|
Nalini
| |
| Friday, December 15, 2006 - 4:42 pm: |
| 
|
पॅन हे असे लिहायचे.. pa.cn
|
Sakhi_d
| |
| Saturday, December 16, 2006 - 7:32 am: |
| 
|
मी बाईक शिकत होते. दुसराच दिवस होता. २ फ़े-या झालेल्या. तिस-या फ़ेरीला समोरून ट्रक येत होता म्हणुन माझ्या मित्राने मला सांगितले कि बाईक डाव्या गल्लीत वळव........... मी त्याला विचारले डावीकडे म्हणजे कुठे??
|
Sjgumaste
| |
| Saturday, December 16, 2006 - 2:52 pm: |
| 
|
Sakhi Good one, now I am staying in Kalyan earlier I was in Dadar, one day I was standing on the Kanjurmarg Platform, I was trying to locate the indicator ,where it is, I didn't found it any where , I thought , how this Central Railway is running ,no indicator on the platform , after some time I thought atleast we will stand under the fan and I saw above my head , there it was Indicator. One more One of my friend is Telephone Operator , he has good habit to say after taking the phone ie Namaskar ......... followed by Company name and may I help you. One day was standing in the Temple , He said Namaskar ... May i help you
|
माझी मोठी बहिण तिच्या वेंधळेपणाबद्दल अगदी प्रसिध्द! मी ११ वीत असतानाची गोष्ट. आमच्या वाड्यात काॅमन टाॅयलेट होता. रात्रीची वेळ होती, आणि दारसमोर थोडा अंधार होता. माझी बहिण टाॅयलेटहुन आली. माझा एक मित्र नेमका दाराजवळ माझी वाट बघत उभा होता. माझ्या बहिणीला वाटले मीच उभा आहे, आणि तिने त्यालाच विचारले..."तुला जायचे आहे का?" बिचारा ओशाळून "नाही, नाही" म्हणत होता, तेव्हड्यात मी बाहेर आलो... आणि माझ्या बहिणीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला...आजुनहि त्या किस्स्यावरुन आम्ही बहिणीची नेहेमी विकेट घेतो....
|
Chaffa
| |
| Monday, December 18, 2006 - 10:01 pm: |
| 
|
खंरतर, हा माझा की कुणाचा वेंधळेपणा ते आता तुम्हीच ठरवायचं, पण किस्सा हा असा, त्या दिवशी सकाळी सकाळी आमची कॉफ़ी मशिन अचानक काम करता करता बंद पडली. बरेच जण कॉफ़ी पिउन मोकळे झालेले. काही खोळंबलेले. मला लहर आली सहज पनल उघडून बघितलं तर आत ईलेट्रॉनिक्स कार्डवर एक पाल मरुन पडलेली. ति काढायला लाउन मशिन रिसेट केल्यावर चालु झाले मी कॉफ़ी पिउन शांत पणे निघालो होतो तेवढ्यात एका भोचकाने विचारलेच काय झालं होतं म्हणुन.? मी सहज म्हणुन गेलो आत पाल होती आणी गप कामाला लागलो थोड्या वेळाने केबिनच्या बाहेर आलो तर हाऽऽऽऽऽऽ गोंधळ तरी मला काही लक्षात आले नाही पण आमचे कॉफ़ीचे महापुजारी (आमचे टेक्निकल मनेजर) घाईघाईत पळताना दिसले मला बघीतल्यावर जेमतेम " तुने सुबह क्यों नही बताया " म्हणून बेसिनकडे धावले. दहा मिनिटात दारत डॉक्टर हजर च्या मारी काय झालेय ते समजेना.!! त्यांनाच विचारलं तेंव्हा खुलासा झाला कि सकाळी पाल पडलेली कॉफ़ी प्यायल्याने काहीजणांना विषबाधा होउन उलट्या होतायत. ही मौलीक माहीती कळल्यावर सगळ्या पळापळीचा उलगडा झाला. ज्या कुणी मला सकाळी विचारले होते त्या बहाद्दराने माझ्या उत्तराचा गैर अर्थ लाउन तमाम मंडळींना सकाळच्या कॉफ़ित पाल असल्याचा फ़ोन केला होता. आणी एकाही बुद्धीमान प्राण्याला मला विचारुन खात्री कराविशी वाटली नाही. मग डॉक्टरांना नक्की काय झालेय ते सांगीतले आणी पुढचा गोंधळ त्यांनी निस्तरला.
