतरांना वास न येणारे पदार्थ सुचवा.
|
Amruta
| |
| Thursday, October 18, 2007 - 9:35 pm: |
| 
|
मी तर सरळ तुप,साखर पोळी रोल देते. हा डबा नक्की संपतो म्हणुन तीला पण चालतो. बरोबर सलाड,काकडी, टॉमेटो अस पण देते. इतर काही दिल तर बर्याचदा तसच परत येत. पास्ता,मॅगी,सॅडविच देउन पाहिल पण ते नेहेमी अर्ध्या अधिक परत येत. वेळ पुरत नाही म्हणते ती. इतर मुल काय करतात विचारल तर सरळ टाकुन देतात म्हणते. नशिब ती तरी अजुन अस काही करत नाहीये.
|
Sahi
| |
| Friday, October 19, 2007 - 2:47 pm: |
| 
|
huमी तर पास्ता भाज्या घालुन,फ़्रेन्च टोस्ट,प्यानकेक,पुलाव देउन कन्ताळले आहे. अजुन ओपश नस सुचत आहेत का?
|
Madhura
| |
| Monday, October 22, 2007 - 9:16 pm: |
| 
|
इथे बघा आवडते का लिंक. ideas .
|
Amruta
| |
| Tuesday, October 23, 2007 - 1:56 pm: |
| 
|
छानच आहे लिंक.. मी ट्राय करेन.
|
Prajaktad
| |
| Tuesday, October 23, 2007 - 6:23 pm: |
| 
|
एकदम कलरफ़ुल लिंक आहे ही!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|