|
Madya
| |
| Monday, October 30, 2006 - 7:32 pm: |
| 
|
parixit sahani bahudha Gul Gulshan Gulfaan hya TV serial madhe hote.
|
Manya2804
| |
| Tuesday, October 31, 2006 - 5:46 am: |
| 
|
आनंद आश्रम मधे उत्तम कुमार होता परिक्षीत सहानी नव्हे. 'देख भाई देख' मधे फरीदा जलाल बरोबर नवीन निश्चल होता. चु.भु.द्या.घ्या.
|
मन्या बरोबर आनन्द आश्रम नव्हे तपस्यात होता तो
|
Bee
| |
| Tuesday, October 31, 2006 - 8:15 am: |
| 
|
काल मी 'जलते हैं जिसके लिये..' साठी 'सुजाता' बघितला. खूप छान विरंगुळा मिळाला..
|
Bee
| |
| Tuesday, October 31, 2006 - 10:24 am: |
| 
|
The Red Cockatoo (Der rote Kakadu ), Between the lines, Summer in Berlin (Sommer vorm Balkon), Belgrad Backspin, Mein Bruder - We'll meet again, Lucy, Happy as one, The wedding factory, Frozen Angels, The free will, Barefoot (Barfuss), And if they haven't passed away…The Children of Golzow (Und wenn Sie nicht gestorben sind... Die Kinder von Golzow ),Into the great silence (Die Große Stille), Tough Enough (Knallhart) हे सर्व जर्मन चित्रपट इथे German film festival मधे दाखविण्यात येणार आहे. ह्यापैकी अगदी must see असा कुठला चित्रपट जर कुणाला recommend करता आला तर मी तो नक्की बघीन. मला German movies बद्दल ओ की ठो माहिती नाही. पण माझ्या मते film festivals मधील चित्रपट जरा हटके असतात.
|
Bee
| |
| Wednesday, November 01, 2006 - 6:13 am: |
| 
|
३६ चौरंघी लेनमधील मुख्य पात्र Jennifer Kendal ही शशी कपूरची बायको होती आणि ती १९८४ मधे कर्करोगानी गेली हे मला आज कळले. हा चित्रपट मी एका महिन्यापुर्वीच बघितला. इतक्या समर्थ अभिनेत्रीला अवार्ड मिळू नये हे खरच दुर्दैव आहे. 'मदन मोहन' ह्यांना देखील एकही अवार्ड मिळालेला नाही. त्यांचे संगीत खूप चांगले होते. http://en.wikipedia.org/wiki/Shashi_Kapoor
|
Prajaktad
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:08 pm: |
| 
|
' कोसला का घोसला ' टू गुड मूव्ही!.. जरुर बघा.. उत्तम अभिनय,संगित,पात्ररचना...सगळ अगदी जमुन आलय..
|
Farend
| |
| Thursday, November 02, 2006 - 3:19 am: |
| 
|
परवा ' Ghost World ' बघितला. बर्यापैकी विनोदी आहे. त्यात सुरुवातीला ६० च्या दशकातल्या हिंदी चित्रपटांत असायचे तसे (बहुधा rock and roll ) एक गाणे दिसले... ज्यात बरेच तरूण आणि तरूणी एकदम टाइट्ट कपडे घालून समोर हात सरळ ठेऊन बोटे खाली लोंबती सोडून नाचतात तसे. तर ते खरोखरच हिंदी निघाले 'जान पहचान हो, जीना आसान हो...'. नंतर ते गुमनाम मधले आहे वगैरे माहिती ही आली. Inside Man नंतर हा एक चित्रपट ज्याच्या टायटल मधे हिंदी गाणे आहे.
|
Bee
| |
| Thursday, November 02, 2006 - 5:47 am: |
| 
|
विजया मेहता सारखी कलाकार १८ वर्षाच्या प्रदीर्घ कालवधीनंतर पडद्यावर येत आहे. अमोल पालेकरांचा मराठी चित्रपट 'थांग' सद्या पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाची कथा ओळखुन त्याचीच ईंग्रजी आवृत्ती देखील निघणार आहे Quest मधे. ह्या चित्रपटातील सर्व कलाकार मराठी चित्रपटातील मुरलेले कलाकार आहेत. विजया मेहतांसोबत मुक्ता बर्वे, म्रिनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, सचिन खेडेकर ईत्यादी.
