|
माझे क्रश खुप आहेत पन लिहायला खुप वेळ लागत आहे त्यामुळे पुन्हा काधीतरी लिहिन पन माझे सेलिब्रीटी क्रश आहेत लेटेस्ट क्रश प्रियन्का चोप्रा काय दिसते ति क्रिशमधे खुपच सुन्दर अप्रतिम आणि डिसने चन्नेल वर १ प्रोग्राम येतो लिझी मागवेर ति मला खुप खुप आवड्ते आणि हो लाफ़टर च्यापन मधिल पारिजात कोलाह ति पान मल खुप आवड्ते ति जेव्हा हसते तेव्हा तिच्या गालावर खळी पडते तेव्हा ति खुपच सुन्दर दिसते आता बस झाले खुप लिहीले
|
खरच फार छान आहेत क्रश सर्वानचे माने गुरुजीन्ची अनुभव ही आनी मानुस आता नविन काही नाही सान्गत
|
Meggi
| |
| Friday, August 25, 2006 - 7:22 am: |
| 
|
संपेल कसं रुपाली.. हा BB तर अजरामर होणार आहे.. माझा सेलीब्रिटी क्रश... समीर धर्माधिकारी याचं सासर आमच्या hostel पासुन जवळ होतं. आणि आम्ही सगल्या मुली याच्या जबरदस्त फॅन. तो दिसेल या आशेने आम्ही त्याच्या सासरी paying guest ठेवतात का? याची चौकशी करायला जायचो. एक दिवस तो hostel च्या जवळ्च्या cyber cafe मध्ये आला. नेमका आमच्या मैत्रिणी जवळच्या PC वर बसला. तिने लगेच आम्हाला sms करुन कळवलं. मग काय आम्ही सगळ्यांनी त्या cafe मध्ये जाऊन रांग लावली. त्याच्या गाडीचा नंबर माझ्या मैत्रीणीने पाठ केला होता.. म्हणजे तो shooting साठी आला कि लगेच कळायचं.फ़ार down to earth माणुस आहे तो.. समोरच्या चहाच्या टपरीवर चहा प्यायचा.. आम्ही लगेच त्या टपरीच्य आजुबाजुला गोळा व्हायचो हे सांगायची गरज नाहिच
|
कुठे रहायचीस ग Meggi.. माझ्या पुण्याच्या घरा पासून पण त्याचं सासर एकदम walkable distance आणि त्याचे सासरे बाबांचे मित्र . शिवाय माझ्या cousin चा तो एकदम जवळचा मित्र , ओळखते त्याला चांगलीच . तुझा message द्यायचाय का काही त्याला ?
|
Meggi
| |
| Friday, August 25, 2006 - 8:10 am: |
| 
|
मी राहुल नगर च्या समोर रहायचे.. LIC colony मध्ये message दिलास तर बरं होइल.. म्हणजे पुढच्या वेळी paying guest न बनता, पाहुणे म्हणुन तरी जाईन म्हणते.. त्याच्या समोरच्या भेळवाल्याचा पण त्याच्या मुळे बराच धंदा झाला होता, हे पण सांग त्याला..
|
Aadi_gem
| |
| Friday, August 25, 2006 - 8:39 am: |
| 
|
My latest... दिया मिर्झा 
|
Harshu007
| |
| Saturday, September 02, 2006 - 7:30 am: |
| 
|
नमस्कार मंडळी माझा तर ११ वी पासुन प्रतेक वर्षी एक क्रश होता आता सुधा आहेत मी ते सवीस्तर लिहिन
|
Mepunekar
| |
| Saturday, September 02, 2006 - 5:27 pm: |
| 
|
Meggi समीर धर्माधीकरी धनकवडी ला चैतन्य नगर मधे राहतो(आता मुम्बैला). आमच्या एका relative च्या बंगल्या शेजारचा बंगला त्यांचा आहे. तो बरेचदा सारसबागेत दिसायचा
|
Asmaani
| |
| Wednesday, September 27, 2006 - 3:51 pm: |
| 
|
माझे celebraty crushes, शम्मी कपूर च्या जवळजवळ सगळ्या जुन्या चित्रपटांतला शम्मी कपूर, "कभी हां कभी ना" मधला शाहरुख, "हम दिल दे चुके सनम" मधला, अजय देवगण(अज्जू), mpk मधला सलमान(सल्लू), kank मधला अभिषेक... आणखी बरेच आहेत. लिहीन आठवतील तसे.
