Maudee
| |
| Monday, September 11, 2006 - 6:21 am: |
| 
|
चाफ़्फ़ा तुम्ही ग्रेट आहात.... भुतदया वगैरे तर वावा.....
|
Chaffa
| |
| Monday, September 11, 2006 - 3:32 pm: |
| 
|
एक आणखी किस्सा. चारपाच वर्षांपुर्वीचा आहे. आमच्याकडे काहीतरी नविन ईक्विपमेंट आणलं होतं. नेहमीप्रमाणे त्याची पुजा करुन नारळ वगैरे फोडायचा होता. आणि सालाबाद प्रमाणे नारळ,पेढे आणलेले नव्हते. आमच्या ताज्या ताज्या ऑफिस बॉयला मी नारळ,पेढे आणायला पिटाळलं. पठ्ठ्या मला वाटंत यु.पी.की बिहारचा होता.दहा पंधरा मिनिटांनी सांगत आला साब उधर पेडा नही मिलता लेकिन उधर बर्फी मिली मै लेके आया. म्हंटलं चला आगदीच खाली हाथ नाही ना आला.! गडबडीत जी.एम. आले त्यांना घाई. कशीबशी पुजा आटोपुन नारळ फोडला त्याचे पाच तुकडे समोर ठेवले वर बर्फीचे तुकडे ठेवले, प्रसाद वाटप झाले माझ्या हातात प्रसाद पडेस्तोवर जी.एम. माझ्याजवळ येउन म्हणाले काय आजकाल देवांना पण रुचिपालट लागतो काय. ? आणि माझ्या हातात त्या तथाकथित बर्फीचा तुकडा ठेवला तो जिभेवर ठेवला मात्र कपाळावर हात मारुन घ्यायची वेळ आली त्या बहाद्दराने बर्फी म्हणुन आणलेली वस्तु चक्क आलेपाक होता आणि त्याचा नैवेद्य दाखवला गेला. गोडाऐवजी वेगळीच चव लागल्याने हैराण झालेल्या सगळ्यां मधुन त्या बॉयला शोधुन र्हास झापला.
|
Chaffa
| |
| Monday, September 11, 2006 - 3:39 pm: |
| 
|
जरा तुम्हाला पण चार्ज करतो. स्टपलरमध्ये नविन पिना भरल्यावर कितीजणांनी पहीली पिन स्वतःच्या बोटात मारुन घेतलीय. घेतलीय ना. ? ........स्टपलर बंद करताना.?
|
Bsk
| |
| Monday, September 11, 2006 - 5:49 pm: |
| 
|
my god !चाफ़्फ़ा तुमच्याकडे किती किस्से आहेत हो!!
|
Chafa
| |
| Monday, September 11, 2006 - 6:21 pm: |
| 
|
चाफ़्फ़ा तुम्ही कवठीचाफा होऊनच जा. सोनचाफा आणि चंपक आहेतच इथे. म्हणजे इथे कोणाचं confusion होणार नाही आणि इथल्या चाफ्यांची जास्तीची मेजॉरीटी होऊन जाईल.
|
Milya
| |
| Tuesday, September 12, 2006 - 8:17 am: |
| 
|
चाफ़्फ़ा तुमचे किस्से भन्नाट आहेत हो पण ह्यातले सगळे खरेच तुमचे आहेत? का काही आइकिव पण आहेत. माफ़ करा पण तुमचा हा कुंडीचा किस्सा काही वर्षापूर्वी मायबोलीवरच कुणीतरी टाकला होता... त्यात त्या माणसाने आपल्या कन्नड मोलकरणीला 'कुंडी क्लीन माडी' असे झोकात सांगितले होते आणि तिने फ़क्त पोलिसाला बोलावणे बाकी ठेवले होते...
|
Chaffa
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:46 pm: |
| 
|
मिल्या, या बहुभाषिक देशात असे किस्से वारंवार घडायचेच.