|
Bee
| |
| Thursday, November 02, 2006 - 7:25 am: |
| 
|
hoy ho Mahaguru. mazech chukale. Dhanyawad!
|
Jadhavad
| |
| Thursday, November 02, 2006 - 9:30 am: |
| 
|
नमस्कार मंडळी, एक छोटासा डॉन चा review आहे. /hitguj/messages/75/118797.html?1162459514 अमित
|
and here is my take.
|
Mbhure
| |
| Thursday, November 02, 2006 - 5:46 pm: |
| 
|
जुना " चायना टाऊन " (शम्मी कपूर आणि शकीला)हा मुळ डॉन आहे. सलीम जावेदने ती आयडिया ह्या चित्रपटावरून घेतली आहे. आता ह्या शक्ती सामंताच्या चित्रपटाचे मुळ कुठुन आले आहे कोण जाणे?
|
Prajaktad
| |
| Thursday, November 02, 2006 - 6:15 pm: |
| 
|
विजया मेहतांसोबत मुक्ता बर्वे, म्रिनाली कुलकर्णी, म्रुणाल कुलकर्णी...आहे ती!
|
विजया मेहतांसोबत मुक्ता बर्वे, म्रिनाली कुलकर्णी, म्रुणाल कुलकर्णी...आहे ती! >>>> मृणाल कुलकर्णी आहे ती प्राजक्ता!
|
Zakasrao
| |
| Saturday, November 04, 2006 - 9:19 am: |
| 
|
सर्वांसाठी एक न्युज आहे. आज डिडी १ ह्या च्यानेलवर जुना डाॅन आहे. भारतातील लोक रात्रि ९:३० वाजता त्याचा आस्वाद घेउ शकतिल. अमितचा रिव्यु लक्षात ठेवुन सर्वानी त्याचा आस्वाद घ्या.
|
Dineshvs
| |
| Saturday, November 04, 2006 - 5:04 pm: |
| 
|
आत्ताच स्टीव्हन स्पीलबर्गचा Cath mee, if you can, ! बघितला. एक अत्यंत डोकेबाज लफ़ंगा आणि एक एफ़ बी आय अधिकारी, यांची हि कथा. लीओनार्दो दी कर्प्रिओ आणि टॉम हॅंक्स प्रमुख भुमिकेत. सगळ्याना भंडावुन सोडणारा हा लफंगा खोटे चेक्स बनवण्यात अगदी पटाईत असतो. खोटी सर्टिफ़िकेट्स करण्यातहि तो सराईत असतो. या कौशल्याने तो पायलट, प्रोफ़ेसर, वकील, डॉक्टर अशी अनेक सोंगे आणतो. अगदी पिच्छा पुरवला तरी तो पोलिसांच्या हातात येत नाही, चालत्या विमानातुनहि गायब होण्याचे कसब आहे त्याच्याकडे. या सगळ्या गुन्ह्यामागची त्याची निरागसता कुठेच लपत नाही. पण शेवटी तो पोलिसांच्या ताब्यात सापडतोच. त्याला शिक्षाहि होते, पण त्याचे अंगभुत कौशल्य त्याला एक मानाचे स्थान मिळवुन देते. त्याला चक्क पोलिसातच नोकरी मिळते. त्या पोलिस अधिकार्याशी त्याचे दोस्ती होते ईतकेच नव्हे तर त्याच्या हातुन विधायक कार्यहि घडते. अगदी वेगळी कथा. यात नेहमीची हाणामारी नाही कि जिवघेणे पाठलाग नाहीत. १९६३ ते १९७४ च्या दरम्यान हि कथा घडते. तसा हा काळ काहि फार जुना नाही, पण स्पीलबर्गने प्रत्येक फ़्रेममधे तो काळ उभा केलाय. कथानकाचा सर्व भार त्या चोरावर आणि त्याच्या करामतीवर असल्याने, त्या भुमिकेतला लिओनार्दो भाव खाऊन गेलाय. त्यामानाने टॉमला कमी वाव आहे. सगळ्यात अनोखी बाब म्हणजे, हि एक सत्यकथा आहे.
