Sandu
| |
| Wednesday, November 08, 2006 - 4:45 pm: |
| 
|
आम्ही सुद्धा हनिमुनला गोव्याला गेलो होतो. तेव्हाची गंमत आहे. आम्ही cruise वर गेलो होतो. तेथे सुरुवातिला कोंकणी dance झाला आणि मग सर्व couples ला dance साठी invite केलं गेलं. मी एकदही गणपतीची मिरवणुकी शिवाय dance केला न्हवता. स्टेज वर गेल्यावर मी बिथरलो आणि डोळे मिटुन गणपती dance करत सुटलो. dance करतांना नको त्या मुली समोर आल्या आणि मी बायकोला सोडुन त्यांच्या सोबत नाचतो आहे असा (गैर)समज झाला. मग काय? १ दिवस कडकडीत उपवास!
|
Lajo
| |
| Thursday, November 09, 2006 - 3:18 am: |
| 
|
Sandu ह. ह. पु. वा. डोळ्यासमोर चित्र उभे राहीले...
|
मी काही दिवसापुर्वी केलेला वेंधळेपणा? Office मधून निघून आम्हा काही जणांना लगेच hp pavallion मध्ये जायच होत. आणि lawrence expwy वरती जे MacDonald आहे तिथुन काहीतरी पटकन घेऊन मी direct hp pavallion वर काही जणांना भेटायच अस ठरल होत. रोज lawrence वरून येता जाता मी ती MacD ची पाटी बघीतली होती. मग मी गाडी उजवीकडे वळवली आणि मग लक्षात आल की MacD च parking lot निळ्या दोरीने बंद केले आहे. पण मग मी शेजारच्या complex मध्ये गाडी लावली आणि निळ्या दोरीवरून उडी मारून आत शिरले. मग बघितले तर parking lot अगदी सुना सुना. वाटल असेल काहीतरी नसतील लोकं येत. मग मी बघीतले तर MacD च्या entrance ला जाताना अनेक दगड धोंडे काही खड्डे वगैरे पण आहेत. पण मग मी तरीही दगडांवरून चालून खड्ड्यांवरून उड्या मारून MacD च्या दरवाज्याकडे पोचले. आत अंधार दिसत होता तरी दार ढ्कलून बघीतले. आत काहीही नव्हत. मग एकदम डोक्यात ट्युब पेटली. माझ मलाच इतक हसू आल. शेवटी पुण्याची आहे नां.. खड्डे, दगडं पार करून दुकानात जायची इतकी सवय लागली आहे वाटल नव्हत
|
Pillu
| |
| Friday, November 10, 2006 - 9:53 am: |
| 
|
माझा एक जबरदस्त किस्सा सहसा मी भाजी आणण्याकरीता एकटाच जातो कारण बायको बरोबर असेल तर भाजी पेक्षा वादावादीच जास्त अर्थात माझ्याबरोबर नाही तर भाव कमी करण्यावरुन. त्या दिवशी हिचा फारच हट्ट झाला म्हणुन नेले भाजी घेत घेत पुढे चाललो एक पिशवी माझ्या कडे अन एक तिच्या कदे माझी पिशवी भरली.मी एके ठिकाणी खाली बसुन भाजी निवडली अन ती माघे न बघता म्हणालो अग ही घे अन पिशवीत घाल. पण दोनदा आवाज देऊनही हिची साद ऐकु आली नाही म्हणून मी चिडलो पाठिमागे वळून काहिही न बघता दुसर्या भाजी वाल्या बरोबर हुज्जत घालणार्र्या बायकोची पिशवी हिसकली काय सांगावे त्याच वेळी माझे गालावर सणकन चपराक बसली कारण ती माझी बायको नव्हतीच मुळी योगायोगाने तिच्याच सारखी साडी घातलेली ति दुसरीच कोणी होती.
|
मस्तच किस्से आहेत सगळ्याचे अर्थात वेधळेपणा हे माझे प्रमुख काम आहे... पण हा आज घडलेला... We are developing largest Special Economic Zone SEZ in India. I was writing a document in Word. It contained SEZ more than 20 times. My boss asked me to subit the document asap After completion, I hit the Grammer CHeck button. SEZ was replaced with SE*. Boss called me and asked "Have you read the document?" Yes. He was so confused. He said next time onwards please check your document. He gave me the print out... Farmers in this area are saying that we will not allow SE* in our region. But the young generation feels that SE* will be a very good opportunity for them. The SE* officials maintanined that SE* will boost the economy in this region. It was a press release....
