|
Jadhavad
| |
| Monday, December 18, 2006 - 8:54 am: |
| 
|
२ भारतीय 'खबर्-गार', १ अफ़गान ड्रायव्हर, १ अमेरीकन फ़ोटो-ग्राफ़र, आणि १ पाकिस्तानी 'हार्ड्-कोअर' तालीबान. 'काबुल एक्सप्रेस' ही ह्यांच्या ४८ तासाची कथा. भय आणि भाग्याने दुरावलेल्या पण नशीबाने जोडलेल्या अनोळखी जगांची कथा. ९११ नंतर अफ़गानीस्तान हा सगळ्या जगाचाच एक उत्सुकतेचा विषय. अमेरीका व तद्-नंतर सगळे जग, त्याला उंदीर म्हणुन संबोधते, अशा ओसामा ची, त्याच्या तालीबान फ़ौजेची माहीती सगळ्या जगापर्यंत पोहोचविण्यासाठी सगळे पत्रकार काबुल ला जातात. आणि काही तरी 'एक्स्लुसिव्ह' जगासाठी पाठवत, हे आपण बरेच वेळा बघितलय. नेट जिओग्राफ़ी वर तर ९११ व अफ़गाणिस्तान हा विषय तर नेहमी हाताळला गेलेला. अशाच पत्रकारांमध्ये भारताचे जय कपुर (अर्शद) व सोहेल खान(जॉन) काहीतरी 'स्कुप' मिळवायच्या नादात गेलेले. तालीब ची इंटर्व्ह्यु घेणारा सोहेल तर जय शुट करनारा पत्रकार, अशी ही टोळी काबुल च्या वाटेवर येते. ९११ नंतर अमेरीकेच्या बॉम्बर्स ने तालीबान चे पाळेमुळे उध्वस्त केली. त्यामुळे तालीबानी सोल्जर्स आसरा घेण्यासाठी पाकीस्तान बॉर्डर कडे धावतात. ह्यांच्या मधल्या एखाद्या तालीब ची तरी मुलाखत मिळवुन वॉर जर्नलिसम मध्ये पैसे मिळवावे ह्यासाठी आलेले. इथे ह्यांचा वाटाड्या अफ़गान ड्राईव्हर खैबर (हनीफ़ हम्-गम). ह्या खैबर ला त्याच्या देशा विषयी अतोनात प्रेम असते. आणी ह्या आजच्या परीस्थीतीला तो फ़क्त तालीबान लाच दोषी धरतो. 'बुझकाशी' खेळाच शूट करतांना एक अमेरीकन जर्नलिस्ट, जेसीका, ह्यांचा प्राण वाचविते. आणि नंतर ह्या टीम ला सामील होते. अशातच त्यांना ज्या तालीब ल भेटायचे असते, तोच ह्यांच अपहरण करतो. त्याच नाव इमरान शाहीद अफ़्रीदी (सुलेमान शाहीद). पाकीस्तानी आर्मी मधला वेस्टन फ़्रंटएयचा मेजर फ़क्त वरिश्ठांच्या आदेशानुसार ६ वर्षापासुन तालीबान बरोबर लढत असतो. पन आता त्याला अमेरीकन बॉम्बीग मुळे परत पाकीस्तान ला जायचे असते. एक सकाळी, जय्-सोहेल च गन पॉईंट वर अपहरण करुन तो खैबर च्या टोयोटा मधुन पाकीस्तान च्या बॉर्डर कडे निघतो. पत्रकार (खबर गार) असल्याने त्यांची चौकशी कुणी करणार नाही ह्या हेतुने जय्-सोहेल च, व बॉर्डर पर्यन्त ची वाट फ़क्त खैबर लाच माहीत असते म्हनुन त्याच अपहरण करुन इमरान 'काबुल एक्सप्रेस' टोयोटा मधुन चालु लागतो. मध्येच जेसीका पण ह्याच वाटेवर असताना ति ह्याना जॉईन होते, आणी तिच पन अपहरण होत. इथुन पुढचे २ दिवसचा प्रवास कसा पार केला जातो, त्याच यथार्थ, सत्य पण विदारक चित्रण म्हणजे काबुल एक्स्प्रेस. मध्येच त्यांना लागणारे लुटारु, त्यांच्या पासुन इमरान ने केलेली सुटका, पकडलेल्या २ तालीबांना मरेपर्यंत मारणारा अफ़गाणी जमाव, पिछा करनारे गाढव आणि एका कठोर सैनीकामध्ये असणार्या कोमळ वडिलांचे ह्रद्य. सगळ्यांच्या मदतीने शेवटी इमरान आपल्या मुलीला भेटुन पोहोचतो ख्रा पण त्याचेच लोक त्याच्या वर गोळी चलवितात. अशा परीस्थीत ह्युमर चा व ईमोशन