|
Dineshvs
| |
| Sunday, January 07, 2007 - 4:49 pm: |
| 
|
हल्ली भारतात मोबाईलवर रॉंग नंबर्स यायचे प्रमाण खुपच वाढलय. एकदा माझ्या ऑफ़िसमधुनच एका परदेशी नागरिकाने दिल्लीतल्या एका बॅंकेला फोन लावला, आणि तो माझ्याच मोबाईलवर आला. माझ्या समोर बसलेल्या मुलीच्या हे लक्षात आले, म्हणुन गोंधळ निस्तरला. काल तर एक फोन आला, आणि मामा मी दापोली ला पोचलो बरं का, असा तो माणुस बोलु लागला. एक क्षण मी गोंधळलो, कारण माझ्या माहितीत दापोलीला जाणारा, किंवा जाऊ शकेल असा एकच प्राणी. पण त्याने मला आधी सांगितले नव्हते. मग मात्र त्या माणसाशी मी दोन मिनिटे गप्पा मारल्या. अगदी प्रवास कसा झाला ? , तिकडे हवा कशी आहे ? आजी कश्या आहेत ? देवळात नक्की जा ? काकाना विचारलय म्हणुन सांग ? भाऊंचा थोरला काय म्हणतोय ? बहुतेक प्रश्ण बरोबर होते. तो माणुस व्यवस्थित उत्तरे देतहि होता. शेवटी जाताना सांगितले नाहीस असे मी म्हणालो तर तो म्हणाला, तुम्हीच तर गाडीवर सोडलत कि. मग मात्र मी फोन ठेवुन दिला.
|
Chyayla
| |
| Friday, January 12, 2007 - 2:40 am: |
| 
|
अरे चाफ़्फ़ा ईब्लिसपणा रोज घडत नसतो आणी मुद्दाम ईथे लिहायचे म्हणुन तर नाहीच नाही आणी त्यात ती सहजपणे येणारी मजा पण नसते. दिनेश, तुमचा रॉन्ग नम्बरचा किस्सा वाचुन मजा आली . या वरुन आठवल माझा Best Freind साजिद आणी मी दोघही खुप ईब्लिस आणी आमची चान्गली जोडगोळी होती व एकामेकाला नेहमीच पाठीम्बा द्यायचो, आमच्याशी पन्गा घेणारा आमचाच मित्र मोटु विजय. तर आमचा तेन्व्हा Job Hunting चा काळ होता व बरेच ठीकाणी Resume टाकले होते. एक दीवस साजिदनी बसल्या बसल्या विजयला फ़ोन लावला व अगदी कडक आवाजात सुरु झाला. साजिद्: Am I Talking with Vijay विजय्: yes साजिद्: I am calling from xyz company I have your resume and we are looking for a position in our organization . विजय एकदम सटरला व Yes sir.. yes sir म्हणुन चालु झाला साजिदनी त्याचा मस्त Interview घेतला मधेच त्याला चान्गला खेचला जसे What is this Vijay you should keep your resume with you, this is not good वैगेरे मखलाशी लावुन दीली. त्यावर तो Sorry Sir वैगेरे म्हणु लागला. शेवटी Anyway I will think about you positively म्हणुन ठेवुन दीला. पण तोपर्यन्त त्याला काही सुगावा लागला नाही की हा ईब्लिसपणा चालु आहे म्हणुन. दुसर्या दीवशी तोच आम्हाला सान्गायला लागला की असा मस्त Interview झाला वैगेरे... मग साजिदनी त्याला विचारले तुला XYZ company कडुन Call आला होता ना? विजय चक्क उडालाच... शेवटी तो मीच होतो म्हणुन सान्गितले तेन्व्हा मात्र विजयचा चेहरा पाहण्यालायक झाला होता. आणी आमची सगळी टोळी त्यावर हसायला लागली अस्सा राग आला होता ना त्याला... पण शेवटी तोही हसायला लागला.