|
Chyayla
| |
| Monday, December 18, 2006 - 10:29 pm: |
| 
|
वॉ वॉ... वेन्धळेपणाचा पण मौसम असतो की काय. सगळ्यान्च्या वेन्धळेपणाला एकदम बहर आलेला दिसतो. एक एक किस्से वाचुन मजा आली. काय चाफ़ा ईतक्या दिवस कुठे कडमडला होतास? आणी हा पालीचा किस्सा म्हणजे ईब्लिस वेन्धळेपणा म्हणावा लागेल. मला पण माझ्या एका मित्राचा वेन्धळेपणा आठवला. हा उत्तरप्रदेशी आणी माझ्याच गोटात एकाच कम्पनीत काम करायचा. आम्हाला महाराष्ट्र सा. बा. खा. च्या VoIP प्रोजेक्ट साठी अमरावतीच्या कार्यालयात नेहमी जावे लागायचे तेन्व्हा एक दिवस सकाळी नागपुर वरुन आम्ही दोघे अमरावतीला येउन पोचलो मित्राच्या आईची तब्येत ठिक नव्हती म्हणुन तो कार्यालयात आल्याबरोबर फ़ोन करायला गेला बराच वेळ झाला हा फ़ोन करतोय करतोय मी म्हटल काय झाले पाहु या तर हा आपला चिन्ताक्रान्त आणी दुरसन्चार खात्याला शिव्या देत होता. मी विचारल काय झाल? हा म्हणतो "यार ये लोग मेरे घरका न. ही गलत है करके बोल रहे है This telephone no. does not exist . म्हटल ठिक आहे काय आहे न. दे मला, मी तो न. लावला आणी एका झटक्यात तो लागला सुद्धा ते त्याने पाहिले आणी जोरात ओरडला " अर्रे याSSSSSर मैने STD कोड ही नही लगाया था.
|
Chaffa
| |
| Tuesday, December 19, 2006 - 7:37 pm: |
| 
|
आणखी एक (नडलेली ) भुतदया. गाडीखाली कुत्र्याचे पिल्लु अडकले होते त्याला बाहेर काढायला गेलो आणी ते हाताला कडकडुन. . ......... आता इंजेक्क्षन घ्यायला लागतिल का.???? किती.????? हातावर चालतिल कि एकदम पोटातच घ्यायला लागतिल.????
|
Dinesh77
| |
| Tuesday, December 19, 2006 - 8:16 pm: |
| 
|
कुत्र जिवंत आहे का ते बघा अगोदर.
|
Dinesh77
| |
| Tuesday, December 19, 2006 - 8:18 pm: |
| 
|
असेल तर त्याला किती इन्जेक्शन द्यावीत ते जनावरांच्या डाॅक्टरला विचारा
|
Chaffa
| |
| Tuesday, December 19, 2006 - 8:29 pm: |
| 
|
अरऽर्रऽऽर्रऽर्रर्र सॉरी हं दिनेश ७७ मी ते विसरोच होतो. बरं झालं लक्षात आणुन दिलेत ते पण काहॉ तुम्हाला कसं काय आठवलं हे.?? नाही आपला उगाचच कुतुहल म्हणुन विचारतोय.
|
Dinesh77
| |
| Tuesday, December 19, 2006 - 9:04 pm: |
| 
|
तुमच्या सारख्याच मित्राचा अनुभव!!!!!!!!!!!!!!!!
|
Chaffa
| |
| Tuesday, December 19, 2006 - 9:13 pm: |
| 
|
अहो दिनेश ७७, तुम्ही कुणाच्या बाजुचे माझ्या की कुत्र्याच्या पिल्लाच्या.???? कुठेतरी वाचलेला फ़ालतु विनोद आठवला म्हणुन लिहिला.
|
for a change हा माझा नाही रूम मेटचा वेंधळेपणा.... काल मोबाईलची battery लो झाली. काही केल्या चार्जर मिळेना. पार अख्खं घर शोधलं. त्यातच दोन तीन कॉल आले आणि मोबाईल मरणासन्न झाला. बरं घरात एकटीच होते. काय करावं सुचेना. रात्री दहा वाजता शमिका आली. ती आल्या आल्या माझा चार्जर कुठे ठेवलास वगैरे प्रश्नाची देवाण घेवाण झाली. तिचा चार्जर तिथेच पडला होता. पण त्याच्या माझ्या मोबाईलला काय उपेग? शेवटी अंजलीचा चार्जर शोधला. तो लावणार तेवढ्यात शमिका ओरडली... अय्या! म्हटलं आता काय झालं.. "सकाळी मी तुझा चार्जर माझ्या पर्समधे टाकला. तरी मी विचार करतेय माझा चार्जर घरी कसा.....