चा चांगला वापर आहे. इम्रान खान चांगला की कपिल देव, हे जय व इमरान मधल भांडन, किंवा इमरान ने मारलेला डायलॉग "तुम्हारे मुल्क मे जिनका नाम सचीन है, वह सब बल्लेबाज है क्या?", "सचिन दुनिया का सबसे अच्छा, बहुत अच्छा बल्लेबाज है" किंवा "माधुरी दिक्षीत हमे दे दो ऑर कश्मीर ले लो" असे. हाईट म्हनजे जेव्हा पाकीस्तानी तालिब आणि भारतीय पत्रकार "मै जिंदगी का साथ निभाता चला गया" हे गान एकत्र म्हनतात, तेव्हा इर्मान म्हनतो, "गाने की कोई सरहद नही होती". गाणे म्हणणार्या तालीब ला जेव्हा कळत की माधुरी दिक्षीत पन लग्न करुन अमेरीकेत सेटल झालिये, तेव्हा त्याने व्यक्त केलेला राग, "येह मुल्क की सारी अच्छी चीजे वहा चली जाती है" किंवा कोक्-पेप्सी मधल भांडण, आणि जेसीका ने दिलेल उत्तर, "कोक ओर पेप्सी, मेड बाय अमेरीका बट आय ड्रिंक नथिंग". राजकारना मुळे आणि नशीबा मुळे परीस्थीती कशी ह्या अनोळखी लोकांना एका टीम सारखी, जीवावरच्या संकटांना तोड देवुन परफ़ॉर्म करायला लावते. पाकीस्तान तालीबान ला मदत करते, हे सत्य जगापासुन लपलेल नाही, पाकीस्तानी सैनीक पण हे कबुल करतात फ़क्त, त्यांचे वरीष्ठ त्याना हे कबुल करु देत नाहीत. एकीकडे एका देशाचा सैनीक वरीष्ठांची ऑर्डर म्हणुन दुसरीकडे लढायला जातो आणि त्यच देशाचा सैनीक त्याला ओळख न देता गोळी घालतो. ह्याच कबीर खान ने उत्तम चित्रण केलय. ह्या मुव्ही चा एक चांगला पॉईंट म्हनजे ह्याचा डाइरेक्टर. कबीर खान ह स्व्:त फ़्री-लान्सर अड्व्हेन्चरस आहे. ह्या पिक्चर ची स्टोरी त्याने अफ़गानीस्तान मध्ये असतांना लिहीलेली आहे. एक्च्युल शुटींग दरम्यान त्यांना खर्या तालीबानींकडुन धमक्या ही आल्या होत्या. पन तरीही न डगमगता, कबीर ने ६० अफ़गान सोल्जरांच्या मदतीने शुटींग कम्लीट केले. अजुन एक नोंद करायची गोष्ट म्हणजे, लोकेशन्स. Natural लोकेशन्स पेक्षा अजुन चांगले लोकेशन्स कोणतेच असु शकत नाही. मग ते उध्वस्त झालेले हॉटेल काबुल असो किंवा वाहणार्या पाण्याची झळी. सकळचा शॉट असो किंवा संध्याकाळचा. इतके मस्त एंगल लावुन शुटींग फ़क्त नैसर्गिक लोकेशन्स मध्येच होवु शकत. देशप्रेम, मग ते भारतीय नागरीकाच असु द्या, पाकिस्तानी नागरीकाच, अमेरीकन्सच असु किंवा अफ़गानी च, देशप्रेम हे प्रत्येकाला प्रिय असते. अमित ता.क. ह्या मुव्ही मध्ये हिरवळी वर, झांडांमागे गाणे गात फ़िरणारे हीरो-हीरोइन्स नाहीये, तेव्हा पत्नीला घेवुन जाण्यार्यांना दक्षता. अथवा, बोलणे तुम्हाला खावे लागतील........ आणि पत्नीने मारुन फ़ेकलेले पॉप्-कॉर्न सुद्धा.
|
Madya
| |
| Monday, December 18, 2006 - 9:32 am: |
| 
|
pop corn चा स्वानुभव आहे का जाधव?
|
अमित, मी स्वत्: काबुल एक्सप्रेस पाहिलाय. चित्रपट सुंदर आहे यात वादच नाही. दिग्दर्शकाची मेहनत प्रत्येक frame मधून दिसून येते. खर्या अर्थाने हा वैश्विक विषय आहे. तुमचे परिक्षण ही चांगले आहे.. पण ते ता.क. ची काही गरज होती का? स्त्रियाच्या intellectual Level ला एका तागडीत तोलू नका....