|
Adi787
| |
| Saturday, January 13, 2007 - 9:47 am: |
| 
|
आरे या किस्स्यावरुन मला माझ्या मित्राने घेतलेलि फिरकि आठवलि.... माझा first time H1B stamp आलेला... आणि मि फ़ुल्ल तयारि करुन पुन्यातिल सगळ्यात चान्गल्या company चा job सोडुन दिलेला.. एक महिना फ़ुल्ल मजा चाललेलि..एक दिवस अचानक एक फोन आला. समोरच्याने सुरु केले प्रशनविचारने: I'm calling from US Visa consulate Chennai. We have few qs regarding your US visa and documents you have submitted. We found some docs missng..blah blah... माझी तर पार बोबडी वळलेलि... म्हटले झाले.. आता या वार्षि पुन्यतच राहने.. You'll need to comedown to Chennai office...I was zapped.. why chennai now? I started arguing..I got my stamping at Mumbai so y do I need to goto chennai...blah.. blah...blah. बर्याच conversation नन्तर मित्राने ओलख दिलि... जाम राग आलेला...मग लगेच आठवन झालि... तो B'lore ला shift झाल्यापासुन आम्हि त्याचे बरेच Interviews घेतलेत....coz he wanted to move back to pune..so our group used take him for a ride.. मग त्याने अस वचपा काढला....
|
Chaffa
| |
| Saturday, January 20, 2007 - 2:25 am: |
| 
|
आमच्या कंपनीचा HR Head म्हणजे एक headache च आहे रोज काहीतरी नव्या कल्पना आणुन आम्हाला हैराण करत असतो बरेच दिवस त्याच्यावर बर्याच जणांचा डोळा होता. आयताच सापडला काल.! हा मनुष्य पुण्यातला त्यामुळे पर्किंग, वन-वे असल्या गोष्टीना चांगलाच घाबरतो, काल आमचा ग्रुप मद्रास वरुन यशस्वीपणे परत आल म्हणुन पार्टी ठेवली होती. आत जानेवारी महीना असल्याने एकतर हॉटेल महा मुश्कीलीने मिळाले, आणी आधीच सगळा पार्किंग लॉट भरुन गेल्यामुळे महाशयाना गाडी बाहेर रस्त्यावरच उभी करावी लागली. अतिशय घाबरत गाडी बाहेर लावली खरी पण पुर्णवेळ लक्ष गाडीत गुंतलेले, रात्री उशीरा पार्टी संपली तेंव्हा बाहेर येउन पहातात तर गाडी गुल आणी खाली रस्त्यावर एक फ़ोन नंबर लिहीलेला.! महोदय जाम गोंधळले, गडबडीत तो नंबर फ़िरवुन बघितला तर तो अस्तित्वात नाही.!! आता.? पोलिस स्टेशनला तर जाउ शकत नाही ( हो दारुचा वास आला तर.? ) आणी सकाळी परत पुण्याला जाणे गरजेचे.! मग अश्यावेळी आम्ही नाही मदत करणार तर कोण.? पण आम्ही आधिच कटलेले.!! बिच्चारा उशिरापर्यंत गाडी शोधत बसला काय काय केले ते त्यालाच ठाउक.! मग आगदी पहाटे पहटे त्याल कुणीतरी फ़ोन केला, तुमची गाडी दोन गाड्या सोडुन थोडी पुढे झाडाखाली अंधारात उभी आहे. आता नवा प्रश्न ती तिथे कशी गेली.? शोधु दे उत्तर.! सगळ्या गाड्यांच्या डुप्लीकेट चाव्या ट्रान्सपोर्ट डिपार्ट्मेंट कडे असतात हे तो विसरलाय.!!
|
हा किस्सा आज सकाळी घडला. सकाळी माझ्या बाजुला (विमानात) एक भेदरलेली गोरी मुलगी येऊन बसली. विमानाने टेक ऑफ घेताना ती सारखी आकाशातल्या बापाची प्रार्थना करत होती. मी तिला म्हणालो, are u scared of flying ? ति म्हणाली नाही देवा कडे प्रार्थना करत होते की अपघात होऊ देऊ नको म्हणुन. त्यावर मी तिला म्हणालो मी : अग तु लकी आहेस आज, ति : का? मी : तु विमानाच्या उजव्या बाजुला बस्ली आहेस, अपघात झाला तरी तो विमानाचा डाव्या बाजुला होईल. ती : ऑं मग हसुन oh yeh, u are funny आम्ही बराच वेळ बोलत बसलो चांगली ओळख झाली. मग विमान खाली उतरले व हवाई सुंदरी म्हणाली की वेलकम टु हवाई. Pl check your baggage, next flight blah असे बोलत होती. चुकुन ति ओमाहा म्हणायचा ऐवजी हवाई असे म्हणाली. तेवढे ऐकुन परत ती : how come it landed in hawai . मी तिची मजा घेत where should it land then ती : to omaha मी : dont think so, look out hawai got snow ती परत भेदरलेया अवस्थेत it seems I boarded on wrong flight, oh man!, i got a meeting एवढे सगळे होई पर्यंत बरेच लोक हवाईसंदरी च्या हवाई म्हणन्याला हसु लागले वे तिला कळाले की ती ओमाहालाच आहे. तिचा चेहरा पाहान्यासारखा झाला होता.
