Dinesh77
| |
| Friday, October 06, 2006 - 3:06 pm: |
| 
|
पुन्हा एकदा विषयांतराबद्दल क्षमस्व, पण ललिता पवार यांची आणखी एक अजरामर भुमिका म्हणजे मिसेस डिसा (अनाडी) राज कपूर ललिता पवार यांच्या साठी अडून बसला होता कारण ती भुमिका पहिल्यांदा सुलोचना यांना देण्यात आली होती.
|
खरच पण ती मिसेस डिसा ची भुमीका खास त्यांच्यासाठीच लिहिली असावि इतक्या त्या त्यात फिट्ट बसल्या. विशेषत: त्यात त्या जेव्हा राज कपुरला......"मव्वाली कही का " अस म्हणतात तेव्हा तर..... आणि त्या भुमिकेसाठी मलातरी निदान सुलोचनाबाईंचा विचारही करवत नाही.
|
Chyayla
| |
| Sunday, October 15, 2006 - 6:45 am: |
| 
|
मला हे गाण चुकीच ऐकु नाही आल पण आता तुम्ही जेन्व्हा केन्व्हा हे गाण ऐकाल तेन्व्हा तुम्हाला मुळ गाण चुकिच वाटेल..ते गाणे असे दिवस तुझे हे फ़ुगायचे झोपाळ्या जाउन लोळायचे स्वप्नात बडबडत जाणे, वाटेत भेटले कुतरडे.. गल्लित पळुन जा SSS यचे... खाण्यात पोट हे फ़ुगायचे मोजावी पोटाची ढोली SSS ढोसावी बासुन्दी ओली तोन्डात बोकणे भरायचे थरारे कोवळी धरती सोसेना प्रुथ्वीला भार माझ्या या घराच्यापाशी थाम्ब गधे तु जराशी पापण्या मिटुन भुलायचे दिवस तुझे हे फ़ुगायचे.. झोपाळ्यावर जाउन लोळायचे अरुण दातेन्नी मोठ्ठा दिवा घ्यावा, दिवाळी जवळच आहे.
|
माझी एक मैत्रिण नेहेमी गाण म्हणायची आला आला वारा संगे साखरेचा चुरा पाठवणी करा सया निखार्याचा सुरा
|
Kiru
| |
| Friday, October 20, 2006 - 1:56 pm: |
| 
|
कुर्बानी मधलं गाणं आहे.. 'आप जैसा कोई..' मी फार कमी वेळा ऐकल होत हे गाणं.. मला हल्ली हल्ली पर्यंत वाटायचं 'आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आये तो बाप बन जाये..' मनांत नेहमी म्हणायचो.. असं कसं गाण केलय हे माझा हा गैरसमज हल्लीच दूर झाला..
|
Chyayla
| |
| Friday, October 20, 2006 - 3:52 pm: |
| 
|
हा हा... किरु बरोबर मलापण असेच वाटायचे
|
Sayuri
| |
| Saturday, October 21, 2006 - 4:20 pm: |
| 
|
मनीषा कोइराला, कमल हसनचं एक गाणं सुपरहिट मुकाबला मध्ये लागायचं. ते मला नेहेमी असं ऐकू यायचं.. 'टेलिफ़ोन बूथ में हसनेवाली मेलबर्न मछली मचलनेवाली' पुढच्या ओळी तर अजिबात कळायच्या नाहीत. खया काय आहेत कोणास ठाऊक. 
|
पण सायुरी मला वाटत बहुदा हे गाणं असंच असावं कारण मीही ते कायम असच एकलय.
|
Disha013
| |
| Monday, November 06, 2006 - 9:35 pm: |
| 
|
हो,सयुरी,असेच आहे ते गाणे...पुढे काय आहे ते देव जाणे.......मेडोना,नताशा नि काय काय! रिना रोॅय चं एक गाणं ( बहुदा हथ्कडी मधले असावे) , 'छोडो छोडो मेरी बाहे' मला, 'तोडो तोडो मेरी बाहे' असे ऐकु यायचे.
|
Chaffa
| |
| Wednesday, November 08, 2006 - 10:05 pm: |
| 
|
बोंबला च्यायला ( हा तो नव्हे ) , दिसते मजला सुखचित्र नवे, हे गाणं मी आजपर्यन्त दिसते मजला सुख ते रणवे असं ऐकत आलो. आज दिवाळी अंक वाचताना हे लक्षात आलं
|
Rahul16
| |
| Monday, November 20, 2006 - 3:20 am: |
| 
|
आज तक वर 'श्री वीर' सरीय ची जाहीरात येते. त्यात धमेन्द्र म्हणतो ' श्री वीर सरीया चले सदियो तक' मला एकु यायचे ' श्री वीर सरीया, चले सर्दियो तक' त्यातच पुढे तो म्हणतो,' मालिक कि मेहेर, मेरी मोहर' मला एकु यायचे ' ' मालिक कि मेहेर, मेरी मौत'
|
Prarthana
| |
| Wednesday, November 22, 2006 - 5:54 am: |
| 
|
तो रंग पंचमीचा दिवस होत. मी बसने घरी येत होते. एक स्टप वर बस थाबली. जवळ्च्याच पान वाल्याच्या टपरीतून गाणे ऐकू आले तेरी शहनाइ बोले सुनके दिल मेर डोले.... माझ्या तोन्डून मात्र सहज निघाले तेरि पीचकारी दबे रंग से बदन मेरा भिगे जुल्मी काहे को ऊडाए ऐसी धार रे
|
Dinesh77
| |
| Wednesday, November 22, 2006 - 2:20 pm: |
| 
|
१० १२ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या घराशेजारी एक लहान मुलगा रहात होता. त्याचे आडनाव होते गुरव. तो "जन ग़ण मन" मधली एक ओळ अशी म्हणायचा: पंजाब सिंध गुरवांचा आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
|
Swa_26
| |
| Thursday, November 23, 2006 - 5:59 am: |
| 
|
पंजाब सिंध गुरवांचा आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! ......... ह. ह. पु. वा.
|
माझी पुतणी अचानक हात मागे करुन म्हणायची...."तव शुभ आशीष मागे"
|
ही माझ्या मैत्रिणीची रफ़ीला श्रद्धान्जली, तुम नमकीन हो. तुम जादा हो तुम नाजुक हो तुम कलिया हो.. सोचता हु की मै किसे प्यार ना करु...
|
Sayuri
| |
| Saturday, November 25, 2006 - 2:38 am: |
| 
|
मर्डर मधलं 'भीगे होंठ तेरे' या गाण्यात एक ओळ मला नेहेमी अशी ऐकू येते: काला जादू करे, लंबे बाल तेरे ऑंखे झील तेरी, डोले लाल तेरे.. ...'डोले लाल तेरे????? बापरे!
|
>>'टेलिफ़ोन बूथ में हसनेवाली मेलबर्न मछली मचलनेवाली' हे असच आहे बहुतेक. त्याच्या पुढे मला ऐकू आलेल्या ओळी अशा आहेत. डिजीटल में सूर है तराशा madonna है या नताशा झाकीर हुसैन तबला तू है हां...
|
Robeenhood
| |
| Wednesday, December 06, 2006 - 5:52 pm: |
| 
|
...'डोले लाल तेरे????? बापरे>>>> ते डोरे लाल तेरे... असे आहे.
|
Robeenhood
| |
| Wednesday, December 06, 2006 - 5:58 pm: |
| 
|
झाकीर हुसैन तबला तू है हां... >>> झाकीर हुसैन तबला तू है क्या.... असे आहे
|