|
अमित मस्तच रे, लई भारी लिहिल, आजच जातो बघायला............
|
Jadhavad
| |
| Monday, December 18, 2006 - 10:43 am: |
| 
|
अगदीच, स्वनुभव..... मी १० डॉलर माझे वसुल झाले, पत्नीने पॉपकॉर्न आणी कोक मध्ये वसुल केले.
|
Sakhi_d
| |
| Monday, December 18, 2006 - 11:07 am: |
| 
|
जाऊ दे ग नंदिनी, ह्या पुरुषांचे असेच असते...... आपण त्यांच्या पुढे गेलेले चालत नाहि, बरोबरीने राहिले तरी problem आणि मागे राहिले तरी problem च
|
Tulip
| |
| Monday, December 18, 2006 - 12:12 pm: |
| 
|
काबूल एक्सप्रेस चा विषय नेहमीच्या हिंदी फ़िल्म्स पेक्षा वेगळा आहे पण दिग्दर्शक कबीर खान ने तो बराचसा उथळ पणे वर वर हाताळला आहे असे सतत जाणवते. अफ़गाणीस्तान मधली स्त्रियांची स्थिती, तालिबानींची दहशत, त्यांच्या बद्दल सामान्य अफ़गाणीला वाटणारी घृणा, नफ़रत हे प्रत्ययकारी पणे कुठेच मनावर उमटत नाही. कदाचित सादिक बर्मेक च्या चित्रपटांतून दिसणारा अफ़गाणीस्तान डोळ्यांपुढे आहे म्हणूनही असेल. सिनेमा नेमक्या कोणत्या दिशेने जात आहे, दिग्दर्शकाला नेमके काय दाखवायचे आहे हे स्पष्टच होत नाही. दोन भारतीय पत्रकारांच्या नजरेतून अफ़गाणीस्तान इतकच दाखवायच असेल तर मुळात जॉन अब्राहम आणि अर्शद वारसी कोणत्याही प्रकारे पत्रकार, फ़ोटोग्राफर वगैरे वाटतच नाही. त्यांची देहबोली, भाषा, नजर सर्वच अत्यंत कमी पडत. वाट चुकलेले प्रवासीच वाटतात ते. अर्शद च्या तोंडचे 'विनोदी' संवाद अस्थानी वाटतात. बंदुकीची नळी सतत रोखलेली दाखवण्याने नुसती तिथली दहशत जाणवत नाही. सिनेमाचा केवळ वेगळा विषय म्हणून कौतुक करण्यातून आता हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांनी बाहेर यावे. त्या विषयाची हाताळणी पण खर्या अर्थाने 'वैश्विक' दर्जाची व्हायला हवी. हिंदी गाण्यांचे तुकडे पेरुन, सचिन कपिल देव चे उल्लेख करुन उलट चित्रपटात जे टेन्शन आवश्यक होते तेच मेन्टेन होत नाहीय हे दिग्दर्शकाला जाणवायला हवे होते. 'तालिबानी' च्या मनात दडलेला 'माणुस' दाखवायचा जर दिग्दर्शकाचा प्रयत्न असेल ( gangster/terrorist च्या मनातला 'माणुस' शोधण्याची फ़ॅशन जुनी झाली म्हणून आता तालिबानी) तर एकाच टेम्पो मधे खैबर च्या मनातली घृणा, द्वेष आणि त्या तालिबानी च्या मनातला 'माणुस' ह्यांमधला अंतर्विरोध भेदकपणे जाणवायला हवा होता. इथे परत त्यापैकी काहीच मनापर्यंत 'पोचत' नाही. वयस्कर तालिबानी इम्रान खान जेव्हा त्याच्या मुलीला भेटतो तो प्रसंग मात्र कबीर खान ने अप्रतीम हाताळला आहे. कमालीच्या संयमीत व संवेदनशीलतेने. खैबर झालेल्या अफ़गाणी नटाची expressions पण सुंदर. ' तालीबानीयोंको लगता है इस खेल मे खूनखराबा ज्यादा है' म्हणताना त्याच्या चेहर्यावर जो विषण्ण saracasm दिसतो तो लाजवाब. अजून जमेची बाजू म्हणजे गाणी आणि कोणत्याही प्रकारे romantic angle आणण्याचा टाळलेला मोह.
|
Kiru
| |
| Monday, December 18, 2006 - 1:34 pm: |
| 
|
अतिशय सुंदर आणि आटोपशीर परिक्षण.. .. ..