|
Praveen007
| |
| Saturday, September 30, 2006 - 7:06 am: |
| 
|
खुप दिवस झाले मायबोलीकडे फ़िरकलो नाही, पण आज ती मला दिसली आणि मला मायबोली ची आठ्वन झाली. मी तील खुप दिवस झाले पाहत आहे पण ति कधितरिच दिसते ईद के चान्द जैसी पण जेव्हा मे तीला पाहतो तो दिवस मला खुप माजेत जातो. म्हणुन मी तिला रोज स्टेशनवर शोधत असतो. ती दिसायल खुपच सुन्दर आहे तीचे ते कळेभोर केस बोलता बोलता एक नझर टाकणे आणि तिचे हसणे तर मला वेडेकरुन सोडते मला काय करावे ते सुचतच नाही. तिच्या बरोबर बोलायचि हिम्मत नाही. फ़क्त पाहत राहने आणि तिला पाहुण झुरत राहणे कारण आपण याच्या पुढे काही करु शकत नाहि आणि आज पर्यत काहि केलेच नाहि. पहिल्यान्दा ति समोरच्या प्ल्याट्फ़ोर्म वर आसायचि त्यामुळे तिच्याकडे एकटक पाहणे सोपे असायचे पण आता ति मझ्या प्ल्याट्फ़ोर्म वर माझ्या जवळच आजुबाजुला असते मग तिला पहिले कि मनात धकधक होते आणि मला काय करावे ते सुचतच नाही. तिला पहिले कि पुर्ण दिवस तिच्याच विचारत जातो कामात मन लागत नाहि सदैव तिचाच चेहरा समोर दिसतो काय करावे ते कळत नाही.
|
Arch
| |
| Thursday, October 19, 2006 - 12:36 pm: |
| 
|
college मधली गोष्ट आहे.त्या class मध्ये जरा कमी students होते. आणि त्या subject च्या Prof ना सतत एकाच मुलिकडे बघून शिकवायची सवय होती. ती कुठेही बसली असली तरी वर्गात आल्या आल्या ते तिला नजरेने शोधत असत आणि मग lecture सुरु केल की सतत तिच्याकडे बघत शिकवत असत. आम्ही त्या Prof ना सूर्यफ़ूल म्हणत असू. ती ज्या बाजूला त्या बाजूला त्यांच तोंड असे. म्हणजे हा prof चा त्या मुलीवर असलेला crush च नाही का? पण त्या वर्गात students कमी असून आम्हाला बिनधास्त झोप काढता येत असे. एक दिवस ती मुलगी आली नाही आणि काय धमाल उडाली त्या prof ची. असो. तर नेहेमी Prof वरच crush असतो अस नाही. It can go either way! 
|
Bee
| |
| Friday, October 20, 2006 - 10:17 am: |
| 
|
अर्च, हे असे प्रसंग कितीतरी वेळा आमच्याही लक्षात आलेले आहेत. आमच्या वर्गात अर्चना नावाची एक सुंदर मुलगी होती. viva असला की तिला बाहेर यायला तब्बल १ तास लागायचा आणि हे नेहही तरुण prof. रांकडून नेमही व्हायचे. वर्गातील प्रत्येक मुलामुलींना ही गोष्ट माहिती झालेली होती. ह्या मुलीला मग मार्कही छान मिळायचे. पण ती एक चांगली आणि हुशार मुलगी होती हे मात्र नक्की त्यामुळे आम्ही तिला कधीच नाव ठेवले नाही.
|
यातल्या क्रश शब्दाचे डिक्शनरी मीनिन्ग कुठेच सापडत नाही याचा उगम काय? की हा स्ल्यान्ग आहे
|
Psg
| |
| Monday, November 06, 2006 - 7:06 am: |
| 
|
रॉबीन, कदाचित स्लँगच असावा.. क्रश म्हणजे दबून जाणे, चिरडून जाणे.. कोणालातरी पाहून दिल असे चिरडून जातं, कामातून जातं, म्हणून 'क्रश' असे म्हणत असावेत .. चू.भू.द्या.घ्या
|
Manya2804
| |
| Monday, November 06, 2006 - 10:10 am: |
| 
|
राॅबीन, Merriam-Webster on-line dictionary मध्ये crush - noun चा अर्थ an intense and usually passing infatuation (have a crush on someone); also : the object of infatuation असा दिला आहे.