|
Chyayla
| |
| Tuesday, February 20, 2007 - 12:43 am: |
| 
|
केदार तुम्ही एकदम शान्तपणे ईब्लीसपणा केलात.. मजा आली.. हवाईला बर्फ़ पडला म्हणजे खुपच झाले शिवाय विमानाला अपघात डाव्या बाजुला.... शाळेत असतानाचा किस्सा आठवला... वर्गात मधल्या सुट्टीमधे आमच्या चिल्ल्यापन्ती मन्डळातल्या सदस्याला एक फ़ाटकी चड्डी कदाचित त्याचा पुसण्याच कापड म्हणुन उपयोग केला होता सापडली. झाल ती चड्डी कुठे तर पन्ख्यावर टाकुन ठेवली. सुट्टी सम्पली आणी तास सुरु झाला आधीच उकाडा असल्यामुळे आमच्या शिक्षकानी पन्खा सुरु केला. मग काय त्या चड्डीनी पडाव तर ते पण नेमक्या मुलीन्च्या रान्गेत एकच आवाज ईईईई.... झाल नेहमीप्रमाणे आमच पुर्ण चिल्ल्यापन्ती मन्डळ तास भर उभे राहुन खड्या पायाची शिक्षा भोगत होते...
|
office मध्ये आमचा ४ जणांचा group होता.त्यात २ जण नवीन आले होते.एकदा सहज mails check करताना matrimonial site दिसली.मस्ती म्हणुन जे नवीन आले होते त्यातल्या मुलाचे नाव आणि सेल नंबर आणि बाकीचे details दिले. सोबत त्याचा फोटोपण upload केला. आणि सर्वात कहर म्हणजे त्या दिवशी तो आलाच नव्हता. पुढचे ८ दिवस बिचारा calls attend करुन हैराण...
|
मी एकदा शेजरच्यान्च्या गाडीच्या धुराच्या pipeमध्ये झाडाच्या पानान्चा गोळा करून ठासून भरला होता. दुसर्या दिवशी गाडी चालू करताना blast झाल्यासारखा आवाज झाला आणि त्यानन्तर ती गाडी जी बिघडली ती पुन्हा सुरूच झाली नाही.
|
Ekrasik
| |
| Monday, March 05, 2007 - 9:42 pm: |
| 
|
काही वर्षा पुर्वी केलेला इब्लिस पणा. एका सह-कर्मचारया ची रजा होती. ( कारण त्याचा भाउ आला होता. हे फ़क्त आम्हालाच सांगितले होते. ) तर त्याला fon केला कि "अरे तुझ्या प्रोजेक्ट चे client आले आहेत, त्यान्ना demo द्यायचा आहे. तु लगेच ये. येतना formals घालुन ये. " (आमच्या कंपनी मधे एकदम informal वातवरण आहे. सगळे जण casuals घालुन येतात.) १/२ तासात हा धावत पळत आला, घामाघुम , formals मधे, त्याला manager कडे पाठवला. तोवर सगळ्याना सुगावा लागला होता काही तरी मजा चाल्ली आहे. १ मिनिटात हा बाहेर आला तर सगळे खो खो हसताहेत. आणि हा रागाने लाल.
अर्थात manager ला काहीच कल्पना नाही कि हा रजेच्या दिवशी अचानक formals मधे का आलाय,
|
एक मित्राचार्य नुकतेच गायनिक मधे MD करून मुंबईत आले आहेत. त्याना मुलगी बघायला जायचं होतं. सोबत कुणीतरी हवं म्हणून मला घेऊन गेला. (इथुनच हे लग्न जमणार नाहि याचे संकेत सुरू झाले). मुलगी संगीतात पदवीधर होती. तिच्या कडे गेल्यावर काही जुजबी प्रश्न उत्तरे झाली. मधेच मुलीचा मामा की काका बाहेरून आला. त्याने मित्राला तुम्ही काय करता हे विचारले. बहुतेक मामाजीच्या कानपुरात संप असावा. दोन तीनदा MD आहे हे सांगून समजले नाही. शेवटी मी माझ्या खणखणीत आवाजात सांगितले... "तो बायकाची बाळंतपणे करतो"
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|