|
Dineshvs
| |
| Tuesday, November 14, 2006 - 5:30 pm: |
| 
|
रॉबीन, देव आनंदचा मुलगा सनैल आनंद, त्याचा आनंद हि आनंद नावाचा सिनेमा आला होता. तो बहुतेक पप्पा आणि शिरिष कणेकर यानीच बघितला असावा. त्याला घेऊन E.T. सिनेमा काढता येईल, असे कणेकर म्हणाले होते.
|
Manuswini
| |
| Tuesday, November 14, 2006 - 7:19 pm: |
| 
|
मी उमराव जन पाहिला youtube.com वर, नी अर्ध्या तासात बंद केला तीच ती एशची थकी अक्टींग बोर आहे....... गाण्यात काहीही दम नाही.. aish म्हातारी दिसते, तिला लिपलाईन्स आल्या आहेत. जावु दे एवढी नावे ठेवु नये कोणाला......
|
Sas
| |
| Wednesday, November 15, 2006 - 6:46 pm: |
| 
|
विवाह कालच विवाह पाहिला खुप प्रभावि नसला तरि छान वाटला डोक जड करणारा दिर्घ दु:खी कथानकचा: उमरावजान पुन्हा पुन्हा कोमेडि: अपना सपना मनि मनि जड जड पकाऊ भाऊक संवाद मेक अप: जानेमन ह्या सार्यां मधे पहाण्यासारखा चित्रपट 'विवाह'. मारामारि, फसवाफसवि, मेक अप चा मारा हे काहि हि नाहि. सादगि, सच्छ विचार यांचि हि Family Love Story तिच तिच राणी, प्रिति, ऐश, प्रियंका ....तोच तोच शाहरुख अमिताभ, सलमान, अभिशेख, रित्तिक, त्यांचे तेच तेच डायलोग ह्यांचा n item songs चा विट आला असेल तर can watch "Vivah" as a good change. राणी, प्रिति,शाहरुख अमिताभ, सलमान,... should take long long break now
|
Sayuri
| |
| Wednesday, November 15, 2006 - 7:06 pm: |
| 
|
'विवाह' मधलं 'दो अन्जाने अजनबी' गाणं चाल, बोल म्हणून छान आहेच पण shootही मस्त केलंय.
|
Disha013
| |
| Wednesday, November 15, 2006 - 10:33 pm: |
| 
|
मी तीन दिवसात तीन भयानक,एकापेक्षा एक पकाऊ pictures पाहिले.. द किलर हमको तुमसे प्यार है हमको दिवाना कर गये इतरांनी नावे तरी ऐकलित की नाहि कोण जाने! चुकुनही वाट्याला जावु नका. सहनश्क्तीची परीक्षा बघतात हो....
|
Giriraj
| |
| Thursday, November 16, 2006 - 7:04 am: |
| 
|
मला तरी 'हमको दिवना कर गये' इतका बोर नही वाटला... काही अतिशयोक्तिपुर्ण किंवा अतिरंज्त प्रकार सोदल्यास.. कतरिना आणि अक्षय ची प्रेमकहाणी आवडली... कतरिना दिसते मत्र खूपच छान कालच बघितलेला एक चित्रपट म्हणजे.. ' the Bridge on River Kwai' .. अप्रोतिम इतकाच अभिप्राय खरं तर पुरेसा आहे... चित्रपटाच्या title पासून सगळाच चित्रपट अतिशय मेहनतिने तयार केलाय... एखादी कादंबरी उलगडत जाते तसाच हा चित्रपटही उलगडत एका परमोच्च बिंदूवर संपतो.. आपलीच निर्मिती नष्ट होऊ नये म्हणुन आधी चाललेला आटापिटा त्याच निर्मितिचा नाश स्वतःच्या हातांनी करण्यातलं दुःख आणि हे सगळं आपल्याच देशासाठी केल्याचं समाधान दाखवतांना दिग्दर्शक आणि कलाकार किती भाव खऊन जातात हे प्रत्यक्षात पाहण्यासारखे आहे... मुख्य कथानकात अगदी प्रेमकथा म्हणता येतिल न येतिल (किंवा भावनिक ओढाताण म्हणा)इतक्या पुसटश्या दोन उपकथा (पहीली Joyce ची आणि दुसरी मेजर शिअर्सची) खूप चटका लावून जातात... अप्रोतिम!!!!!! अवश्य पहावा!
|
Dineshvs
| |
| Thursday, November 16, 2006 - 5:05 pm: |
| 
|
उद्या कॅसिनो रॉयाल येतोय. ट्रेलर बघितला स्टंट्स अप्रतिम आहेत पण या पिअर्स ने मला स्पॉईल करुन ठेवलेय. त्याच्या जागी आणखी कुणाला स्वीकारणे जरा कठिणच जाणार आहे.
|
ह्या कसीनो रॉयल मधेच आहे का मल्लीका शेरावत? I know पीअर्स खुपच सही वाटायचा बॉन्ड म्हणून.. नविन बॉन्ड असा त्याच्यासारखा मिश्किल वाटत नाही. बराच सीरीयस वाटतो
|
Sashal
| |
| Thursday, November 16, 2006 - 6:28 pm: |
| 
|
हा 'the Bridge on River Kwai' बंगाली आहे का? नाहि, 'अप्रोतिम' आहे म्हणून विचारतेय ..