|
Mirachi
| |
| Tuesday, November 21, 2006 - 9:06 am: |
| 
|
माझा पहिला crush celebrity होता. राखी सावंतच्या परदेसीया (remix) album मधला तो तिचा boss असतो ना, ............ हां, तोच तो (ए कुनाला त्याचे नाव माहित आहे का?) Anyway, after that, मला माझ्या real life मधला hero भेतला. मी 12th Science ला होते, ना तेव्हा "तो" माझ्या class मध्ये होता. कसला cute दिसायचा तो, त्याचं नाव गौरव होतं. almost classमधल्या सगल्या मुली मरायच्या त्याच्यावर. but, specially मी आनि माझी मैत्रिन केतकी. आम्ही रोज classला उशिरा जायचो, आनि parking plotला उभारायचो, का तर तो नेहमी late यायचा. असं त्याला पाहन्यात yearनिघुन गेलं. ............ नंतर मी engineeringला admission घेतलं. पाहते तर काय, तिथं तो रांगेत माझ्या समोर होता. त्यानं मला पाहुन smile दिली. form भरुन झाल्यावर तो माझ्याशी बोलायला आला. तो: hi मी: hi (ए दिल जरा संभलना............) तो: which branch? मी: (तुझ्या मनाची......... हे आवरुन) electronics .................. आनि तुम्हाला खरंच सांगते तो चक्क "माझीपन!" म्हनाला. .................. आम्ही नंतर एका वर्गात आलो. मी "हे सगलं" केतकीला सांगितल्यावर ती खुप jealous झाली. bur, we became nice friends after that...................................... अहो, खरी कहानी तर आत्ता आहे. बोलता बोलता एकदा त्याने मला त्याच्या first crush बद्दल सांगितलं आनि त्याचि "ती" होती माझी मैत्रिन केतकी!!!!!!!!!!!!!!!.....................
|
Manyah
| |
| Wednesday, November 22, 2006 - 5:07 pm: |
| 
|
हा माझा किस्सा बावळट्पनाच्य वर शोभुन दिसेल.... बारावी मधे आमच्या क्लास मधे एक छान सुन्दर मुलगि होति..... तिच्या गालाला अतिशय सुन्दर खळ्या पडायच्या..... तिचि आनि माज़ि कायमचि खुन्नस होति गनिताच्या पेपर वरुन..... आमच्या दोघान्पैकि कोनितरि पहिले यायचे.... पन आम्हि तसे चान्गले फ़्रेन्द्स होतो तिला मी फार आवडतो असे मी माझ्य बर्याच मित्रा कदुन एकले होते..... सगले जन मला तिच्या वरुन चिडवायचे हलुहलु सगल्या क्लास मधे विषय चालु झाला मला हे सहन नाहि झाले आनि मे एक नविन प्लान केला..... एके दिवशि मे सरल रखि घेउन क्लास ला गेलो अनि क्लास सुटल्यावर तिच्या कडे जाउन तिला म्हनलो कि सगले जन आपल्याविषयि बोलतात मल हे आवडत नहि..... तु मला राखि बान्ध म्हनजे प्रश्न मिटला.... तिने या विषयावरुन भरपुर वाद घातला नन्तर म्हनलि कि जर तुझि ईतकिच इच्छा असेल तर बान्धते मी तुला राखि... अनि रखि बन्धुन निघुन गेलि..... हे सगले क्लास च्या समोर सर्व मुल मुलिन्च्या समोर..... नन्तर आज पर्यन्त ति माझ्याशी कधि हि बोललि नहि... सगले मित्र आजहि माझि या विषयवरुन खिल्लि उडवतात....
|
काय मन्या बिच्चारीचा दिल तोड दिया ना?