|
आमच्या एका शेजारी रहाणार्या काकुंनी एकदा भरल्या वांग्याच्या भाजीत काळ्या मसाल्या ऐवजी शिकेकाई टाकली होती !!! वर सगळ्या शेजार्यांना पाठवून दिली होती ती भाजी माझ्या आईने माझ्या एका मावस बहिणीला पहायला आलेल्या मुला कडच्यांना पाण्या ऐवजी vinegar दिले होते प्यायला .. बिचार्यांनी निमुटपणे प्यायले ते !! अणि तरीही मावस बहिणीचे लग्न तिथेच ठरले ! चहा दूधा ऐवजी ताकात गाळल्याचे किस्से तर बर्याच लोकंकडून ऐकले आहेत
|
Sandu
| |
| Friday, November 10, 2006 - 3:33 pm: |
| 
|
पिल्लु, नंदिनी, दिपांजली, लै भारी, खुप हसलो. माझे काका आणि काकू एकदा स्कुटरनी बाजारात खरेदीसाठी गेले होते. खरेदी झाली आणि काकांनी स्कुटरला किक मारली आणि त्यांना वाटले काकू मागे बसली ते निघुन गेले. येथे काकू रस्त्यावर उभी. काकूने पटकन रीक्षा केली आणि काकांच्या आधिच घरी पोहोचुन गेट जवळ उभी राहिली. काका स्कुटर वरुन गेट जवळ आले आणि २ मिनीट काकू कडे पाहात रहिले आणि झटकन मागे वळुन स्कुटरची मागेची सिट पाहिली आणि काकू सगट तेथे उभे असलेले आम्ही सगळे खुप खुप हसलो. काका तर थोद्या वेळासाठी पार गांगरुन गेले. मग काकांना कळाले की लोक गाडीवाले का इतके हसत होते कारण काका मागे बसलेल्या (?) काकूला office ची गंमत अगदी हातवरे करत सांगत होते.
|
Saranga
| |
| Friday, November 10, 2006 - 5:19 pm: |
| 
|
मी नूकतीच car घेतली होती आणि एक दिवशी काही कामा साठी car घेउन गेलो. माझे काम खुप वेळ रेंगाळले आणि मी खुप वैतागून गेलो होतो. कधी एकदा घरी जातो असे झाले होते. शेवटी एकदाचे काम संपले आणि मी रीक्षा करुन घरी आलो. आई ने जेव्हा विचारले car कुठे आहे तेव्हा tube पेटली. तसाच रीक्षा करुन परत गेलो आणि car घेउन आलो.
|
माझा एक मित्र आहे शेखर. माझ्या घरा शेजारीच राहायचा. दुसर्या गल्लीत एक मुलगी राहायची देशपांडे. ती आमच्या गल्लीत फार यायची व जरा जास्तच नखरे करायची. एके दिवशी मी व शेखर्या दोघे पाणिपुरी खायला जात होतो. थोडे दुरवर ठेल्यावर ही बया दिसली. मी शेखर्या ला म्हणालो अबे शेखर ही समज्ते काय स्वत्:ला नेहमी आखडुन असते. फटाकडी आहे पण. माझे असे बरेच बोलने झाल्यावर शेखर्या म्हणाला अबे केद्या ति माझी मावस बहीन आहे. झाल. मला वाटल तो चिडनार पण तो म्हणाला जाउदे यार तुझे मालुम नही था. मग काय त्या दिवशी त्याने तिची व माझी ओळ्ख करुन दिली व शेवटी पाणीपुरी मी खाउ घातली. खाता खात वर सुनावले की तुला लोक फटाकडी, ११८ NE म्हणतात म्हणुन. ( पण थोडावेळ माझी वाट लागली होती). 118 NE ही त्या काळातली नवीन कार. थोडी ईतर्रांपेक्षा वेगळी. आम्ही जरा सुंदर मुलगी दिसली की ११८ NE म्हणायचो.
|
Dinesh77
| |
| Friday, November 10, 2006 - 6:27 pm: |
| 
|
केदार, तुमचा किस्सा वाचुन मलाही एक किस्सा आठवला. माझ्या चुलत भावाचे लग्न होते, आणि मुलाकडचे म्हणुन जरा जास्त दंगा चालला होता आमचा. लग्नादिवशी मी आणि माझा दुसरा चुलत भाउ जेवायला बसलो होतो. शेजारी ज्याचे लग्न होते त्या भावाचा मित्र बसला होता. आणि आमच्या समोर एक अतिशय सुंदर मुलगी बसली होती. पुर्ण जेवणभर आम्ही तिची स्पेशल भाषेत तारीफ़ करत होतो. जेवणाच्या शेवटी त्या मित्राने शांतपणे सांगितले की ती माझी सख्खी बहिण आहे. आईशप्पथ, पानात जे होते ते तसेच टाकून जे पळालो ते आजतगायत त्या मित्राच्या समोर आलो नाही. नंतर आमचा चुलत भाउ विचारत होता, तुम्ही काय पराक्रम केलात म्हणुन, काय सांगणार कप्पाळ?
