Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 15, 2006

Hitguj » My Experience » Please help , confused » Archive through December 15, 2006 « Previous Next »

Skdeep
Friday, December 08, 2006 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठून सुरवात करायचि कळत नाहीये मागच्या आठ्वड्यात एक भयन्कर प्रसन्ग आमच्यावर आला इथे न्युजर्सि मध्ये एका अपार्ट्मेन्ट कोम्प्लेक्स मध्ये आम्हि गेल्या ७ महिन्यान्पसून रहतो काहि भिति नवति मागल्या आठवड्यात माझ नवरा रात्रि पोस्ट बघायला गेला तर ५ ६ बुरखा घातलेली माणसे आलि आनि त्यान्नि त्याल मारहाण केलि आनि पाकिट काढून घेतले दुसर्या दिवशि शेजारीच असा प्रसन्ग घडला. इथे अश्या ५ ते ६ घटना घड्ल्या आहेत २ महिन्यान्पासून.

माझ्या नवर्यावर अश्या प्रकारचा प्रसन्ग ६ महिन्यान्पूर्वि न्युयोर्कला आला म्हणुन त्याने इथे अपार्ट्मेन्ट घेतले

ह्या ६ महिन्यान्त त्याचे २ अपघात पण झालेत

आमचे लग्न ६ वर्षान्पूर्वि झाले पण तो ग्रीन कार्ड होल्डर होता म्हनून मला लगेचच येता आले नाहि नवर्याने खूपच कष्ट काढले ३ ते ४ महिने इथे आनि नन्तर तिथे ३ ते ४ महिने अशी ६ वर्ष काढलि आत्ता ७ महिने मला झाले इथे येवून
पण अश्या ४ भयन्कर प्रसन्गानि आम्हि खचून गेलो अहोत वाटले होते कि आत्ता तरी नीट एकत्र राहू पण सतत टेन्शन आहे आत्ता भारतात परत जायचा विचार करतोय कुठेच सुरक्षीत वाटत नाहिये


Maitreyee
Friday, December 08, 2006 - 10:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे खूपच scary !! पण इतके घाबरून जाऊ नका. पोलिस कम्प्लेंट केली का? Nj मधे नक्की कुठे रहात तुम्ही? आणि सगळीकडेच असे होईल असे नाही.. आता परत बदलणार असाल तर कितपत सुरक्षित भाग आहे ते नीट चौकशी करूनच घ्या अपार्टमेन्ट. Good Luck!

Mrinmayee
Saturday, December 09, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच भयानक प्रसंग! पण खचुन जाऊ नका. (म्हणाल 'सांगणं सोपं आहे'). पण मैत्रेयी म्हणते तसं पोलिस कंप्लेंट करायला हवी. तुमची लीज कधी संपते? त्यानंतर लवकरात लवकर जास्त सुरक्षित (समजल्या जाणार्‍या) भागात अपार्टमेंट बघु शकता.
असे प्रसंग अमेरिकेत, भारतात कुठेही घडु शकतात. तेव्हा तडकाफडकी निर्णय घेण्यापेक्षा इथे पोलिसांच्या मदतीनं काय होऊ शकतं ते बघा.


Nilyakulkarni
Sunday, December 10, 2006 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच खुप भयानक आहे हे सर्व
वाचुनच कल्पना येते काय मनस्थिति असेल तुम्हा सर्वांची
पन घाइत कोनताही निर्नय घेउ नका

स्थानिक पोलिस किवा लिडर ची मदत घ्या
GOOD LUCK ...