|
Vijay3845
| |
| Saturday, November 25, 2006 - 5:49 pm: |
| 
|
मला ही साइट पाहून आणि क्रशविषयी वाचून माझ्या शाळेतल्या दिवसांची आठवण झाली. अंतर्मनाची तार छेडली गेली. का ते नंतर सांगेन.
|
Vijay3845
| |
| Sunday, November 26, 2006 - 2:18 pm: |
| 
|
तेरावं संपून मला चौदावं वर्ष लागलं होतं. नववीत गेलो होतो. शाळेत आम्हाला मराठी शिकवायला एक मॅडम होती. तेव्हा ती बावीस तेवीस वर्षांची असेल. साडे पाच फूट उंच, गोरीपान, सुरेख चेहर्याची. मला ती खूप आवडायची. छान छान साड्या नेसून ती यायची. तिच्या डाव्या खांद्यावरचा पदर तर अगदी कोपरापर्यंत आलेला असायचा. पण साडीत तिचा बांधेसूदपणा खुलून दिसायचा. वर्गात तिनं शिकवायला सुरवात केली की मी जिवाचा कान करून तिचं बोलणं ऐकत असे. तिचा आवाज कानात साठवून ठेवावासा वाटे. मराठी कविता वाचतांना तर तिचा आवाज अधिकच भावपूर्ण होत असे. तिच्या भुवया, तिचे मोठे डोळे खूप काही बोलत. तिच्या तासांची मी आतुरतेने वाट पाहात असे. माझी मराठी भाषेतली प्रगती पाहून मला ती शाबासकी देत असे. माझ्यावर तिचा प्रभाव आहे हे तिला माहीत होतं. वर्गात तिच्या डाव्या बाजूला पहिल्याच बाकावर मी बसायचो. शिकवतांना तिच्या गोर्या सुंदर हातांची मोहक हालचाल व्हायची. तिच्या डाव्या मनगटावर छानसं घड्याळ असायचं. बोलत बोलत ती बर्याचदा माझ्या बाकाच्या अगदी जवळ येऊन उभी राहायची. ते पाहून मला खूप बरं वाटायचं. एकदा मी चार दिवस तापानं आजारी पडलो. शाळेत गेलो नाही. चार दिवसांनी गेलो तेव्हा तिनं माझी विचारपूस केली. तब्येतीची काळ्जी घे म्हणाली. चार दिवसात तिनं काही अलंकार आणि काही समास शिकवले होते. मला ते समजले नाहीत. मी तिला म्ह्टलं. तेव्हा तिनं मला तिच्या घरी बोलावलं. सारे अलंकार आणि समास समजावून सांगितले. तिची आई पण छान होती. मला तिनं रव्याचा लाडू खायला दिला. वर्ष संपलं. मी दहावीला गेलो. तेव्हा ती मला शिकवायला नव्हती. पण जाता येता बोलायची. गोड हसायची. नंतर ती शाळा सुटली आणि ते गावही. बर्याच वर्षांनंतर मी पुण्याला एका पुस्तकाच्या दुकानात पुस्तकं पाहात होतो. तिथं अनपेक्षितपणे ती मला दिसली. तिच्या बरोबर तेव्हा सात आठ वर्षांचा एक गोड मुलगा होता. मी पुढे होऊन म्हटलं, "मॅडम, मला ओळखलं?" "अरे, विजू? तू?" अतिशय आनंदानं ती बोलली. तेच गोड हसू चेहर्यावर होतं. वयानं आपल्या खुणा तिच्या चेहर्यावर उमटवल्या होत्या. पण तिचा बांधा अजून तसाच होता. तिचं व्यक्तिमत्व तसंच होतं. भारदस्त आणि प्रभावी. कुठे असतोस, काय करतोस, वगैरे झालं. मग आम्ही एका कॅफेमध्ये काॅफी घेतली. "खूप दिवसांनी भेटलास. बरं वाटलं." निरोप घेतांना ती बोलली. ही भेट होऊनही आता बराच काळ लोटला आहे. पुन्हा ती भेटली नाही. पण मनाच्या एका कप्प्यात मी तिला जपून ठेवलं आहे. ती मला भेटत असते. मी मग तिला विचारतो, "मॅडम, मला ओळ्खलं?" "अरे, विजू? तू?" ती हसून बोलते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|