|
Chaffa
| |
| Tuesday, September 12, 2006 - 3:27 pm: |
| 
|
आणखी एक भर मी काम करतो तिथे माणसं बयापैकी मनमोकळी असल्याने काही गोष्टी खपुन जातात. या प्रकाराला तसा बराच जुनेपणा आलाय. तो प्रेझेंटेशनचा पिरीयड होता. आमच्या टेकनिकल मनेजरच्या केबिनमधे मी प्रेझेंटेशन करत होतो, समोर बॉय कॉफी ठेउन गेला ( हा तोच प्राणी मागच्या वेळचा ). माझा बॉस थंड झाल्याशिवाय चहा,कॉफी घेत नाही.माझे प्रेझेंटेशन चालु करुन द्यायला मी त्याच्या खुर्चीवर बसलो होतो सहाजिकच माझ्या डाव्या हाताचा कप मी घेतला प्रेझेंटेशन संपेपर्यंत तो संपवला देखिल कंप्युटर वरचं माझं काम संपलं आणि मी माझ्या खुर्चित येउन बसलो. थोड्यावेळाने मी पुन्हा माझा कप उचलुन कॉफी संपवली, प्रेझेंटेशन संपवलं आणी जायला निघालो, इतक्यात त्याने ईंटरकॉम वरुन पुन्हा कॉफी मागवलेली ऐकली म्हणुन बाहेर पडता पडता त्याला बजावलं "ईतनी कॉफी पिना सेहत के लिये अच्छा नही है. ! " दोन दिवसांनी माझ्याकडे पाहुन एक ईब्लिस सहकारी म्हणाला क्यो भाई प्रेझेंटेशनमे आप बहुत डिस्टर्ब थे क्या,दो दो कप कॉफी पी गये. ? च्यायला म्हंटलं काय लोच्या झाला. ? नंतर कळलं मी डाव्या डाव्या हाताचे असे करुन माझी आणी बॉसची अशी दोन्ही कप कॉफी पिउन टाकली. आणि वर त्यालाच उपदेश करुन आलो. साला जाम शरमल्यासारखं झालं.
|
Deshi
| |
| Tuesday, September 12, 2006 - 3:30 pm: |
| 
|
आयला चाफ्फा लय भारी. जरा तुमच्या चांगल्या वागन्याचे किस्से पण टाका की राव.
|
Chaffa
| |
| Tuesday, September 12, 2006 - 3:40 pm: |
| 
|
देशी, चांगल्या वागण्याचे किस्से कुणि मन लाउन वाचेल का. ? त्यातुन हा वेंधळेपणाचा. बाकी तुम्हाला गप्पा मारायच्या असतिल तर बेधडक मला मेल करा अट फक्त एकच मराठीतुन बोलायचं.
|
Chaffa
| |
| Wednesday, September 13, 2006 - 5:37 am: |
| 
|
माझा एकही स्वयंपाकघरातला किस्सा अजुन मी लिहिला नाही का माहितेय. ? कारण मला स्वयंपाकघरात जायला बंदी आहे. त्याचं असं झालं ते दिवाळी की नवरात्रीचे दिवस होते,आमच्या कॉलनित बरेचजणांनी दारात रांगोळी काढुन आपले मराठिपण सिद्ध केलं होतं. आमच्या घरात रांगोळी काढु शकेल असं कुणिच नाही. थोडं वाईटही वाटलं आणि रांगोळी काढायची हौसही आली. चला म्हंटलं आज हा प्रयोगही करायचा. पण रांगोळी काढणं वाटतं तितकं सोपं काम नाही. एकतर रांगोळी प्रकरण हातातुन सुटत नाही नाहितर एकदम पडते. (रांगोळी काढू शकणार्या मंडळींना आपले शतशः प्रणाम)मलाही काही जमेना म्हणुन मी एक अभिनव शक्कल लढवली. किचन मधली एक बरणी घेउन त्यात सगळी रांगोळी ओतली बरणीच्या झाकणाला भोक पाडुन त्याने रांगोळी चितारण्याचा प्रयत्न केला. रांगोळी काढता आली की नाही ते काही आठवत नाही पण त्यामुळेच पुढचा प्रकार घडला. ती भानगडबाज बरणी मी कुठे ठेवली ते काही आठवत नाही पण वार मंगळवार होता आणी मंगळ्वारी आमच्या घरात सामुदाईक उपवास असतो आणी त्या दिवशी बाबांचे दोन मित्र जे आमच्या कडुन उपमा खाउन गेले ते आजपर्यंत पुन्हा कधी परत आलेले दिसले नाहीत. आणी त्या दिवसा पासुन मला किचनमध्ये कायमची बंदी माझ्या आईने केलेय.