Skdeep
Monday, December 11, 2006 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिसादाबद्दल धन्यवाद आम्ही पोलिस कम्प्लेन्ट केलि पण तेच म्हणतात असे कुठेही होवू शकते २ आठवड्यान्साठि सिक्युरिटि वाढवली पण पूढे काय ख़र सान्गायचे तर आमच आत्मविश्वास ढासळलाय कोणताही निर्णय घेवू तो बरोबर असेल ह्याची खात्रीच वाटत नाहिये
न्युजर्सी मध्ये कुठले अपार्ट्मेन्ट चान्गले आहेत


Bhagya
Monday, December 11, 2006 - 10:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एस के, मी पण अमेरिकेला असताना अशाच दोन प्रसंगातून गेलेय.
एकदा मी माझ्या मुलीच्या stroller सकट पोलिस चेज़ मध्ये सापडले होते.
दुसर्‍या वेळेला लहान मुलं गाडीतून घेउन जात असताना एका माणसाने आमच्या गाडीवर पिस्तुल रोखले होते. आणि ते ही अगदी चांगल्या भागात असताना.
पण हेही खरेच आहे की sunnyvale -cupertino सारखी काही ठिकाणे अगदी सेफ़ आहेत. तशा काही जागा तुम्ही राहता तिथे असतील तर तिथे मुव्ह होता आले तर बघा. अन्यथा तुम्हाला जो योग्य वाटेल, तसा निर्णय घ्या. शेवटी आयुश्यात आपल्या सुख्-सोयी महत्वाच्या असतात आणि आपण आपल्या दृष्टीकोणातून निर्णय घ्यायचा असतो.


Aaftaab
Tuesday, December 12, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Before finalizing an apartment, look at the reviews. Also, it is better to live where you have some friends. In NJ, you should be able to get apartments where there are lots of indians. Generally, apartments that are not very cheap in terms of rent, are safer too. (may not be true always, but still...)
All the best.


Anupama
Tuesday, December 12, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या गोष्टी sunnyvale-cupertino मध्येपण होऊ शकतात. माझ्या मैत्रीणीच्या नवर्‍याची गाडी बन्दूक दाखवुन पळवली होती.

Supermom
Tuesday, December 12, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई ग, आम्ही न्यू जर्सीला move व्हायचा विचार करतोय.
एसकेदीप,खरेतर तू अपार्टमेंटचे नाव लिहायला पाहिजेस निदान इतरांना त्याचा फ़ायदा होईल.


Skdeep
Tuesday, December 12, 2006 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही ऐवनेल मध्ये फ़ोरेस्ट व्ह्यू ड्राईव्ह मध्ये राहतो इथे ८०% भारतिय आहेत ऊन्हाळ्यात सगळ्यानचे आई वडिल येतात पण तरी हा प्रोब्लेम ४ महिन्यापासून चालू आहे इथे काहि विशिष्ट वर्गाला रेन्ट मध्ये सवलत दिली त्यामुले काहि लो इन्कम लोक आहेत


Sas
Tuesday, December 12, 2006 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हि कधी कधी खुप टेंशन येत इथे Bay Area CA त.

काहि महिन्यांन पुर्वि एका मुस्लिम बाइला तिच्या लहान बाळा सोबत उडविण्यात आल भर रस्त्यात.

One day I went for walk alone; one person followed me in car; he was saying "Come on sit in the car I will give u lift , u want lift..." It was 4:30 in Afternoon.

मी खालच्या गोष्टि करते for Safty

कुणा अनोळखी व्यक्तिला आपलि काहिच माहिति देउ नये.
(Do not tell from which country u r n what is your Religion)

दारावर जर कोणि अनोळ्खि असेल आणी आपण एकटेच असु तर दार उघडु नये.

रात्रि संध्याकाळि शक्यतो Post वै. चेक करण्यास एकट जाउ नये कारण एकटा माणुस तो हि गाडित नाहि कुणिहि काहिहि करु शकत.गाडित थोड तरि Safe असत.

शेजारि पाजारि चांगलि ओळक ठेवावि.

आम्हि रात्रि उशिरा कुठेहि जाण्याच टाळतो व गेलो असलो तर 8:30 Pm पर्यंत परत येण्याच ट्राय करतो.

