Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 22, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through December 22, 2006 « Previous Next »

Sashal
Wednesday, December 13, 2006 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे जो फोटो आहे रेखाचा दुसरा त्यात तिची उजवी eyebrow डाव्या पेक्षा जास्त जाड दिसतेय ना आणि आकार पण वेगळा दिसतोय ..

Kedarjoshi
Wednesday, December 13, 2006 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐश ने डोळ्याला लागल म्हणून डोळे झाकलेत का?

Ashwini
Wednesday, December 13, 2006 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>रेखासारखी प्रचंड glamerous पण traditional beauty आणि शृंगारीक looks असलेली अभिनेत्री तर तिच्या नंतर कोणीच झाली नाही .
अगदी अगदी...
आणि dj , त्यातल्या त्यात जवळपास जाउ शकेल अशी फक्त ऐशच हे पण पटले.


>>>इथे जो फोटो आहे रेखाचा दुसरा त्यात तिची उजवी eyebrow डाव्या पेक्षा जास्त जाड दिसतेय ना आणि आकार पण वेगळा दिसतोय ..
आणि सशल, असं असताना सुद्धा ती इतकी सुंदर दिसतेय... :-)

Mrinmayee
Thursday, December 14, 2006 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐश ने डोळ्याला लागल म्हणून डोळे झाकलेत का? . मला तर डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेलं की डोळे तपासताना ते एका डोळ्यावर हात ठेवून अक्षरं वाचायला लावतात ना त्याचीच आठवण झाली. :-)
सशल, काय पण सही ऑबजर्वेशन!! :-) हो ग अश्विनी, सावनभादो आणि तत्सम सुरवातीचे सिनिमे सोडता खुबसुरत पासून अगदी कात टाकली रेखानं. सिलसिलातली रेखा आठवा. :-)


Dineshvs
Thursday, December 14, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या शेवटच्या नाचात निळ्या ड्रेसमधे ऐश्वर्या छान दिसलीय, पण तो सेटहि निळाच असल्याने, तो उठुन दिसत नाही. त्या गाण्यानंतरची मुक दाद खुप प्रभावी आहे, पण गाणे मात्र नाही लक्षात रहात.
मला ते मेंदीचे कोडे अजुनहि सुटले नाही. ड्रेसवर ईतकी छान कलाकुसर पण मग मेंदीचा फक्त चौकोनच का ? त्यावेळी मेंदीची नक्षी काढायची रित नव्हती का ? रेखाच्या हातावर आहे कि नक्षी, मग ऐश्वर्याच्या हातावर का नाही ?


Deepanjali
Friday, December 15, 2006 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेंदी designs काढायची पध्दत होती पण अत्ता सारखी जाळीदार कोन नी काढलेली नक्षी नव्हती .
ऐश्वयानी काढलेले डायमंड shape नॉर्थ अफ़्रिकन मुस्लीम समाजात ' खामसा ' या नावाने ओळखल्या जाणार्‍या design चे एक variation आहे .
Ideal खामसा पॅटर्न मधे डायमंड च्या आत एक फ़ुली सारखा आकार आणि चार ठिपके पण असतात .
या प्रकारचे shape सैतानाची नजर दूर ठवण्या साठी काढले जायचे , म्हणून बहुदा मुजरावाल्या स्त्रीया काढत असतील तसा shape. :-)
कोठ्यावर येणार्‍या सगळ्याच नजरा सैतानाच्याच:-)
अजुन एक कारण मला वाटते ते म्हणजे हे असे shape पुन्हा गिरवणे सोपे असते , त्यामुळे कथक करताना तिच्या हस्तमुद्रा कायम गडद मेंदी ने सुंदर दिसतील .
या उलट जाळीदार नक्षी एकदा रंगल्यावर छान दिसते पण ती पूर्ण गेल्या शिवाय दुसरे design हतावर चांगले दिसत नाही .
ती गिरवणे तितके सोपे नसते त्यामुळे fade होताना हात खराब दिसतात .
आणि performer चे हात असे खराब दिसून कसे चालेल ?
म्हणून मेन्दीने हे bold shape काढत असावेत .
शिवाय बोल्ड पॅटर्न्स हे दूर बसून मुजरा पहाणार्‍यालाही पटकन दिसतील .
म्हणून च आज काल सुध्दा कथ्थक आणि इतर नृत्यात हातावर बारीक design नाही तर मोठा लाल गोलाकार shape आणि tips च रंगवायची पध्दत आहे .
अर्थात आज काल नृत्त्या मधे बरेचदा temporary color म्हणजे आलता लावायची जास्त चलती दिसते .
मग त्या काळी मुजरा करताना अशा temporary colors सारखा सोपा शोध का लावला नव्हता कोणी , तर
इस्लाम समाजात स्त्रीला हतांवर ideally नेलपॉलीश , आलता किंवा या सारख्या इतर रंगीत सौंदर्य प्रसाधनांना नमाज पढताना परवानगी नाही .
असे कुठले रंग हे त्यांच्या धर्मात अपवित्र / अस्वच्छतेचे प्रतीक आहे आणि हात स्वच्छ नसतानाचे नमाझ अल्ला पर्यन्त पोचत नाही असाही एक समज आहे .
पण मेंदीला मात्र natural cosmetic म्हणून official परवानगी आहे .
म्हणूनच ऍश च्या हातावरचे साधे बोल्ड पॅटर्न दाखवले आहेत तेच जास्त बरोबर आहेत रेखा च्या उमराव जान पेक्षा !
Moderators,
Sorry विषयांतर झाल्या बद्दल . :-)




