|
Prasik
| |
| Tuesday, November 28, 2006 - 6:41 pm: |
| 
|
आरे विजु, मी ईंजिनीअरीग ला असताना सुध्धा आम्हाला आशिच क्युट टिचर होती, केमेस्ट्री शिकवायला. (मै हु ना! च्या शुश्मिता सेनची आठवण नाही झाली तर फ़ाऊल समजेन) सगळे कॉलेजचे मुले तिच्यावर लाईन मारायचे, फ़क्त मी सोडुन............ कारण सागंतो. तिचा बॉयफ़्रेन्ड माझा मित्र होता. नंतर त्या मैत्री मुळे मला प्राक्टीकल्स ला तिने सर्वात चांगले मार्क दिली हा फ़ायदा झाला
|
My first crush was my Maths Teacher in 9th Std...who happened to be a Bio teacher(so her Maths was weak..ignore that)....Same scenario like any S/W company...not so good resource management.
|
Vijay3845
| |
| Wednesday, November 29, 2006 - 9:54 am: |
| 
|
मला आवडणार्या सुरवातीच्या सार्या स्त्रिया माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. माझ्या मराठीच्या मॅडमबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं, तसंच आज माझ्या दुसर्या एका मैत्रिणीबद्दल सांगणार आहे. ती होती माझ्या एका वर्गमित्राची, साज़िदची मोठी बहीण. साज़िद आणि मी सातवी ते दहावी अशी चार वर्षं एकाच वर्गात होतो. आठवीला आमची खूप जवळची मैत्री झाली. आम्ही नेहमी एकत्र असायचो. खूप बोलायचो एकमेकांशी. दिलिपकुमार, राजकपूर, नर्गिस, मधुबाला यांचे पिक्चर्स, गाणी हे आमच्या बोलण्याचे विषय असायचे. त्याला उर्दू लिहिता वाचता यायचे. तो ज्या उर्दू कादंबर्या वाचायचा त्यांची कथानकं मला सांगायचा. एडगर बरोजची टारझनवरची बरीच पुस्तकं त्यानं मला वाचायला दिली होती. नववीला असतांना पुस्तकं देण्याघेण्याच्या निमित्तानं मी त्याच्या घरी जाऊ लागलो. तिथं तिला मी पहिल्यांदा पाहिलं. इमारती लाकडांचा त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता. आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्याची आई खूप प्रेमळ होती. गोरी, उंच, रेखीव चेहरा असलेली अशी ती मला आजही आठवते. माझ्याशी ती हसून बोलायची. मला खायला द्यायची. त्याचे वडील मात्र फारसे बोलत नसत. साज़िदच्या बहिणीचं नाव नज़मा. मी साज़िद एकाच वयाचे. नज़मा आमच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी. तिच्या आईसारखीच तीही गोरी, उंच अणि अप्रतिम देखणी होती. मी साज़िदकडे आल्यावर ती समोर असली की म्हणायची, "आओ न विजू, मै बुलाती साज़िदको." तिची चांगली ओळख झाल्यावर तीही माझ्याशी बोलू लागली. मी आलो की माझा हात धरून मला साज़िदच्या खोलीत घेऊन जाऊ लागली. तिच्या त्या गोर्या हातांचा मुलायम स्पर्श मला मोहरून टाकत असे. एकदा मी साज़िदशी बोलता बोलता म्हणालो, साज़िद, मला उर्दू शिकव न. म्हणजे मलाही त्या कादंबर्या वाचता येतील. [पुढचा भाग नंतर सांगेन.]
|
Chetnaa
| |
| Thursday, December 07, 2006 - 2:32 am: |
| 
|
mee maraatheet lihinyaachaa prayatna kareet aahe.
|
Vijay3845
| |
| Saturday, December 09, 2006 - 2:41 pm: |
| 
|
नुकताच बाहेरगावाहून आलो आहे. प्रसिक, चेतना, उद्या मी माझ्या स्टोरीचा पुढचा भाग सांगेन.
|
Vijay3845
| |
| Saturday, December 09, 2006 - 2:44 pm: |
| 
|
आणि चेतना, मराठीत लिहिण्याचा सराव चालू ठेव. एक दोन दिवसात जमेल.
|
Vijay3845
| |
| Sunday, December 10, 2006 - 12:54 pm: |
| 
|
साज़िदसारखंच नज़माचंही उर्दू चांगलं होतं. ती आणि तिची आई एकमेकींशी बोलायच्या तेव्हा अगदी मधुबाला, मीनाकुमारीच एकमेकींशी बोलताहेत असं वाटायचं. मला उर्दू शिकव असं मी साज़िदला म्हणालो, तेव्हा नज़मानं कपडे वाळत घालतांना ते ऐकलं. साज़िद म्हणाला, जरूर शिकवीन. कपडे वाळत घालून झाल्यावर नज़मा माझ्याजवळ आली न म्हणाली, विजू, उर्दू सीखना चाहते हो? साज़िद को फ़ुरसत कहां मिलेगी? तुम हररोज़ मेरे पास आते रहना, मै तुम्हे उर्दू सिखाऊंगी. मला खूप आनंद झाला. खरंच? असं मी विचारलं आणि हसत ती हां म्हणाली. का कोण जाणे पण माझी छाती धडधडू लागली. दुसर्याच दिवशी तिनं मला शिकवायला सुरवात केली. साज़िद त्याच्या अभ्यासात गर्क असायचा. एका सोफ्यावर माझ्या शेजारी बसून एका वहीवर ती काळ्या शाईनं उर्दू अक्षरं लिहायची मग ती वही माझ्या हातात देत म्हणायची, इस तरह लिखो. तिचं हस्ताक्षर अप्रतीम सुंदर होतं. ती जेव्हा वहीवर लिहायची तेव्हा मी ते निरखून पाहात राहायचा. खूप छान शिकवायची नज़मा. माझं काही चुकलं तर हसून माझी चूक सुधारून द्यायची. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे मीही इंटरेस्ट घेऊन शिकत राहिलो. उर्दू शब्दांचे उच्चार तिनं मला शिकवले, मला अडणारे उर्दू शब्दांचे अर्थ सांगितले. दोन अडीच महिन्यात माझी बरीच प्रगती झाली. एक तास ती माझ्या शेजारी बसून मला शिकवायची तेव्हा मी बाकीची सारी दुनिया विसरून गेलेला असे. माझं सारं लक्ष तिच्या बोलण्याकडे असे. नज़मा अप्रतीम सुन्दर होती. तिचे काळेभोर मोठे डोळे, सरळ नाक, नाजुक गुलाबी ओठ, नितळगोरा रंग, काळे लांबसडक केस सारंच अप्रतीम. उंची आणि सौष्ठवपूर्ण बांधा यामुळे सलवार कमीज़मध्ये ती खूप छान दिसायची. मीही नववीतला. तेरा चौदा वर्षांचा. मला ती खूपच आवडायची. शिकवतांना तिच्या हातांचा अनेकदा स्पर्श व्हायचा. पण तिच्याबद्दल मी माझ्या मनात वासना कधीच येऊ दिली नाही. तिचाही माझ्यावर खूप जीव होता. त्याच वर्षी एक दिवस तिचं लग्न ठरलं. सासरी जातांना माझे खांदे धरून ती मला म्हणाली, अब हम मिल नही पायेंगे विजू. मगर तुम उर्दू पढते रहना. मीही डोळ्यातले अश्रू आवरत म्हणालो, तुम्हारी बहुत याद आयेगी नज़मा. शायद आखरी सांस तक. माझ्या गालावर उजव्या हाताच्या बोटांनी स्पर्श करत म्हणाली, "रोना मत विजू" लग्न होऊन नज़मा सासरी गेली. पुन्हा ती दिसली नाही. नंतर मीही ते गाव सोडून गेलो. दुसर्याच वर्षी पहिल्याच बाळंतपणात ती हे जग सोडून गेली. तिचा मुलगा मात्र जगला. मला साज़िदनं जेव्हा हे पत्रानं कळवलं, तेव्हा खूप दु:ख झालं. आजही इतक्या वर्षानंतर एखादं उर्दू पुस्तक वाचताना तिची आठवण येते. मधूनच तिचा वहीवर लिहिणारा गोरा हात दिसतो. तिचं सुंदर हस्ताक्षर दिसतं. तिचं हसणं, बोलणं आठवतं. डोळे भरून यायला लागतात. पण मग लगेच आवाज येतो, "रोना मत विजू"
|
Chetnaa
| |
| Sunday, December 10, 2006 - 2:00 pm: |
| 
|
vijay,dolyat pani ale bahg tachakan.kharech akherparyant wisarne kathin hote bagh asha vyaktinna.te jatat,pan kayamcha sugandh mage thewun jatat.
|
Prasik
| |
| Sunday, December 10, 2006 - 8:49 pm: |
| 
|
काय रे हे,....... चेतनाचा मेसेज वाचुन समजलेच होते की .................. पण ही कथा खरी असेल तर .........रोना मत विजू......... माझ्याकडे शब्द नाहीत...
|
Vijay3845
| |
| Monday, December 11, 2006 - 3:11 pm: |
| 
|
प्रसिक, कथा खरीच आहे. मी शाळेत असतांना घडलेली. मला आज जे उर्दू येते ते तिच्यामुळेच. मनात रुतून बसलेल्या या आठवणी. इथं सारेजण आपल्या आठवणी सांगताहेत म्हणून मी पण सांगितल्या.
|
Vijay3845
| |
| Monday, December 11, 2006 - 3:15 pm: |
| 
|
चेतना, तुझा मेसेज वाचला. देवनागरीत लिहिण्याचा प्रयत्न कर.
|
एक झम्पुं पोरगा माझ्या एका मैत्रिणीवर लाईन मारायचा. एकदा त्याने तिला प्रपोज केले. तिने मला येऊन सांगितले. मग काय त्याची खुप धुलाई केली.
