|
Pillu
| |
| Wednesday, November 29, 2006 - 3:27 pm: |
| 
|
मित्रांनो माझ्या दुर्दैवाने माझे बरेच मित्र कोब्रा आहेत.पण त्यातिल एक साठे नावाचा मित्र ( म्हणावा का ) या सर्वांवर नक्कीच कडी असेल. हा चिक्कू माणुस तर आहेच पण भयंकर घाणेरडा आहे. कंपनीत चांगल्या पोस्ट वर आहे (अर्थात चमचेगिरी करुनच ) (माझ्या पोटात दुखत वगैरे काही नाही हां )चांगला ५ आकडी पगार आहे. पण डबा आणताना घरातुन कधिही.१ पोळी अन काकडीचे दोन काप फक्त या वितिरिक्त काहीसुद्दा आणणार नाही. घरी सांगतो मला डायटिंग करायला सांगीत्ले आहे. पण आम्ही डबा उघडायचा अवकाश की याने हात घातलाच अधाश्यासारखे सगळ्यांच्या डब्यात काय आहे पहाणार. याला खायला काहिही चालते हे आवडत नाही हा शब्द त्याचा शब्दकोशातच नाही. बरे खायला घेणे या बद्द्ल आमचे काही म्हणणे नाही. पण उष्टा चमचा सगळ्यांमधे कोंबणार, अन तोच चमचा तोंडात घालुन लहान मुलासार्खा २,३ वेळा सर्व चाटून घेणार नंतरच दुस्-याच्या डब्यात तो घालणार.पोट भरल्या नंतरच ऊठणार, बरे त्याची काकडी खाण्याची कुणाचीही हिंमत होत नाही. कारण प्रथम तो दोन्ही काप अर्धे खाऊन्च ठेवणार. एक्दा मात्र गंमत झाली. कंपनीची पार्टी होती सगळे अर्थातच चकटफु होते आम्ही सर्व जण सहकुटूंब होतो. हा जेवायला गेला आम्ही सर्व जण होतो. अगदी हा पोट फुटे पर्यंत जेवला जेवणं झाली आणि याची बायको हमसुन हमसुन रडायला लागली. त्याच्या सहीत कोणालाच कळेना काय झाले. चौकशी केल्यावर ती म्ह णाली '"काय सांगु हो आमचे हे किती तरी महिन्यांनी पोट्भर जेवले हो अगदी भरुन आले हो एकदम यांना असे पोटभर जेवलेले पाहिले की. आम्ही पामर या वर काय बोलणार नव्-यावर किती प्रेम आहे ते कळाले ना?
|
Milindaa
| |
| Wednesday, November 29, 2006 - 4:15 pm: |
| 
|
हा बीबी हळू हळू एक एक जाती पोटजाती पकडून त्यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेण्यासाठी वापरला जाणार आहे असं दिसतंय..
|
Ana
| |
| Wednesday, November 29, 2006 - 4:20 pm: |
| 
|
पिल्लु, इतक सहन करुन तुम्ही का मैत्री ठेवता कोब्र.शी. खरोखरी आपण महान आहात! इतकी पुण्याला आणी कोब्रांना नाव ठेवता आणी घर घ्यायची वेळ आली की पुणच आठवत. आणी लग्नच्यावेळी पण पुण्यात मुलगी द्यायची आणी पुणेकर मुलीशीच लग्न जमवायच(त्यातुन कोब्रा असतील तर अभीमानानी सांगायच). मजा आहे खरी दिवे घ्या.
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, November 29, 2006 - 4:33 pm: |
| 
|
हा बीबी हळू हळू एक एक जाती पोटजाती पकडून त्यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेण्यासाठी वापरला जाणार आहे असं दिसतंय>>>> अरे रे तस असेल तर चुक होईल.
|
Chyayla
| |
| Wednesday, November 29, 2006 - 5:03 pm: |
| 
|
केदार, मिलिन्दा तुमच्या काळजीशी सहमत. मायबोलिकरानु आता आपण वाईटाशिवाय चान्गल्या गोष्टीपण सान्गुया, टिपिकलपणात वाईट आणी चान्गल दोन्ही पण येतात. पण लोकान्च्या लक्षात चान्गल्या गोष्टी लक्षात रहात नाही हा एक टिपीकल मानवी स्वभाव म्हणावा का? तर आधी पाळी कोब्राची त्यानीच देब्रान्च, वैदर्भियान्च "करुन राहिलो" काढले होते... पण तुमच्या एक लक्षात आल का...यात कुणाच नुकसान किन्वा कोणाला वाइट्पणा, किन्वा मनात तेढ निर्माण होत नाही. "काय सांगु हो आमचे हे किती तरी महिन्यांनी पोट्भर जेवले हो अगदी भरुन आले हो एकदम यांना असे पोटभर जेवलेले पाहिले की. आम्ही पामर या वर काय बोलणार नव्-यावर किती प्रेम आहे ते कळाले ना? पिल्लु... हे खरे आहे का रे? नसेलही तरी एक भारी विनोदी आहे, आणी खरच घडले असेल तर माझा पण त्या महात्म्याला नमस्कार.
|
Sunidhee
| |
| Wednesday, November 29, 2006 - 5:42 pm: |
| 
|
च्याला, अरे बाबा तुझा आयडी असा 'वेगळा' आहे ना त्यामुळे लिहीता लिहीता हातच थांबतो, नाहीतर शब्द गाळले जातात. खरेतर आपण सर्वच जण कश्या ना कश्यात चिक्कुपणा करत असतो पण ते लोकांत इतकं दिसुन येइतोवर केल गेल की आपण 'प्रसिद्ध' होतो.. एरवी काटकसर फायद्याचीच असते. तेव्हा कंजुष लोकांच्या खुप गोष्टी असतील (आता ते नेमके को. नाहीतर दे. असतील नाहीतर अजुन कोणी). मला असे चिक्कु खुप कमी भेटलेत. तेव्हा मी आता फक्त वाचणार.
|
Atul
| |
| Wednesday, November 29, 2006 - 6:18 pm: |
| 
|
आमचा एक दक्षिणी कलिग आला की दुरुनच कळते. कारण आधी साम्बाराचा वास येतो!
|
हा BB बंद करण्यात येत आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|