मोबाईल नेहमी चार्ज ठेवावा. वेळ प्रसंगि मदति साठि Call करण्यास कामी येतो.

नवर्‍याला तो Office त पोहोचल्यावर, तो Office तुन निघत असतांना फोन करण्यास सांगणे.
(H-W should have info abt each other when n where you are going when u will be back...)

Do not got for walk or shopping alone if people are keeping Eye on u then they keep track of whether u go alone.

If you are not secure in that Apartment n already u hv faced problem then Apartment shd not think of Lease if u want to vaccant it.

Apartment gate shd not open for all people.
Try to stay in Apt where Access Code system is there on gate.

Robeenhood
Wednesday, December 13, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सर्व वाचून मला पुण्याची आठवण झाली. पुणं देखील इतकंच अनसेफ झालंय...
मला वाटतं जगाच्या पाठीवर सर्वत्र असुरक्षितता आहे...


Sayonara
Wednesday, December 13, 2006 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे, हे एवनेल म्हणजे नक्की कुठे, I mean कुठचं county ?

Deepanjali
Wednesday, December 13, 2006 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bay area मधे तसे safe असले तरी पण एकटीने चालायला जाणे , रात्री उशीरा ( नऊ नंतर ) गॅस स्टेशन वर एकटीने जाणे या गोष्टी मात्र नक्कीच avoid करायला पाहिजेत .
काही south Indian मुलींना जिथे तिथे जाताना सोने आंगावर घालून मिरवायची सवय असते अशा मुलींना दिवसा ढवळ्या चाकु दाखवून लुटल्याचे पण ऐकले आहे चांगल्या so called safe भागात !


Robeenhood
Wednesday, December 13, 2006 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही south Indian मुलींना जिथे तिथे जाताना सोने आंगावर घालून मिरवायची सवय असते >>>>
मूर्खपणा हा काही फक्त South Indian मुलींचाच मक्ता नाही काही...

Vinaydesai
Wednesday, December 13, 2006 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

NJ मध्ये जसे Safe भाग आहेत तसे unsafe आहेतच... (प्रत्येक ठिकाणी असतात)

Rule of the thumb , जस जसं NewYork, Newark च्या जवळ जाल तसा unsafeness वाढतो..

माझ्या दृष्टीने EDISON पासून PrinceTon कडे आल्यास बहुतेक Area Safe आहे.. अर्थात, जागा भाड्याने घेताना तिथे इतर कोण लोक रहातात हे बघायलाच हवं..

तेव्हा Move होताना इतराना काही माहीती असल्यास ती मिळवणं चांगलं...


Skdeep
Thursday, December 14, 2006 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐवनेल हे वूडब्रिज ऐरियात येते तुम्हि म्हणता तसे अम्हि पण पूर्वी ऐकले कि एडिसन सेफ आहे पण आत्ता तेही सेफ नाहिये, अमेरिकेची ईकोनोमी घसरतेय त्यामुळे देसी लोकान्वर ईथली लोक राग काढतात असे म्हणतात खरे खोटे देवच जाणे

Maitreyee
Thursday, December 14, 2006 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही गं आम्ही एडिसन मधे गेले दीड वर्ष होतो. तसे कधी ऐकले / अनुभवले नाही.. कदाचित तुम्हाला आलेल्या अनुभवामुळे असे कुणी सांगितले तर तुम्हाला लगेच विश्वास ठेवावासे वाटले असेल..
बाकी मी विनयच्या वरील पोस्ट शी सहमत आहे.


Lopamudraa
Friday, December 15, 2006 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे अस पण होत..

पण कदाचित शहर जास्त धोकेदायक असेल त्यामानाने countryside जरा safe असतील.


Skdeep
Friday, December 15, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी तुम्हि एडिसन ला कुठल्या अपार्ट्मेन्ट कोम्प्लेक्स मध्ये राहात होतात आम्हाला पण देसी लोकानमध्ये सेफ वाटते

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators