|
Dakshina
| |
| Monday, December 31, 2007 - 5:08 am: |
|
|
Hi निलिमा, तुझे नविन वर्षाचे संकल्प वाखाणण्याजोगे आहेत. एक दोन मी ही उचलावे म्हणतेय. तशा मी ही काही गोष्टी ठरवल्या आहेत. दैनंदिनी लिहीणे. Consistancy वाढवणे.. (माझ्यासाठी अत्यंत आवघड आहे).
|
Ankyno1
| |
| Wednesday, January 09, 2008 - 9:38 am: |
|
|
माझाही संकल्प कार्बोनेटेड पेयांवर बहिष्कार... (म्हणजे... कोकाकोला च्या कोक, फँटा, लिम्का, स्प्राइट... इत्यादी उत्पादनांवर... कारण... पेप्सीको उत्पादनांवर तसाही "आपला ब्रँड नाही" या नवाखाली बहिष्कार होताच ) आता क्रुत्रिम पेयांपेक्षा शहाळे, ज्यूस, लिंबू सरबत, कोकम सरबत अशा नैसर्गिक पेयांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.... बघुया... किती साध्य होतं ते....
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 09, 2008 - 6:18 pm: |
|
|
घाण होतं हे वर्ष! नवीन वर्षात संकल्प असं काही नाही केलं पण अल्कोहोल ला सुट्टी दिलीये. गेले २-३ महिने. प्राणायाम आणि व्यायाम अधून मधून सुरू केलाय. frequency वाढवायचा प्रयत्न आहे. आणि बुडाला आग लागल्यासारखं काम करायचंय. आळस झटकून. बघूया काय काय घडतंय ते!
|
Poorva
| |
| Wednesday, January 09, 2008 - 9:09 pm: |
|
|
कुणी सकाळ मध्ये आलेल्या लेख़ाप्रमाणे 'आरोग्याचे नियोजन ' केल आहे का? I didn't but would love to know if somebody has.
|
Dakshina
| |
| Thursday, January 10, 2008 - 6:26 am: |
|
|
पूर्वा, मी काही सकाळमधला लेख वाचला नाहीए. पण आरोग्याचे नियोजन (माझ्या परीने) केले आहे. म्हणजे नियोजन कसे करायचे ते ठरवले आहे, आणि So far ते यशस्वीपणे सुरू आहे. सगळ्यात आधी मी जे काही ठरवलं ते मूळात डिसेंबर पासूनच आमलात आणायला सुरवात केली, कारण १ जाने. पासून करू म्हणलं तर ते कधीच होत नाही (हा माझा अनुभव) आरोग्य नियोजन म्हणाल तर, सकाळी लवकर उठणे, आपल्याला झेपेल तो व्यायाम करणे. अंकुरने म्हटल्याप्रमाणे आरोग्यास हानिकारक पेय, खाणं टाळणे. दिवसभरात एखादं तरी फ़ळ (वडापाव ऐवाजी) खाणं रात्री हलका आहार, लवकर नीज. हे साधं सोप्प समीकरण. ( हे मी सध्या follow करते आहे.) पण ख़ाण्या - पिण्यावर बंधन आपल्याला कोणालाच नकोसं वाटतं, पण त्यातूनही मार्ग काढून नविन नविन (आरोग्यपूर्ण) पदार्थ तयार करण्याचा ही संकल्प केलाय, आणि तो काही प्रमाणत आमलातही आणतेय. मानसिक आरोग्याचं नियोजन मात्रं काहीही केलेलं नाही. त्यासाठी संकल्प बाकी आहे.
|
Nkashi
| |
| Thursday, January 10, 2008 - 9:30 am: |
|
|
माझा नविन वर्षातला संकल्प १. मराठी / english लायब्ररी शोधुन join करायची आहे (कुणी मदत करु शकेल का? पुण्यात कोथरुड, कर्वे नगर, अगदी डेक्कनला असेल तरी चालेल)
|
माझे संकल्प्: टॅक्सीवाल्याशी फ़क्त मराठीतून बोलणे. रोज सास बहु सीरियल बघणे. चहा कमी पिणे. त्वचेची नीट काळजी घेणे. आणलेली सर्व कॉस्मेटिक्स आणि स्कीन केअर प्रॉडक्ट्स वापरणे. आठवड्यातून एकदा तरी साडी नेसणे. हाय हील्सची सवय करणे
|
Runi
| |
| Thursday, January 10, 2008 - 5:48 pm: |
|
|
नंदिनी, आवडले तुझे संकल्प आपल्याला. तुझे शेवटचे ३ संकल्प मी पण करावे म्हणतेय कारण पहिले २ संकल्प मला उसगावात करणे शक्य नाही आणि ३ रा मला स्वत:लाच करणे शक्य नाही.
|
Zakki
| |
| Thursday, January 10, 2008 - 9:53 pm: |
|
|
टॅक्सीवाल्याशी फ़क्त मराठीतून बोलणे. कुठे? पुण्यात की मुंबईला? योग्य जागी योग्य वेळी पोचायचे आहे ना? एकदा मी पुण्यातल्या लक्ष्मी रोड वरच्या रिक्षेवाल्याला मराठीत बोलून सांगितले बालगंधर्व थेटरावर घेऊन चल. जरा वेळाने मी बाहेर पाहिले तर फर्ग्युसन कॉलेजपाशी पोचलो होतो!!
|
Farend
| |
| Friday, January 11, 2008 - 12:40 am: |
|
|
रूनी हो ना तो न. ३ चा मलाही कधीच जमलेला नाही. स्वत: चहा न पिणारे लोक कोणत्याही गोष्टीवरच्या उपायांबद्दल चर्चा चालू असेल तर बिन्धास्त ठोकून देतात पिणार्यांना की चहा कमी घेत जा (फक्त सकाळी एकदा वगैरे!) यावर सविस्तर लिहायचे आहे एकदा नन्दिनी तुझ्या न. ४ मधली दोन्ही वाक्ये पाहता दोन्हीपैकी एकच काहीतरी जमेल असे वाटते . न. २ मधे मात्र त्या सिरीयल बघून त्यावर येथे लिहिणे हे ही टाक. रूनी न. २ तुलाही येथे झी चॅनेल घेतले तर शक्य आहे. वरती उल्लेख केलेला तो आरोग्याचे नियोजन लेख कोठे मिळेल? लिंक आहे का?
|
बाय द वे हे माझे दरवर्षीचे संकल्प आहेत सास बहु (आद्य सीरियल तुलसीवाली) मी बघायला सुरुवात केली आहे. मधे तीन वर्षाचा गॅप पडला होता असं वाटतच नाही. सर्व स्टोरी समजतेय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|