|
Ankyno1
| |
| Saturday, January 05, 2008 - 9:54 am: |
|
|
Thanks Poonam... केदार... अरे ती हिर्वीण ईशा शर्वणी.... ईशा लाखानी टेनिस player आहे.
|
Dinesh77
| |
| Saturday, January 05, 2008 - 12:42 pm: |
|
|
शोले चे शूटिंग खरोखर कर्नाटकात झाले आहे. बंगलोर म्हैसूर रोडवर आहे ते खेडेगाव. त्याचे खरे नाव रामगढ नाही आहे.
|
Asami
| |
| Saturday, January 05, 2008 - 4:10 pm: |
|
|
पण जेवढे कौतुक ऐकले तेवढा वाटला नाही. >श्या तुझ्याकडून हे लिहिले जाईल असे वाटले नव्हते रे मी जाने भी दो, , अंगूर , हेरा फेरी ह्या पंक्तीमधे बसवेन AAA ला. classic farsical comedy
|
अंदाज अपना अपना हे त्या भिक्कारड्या सिनेमाचे नाव आहे हे कळले. मी माझ्या मतावर ठाम आहे. अत्यंत बकवास सिनेमा. जाने भी दो यारो, अंगूर ह्यांच्या पंगतीला ह्याला बसवणे म्हणजे हापूसच्या आंब्यांशेजारी बटाटा (तोही सडका) ठेवण्यासारखे आहे. किंवा शोलेच्या बाजूला रामू की आग! (तेवढाच शोलेशी संबंध आला!)
|
Ankyno1
| |
| Monday, January 07, 2008 - 7:04 am: |
|
|
मी ही माझ्या मतावर ठाम आहे... अंदाज अपना अपना हा एक classic comedy आहे. अंगूर, जाने भी दो यारो, गोलमाल (जुना), नरम गरम, रंग बिरंगी, हेराफेरी..... या निखळ करमणूक करणार्या विनोदी सिनेमान्च्या पंक्तीत बसायला एकदम लायक आहे.
|
Uchapatee
| |
| Monday, January 07, 2008 - 11:41 am: |
|
|
असामी, अन्क्यु न. १ ना अनुमोदन. AAA हा एक मस्त टाईमपास सिनेमा आहे. परेश रावल चा मला वाटते पहिला विनोदी रोल असावा.
|
Amruta
| |
| Monday, January 07, 2008 - 4:06 pm: |
|
|
AAA च्या बाजुने बोलणार्या सर्वांना अनुमोदन. मला अतिशय आवडलेला अंदाज अपना अपना. अजुनही अगदी कंटाळा आला असेल तेव्हा AAA , हेराफेरी हे सिनेमे बघितले की मस्त वाट्ट.
|
Aashu29
| |
| Monday, January 07, 2008 - 6:50 pm: |
|
|
अर्रे अंदाज ला शिव्या नकोत रे देवु, आमचे कॉलेजचे दिवस ते दायलॉग मारण्यातच तर गेले, कसला धमाल सिनेमा, एकटे पहिले तर बोर होईल एखादवेळेस पण दोस्तान्च्या संगतीत धमालच येते
|
Maanus
| |
| Monday, January 07, 2008 - 9:20 pm: |
|
|
नुकत्याच मिळालेल्या माहीतीनुसार अब तेरा क्या होगा कालीया हा एक गेम आहे, english मधे त्याला Russian roulette आणि त्या धर्ती वरचा सीन अजुन बर्याच चित्रपटांत येवुन गेलाय. http://en.wikipedia.org/wiki/Russian_roulette
|
AAA चांगला सिनेमा झाला असता, पण ते शक्ती कपूरचा अचरटपणा त्यात आला असता तर.. फार्स चांगला चालू असताना त्याचा 'इनोदी चित्रपट' करायचा प्रयत्न चित्रपटाची वाट लाऊन गेला...