|
Sandu
| |
| Friday, November 10, 2006 - 6:50 pm: |
| 
|
कोणि अनोळखी लोक जर एखाद्या मुली बद्दल काही बोलतांना दिसले की मी त्यांना बिनधास्त फ़ेकायचो की ती माझी बहिण आहे म्हणून. खुप मजा यायची मला त्याची उडालेली पाहुन
|
सारंग Deeps हे गाडीत मागे कोणी बसल आहे की नाही चा किस्सा बर्याच जणांच्या बाबतीत घडतो वाटत
|
Ajjuka
| |
| Saturday, November 11, 2006 - 3:24 am: |
| 
|
ही ही ही.. दुचाकीवर बसताना मागच्या माणसाला विसरून जाणे हा किस्सा बर्याच जणांचा घडतो हे खरे आहे हं. मी आणि बाबा दोघांनीही हा घोळ एकेकदा तरी केलाय. तसंच लॉ कॉलेज रोडवरच्या कृष्णा हॉटेल च्या बाहेर रोजची सवयीची कायनेटीक तिथेच सोडून रात्री रिक्षाने घरी आलेय मी आणि सकाळी बाबा विचारतायत की कायनेटीक ला काही porblem आलाय का? गाडी दिसत नाहीये खाली. तेव्हा माझी tube पेटली. मग काय झोप उडाली तशीच माझी वरात कृष्णा वर. सुदैवाने गाडी तिथे होती. नाहीतर माझं काही खरं नव्हतं. माझी एक मैत्रिण होती. आम्ही दोघी एकत्र कॉलेजला जायचो. तेव्हा नुकतेच १८ पूर्ण झाल्याने मला नवीन म ८० घेतली होती. तिला घेऊन मग आम्ही कॉलेजकडे रवाना व्हायचो. ती चणीने एवढ्ढीशी. गणवेष घातला तर ७वीच्या वर्गात खपेल इतकी बारीक नी बुटकी. मागे बसली की नाही हेच कळायचं नाही. त्यामुळे दरवेळेला खड्ड्यातून गाडी गेली की मी ओरडायचे आहेस ना की गेलीस. ती चणीने लहान असली तरी अवाजी जोरदार होती त्यामुळे तीही ओरडायची आहे आहे अजून. रस्त्यातल्या बाकीच्यांची करमणूक व्हायची हे सांगायला नको.
|
माझ्या एका मैत्रिणीला वाटले की समोरुन असलेली मारुती तिच्याच अगावर येतेय... तिने काचकन ब्रेक दाबला... दोन दात पड्ले.. मग तिला कळले... मारुती नुसतीच उभी होती.. ड्रायव्हर महाशय लघुशंकेला खाली उतरले होते.. .
|
Maitreyee
| |
| Saturday, November 11, 2006 - 12:51 pm: |
| 
|
एखाद्या दिवशी वेन्धळेपणाचा वार वगैरे असल्यासारखा एका पाठोपाठ वेन्धळेपणा होत रहातो! परवा असाच बराच उशीर झाला म्हणून घाईने गाडी पार्क केली आणि निघाले. गाडी लॉक करायचे विसरले! मग ती चूक सुधारली पण पुढे जाऊन एलेव्हेटर समोर उभे राहून गाडीच्या रिमोट वरचे unlock चे बटन दाबत राहिले 4-5 वेळा आणि बघत राहिले अजून एलेवेटर चे दार उघडत का नाही मग लक्षात येऊन आत गेल्यावर तिसर्या मजल्याऐवजी परत ground floor चेच बटन दाबले! आणि दार उघडल्यावर इकडे तिकडे न पहाता ऑफ़िस च्या दिशेने(?) घाईने निघाले पण! असली वैतागले नन्तर स्वत वरच!
