|
Srk
| |
| Wednesday, December 27, 2006 - 2:02 pm: |
| 
|
टायटल सॉंग मागच्या महिन्यात मायबोली’ मुळेच कुछ खोया कुछ पाया’ सिरीयलची आठवण आली. रोहिणी हट्टंगडीची अंबा वहिनी आठवली. अंनत जोगच्या करेक्टरचा परत खुप राग आला. विक्रम गोखलेचं रामदास स्वामींसारख करेक्टर आठवलं. त्या सिरीअलचं टायटल सॉंग आठवलं. बर्याच सिरीअलसची टायटल सॉंगस आठवली आणि मनाला भावलेली शेअर करावीशी वाटली. "यादों के धुंदले दर्पण में, बिते हर पल की छाया है| हर मोड पे मैने जीवन के, कुछ खोया है कुछ पाया है||ध्रु|| कुछ अंर्तमन की पीडाए, अपने ही लोग न समझे है| जितने सुलझाए प्रश्न यहॉं, वो रेशम जैसे उलझे है| क्यों मन कहने को अपना है, जब इसमे दर्द पराया है|" आठवणींच्या धुक्यानं पुसट झालेल्या आरशात गेल्या प्रत्येक क्षणाची सावली पडलीय. छोट्या छोट्या गोष्टी खुप वर्ष उलटुन गेली तरी लख्ख आठवतात.मनाच्या कुठल्यातरी कप्प्यात दडुन बसलेल्या, कधिच कुणाला न सांगितलेल्या. सांगण शक्यच नव्हतं कदाचित. माझी आजी अशीच आठवणी सांगायची. नाही बोलायची. मी कधीही न पाहीलेल्या, मला मुळीच माहिती नसलेल्या माणसांबद्दलसुद्धा ती सांगत असे. मोठ्यानं विचार केल्यासारखं ते बोलणं आठवतांना जाणवतय की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काहितरी हरवलं आणि काहितरी गवसलं मनाच्या खोल जखमा आजही ओल्या आहेत.माझ्या खुप जवळच्या माणसांनाही या वेदना जाणवु नयेत? पण मी सांगितल्याशिवाय कसं कळणार त्यांना? हे वादळ काहीसं आतल्या आत आहे ना! म्हणुनच तर निदान जवळच्या माणसांना कळावं असं वाटतय. छे! नुसतच कन्फ्युजन. जितकं सोडवावं तितक जास्त गुंतत जातय. एका वेळी एक प्रश्न सोडवावा म्हटलं तर सगळे कुठेतरी एकमेकांशी जुळलेत, अडकलेत. रेशमाच्या धाग्यांचा व्हावा तसा गुंता झालाय नुसता! हे मन तरी असं कसं? इतरांचा विचार जास्त करतं. हो अगदि क्रुर माणसालासुद्धा आपल्या वागण्यानं इतरांना त्रास होतोय हे त्याचं मनच सांगतं आणि मग तो खुष होतो. म्हणजे मनही फक्त नावापुरतच माझं आहे कि काय? कारण इतरांचच दुःख त्याला जास्त जाणवतं. पण याचाच अर्थ माझं दुःख समजुन घेईल असही मन कुठेतरी आहेच की! जिवनाच्या प्रत्येक वळणावर काहितरी हरवलं तर काहितरी गवसेलही. दुसरी सिरीयल तलाश’. मला मुख्य पात्र आठवत नाहीत, पण निलीमा अज़िज़ (साईड हिरोईन), एस. एम. ज़हीर( तिचे वडील), ‘जस्सी जैसी कोई नही’ मधले जस्सीचे वडिल (हीरोचे वडील) आठवतात. "कभी हादसों की डगर मिलें, कभी मुश्कीलों का सफ़र मिले| ये चिराग है मेरी राह के, मुझे मंजिलों की तलाश है| कोइ हो सफ़र में जो साथ दे, मै हु जहॉं कोई हाथ दें| मेरी मंजिलें अभी दूर है, मुझे रास्तों की तलाश है|" एखादा दिवस असा उगवतो कि काहीच मनासारखं होत नाही, अगदी चहासुद्धा! कामात, घरी, रोजच्या गोष्टीदेखिल नेहमीसारख्या होत नाहीत. कुठेतरी चुकत रहातं. छोट्याशा कारणानी सगळच अडुन बसतं. आधीच कमी वेळ आणि त्यात खुप काही साधायच. मग कंटाळा येतो. नको वाटत. यशाची, ध्येयाची वाट म्हणजे अडचणींनी भरलेला प्रवास वाटतो. जागोजागी अपघात व्हावा असा धोक्याचा रस्ता वाटतो. पण जरा विचार केला तर कळतं झालेल्या चुका, आलेल्या आणि पार केलेल्या अडचणीच तर मला माझा रस्ता दाखवतात. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माझी मंज़िल शोधत निघालोय. एखाद्या निर्णयानी वाट चुकली तरी, हा रस्ता आपला नाही हे कळतं आणि योग्य मार्ग शोधला जातो. मात्र आता वाटतय कुणाची तरी सोबत हवी या प्रवासात. कधी धडपडलो, अडखळलो तर निदान हात देऊन उठवायला तरी कुणी हवं. कारण माझं ध्येय, माझी मंज़िल दूर आहे. अजुन दिसतसुद्धा नाहीये, पण आहे! आणि तिथपर्यंत नेणार्या रस्त्याचा शोध अखंड सुरू आहे. या सिरीयलचं टायटल सॉंग तर सुंदर होतच पण प्रत्येक एपिसोड्च्या शेवटी चार ओळींच गाणं असे. त्यातल एक आठवतय. "वोह जो मुद्दतोंसे साथ था, वोह जो मेरा दाहिना हाथ था, मेरी जिंदगी से निकल गया, मुझे आसुओं की तलाश है|" आजवर ज्यानं सोबत केली, तो जणु माझा ऊजवा हातच होता. माझ्या अस्तित्वाचा महत्वाचा भागच मी त्याला समजलो. त्याच्याशिवाय काही करणंच शक्य नाही, मुळात जगणंच शक्य नाही असं वाटत होतं. तो नसु शकतो असा विचारही मनाला शिवला नाही, तोच माझ्या आयुष्यातुन निघुन गेलाय. या अनपेक्षित धक्क्यानं मला, माझ्या असण्याला समुळ हलवुन टाकलय. या दुःखाचा भार घेऊन पुढे जाणं शक्यच नाहीये. पण जावं तर लागणारच, ते कधी कुणाला चुकलय? निदान दुःखभार थोडा कमी करण्यासाठी माझ्या अश्रुंची गरज आहे. तेही कुठेतरी हरवलेत, म्हणुन आज आसवांचाच शोध घेतोय. कितीतरी टायटल सॉंगस मनात लपुन बसलीयत. कधी वाटतं विसरले असेन पण जरा मेंदुवर जोर दिला तर पटकन आठवतात. ‘गोट्या’ चं बीज अंकुरे अंकुरे’ असो वा लाईफलाईन्’ची बीप बीप’, ‘मृगनयनी’चं जरासं शस्त्रीय असो वा मालगुडी डेज्’ च तानाना नाना नाना ना, नानाना नाना नाना ना’ विसरु म्हणता विसरली जात नाहीत. दुपारी दूरदर्शनवर वक्त की रफ़्तार्’ नावाची अधिकारी बंधुंची सिरीयल येत असे. मी तिचा एकही एपिसोड पाहीला नाही. पण तिचं टायटल सॉंग संपल की कुठच्या तरी सुटीतल्या क्लासची वेळ होत असे.( आई म्हणणार कुठचा क्लास ते आठवत नाही, टायटल सॉंग मात्र….... पण काय करु माझी मेमरी एकता कपूरच्या गोष्टीतल्या सारखी केव्हाही, कितीही वेळासाठी आणि कितीही इंटेन्सिटीनं येत जात असते. ) "मंज़िल पर जो दीपक जलता, बहुत कठीन है उसका रस्ता| उसपर जो भी चलता जाये, वक्त उसी के संग हो जाये|" वाटचाल सुरुच आहे.
|
Srk
| |
| Wednesday, December 27, 2006 - 3:49 pm: |
| 
|
admin नाव मराठीत बदलण्यासाठी काय करु? टग टाकायला विसरले.
|
done..
|
Srk
| |
| Wednesday, December 27, 2006 - 5:15 pm: |
| 
|
mod तुमचे मनापासुन आभार
|
Manuswini
| |
| Wednesday, December 27, 2006 - 7:16 pm: |
| 
|
मी वरील SerialS पाहील्या नाहीत पण मला सैलाब ची title song खुप आवडयचे. अपनी मर्जी से कहा अपने सफ़र के हम है काय होती ती पुढची ओळ?
|
Prajaktad
| |
| Wednesday, December 27, 2006 - 8:59 pm: |
| 
|
रुख हवाओ का जिधरका है उधर के हम है!
|
Dhumketu
| |
| Thursday, December 28, 2006 - 9:11 am: |
| 
|
फ़ास्टर फ़ेणे मधील टायटल सॉंग आठवते का कुणाला? मला ईतकेच आठवते... "ईरादे नेक हो तो सपने भी साकार होते है, अरे सच्ची लगन हो तो..."
|
Jhuluuk
| |
| Thursday, December 28, 2006 - 10:15 am: |
| 
|
srk: जुन्या आठवणी काढुन दिल्याबद्दल धन्यवाद.. मनु, मला पण सैलाबचे टायटल आवडायचे आणि मला अस्तित्व एक प्रेम्-कहानी चे सुद्धा आवडायचे. "मुझ को तो चलते जाना है, अपनेही अस्तित्व का दामन थामे..."
|
Swasti
| |
| Thursday, December 28, 2006 - 12:08 pm: |
| 
|
धुमकेतु , .... रासते आसान होते है .. इतकच आणखी एक serial हल्लीहली लागायची इन्तझार और सही त्याच ही title song मस्त होतं मेरे आखोंके सभी ख्वाब प्यासे है अभी प्यार के कोई घटा घिरके आजाये कभी त्याच्या सुरुवातिचा शेर छान होता आठवला की लिहिन
|
Swasti
| |
| Thursday, December 28, 2006 - 12:18 pm: |
| 
|
तसच किट्टु गिडवनी आणि रजत ( की रंजीत ) कपुर ची एक मालिका लागायची " ज़मीन - आसमान " त्यात एक गाण होत ( आणि बहुतेक title song ही .) आम्ही ते बिन्धास्त अंताक्षरी मध्ये म्हणयचो " न जगका पता है , न अपनी ख़बर है मेहका है मोसम , बहकी नजर है जबसे तुम्हे देख़ा ... तुम्हारी फ़िकर है "
|
Mrinmayee
| |
| Thursday, December 28, 2006 - 4:33 pm: |
| 
|
Srk , छान लिहीलंय! अशी बरीच टायटल सॉन्ग्स आठवली. 'नीव' या सीरिअलचं सुरवातीचं गाणं तर फार आवडायचं... धरतीपर सूरज की किरने रख्खे नीव उजाले की विद्या के प्रकाश से रौषन नीव रहे विद्यालय की...
|
Sayuri
| |
| Saturday, December 30, 2006 - 7:30 am: |
| 
|
srk, माझ्या आवडीचा विषय! कुछ खोया कुछ पाया च टायटलसॉंग न विसरता येण्यासारखंच!सर्व शब्द माहित नव्हते. धन्यवाद! थोडीफ़ार आठवतात बाकीची शीर्षकगीते...(not sure abt lyrics) रजनी लडकी है एक नाम रजनी है, रजनी रजनी रजनी रजनी की एक ये कहानी है रजनी रजनी रजनी 'किस्मत' नावाची एक पकाऊ सिरियल होती (पण त्यात एक अरुंधती गणोरकर नावाची एक छान मराठी मुलगी होती. )anyways titlesong was like this: हसना है कभी रोना है खोना है कभी पाना है किस्मतका तो यही फ़साना है मराठी 'परमवीर' सिरियलचं गाणं आम्ही कायम म्हणायचो : जो करी जीवाची होळी छातीवर झेलून गोळी जो देश लढविण्यासाठी(?) होई परमवीर
|
Upas
| |
| Sunday, December 31, 2006 - 4:33 am: |
| 
|
जबान संभाल के चं टायटल सॉंग खूप आवडायचं.. पाठं आहे अजून बरचसं.. निव्वळ धमाल! मला रामायणच पण टायटल सॉंग आवडायचं! सायुरी, मला आठवतय त्याप्रमाणे ते जो देशद्रोह नित जाळी.. तो परम्वीर.. असं आहे!
|
Srk
| |
| Sunday, December 31, 2006 - 11:11 am: |
| 
|
झुळुक,मृण्मयी,सायुरी धन्यवाद. पंकज कपूरची 'नीम का पेड' सिरीयल होती. ते गाणंही छान होतं. "मुह की बात सुने हर कोइ, दिल के दर्द को जाने कौन? आवाजों की बाज़ारों में खामोशी पेहचाने कौन?" नुक्कड, ये जो है जिंदगी ची १ च ओळ आठवते. सगळ्या मायबोलीकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपल्या सगळ्या मायबोलीकरांना सुखा समाधानाचे आणि पुर्ण झालेल्या कथा कादंबर्यांचं जाओ.
|
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.... SRK ...म्रून्मयी....सायुरी... खरच आठवनी जाग्या झाल्या.... गोट्याचे title song तर अजुन पाठ आहे....बिज अंकुरे अंकुरे ओल्या मातिच्या कुशीत...जसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात... alpha T V च्या आभाळमाया चे ही title song छान होते....
|
Dineshvs
| |
| Monday, January 01, 2007 - 3:15 pm: |
| 
|
Srk लाईफ़लाईन माझी अत्यंत आवडती मालिका. विजयाबाईनी काय वातावरणनिर्मिती केली होती ना ? मला आमची माती आमची माणसं चे हे गाणे खुप आवडायचे हि काळी आई, धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं
|
Fulpakhru
| |
| Tuesday, January 02, 2007 - 4:40 am: |
| 
|
आनन्द या जीवनाचा सुगन्धापरी दरवळावा झिजुनी स्वता चन्दनाने दुसर्यास रसगन्ध द्यावा पाव्यातला सुर जैसा ओठातुनि ओघळावा मला मलिकेचे नाव नाहि आठवत पण ते टायटल सोन्ग मात्र अजुनही लक्शात आहे. कोणाला पुरे आथवते आहे का?
|
मौत और जिंदगी, दोनो हैरान है वक्तको मोड दे, हम वो तुफ़ान है ए जमाने तेरे, सामने आ गए आजके दौरके, नौजवा आ गये, दरपे तेरी लेके सूरत, लेके सुबह आ गए अब हम सुबहको, कर सलाम माझ हे सगळ्यात आवडत शिर्षकगीत.
|
सव्या कसली craze होती तेंव्हा सुबह ची ! माझं पण favorite title song आहे ते ! अजुन पण बरीच आहेत .. झी वर मधे एक short stories वर आधारीत चौदा पन्ने कि अशीच काही तरी serial होती .. नाव आठवत नाही .. त्यात सलील चौधरींच्या मुलीने , अंतरा ने म्हंटलेले title song सही होते ! " दिल न जाने क्यूं , यूं मुझको लगे तू बैचैन है , बेताब है शायद यही तो प्यार है !" आणि अजय सिन्हाच्या ' जुस्तजु " चे महालक्ष्मी अय्यर ने म्हंटलेले title song पण मस्त होते " दिल हमारा हमारे ही बस मे नही कभी ये आरजु कभी वोह आरजु हसरतोंका सफ़र खत्म होता नही कभी ये जुस्तजु कभी वोह जुस्तजु " जुन्या पाउलखुणाचे महालक्ष्मी अय्यर आणि अमोल पालेकर च्या मुलीने म्हंटलेले गाणे पण छान होते . आणि भारत एक खोज , स्वाभिमान चे पण छान वाटायचे ऐकायला ! साध्याच्या ' रावण ' serial चे पण आवडते मला
|
Hems
| |
| Tuesday, January 02, 2007 - 9:22 am: |
| 
|
" सुबह " चं title song मस्तच होतं आणि life line च्या सुरुवतीचे beeps तर अफलातून! बुनियाद, फौजी अशा काही जुन्या मालिका आणि त्यांची title songs आठवताहेत का कुणाला? मला "अधांतरी" चं title song आवडायचं हल्ली ऐकलेलं एक शीर्षकगीत खूप आवडलं होतं : "दोन हे आहेत पेले, आपुले नाही जणू ..". ह्रुदयनाथ मंगेशकरांचं संगीत होतं , राधा मंगेश करचा आवाज आणि शिल्पा तुळसकर होती प्रमुख भुमिकेत. मालिकेचं नाव आठवत नाही कदाचित अजून चालू असेलही alpha TV वर. आणि "टिकल ते पोलिटिकल जे पोलिटिकल ते टिकल" हे title song सुद्धा खासच! विशेष करून त्यागराज खाडिलकरने केलेला तो "जे" चा घाटी उच्चार !
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|