|
Chaffa
| |
| Wednesday, December 20, 2006 - 8:15 pm: |
| 
|
नंदिनी धन्य आहे............. यावर उपाय एकच एकतर तुम्ही एकाच प्रकारचे मोबाईल वापरा किंवा चार्जर डॉ. सारखा गळ्यात आडकवा. हे असले आमचे फ़ुकटे सल्ले.!! आम्ही काय करतोय.?? तेऽऽऽऽच म्हणुनच आज माझ्याकडे तिन,तिन चार्जर आहेत. काय भरवसा कुठे विसरेन याचा.
|
Rajeshad
| |
| Friday, December 22, 2006 - 9:54 am: |
| 
|
माझ्या एका मित्राला ऑफिसच्या कामासाठी जायचे होते. त्या वेळेस त्याने नुकताच वॉकमन घेतला होता त्यावर फ्लाईट मधे गाणी ऐकावी असा त्याने प्लॅन केला. घाईतच पॅकिंग करून त्याला निघावं लागलं त्यामुळे समोर दिसेल ती त्याच्या कलेक्शन मधली एक कॅसेट त्याने उचलली. बोर्डींग करुन झाल्यावर ऐटीत त्याने हेडफोन कानाला लावला तर त्यावर बाबा महाराज सातारकरांची भजनं चालू झाली. घाईत त्याने चुकुन त्याच्या वडीलांचीच कुठलीशी कॅसेट उचलली होती!
|
Chaffa
| |
| Friday, December 22, 2006 - 2:35 pm: |
| 
|
आणी मग त्याचे विमान सुखरुप उतरले असा काहीतरी शेवट या किश्श्याला द्यावासा वाटतो नाही का राजेश.???????
|
Zakki
| |
| Friday, December 22, 2006 - 3:43 pm: |
| 
|
शिवाय त्याच्या वडिलांनी त्याची टेप उचलून ऐकली तर? ...
|
Chaffa
| |
| Saturday, December 23, 2006 - 11:04 am: |
| 
|
माझा मामा (म्हणजे आईचा भाऊ या आर्थी, माझा बनवलेला मामा असे नव्हे.!!) वेंधळेपणाचे कोठार.!!!! तो ईकडे आल की माझ्या पोटात गोळा येतो कधि काय करेल याचा भरवसा नही. आता पर्वा परवाचेच( हा एकदम प्रातिनीधिक शब्द आहे कितिही काळ का जाईना ते परवा परवाच) उदहरण घ्या ना.!! मामा आल्याच्या दुसर्या दिवशी मी आपला घबरत घबरत घरी गेलो आनी पंखा लावला तर थोड्या वेळात पंख्यातुन धुर.!!!!!!! म्हंटलं आता आणी काय झालं तेवढ्यात आई किचन मधुन किंचाळली आत गेलो तर मिक्सर मधुन पण धुर.!!!! आइला म्हंटलं आजि घरातल्या सगळ्याच वस्तु धुर कशा काय सोडायला लागल्या.???? आईने फ़क्त हसुन मामाकडे पाहीले. मामाला खोदुन खोदुन विचारल्यावर उलगडा झाला.!!!!! मामाश्रींनी आज रॉकेल आणी खोबरेल तेल एकत्र करुन पंखे आणी तो मिक्सर यांचे सर्व्हीसिंग केले होते.!!!!!! ! आणी हे महगुरु चांगले L&T मधे कामाला आहेत हे विशेष.
|
Zakki
| |
| Saturday, December 23, 2006 - 2:31 pm: |
| 
|
अरे देवा! L&T इतकी जुनी कंपनी, इतकी चांगली! तुमच्या मामासाहेबांना आवरा!

|
Mahaguru
| |
| Saturday, December 23, 2006 - 10:16 pm: |
| 
|
आणी हे महगुरु चांगले L&T मधे कामाला आहेत हे विशेष. >> हे महागुरु वेगळे आहेत. महागुरु ह्या आयडीशी त्यांचा संबंध नाही. :d
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|