|
Dineshvs
| |
| Monday, December 18, 2006 - 4:12 pm: |
| 
|
आताचे उध्वस्त अफ़गाणिस्तान बघवत नाही. फ़िरोज रानडे आणि प्रतिभा रानडे, हे दोघे तिथे राहिले होते. त्या दोघानी पुर्वीच्या अफ़गाणिस्तानवर, छान पुस्तके लिहिली आहेत.
|
निळू दामलेंचे contemporary अवघड अफगाणिस्तान वाचलेय का?
|
Dineshvs
| |
| Tuesday, December 19, 2006 - 5:42 am: |
| 
|
रॉबीन, ते तर माझे आवडते लेखक. पण त्यापुर्वी अफ़गाणिस्तान फ़ार सुंदर देश होता. स्त्रीयांवर अजिबात बंधने नव्हती. त्या काळातले वर्णन रानडे पतिपत्नीनी केलेय. अर्थात त्यानी असंतोषाची सुरवातहि बघितली.
|
Jadhavad
| |
| Tuesday, December 19, 2006 - 10:36 am: |
| 
|
ता.क. च्या मागे पुरुष्-स्री असा काही भेदभाव करण्याचा हेतु नाहीये, हे प्रथम वाचकांसाठी. ट्यूलीप्: कबीर खान ह्याने काबुल एक्सप्रेस आधी अफ़गानीस्तान वर आणि हिमालया वर भरपुर डॉक्युमेंट्रीज बनविलेल्या आहेत. डिस्कव्हरी वर त्याच्या काही डॉक्युमेंट्रीज आल्या होत्या. इथे त्याने त्याचा हे चित्रन राजन कपुर ह्य त्याच्या मित्राबरोबर अनुभवले आहे. त्यामुळे त्याचा हा मुव्ही "पुस्तकी" मुळीच वाटत नाही. काबुल स्पोर्टस ग्राउंड मध्ये फ़ुटबॉल गोलपोस्ट ला लटकवुन एकाला तालीबानने दिलेली फ़ाशी असो किंवा ब्ल्यु बुरख्यातल्या स्री ला AK56 ने गन पॉईंटवर केलेल शुट असो, असे कितीसे अफ़गानीस्तान चे "तालीबानी" चित्र आपन nat geo वर किती वेळा तरी बघीतले असतील. पण डाईरेक्टर ने ती एक स्टोरी नाही घेतलेली. एक द्वेष भरलेला समाज म्हणुन सगळ्या जगाला माहीत नसलेल्या सामान्य अफ़गाणी च चित्रण दाखविलय. हिरवळ,गाणे, हीरो, हीरोईन्स, व्हीलन ह्याला तडा देत, मूळ मुद्द्याला न सोडता, विषयाचे भान ठेवत, एक ड्राईव्हर ला प्रतीक माणुन अफ़गाणी समाजाची घुसमट नक्किच काबील्-ए-तारीफ़ आहे. तुफ़ान गोळीबार करुन, बेसुमार अत्याचार करुन किंवा शिव्या हासडुन पण दहशत्-आतंकवाद नाही दाखवीता येत. आपल्या दर ५ मुव्हीज पैकी १ मध्ये तर हेच असते. पन बाकीच्या वेगळ्या नाही होत. त्याला काबुल एक्स्प्रेस सारखी स्क्रिप्ट वेगळ करते.
|
Maitreyee
| |
| Friday, December 29, 2006 - 4:39 pm: |
| 
|
मी पण पाहिला काबूल.. विषय,कथा यात वेगळेपण आहे हे खरे. पण मला ट्यूलिप चे म्हणणे बरेचसे पटले. कथेचा विषय आणि ज्या परिस्थिती मधे परस्पर विरोधी लोक एकत्र येतात त्यात दृष्टीने अजून टेन्शन बिल्ड अप व्हायला हवे होते, तर ते जास्त खरे वाटले असते. टेन्शन मधे थोडा रिलिफ़ म्हणून जोक्स ठीक वाटले असते पण इथे हे दोघं हीरो इतके चेष्टा मस्करी, विनोद करत असतात की त्यांचे तालिब ने केलेले अपहरण, सतत मृत्यू ची छाया वेगवेगळ्या रुपात अवती भोवती असणे हे कुठे जाणवत नाही. तालिबानी इम्रान आणि तो अफ़गाणी हे मात्र अगदी खरे वाटतात आणि सुरेख अभिनय करतात. त्या तुलनेत अर्शद वारसी आणि जॉन अगदीच देमार फ़िल्मी रिपोर्टर(?) वाटले.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|