|
Sheshhnag
| |
| Friday, December 15, 2006 - 12:24 pm: |
| 
|
"रोना मत विजू" `अप्रतिम स्फ़ूट झाले आहे.' ही सत्यकथा असल्याने मन अस्वस्थ तर होतेच, पन कहाणी इतक्या परिणामकारक मांडली आहे, की एखाद्या प्रथितयश लेखकानेही स्तब्ध व्हावं. विजयजी, तुम्ही उत्तम लेखक होऊ शकाल. तुम्हीच का, `मायबोली'ने बहुतांशी सुह्रूदांना तांत्रिकचे शब्दमांत्रिक बनवले आहे.
|
विजय, खरोखरच अप्रतिम लिहिलं आहे. थोडक्यात पण अगदी परिणामकारक!
|
Vijay3845
| |
| Monday, December 18, 2006 - 6:09 pm: |
| 
|
शेषनाग, स्वप्निल तुमच्या प्रतिक्रियांबद्दल आभार!
|
Punayatlya eka mulichi he gost. Actually me hydrabad hun mumbaila eka interview vrun yet hoto. Gaadit ek marathi couple hote. Punaychya eka college che Princpl.(Nav nahi sangat)Nemke tevaach maazya sejaarchyaa seat var ek sunder(rather tya deam light madhe vaatat hoti) mulgi chdli. Tichi Aai eksaarkhi radt hoti aani baba tya prof. shi bolt hote.(Te tyanchyaach college madhe 2nd yr... la hoti.)Zaal gadi sutli mag aamhi ektr gevlo. toprayant mazee tya sir&madem shi chnglich olkh zali hoti.Tya mulishi boltana kaayam rashtrbhashecha nahitar ANGL bhasecha aadhar get hoto. (B'cze ti BENGALI hoti) Tr naav gaav pal ...vicharun zale. Pan samorch te Prof. aslyene phar kahi bolu sklo naahi( Tsehi phaar kaahi bolnar hoto ka ha ek prshnch aahe) But in general related to books,music,fav.timepass & all. Natr velechya bandhana mule aamhi zoplo. (Mala matr kahi kelya zop ch yet navhti nahi tsa mi dupari changla 4 tass zoplo hoto) me maatr Brian adems iket bslo hoto. Dusrya divshi sakli mala vatle ki aata khoop vel bolu shku Baakich nantr lihito aata Boss bomblto aahe (Please bear with me for my MINGRI)HA HA...
|
Sakhi_b
| |
| Friday, December 22, 2006 - 11:38 am: |
| 
|
kuldeep kadhi takat ahes next???
|
Skali skali ek sunder fresh chera bghnyacha anand kaay asto te mala tenva smjle. Ti ( s....) uthli aani wow she was looking very cute tiche dole,kes,chera haay I was dam desprate to catch her in my camera but it wasn't possible.Ha, tr ti jenva uthli aani aavru lagli tenva kaay zale mahit nahi pan mi sumpurn 2-3 minutes baher gelo. Pan nantr vatle ugachch gelo karan I lost those precious movements of her. (But @ that time whatever i did was ethically correct) Kuthle station ale mahit nahi pan amhi(Sir& madem)S... & me ) cngla chaha ghetla. Ase vaatle ki he kshn kadhi smpuch nyet.Pn Gaadi agdi jorat dhawat hoti,punyala right time pohchnyasathi. (I think first time in my life I wanted that train to be late so that I can have some more time with that beautiful Young lady & exciting couple.) Pan kaay krnaar gadi punyala agdi right time jaat hoti. Madhe madhe kahi station var thambli.Skalchi vel aslyane roojche student/aani iter pravsi aamchya bogi t chadhle. kse kaay mahit mi lageche thoda srkun bslo (Aata hyala koni stree-dakhinya mhnu shkel)
|
We shared newspapers within us.I asked her what she would like to do after her graduation ... I also exchanged the cards with Sir. Unfortunately,mi kahi ticha e mail id or any other contact no ghetla naahi.(tse te shkych navhte as vatle) Nahitri ek ratri eka gaditun ektr pravas krne aani contact details xchange krne phar sope nahi. (ithe mla chetan bhagat chya 1 night @ call centr chya preface chi prkarshane aathwan yete aahe) Kaay krnar shevti pune aale. Sir aani madem kde saamaan khoop hote so mi 1/2bag baher platform var neun thevlya.Tsech tichya kde hi saaman khoop hote so mi te hi gadi baher neyaant madat keli. bs that was last bye bye to her & that couple. Nantr mi anekda punyaala gelo aahe jaat aahe jaainhi. pan kadhi ajun tri tya .. college chya prince. kade jaaun bhetnyache mazi ichaa poorn zali naahi Baaki che nantr sangto aata punyala plto aahe
|
Vijay3845
| |
| Thursday, December 28, 2006 - 6:05 pm: |
| 
|
चेतना, प्रसिक, शेषनाग कसे आहात सारे? तुम्हाला १९०७ साल आनंदाचे, भरभराटीचे जावो!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|