|
Saurabh
| |
| Saturday, November 11, 2006 - 8:08 pm: |
| 
|
गाड्यांशी रिलेटेड किस्से ऐकून माझा एक किस्सा आठवला. मी लक्ष्मी रोडवर स्प्लेंडर पार्क केली होती, साईड स्टॅंड ला लवून (तेंव्हा तेवढी जागा असायची!) मी कुठल्यातरी दुकानातुन गडबडीने बाहेर पडलो, बाईकवर टांग टाकली, स्टॅंड काढला आणि किल्ली लावली. लागत नाही म्हटल्यावर लक्षात आले की मी घराची किल्ली लावतोय. बसल्या बसल्या जीन्सच्या खिशातून किल्ली काढण्याएवढी माझी अंगकाठी सडपातळ नसल्याने मि उठलो, बाईकचा स्टॅंड काढलेला आहे हे विसरून आणि मग माझ्या एक पायावर स्प्लेंडर आणि आम्ही दोघे आडवे
|
Chyayla
| |
| Sunday, November 12, 2006 - 1:49 am: |
| 
|
हा किस्सा पण पुष्कळदा घडतो, मी माझ्या मित्रासोबत स्प्लेन्डरने शॉपिन्ग साठी गेलो आणी बाहेर आल्यावर किल्ली नीट लागत नव्हती तरी आमच्या दोघान्च्या लक्षात नाही आले कशी तरी अर्धवट घालुन बर्याच किक्स मारल्या पण ती काय सुरु व्हायचे नाव घेईना. मग खुप वेळाने आमच्या लक्षात आले की आपण दुसरीच स्प्लेन्डर चालु करण्याचा प्रयत्न करतोय. नशीब त्या गाडीचा मालक नव्हता आला नाहीतर चोरी करण्याच्या प्रयत्नात पकडले गेलो असतो. माझ्या भगीनी द्वयान्नी एक दिवस ज्येष्ठमधाची पुड समजुन मेहन्दी खाल्ली होती किती तरी वेळ कडु तोन्ड करुन बसल्या होत्या.
|
Chaffa
| |
| Sunday, November 12, 2006 - 2:24 am: |
| 
|
गाडी आणी गाड्यांच्या गंमती.!!!!!!! माझ्या कडे कुणे एकेकाळी स्कुटर होती. स्कुटरवाला (म्हणजे ती चालवणारा ) आर्धा (आर्धाच) मकेनीक असतो (असे म्हणतात) वेळी अवेळी बंद पडणारा हा वाहनप्रकार.!! बंद पडली की प्लग तपासुन बघणे प्लग़ला सप्लाय येतो का बघणे आलेच ओघाने. ते पावसाचे दिवस होते, आणी भर रस्त्यात गाडी बंद, काढले कव्हर प्लगची केबल काढुन चेक करायला कार्बोरेटर जवळ धरली आणी किक मारली बसऽऽ तिनताड उडालो. साऽऽऽऽला केबल ओली होती हे लक्षातच नाही आले.!!!!!! जोरका झटका जोरसे ही लगे.!
|
बरेच दिवस स्कूटर ची सवय होती. Gearless गाडी आयुष्यात पहिल्यांदा चालवत होतो. समोरून म्हशींचा एक तांडा 'बागडत बागडत' येत होता. गाडी थांबवायला रिकाम्या floor वर पायाने ब्रेक शोधतोय-शोधतोय... शिरलो म्हशींत!
|
Nakul
| |
| Tuesday, November 14, 2006 - 11:49 pm: |
| 
|
मला सहावीत असताना चष्मा लागला. तेव्हाची ही गोष्ट. जून जुलैचे दिवस होते. रिमझिम पाउस येउन जाउन असायचा. नवीनच लाभलेला दागिना, म्हणजे चष्मा, बाळगायची सवय झाली नव्हती. शाळेला बसनी जाताना मी पाउस आला म्हणून झाडाखाली थांबलो. पाच मिनीटांनी पाउस थांबला, तसा पळतपळत बसस्टॊपवर आलो. ९९ कधी नव्हे ती वेळेवर सुटली होती - त्यामुळे १४४ ने जावे लागणार होते. १४४ मध्ये बसलॊ आणि लक्षात आले की मला लांबचे एकदम कमी दिसते आहे. चष्म्याला काय झाले म्हणून हाताने बघतो तर चष्मा जागेवर नाही. एकदम ट्यूब पेटली - पाउस आला तेव्हा चश्म्यावरचे शिंतोडे पुसायला मी चष्मा काढला आणि तो पुसून झाल्यावर रुमालाची घडी घालताना बाजूला ठेवला तो तिथेच राहिला. तडक १४४ मधून उतरलो, परत आलो तर तो जागेवर नव्हताच. मग भरपूर उद्धार !!
|