|
क्वायवरचा पूल हा डेविड लीनचा सर्वोत्कृष्ट पिक्चर बरेच लोक मानतात. काही लोक डाॅ झिवागोला त्याचा मान देतात. क्वायपुलातील मूल्यांचा संघर्ष 'अप्रोतिम'च आहे आणि तेही मोठ्या तरल पद्धतीने. नाहीतर आपल्याकडे वेगळा विषय घेतला की त्याची एक अन्धारी, कुन्थणारी,रटाळ आर्ट फिल्म करून टाकतात...
|
Mbhure
| |
| Thursday, November 16, 2006 - 10:30 pm: |
| 
|
FOR USA: ज्यांना केबलद्वारे BRAVO Channel दिसतो त्यांनी आज रात्री ९ वा ३० मि. Central Time दाखवण्यात येणारा MEMENTO हा चित्रपट चुकवू नका. अगदी सुरुवातीपासुनच बघावा ही विनंती नाहीतर....
|
Maitreyee
| |
| Thursday, November 16, 2006 - 11:21 pm: |
| 
|
नाहीतर आपल्यालाच तो आजार जडलाय असं वाटायला लागतं सही आहे Memento ..
|
अखेर ओमकारा पाहिला.. काय जबरी ट्रीटमेन्ट दिलीय विशालने त्याला. आणि othello चं जे बिहारीकरण केलय त्याला खरंच तोड नाही. सैफ अलि खानने तर life time role केलाय. पिक्चरचे casting फारच जबरी आहे अत्यन्त जळजळीत वास्तवामुळे व त्या मुळे आलेल्या बोल्ड भाषेमुळे पिक्चर अंगावर येतो मात्र
|
Seema_
| |
| Friday, November 17, 2006 - 5:54 am: |
| 
|
कुणी Good will hunting बघितल नसेल तर जरुर बघा . Full timepass म्हणुन wedding crasher पण चांगला आहे . आता मला बघायचा आहे तो म्हणजे बाॅबी . पाहिल्यावर कुणी तरी लिहा please कसा आहे ते .
|
Swa_26
| |
| Friday, November 17, 2006 - 6:08 am: |
| 
|
"कायद्याचं बोला" हा चित्रपट काल पाहीला. हसून हसून डोळ्यातून पाणी आणि पोटात दुखायला लागले. मकरंद अनासपुरेची संवादफेक उत्तम, सगळा सिनेमा तोच खाऊन टाकतो. स्टोरीलाइन तशी फारशी मोठी नाहीय पण कदाचित म्हणूनच त्याची मांडणी एकदम संयत आहे. मुख्य म्हणजे पिक्चर कुठेही भरकटत नाही. एकदम सहज लय पकडून चालतो त्यामुळे कंटाळा असा येतच नाही. आणि एक विशेष असे की पूर्ण पिक्चरमधे एकही गाणे नाही, हे पिक्चर संपल्यावर आपल्या लक्षात येतं. मकरंद अनासपुरेबरोबर बाकीच्या सगळ्यांचीच कामे खूप छान झालीत. निर्मिती सावंत, मोहन आगाशे, सचिन खेडेकर, शर्वरी जमेनीस, संजय मोने, अरूण नलावडे, पुष्कर श्रोत्री, उमेश कामत ही नेहमीची मंडळी तर आहेतच पण बाकी सगळ्यांची कामेही मस्त. नवीन अक्षय पेंडसे पण लक्षात राहतो. प्रत्येकाने एकदा तरी पहावाच असा चित्रपट.
|
Dineshvs
| |
| Friday, November 17, 2006 - 5:08 pm: |
| 
|
रचना, मल्लिकाताई, जॅकी चॅनच्या एका सिनेमात होत्या. यात पण आहेत का ? नवा बॉंड मला ट्रेलरमधे तरी नाही आवडला. सिनेमा बघुन मग लिहिन. रॉबीन. क्वायपुल निदान पंचवीस वर्षांपुर्वीचा सिनेमा आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी म्यानमार अशांत होता म्हणुन त्याचे चित्रीकरण श्रीलंकेत झालेय. त्याकाळी कॉम्प्युटर ग्राफिक्स नसल्याने, सगळी दृष्ये खरी आहेत.
|
Sashal
| |
| Friday, November 17, 2006 - 5:31 pm: |
| 
|
काल 'अब तक छप्पन' पहिल्यांदाच पूर्ण बघितला .. नाना पाटेकर, सलाम!
|
Karadkar
| |
| Friday, November 17, 2006 - 11:56 pm: |
| 
|
Casino Royale!!! fantastic movie ... New bond is good. I still wished Pierce Brosnan was 007!!
|
वास्तुपुरुष, आताच पाहिला. अत्यन्त सुन्दर चित्रपट.
|
काल 'अब तक छप्पन' पहिल्यांदाच पूर्ण बघितला .. नाना पाटेकर, सलाम! <<<<<त्यातली एक गडबड कळली का ? जर नाना पाटेकर नी त्या फ़िरोज चे आधीच encounter केलेले असते तर जेंव्हा नानाला फ़सवण्या साठी फ़िरोज च्या ठाव ठिकाण्याची खबर देतात तेंव्हा तो जीव धोक्यात टाकून का जातो ??
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|