Sheshhnag
Friday, December 15, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपालीजी, काय मस्त माहिती दिलीत तुम्ही. वाह!

Sashal
Friday, December 15, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल 'विवाह' पाहिला .. मल तर बरेचसे संवाद नीट ऐकूच आले नाहित .. तसंही काहि फ़ार होतंच नाहि त्यात .. आणि शेवटी तो अपघाताचा scene म्हणजे सगळाच बिनडोकपणा ..

Giriraj
Saturday, December 16, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे विषयांतर काय! छान माहिती दिलीस तू! :-)

Rahulphatak
Monday, December 18, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खोसला का घोसला पाहिला.. छान आहे. हलकाफुलका विनोदी.
अश्या चित्रपटांविषयी फार विचार करायचा नसतोच, पण तरीही दोन तीन मिनिटाच्या एका सिक्वेन्स मधे वेगवेगळ्या पातळ्यांवर सामान्य माणसाचे (खोसला) असहाय्य असणे दाखवले आहे (त्याची बाजू 100% खरी / सत्याची असली तरी) ते believable वाटते.. आणि म्हणूनच काहीसे अस्वस्थ करते


Jadhavad
Monday, December 18, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी,
पर्वा 'काबुल एक्सप्रेस' बघितला. त्याच्या वेगळ्या कथानकामुळे, तो इथे मांडणे होनार नाही, त्या साठी मी नवीन बी.बी. चलु करतोय.
तुमचा प्रतीसाद अपेक्षित.

अमित


Kedarjoshi
Monday, December 18, 2006 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीनहुड पाहीला. ( I mean Movie) , बर्याच दिवसांपासुन पाहायचा होता. ठिकय. केवीन तेव्हा ही मिडल ऐजड वाटत होता.

Dineshvs
Tuesday, December 19, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ किती सुंदर माहिती. सुदानमधल्या बायकांच्या हातावर मी असे भौमितिक आकार बघितले होते. त्यांच्या काळ्या वर्णांमुळे त्यांचे तळहात खुपच उजळ दिसतात.
पण त्यांची मेंदी, लाल पेक्षा काळ्या रंगाकडे जास्त झुकणारी असते.


Asmaani
Tuesday, December 19, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ छान माहिती दिलीस! good !

Dineshvs
Thursday, December 21, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी परवा बसच्या प्रवासात अर्धवट झोपेत, अपरिचीत नावाचा सिनेमा बघितला. तसं बघितलं तर कथाकल्पना खुपच छान होती, पण टिपीकल बीभत्स मद्रासी हाताळणीमुळे सिनेमा अगदी अंगावर येतो.
सगळ्यात जमेची बाजु म्हणजे साहसदृष्यातली तांत्रिक करामत. अगदी मॅट्रिक्स च्या तोडीची.
हा सिनेमा बहुतेक तयार करतानाच हिंदीत केला असावा. वाहनाच्या नंबरप्लेट्स, लोकांची वेशभुषा असे सगळी मद्रासी असले तरी, लिखीत मजकुर हिंदीत होता.
गाण्यातला बीभत्सपणा काय वर्णावा. अगदी ट्युलिप्सच्या ताटव्यातले चित्रण असुनही, नाच बघवत नव्हते.
क्रिमिनल म्हणावा, असा खर्च झालेला आहे, या चित्रीकरणासाठी.