|
Dineshvs
| |
| Monday, November 06, 2006 - 2:15 am: |
| 
|
काल उमराव जान बघितला. रेखाच्या सिनेमापेक्षा थोडे वेगळे कथानक आहे. त्या सिनेमात नसलेली, अमीरनची शेवटी तिच्या आईशी झालेली भेट ईथे आहे. पण लहानपणची मैत्रिण, रिता रानी कौल, प्रियकराच्या पत्नीच्या रुपात समोर येणे, हा प्रसंग नाही. पण या दोन्ही सिनेमापैकी मूळ कादंबरीशी आणि कादंबरी प्रत्यक्ष इतिहासाशी कितपत प्रामाणिक आहेत, हे मला माहित नाही. पण रेखाच्या सिनेमापेक्षा, ईथे सुलतानचे पात्र जास्त खोलात जाऊन रंगवले आहे. कोठेवालीची भुमिकाहि जरा विस्ताराने रंगवलीय. सिनेमा अगदी संथ आणि प्रदिर्घ आहे. ऑफ़िशियल इंटरव्हल नाही. मधेच ते केले जाते. ओ पी दत्ताचे संवाद अगदी अस्सल आहेत, आणि आजवर फारश्या न ऐकलेल्या अवधी बोलीत आहेत. संवादावर खास लक्ष दिल्याचे जाणवते. कभो सारखा एखादा शब्द, गाण्यातहि आहे. मूळ सिनेमातल्या फ़ारुखच्या भुमिकेत ईथे अभिषेक आहे. त्याला हि भुमिका जमलेली नाही. त्याच्या डोळ्यात अजिबात पठाणी झाक दिसत नाही. भरपुर प्रसंग वाट्याला येऊनहि त्याचा अजिबात प्रभाव पडत नाही. हा माणुस जर पिताश्रीप्रमाणेच आपल्या आवाजाच्या बळावर आणि एकाच चेहर्याने भुमिका करणार असेल, तर कठिण आहे. सुनील शेट्टीला सिनेमात का घेतात ? मूळ सिनेमातली राज बब्बरची भुमिका त्याने केलीय. वेगळा मेकप गेटप असुनहि त्याचे शेट्टीपण लपत नाही. तसेच मानेवर सुरी ठेवलेल्या बकर्यासारखे रेकत बोलतो. तिथे आमिर वा हृतिक असता तर !!!? मूळ सिनेमातली शौकत आझमीने केलेली कोठेवालीची भुमिका शबानाने केलीय. मंडी मधल्या रुक्मिणीच्या भुमिके नंतर पुलाखालुन बरेच पाणी गेलेय. जीभ जड झालीय. चेहरा तितका लवचिक राहिलेला नाही. पण तरी पुर्वपुण्याईवर भुमिका निभाऊन नेलीय. माया अलग, सुधा शिवपुरी, कुलभूषण खरबंदा हे गुणी कलाकार असले तरी चेहर्याचे स्नायु लवचिक न राहिल्याने, आपल्या प्रत्यक्ष वयापेक्षा लहान वयाच्या भुमिकेत अवघडले आहेत. बाकि दोघी ठिक असल्या तरी, कुलभूषणच्या संवादात सहजता नाही. दिव्या दत्ता आणि आयेषा झुल्का, कोठीवरच्या ईतर नर्तिका आहेत. पण त्याना फक्त अर्धाच नाच आहे. तरी दोघी ठाकठिक. अना सिंगचा कपडेपट ही या सिनेमाची खासियत. प्रत्येक ड्रेस हा नजर न ठरावी ईतका देखणा आहे. कपडेच काय पलंगपोसावरची कारागिरीपण बघण्यासारखी आहे. आणि ते सर्व अगदी सुस्पष्ट दाखवणारे चित्रीकरण आहे. या सिनेमात दृष्य फ़ेड ईन करण्यासाठी एक वेगळे तंत्र वापरले आहे. आवर्जुन बघण्यासारखे आहे ते. वैभवी मर्चंटची कोरीऑग्राफी, हा आणखी एक प्लस पॉईंट. ऐश्वर्या आहेत म्हणुन जोरकस नृत्ये नाहीत, तर ती आहेत अभिजात कथ्थक शैलीत. या बाबतीत मूळ सिनेमापेक्षा सुंदर कामगिरी आहे. या सिनेमाचे संगीत उत्तम