|
Mi ekda Hyd. hun train ni yenar hoto, reservation hote ani tyavar vel hoti 20:05 Ata mi (ati)shahanyani ticket baghun mazi train 10:05(instead of 08:05) la ahe ashi samajut karun ghetali. Kadachit 20 ani 10 madhlya common 0 ni gondhal kela hota Ani station la ugach lavkar pochlo, javalpaas 08:15 paryant ani mazi train mazyasamor nighun geli. Mi matra aapli train tar barich ushira ahe hyach naadat. jemva gondhal lakshat aala temva swatalach jara shivya ghatlya ani bus pakadun aalo...
|
Athak
| |
| Wednesday, September 13, 2006 - 7:46 am: |
| 
|
अरे वा नविन चाफ़ा दरवळतोय का इथे , मी आपला वाचतांना जुना चाफ्याला हा नविन वास कसा म्हणुन विचार करत होतो हे भन्नाट आहे रे भो तुझे किस्से चाफ़्फ़ा अन लिहिण्याची शैली बी
|
Sandu
| |
| Wednesday, September 13, 2006 - 6:30 pm: |
| 
|
Chaffa .. lai bhari .. khup hasu ala vachun .. ajun liha .. khup kisse liha .. mi tumhala vendhala ajibaat mhananaaar nahi
|
Chyayla
| |
| Wednesday, September 13, 2006 - 10:10 pm: |
| 
|
मी पाचव्या वर्गात असताना, आमच्या शिक्षिका प्रश्नाचे उत्तर सान्गत होत्या आणी आम्ही ते वहित लिहित होतो. उत्तर सान्गताना मधेच एका टार्गट पोराला दटावताना म्हणाल्या "मार हवा आहे का तुला?" आणी मी ते पण लिहिले, जेन्व्हा त्यान्नी विचारले कुठे होतो आपण, तेन्व्हा मी तेच वाचुन दाखवले, आणी वर्गात एकच हशा पिकला.
|
Chaffa
| |
| Friday, September 15, 2006 - 1:56 am: |
| 
|
माझे किस्से बरेच झाले आता माझ्या एका चिक्कट मित्राची गोष्ट. हा प्राणी ईतका चिकट आणि भित्रा आहे की बापरे. त्याच्या या कंजुसपणानेच त्याच्यावर एकदा चांगलेच संकट ओढावले होते. महाशय सिगारेट ओढताना सुध्धा ती अर्धीच ओढतात आणि वर चोरुन असाच एकदा चोरुन सिगारेट ओढत असतना कुणितरी आले म्हणुन महाशयांनी आर्धी सिगारेट विझवुन सरळ खिशात टाकली. रमतगमत स्वारी माझ्या केबिन पर्यंत आली माझं सहज लक्ष गेलं तर या भन्नाट माणसाच्या खिशातुन धुर येतोय मी त्याच्या लक्षात आणुन द्यायच्या आतच त्याने शक्य तितक्या डांसस्टेप करायला सुरवात केली. प्रकार काय झाला ते सांगायला नकोच. नशिब ईतकेच की खिसा शर्टचा होता कारण त्याच खिशात काडेपेटीही होती.
|
बोम्बा बोम्ब झाली असेल त्या मित्राची चाफ़्फ़ा...
|
Chaffa
| |
| Friday, September 15, 2006 - 2:49 am: |
| 
|
चांगलीच आठ दिवस कुणाला दिसला नव्हता.
|
ह. ह. पु.वा बिच्चारा चिक्कट मित्र
|
Rakhee
| |
| Friday, September 15, 2006 - 11:33 pm: |
| 
|
मी चौथी-पाचवीत असतानाचा किस्सा. आईनी एका जवळच्या दुकानातून काहितरी आनायला पाठवले. त्या दुकानाचे नाव विक्रम स्टोअर्स. त्याच काळात विक्रम वेताळ सिरीअल टीव्ही वर लागायची. मी त्या सिरीअलचे विक्रम और वेताळ विक्रम और वेताळ असे टायटल गीत म्हणत नाचत त्या दुकानात गेले. तिकडे पोहोचल्यावर तिथल्या मानसाशी बोलताना लक्शात आले की गाण म्हणण्याच्या नादात आईनी काय अणायला सन्गितले आहे तेच मी विसरले होते. मग घरी येऊन आईला विचारले आणि परत गाण न म्हणता चुपचाप काम करुन घरी आले
|