Chafa
| |
| Thursday, September 07, 2006 - 8:23 pm: |
| 
|
हं आता काय करायचं? देवनागरीत नावं असती तर ती unique राहीली असती. ऍडमिन, असं करता येणं शक्य आहे का? मला वाटतं 'मनोगत' वर तशी सोय आहे.
|
Chaffa
| |
| Friday, September 08, 2006 - 2:15 pm: |
| 
|
हा चाफा ईथेच आहे का.? तरीच म्हंटलं मला नांव का बदलायला लागलं .? ही आपली गंमतच बरं. खरं तर हे नांव म्हणजेच एक गंमत आहे. ती पुन्हा केंव्हातरी. पण आता माझ्या लहानपणीचाच एक किस्सा लहानपणी शाळेत भुतदया विषयी भाषण डोक्यात भिनवून घेउन शाळेतुन घरी आल्यावर पटांगणात चरणार्या गाढवावर भुतदया दाखवायची सणक आली.त्याच्या मागच्या पायाला बांधलेल्या दोर्या जबरदस्तीनं कापल्या.नंतर.....? आयाईऽऽ गंऽऽऽऽऽ साला अजुन कधी कधी जबडा दुखतो.
|
Moodi
| |
| Friday, September 08, 2006 - 2:22 pm: |
| 
|
चाफा नं. २ धमाल किस्से आहेत हो 
|
Shyamli
| |
| Friday, September 08, 2006 - 2:30 pm: |
| 
|
हे हे हे.... भुतदया.... दाखवा अजुन
|
Milindaa
| |
| Friday, September 08, 2006 - 5:00 pm: |
| 
|
चाफा, सध्या तरी नावांचे देवनागरीकरण शक्य आहे असं वाटत नाही. त्यातून Admin अपडेट देतीलच.
|
Prajaktad
| |
| Friday, September 08, 2006 - 5:20 pm: |
| 
|
चाफ़ा-१ आणी चाफ़ा-२ अस दोन्हि चाफ़्यांना पटत असेल तर आणी अर्थात admin ला शक्य असेल तर करता येईल का??.. सहज म्हणुन सुचवले. चाफ़ा तुमचे किस्से धम्माल आहेत ह!
|
Storvi
| |
| Friday, September 08, 2006 - 6:03 pm: |
| 
|
अरे पण त्यांची नाव वेगवेगळी आहेत.. original चाफ़ा तर हा नविन चाफ़्फ़ा आहे ना.. मग? 
|
Psg
| |
| Saturday, September 09, 2006 - 5:04 am: |
| 
|
माझं पोस्ट कोणी उडवलं आणि का?
|
Robeenhood
| |
| Saturday, September 09, 2006 - 5:14 am: |
| 
|
त्याना रंग द्या. पांढरा चाफा, ताम्बडा चाफा, काळा चाफा ई.
|
Chaffa
| |
| Saturday, September 09, 2006 - 10:15 am: |
| 
|
सालं ईथेही डिलीटाडिलीटी चालते का. ? माझं कालचं पोष्ट कुणी उडवलं. ? बाकी रॉबिन तुझी कल्पना छान आहे विचार करायला हवा.
|
Meggi
| |
| Saturday, September 09, 2006 - 1:49 pm: |
| 
|
कवटी चाफा हे नाव कसं आहे
|
Chaffa
| |
| Saturday, September 09, 2006 - 2:16 pm: |
| 
|
मॅगी की मेगी कवठी चाफ़ा मस्तच नावं आहे हं.
|
Chaffa
| |
| Saturday, September 09, 2006 - 2:53 pm: |
| 
|
हा बयापैकी ताजा किस्सा आहे. आमच्या कॉलनीत एक नविनच महोदय रहायला आले होते. कन्नड होते आणि हिंदी मराठीची बोंबच होती. आमचं हिंदी आधिच भयानक त्यातुन हे कॉलनितले पहिले अमराठी. त्या मुळे हाय हलो च्या वर बोलणं असं व्हायचच नाही. एकदा गुलाबाची कलमं विकायला एकजण आला. बर्याच जणांनी घेतली त्यांच्याबरोबर त्याने आणि मी पण घेतली (कलमं ). आणि कधी नव्हे ते त्याने विचारलं. ये झाड कैसा लगानेका सर्. आम्ही ग्रेट. उत्तरलो कुछ नही घरमे जाके कुंडीमे डालनेका और कुछ नही. तो जो भडकुन निघुन गेला तो दोन आठ्वडे तरी माझ्याकडे रागानेच बघायचा. मी गोंधळात! म्हंटलं याला कसला राग आला. आणि जेंव्हा कुंडी शब्दाचा त्याच्या भाषेतला अर्थ कळलाऽऽऽ. आई ऽऽ शSपSथ दहादा तरी माफी मागितली असेल.
|
Chaffa
| |
| Saturday, September 09, 2006 - 3:02 pm: |
| 
|
सिगारेटमध्ये लवंगी फटाके भरुन खुप जणांनी दुसर्याची गंमत केली असेल पण तिच सिगारेट कुणी चुकुन बाबांना देउन पाहीलेय. हा पराक्रम मी गाजवलाय. सॉऽऽऽलिड फटके पडतात.
|
Moodi
| |
| Saturday, September 09, 2006 - 3:28 pm: |
| 
|
चाफा कुंडीचा अर्थ मला माहीत आहे.  
|
Chaffa
| |
| Saturday, September 09, 2006 - 3:37 pm: |
| 
|
अरे पण मला नव्हताना माहित. ईथेच तर राडा झाला.
|
Sandu
| |
| Saturday, September 09, 2006 - 5:27 pm: |
| 
|
kay artha ahe "kundi" cha .. mala nahi mahit 
|
चाफ्फा, भारी किस्से हो तुमचे...कुंडीचा तर खरंच innocent जोक झाला हं! मलाही अर्थ नव्हता माहिती कुंडीचा, गुगल भाऊंना विचारले (संदु, तुम्हीही विचारा).
|
Chaffa
| |
| Sunday, September 10, 2006 - 2:11 am: |
| 
|
खरंच कवठीचाफा नावं घेउ काय.?
|
Durandar
| |
| Sunday, September 10, 2006 - 9:00 am: |
| 
|
गावरान चाफ़ा कस,मस्त सुग्गन्धि नाव
|