|
शोले चं शूटिंग रामगिरिबेट्टा खेड्याजवळ झालं होतं. रामगढ म्हणजे पूर्णपणे उभारलेला सेट होता. वरून साधं कौलारू वाटणारं घर म्हणजे व्यवस्थित AC मेक-अप रूम होती. शोले शूट व्हायच्या काही दिवस आधीच अमिताभ-जयांचं लग्न झालं होतं, हनिमून नंतर लगेच विधवेच्या गेट-अप मध्ये जाणं किती भयानक असेल नै? 'शोले' दरम्यान धरम-हेमाचा रोमान्स 'पूरे शबाब पर' होता. बागेत बंदुकीने कैर्या पाडायच्या सीनमध्ये रीटेक्सच्या निमित्ताने हेमाला बिलगता यावं म्हणून धरमपाजी स्पाॅटबाॅयज़ ना सीन्स चुकवायला लावायचे. लाच देऊन!! 'स्टेशन से गाडी जब छूट जाती है' मधली ट्रेन आणि टांगा समांतर पळवायचा सीन दिवसातनं एकुलत्या जाणार्या गाडीवर शूट करतांना धावपळ उडायची. एकदा हेमाच्या डोक्यातल्या फुलांच्या continuity पायी शूटिंग खोळंबलं होतं, पटकन जाऊन ती फुलं आणण्यात आली, आणि गाडी सुटायच्या १० मिनिटं आधी फुलं मिळाली. (हुश्श!) सेट बंगळुरापासून ३५-४० किलोमीटर दूर होता. धरम एकदा दारूच्या नशेत हे अंतर चालत हाॅटेलवर पोचला होता! अमिताभनी सचिनना एक AC भेट दिला होता- 'अहमद' च्या कामावर खुष होऊन. गब्बरच्या भूमिकेसाठी डनी आणि शत्रुघ्न सिन्हाचा विचार होत होता. संजीवकुमारचा पण गब्बर च्या ट्रॅकवर डोळा होता. ह्याच वर्षी धरम्-अमिताभ जोडगोळीचा 'चुपके-चुपके' रिलीज़ झाला होता. What a contrast! शोलेचा मुहूर्ताचा शाॅट होता- अमिताभ रेड्यावर बसून जयाच्या पुढ्यात येतो- तो, आणि फ़िल्म चा शेवटचा शाॅट होता (बहुतेक)जेलर वाला. --- काही गोष्टींचं मला नेहेमी नवल वाटत आलंय रामगढ मध्ये जिथे वीज नाही, एव्हढी उंच टाकी कुठल्या विद्वानाने बांधली?
|
Dakshina
| |
| Monday, March 10, 2008 - 4:51 am: |
|
|
शोले शूट व्हायच्या काही दिवस आधीच अमिताभ-जयांचं लग्न झालं होतं, हनिमून नंतर लगेच विधवेच्या गेट-अप मध्ये जाणं किती भयानक असेल नै? >>>>>>>>> माझ्यामते काही दिवस आधी नाही, बरंच आधी लग्नं झालं असेल, कारण असं म्हणतात, कि त्यावेळी जया प्रेग्नंट होती (दुसर्या वेळी)
|
'शोले' दरम्यान धरम-हेमाचा रोमान्स 'पूरे शबाब पर' होता. बागेत बंदुकीने कैर्या पाडायच्या सीनमध्ये रीटेक्सच्या निमित्ताने हेमाला बिलगता यावं म्हणून धरमपाजी स्पाॅटबाॅयज़ ना सीन्स चुकवायला लावायचे. लाच देऊन! एक विवाहित, मोठी मुलेबाळे असलेला माणूस कामासक्त होऊन कुण्या सुंदरीच्या मागे उल्लू बनतो ही निंद्य गोष्ट आहे. चवीने चघळण्याची नाही.
|
एकदाच लिहिण्याला 'नमूद करणे' म्हणतात रे शेंडेनक्षत्रा! त्याच्यापलिकडे गेलेल्या कशालाही 'उगाळणं' म्हणतात. दिवे घे. त्याकाळी पार्श्वसंगीत दृश्याच्या अंदाजे लांबीवर ठरत असे. बसंतीचा पाठलाग गब्बरचे डाकू करतात त्या सीनला पंडित सामताप्रसादांचा तबला आहे. आरडींनी सामताप्रसादांना प्रसंग समजावून सांगितला, आणि त्यांनी ती रिळं न बघता तितक्या मिनिटांचं पार्श्वसंगीत दिलं- ते इतकं चपखल बसलं की जेमतेम काही फ़्रेम्स out of synch गेलं.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|