असावे, अशी रास्त अपेक्षा होती. पण काहि जमलं नाही बाप्पा. अनु मलिकच्या मर्यादा उघड झाल्यात. तश्या चाली ठिकठाक आहेत. जावेद अख्तररच्या काव्यात चमकदार कल्पना नसल्या तरी, त्याला किमान दर्जा आहे. घोळ झालाय तो अलका याज्ञिकच्या गायनात. तिने भरपुर मेहनत घेतलीय खरी, पण तिचा आवाज मला तरी फ़ार कर्कश वाटला. ( जुन्या सिनेमात आशाने जरा खालच्या पट्टीत गायन केलेय. त्यामुळे तिच्या कारागिरीने शब्द मागे पडणे टळले आहे. वर लिहिल्याप्रमाणे हे माझे वैयक्तिक मत आहे. लता आशाच्या सुरावर वाढलेली माझी पिढी ते स्थान, सहजासहजी आणखी कुणाला देणार नाही. ) आणि आता ऐश्वर्या बद्दल. हम दिल दे चुके सनम, नंतर कुठल्या प्रसंगात ती कसा अभिनय करेल, याचा अंदाज बांधता येतो. तरिही तिच्या कपाळावरची तटतटलेली शिर, फुगलेली नाकपुडी, लाल झालेले डोळे, तिची मेहनत दाखवतात. आवाजाचाहि उत्तम वापर केलाय. आणि उत्तम चित्रीकरणामुळे, तिचे आरस्पानी सौंदर्य अगदी खुलुन आलेय. खास या नजरसुखासाठी, पहायला हरकत नाही.
|
Yog
| |
| Monday, November 06, 2006 - 4:54 am: |
| 
|
Dinesh, थोडक्यात, don पेक्षा हा remake बरा आहे अस दिसतय. उमराव जान ची जान ही रेखा आणि आशाताईनी असामान्य उन्चीला पोचवलेली गाणी अस मला नेहेमी वाटल. तू स्थान म्हणतोयस त्याहीपेक्षा मला वाटत निव्वळ "दर्जा" च्या मापावर देखिल अलका याग्निक खूप खालच्या स्तरावर आहे. "कयामत से कयामत तक" मधे अतीश्य सुन्दर वाटणारा तीचा आवाज आज सोळा वर्षानी कर्णकर्कश वाटतो. आजकाल तीच्या त्याच त्याच गाण्याच्या चार ओळीन्चे प्रमोज श्रोत्यान्वर hammer करून आपल्या कानात उतरवले जातात. मला वाटत आशाताई, लतादिदी,(अगदी अलिकडे म्हणजे पन्नास वर्षानन्तर त्यान्चा सूर कानाला खटकतो.)किशोरदा, रफ़ी, मुकेश आणि आजकालचे गायक यान्च्यात हाच फ़रक आहे. या आधीच्या महान गायकान्चे गाणे एकदा ऐकले की त्यातले स्वर माधुर्य अपोआप मनात उतरत असे. त्यान्च्या सुराला, स्तरला आणि दर्जाला कधी वयाच बन्धन नव्हत. त्यान्ची गाणी लोकाना पुन्हा पुन्हा ऐकावयास मिळण हे श्रोत्यान्च सौभाग्य असायच. "पसन्द आपकी" सारख्या पूर्वीच्या रेडिच्या कार्यक्रमातून ती गाणी मुद्दामून वाजवली जात... आजकाल, "पसन्द हमारी, advertise हमारी, फ़क्त sms आपके", इतकच सन्गीतात उरलय. नशीब तरी अजून "कानान्चा" वापर गृहीत धरला जातोय. injection टोचून गाण मनात ठसवायची सोय निघाली तर आजकालचे "सन्गीत दुकानदार" तेही करतील. असो. विषय भरकटला.. पण तुझी पोस्ट वाचून रहावलं नाही.
|
Dineshvs
| |
| Monday, November 06, 2006 - 5:37 am: |
| 
|
अगदी अगदी,मनातलं बोललास. हिही गाणी हॅमर करुन हिट केली जातील.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|