Tanyabedekar
Friday, December 22, 2006 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, अपरिचीत हा साधारण दीड वर्षांपुर्वी अन्निअन म्हणुन तमिळ आणि अपरिचीताडु या नावाने तेलुगु मध्ये प्रदर्शीत झाला. तमिळनाडु आणि आंध्रा मध्ये तो तुफान चालला. शंकर जो ह्याचा दिग्दर्षक आहे, त्याचे काही सिनेमे म्हणजे हिंदुस्तानी, नायक, हम से है मुकाबला. (नायक हा रिमेक होता. मुळ सिनेमा मुधल्वन ज्यामध्ये मनिशा कोइराला होती) हे सगळे सिनेमे तमिळ मधुन हिंदि मध्ये डब झाले आहेत. याच्या सिनेमाची थीम नेहेमी भ्रष्टाचार, समाजामधील अनैतिक मुल्ये वगैरेच्या विरोधात असते. पण सिनेमा नेहेमी प्रचंड भडक असतो. आणखी एक म्हणजे ह्याचा आजवर एकही सिनेमा फ्लॉप नाही. सगळे सुपरहीट. रजनीकांतचा येउ घातलेला सिवाजीचा डायरेक्टर पण शंकरच आहे.

अपरिचीत मधला एक डायलॉग मला लै आवडला. "गलती कोई बनियान का साइज नही है. स्मॉल, मिडियम, लार्ज. मेरे लिये हर गलती एक्स्ट्रा लार्ज ही है."
वा, फक्त तमिळ पिक्चरवालेच असे संवाद लिहु शकतात.


Giriraj
Friday, December 22, 2006 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपरिचीत मधला एक डायलॉग मला लै आवडला. "गलती कोई बनियान का साइज नही है. स्मॉल, मिडियम, लार्ज. मेरे लिये हर गलती एक्स्ट्रा लार्ज ही है."
वा, फक्त तमिळ पिक्चरवालेच असे संवाद लिहु शकतात.>>>>>>


Nalini
Friday, December 22, 2006 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काल Patch Adams हा चित्रपट पाहिला. मला खुप आवडला. त्यात Robin Williams चे काम खासच. हा चित्रपट खर्‍या कथेवर आधारीत आहे. Dr. Patch Adams यांच्या डॉक्टर बनण्यावर.
The Gesundheit! Hospital Project
आपला मुन्नाभाई MBBS ह्याच चित्रपटावरुन बनवण्यात आलाय.

Zakki
Friday, December 22, 2006 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९६४ ६५ च्या सुमारास, प्यार किये जा हा हिंदी सिनेमा तमिळमधील 'कादिलिक्केनैरमिल्लै' या सिनेमाची कॉपी करून बनवला होता. तामीळ सिनेमा पण बघितला, नि त्याचीच कॉपी केलेले तेलुगु, नि कानडी पण सिनेमे बघितले. तेलेगु, कानडी सिनेमे स्वस्तात झाले असावेत कारण त्यात सर्व सीन, अगदी प्लास्टिकच्या बादल्यांचे रंग (ज्या बादल्यांमधून नायिका, नायकाच्या नि त्याच्या मित्रांच्या अंगावर पाणी फेकते त्या) सुद्धा हुब्बेहूब तामीळ सिनेमातलेच!

Dineshvs
Friday, December 22, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्या, याच कारणास्तव त्या सिनेमातला नायक, नायिकेच्याच जीवावर उठतो. हा प्रसंग ईतका अंगावर येतो, कि मी दचकुन जागा झालो.
झक्की याहि सिनेमात, अगदी डांबरी रस्तादेखील भडक ऑईलपेंटने रंगवलाय. पण तांत्रिक बाजु मात्र झकासच.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators