Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 06, 2006

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » कांदापोहे अनुभव » Archive through April 06, 2006 « Previous Next »

Maanus
Tuesday, April 04, 2006 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कदाचीत आपल्याला माहीत नसेल, कोथरुड मधे झा कुटुंब famous आहे, दोघे नवरा बायको एकमेकांशी संस्कृत मधेच बोलतात. त्यांच्या घरात हजारोनी संस्कृत पुस्तके आहेत. श्री. झा बहुतेक आयुर्वेदाचे वैद्य आहेत.

Junnu
Tuesday, April 04, 2006 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे मला माहीत नव्हत. पण ही अट मला तरी strange वाटली होती.

Junnu
Tuesday, April 04, 2006 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन : स्विनी, त्याला म्हणायचस ना की आधीच का नाही सांगीतलस मी आले असते तुझ्या घरी चहा प्यायला.

Abhijit
Tuesday, April 04, 2006 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महान अनुभव आहेत एकेक. असे काही होत असते हे कळून धक्काच बसला..

Ameyadeshpande
Tuesday, April 04, 2006 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलापण...आधी धक्का बसला आणि मग धक्क्यानी मी खाली बसलो.

Manuswini
Tuesday, April 04, 2006 - 9:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे सांगायचे तर मला नेहमी हा प्रश्ण पडतो ही मुले एथे रहातात, फिरतात, बघतात मुलिंना, चांगली शिकलेली असतात तरी अश्या संदर्भात मुलिशी कसे बोलायचे, काय विचारायचे कळत कसे नाही??

आणी outstanding quality म्हणजे confused and insecured . त्यात मुलगी independant बघितली की घाबरलेच आधीच.
I am not biased here but girls counterpart are better असे मला वाटते
च्यायला जुन्नु मग तो म्हणाला असता तु घरुन चहा घेवुन आलि असशीलच ना काय भरोसा नाही ह्या मुलांचा



Manuswini
Tuesday, April 04, 2006 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेया
कसा आहेस?
खाली बसु नकोस,
शिकुन घे :-)

दिवे घे रे


Maanus
Tuesday, April 04, 2006 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेया नका म्हणु रे...

Ameyadeshpande
Wednesday, April 05, 2006 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस कितिदा सांगायचं रे लोकांना तेच तेच आता तूच बोललास बरं झालं. :-)
मी मजेत...पण हे सगळे प्रकार ऐकून कोणत्या रौरवात पाय टाकतोय लवकरच कुणास ठाऊक असं झालं! :-)


Manuswini
Wednesday, April 05, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अमेया तु नावाचं spelling change कर पाहु
just kididng अरे गमतिने लिहिले
कुठल्या रौरवात पाय टाकतोस आहेस? :-)
तु त्या माणुस्ला विचार त्याच्या कडे एथली काही भारी प्रश्णाची नोंद असलेली डायरी आहे म्हणे.
:-)
हो ना रे माणुस?


Maudee
Wednesday, April 05, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एक स्थळ आलेले.....
त्या मुलाचे म्हणणे होते कि मुलीचा फोटो बघतो पसन्द पडला तर आपण कान्देपोहे program करुयात.....मी म्हटले चालेल....मुलाचाही एक फोटो पठवून द्या...म्हणजे मलाही ठरवता येइल भेटायचे कि नाही.....त्याने चक्क नकार दिला....म्हणे मुलगा फोटो बघत आहे तेव्हढे बस आहे......त्याला मुलगी पसन्द पडली तर आम्ही भेटणारच आहोत न??
मी त्याला त्याच वेळी नकार देऊन टाकला



Saavni
Wednesday, April 05, 2006 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आईला एका स्थळाचा फोन आला होता. त्या मुलाच्या वडीलांनी आधी माझ्या आईला आमच्या घरी कुणाकुणाला कुठले कुठले आजार आहेत हे विचारलं. तसं काही काळजी करण्यासारखं नाही असं आईने त्यांना सांगीतलं. इथंपर्यंत ठीक होतं. पण जेव्हा माझे आई-वडील दोघेही working आहेत हे कळलं तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही दोघं ही घराबहेर असायचा तर मग तुमच्या मुलीचं वळण चांगलं आहे का ? ह्यावर माझ्या आई ने " तिचे आजी-आजोबा होते तिची काळ्जी घ्यायला " असं सांगीतलं पण जेव्हा मला कळलं तेव्हा मला मात्र असं वाटलं की आई ने त्यांना म्हणायला हवं होतं की "नाही. आमची मुलगी अतिशय वाईट वळणाची आहे. Infact आम्ही ambitiously तिला तसंच वाढवलं आहे. " अरे ही काय विचारायची पद्धत आहे का ? कोणते आई-वडील आपल्या मुलांकडे इतकं दुर्लक्ष करतील की स्वत:च्या तोंडानेच ती / तो वाईट वळणाची आहे असं म्हणायला लागावं ?

Rutu_hirwaa
Wednesday, April 05, 2006 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही आलेला एक अनुभव

एक स्थळ पहायला मी आई आणि बाबा गेलेलो..
मुलगा विशेष बोलत नव्हता मग इकडचे तिकड्चे आणि जॉब बाबत बोलून झाल्यावर
मी विचारले --"बर, मग पुण्यामधे शनिवारी-रविवारी काय करता मोकळ्या वेळात?"
तो -- "काही नाही"
माझ्या चेहर्यावर विलक्षण आश्चर्य!!
मग परत थाम्बुन तो -- "नाही,म्हणजे एक दिवस मावशीकडे जातो आणि एक दिवस काकान्कडे..मावशीच्या मुलीन्ना ना माझा खूप लळा
आहे"
माझ्या चेहर्यावर अपार आश्चर्य
म्हणजे मावशीच्या मुली आहेत तरी केवढ्या??????

नन्तर तो पुढे
"नाही चार चार वर्षाच्या आहेत त्या मुली !! "

हा जोक नन्तर घरी खूप दिवस पुरला आम्हाला



Mrdmahesh
Wednesday, April 05, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, प्रश्न आईवडिलांनी आपल्या मुली बद्दल काही सांगण्याचा नाही. प्रश्न आहे तो असले बिनडोक / मूर्खासारखे प्रश्न विचारणार्‍याचा. हे लोक असं काही कसं विचारू शकतात याचेच आश्चर्य वाटते. त्यांची हिम्मतच कशी होते असं काही विचारायची? मी जर विचारणार्‍याच्या जागी असलो असतो तर असलं काही विचारायच्या भानगडीत पडलोच नसतो. मला जर वळणाविषयी विचारायचे असले असतेच तर ते मी मध्यस्थाला विचारले असते किंवा इतर कुठून माहीती काढली असती. ती मिळाली तर ठीक नाहीतर चक्क नकार कळवला असता. कारण मला संशय आहे ना! मग तो खोटा का असेना. खरंतर असल्या गोष्टींची शहानिशा अप्रोच होण्यापूर्वीच करायची असते. असो.
तू नकार कळवलाच असशील यात संशय नाही.
माझा कांदापोहे अनुभव येणेप्रमाणे
स्थळ सांगून आलं. माहितीतल्याच कुटुंबातली मुलगी. शेजारच्याच कॉलनीमध्ये रहाणारी. तिचा मोठा भाऊ माझ्याच शाळेत आणि कॉलेज मध्ये मला एक वर्ष ज्युनिअर. भावाव्यतिरिक्त मी तिच्या बाबांनाच फक्त पाहिलेले. भाऊ हाय / हॅलो एवढंच करायचा. मला नव्हतं माहीत की या पठ्ठ्याची बहीण आपल्याला आवडेल म्हणून.
मी त्यावेळी पुण्यात होतो. रूमवर रहायचो. मुलगी ही भावाबरोबर पुण्यात रहात होती. घरच्यांनी कळवले तिकडेच मुलगी पाहून घेणे. तुझा होकार आल्यास पुढच्या गोष्टी आम्ही पाहू.
झाले, मुलगी पहाण्याचा दिवस ठरला.
स्थळ्: गंधर्व हॉटेल (बाल गंधर्व रंगमंदिरा समोर)
वेळ्: संध्याकाळची.
ती मंडळी (म्हणजे, ती, भाऊ, त्याची बायको, आणि तिची बहीण) आधीच आली होती. मी माझ्या मित्राबरोबर. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. शिक्षणाबद्दल डिटेल विचारल्यावर असे कळाले की ती माझ्याच कॉलेज मधून १२ वी झाली. ४ वर्षा नंतर माझ्याच युनिव्ह. मधून बी. टेक. केले. आणि ती इथे आली. जणू काही माझाच पाठलाग ती करत होती. मग "प्रायव्हेट बोलायचे आहे." असं सांगून तिला गंधर्व पुलावर घेऊन गेलो. जाताना तिच्या आवडीचे तिखट दाणे घेतले. तिथेच गप्पा मारल्या. अर्थात जास्तवेळ मीच बोलत होतो (आता ती बोलते.). दीड तास कसा गेला ते कळालेच नाही. इकडे माझा मित्र आणि ती मंडळी कंटाळून गेलेली. शेवटी एकदाचे आलो. तिच्या भावाला सांगितले की मी विचार करून निर्णय देईन. (निर्णय तिथेच झाला होता पण म्हणलं सस्पेन्स मध्ये ठेवावं :-)). जाताना तिचा भाऊ मला म्हणाला: महेश, तुझा नकार आला तरीही आपली जी काही मैत्री आहे त्यात माझ्याकडून तरी काही फरक पडणार नाही. त्याचे हे भाबडेपण पाहून माझ्या डोळ्यात पाणीच यायचे बाकी होते.
नंतर त्याच रात्री होकार कळवला.


Somesh
Wednesday, April 05, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझाही एक अनुभव...

मी एक मुलगी बघायला गेलो असताना, सर्व बघण्याचे सोपस्कार झाल्यानन्तर माहीती देवाण्-घेवाण ह्याचा कार्यक्रम झाला. मी लिहुन दिलेली माहीती वाचुन मुलीच्या वडीलाने प्रश्न तरी काय विचारावा... " तुम्ही english मधे नाव लिहुन दिलेलेच आहे, आता मराठीत नाव सांगा.... "

तेव्हाच........ कपाळावर हात मारला....!!!


Saanjya
Wednesday, April 05, 2006 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

3-4 वर्षांपुर्वी एका सदगॄह्स्थाने माझ्याही सहनशक्तीचा अंत पाहिला होता..

त्याचे झाले असे कि माझ्या घरच्यांना कुठूनतरी एका स्थळाची माहिती मिळाली.. घरच्यांनी त्यांना २-३ वेळा फ़ोन करायचा try केला.. पण phone लागला नाही.. त्यामुळे ते काम माझ्यावर सोपवण्यात आले (सोबत लगेच phone कर, टाळाटाळ करु नको नेहमीसारखि, etc कानपिचक्यापण दिल्या..)

दुसर्या दिवशी मी अगदि sincerely phone केला..

मी: hello, मी संजय बोलतोय.. अमुक अमुक आहेत का?
(पलिकडुन एका मुलिचा आवाज): आबा घरी नाहीत, ते फ़िरायला गेले आहेत.. काहि काम होत का?
मी: हो, ..लग्नासंदर्भात बोलयचे होते.. ते परत आले कि please मला phone करायला सांगा.. (मी ph. no दिला)

15-20 मिनीटात मला phone आला..

मी: hello..
(पलिकडुन एक सदगॄह्स्थ): phone का केला होता मघाशी..
मी: अरे, हो, आपण.. अमुक अमुक का? ..(मी त्यांना जुजबी माहिती देउ लागलो..)

(एक दोन वाक्य बोललो तर ते सदगॄह्स्थ मधेच..):
सदगॄह्स्थ: कुठुन बोलताय तुम्हि?
मी: माझ्या flat वरुन, शनवार पेठ, पुणे..
सदगॄह्स्थ: जन्मतारिख काय?
मी: 76..
सदगॄह्स्थ: सध्या काय कामधंदा?
मी: मी अमुक अमुक शिकलॊय, आणि गेली 4-5 years job करतोय..
सदगॄह्स्थ: पगार किती?
मी: अमुक अमुक ...
सदगॄह्स्थ: मग अजुन तुमच लग्न कसे झाले नाही..
मी: sorry? काय म्हणालात..?
सदगॄह्स्थ: 4-5 वर्ष नोकरी, एवढा पगार, मग अजुन लग्न कसे काय झाले नाही?
मी (शक्य तितका संयम बाळगीत..): 'लग्न कसे काय झाले नाही' हा प्रश्न नाहिये.. 'लग्न कसे काय केले नाहीत' असा प्रश्न विचारा..
सदगॄह्स्थ: बर.., बर.., हा गाड्यांचा आवाज कसला येतोय?
मी: रस्त्यावरच्या गाड्यांचा आवाज येतोय..
सदगॄह्स्थ: flat वरुन बोलताय म्हाणाला मघाशी..
मी: हो, माझा flat रस्त्या कडेला आहे.. त्यामुळे गाड्यांचा आवाज येतो.
सदगॄह्स्थ: हा लहान मुलाच्या रड्ण्याचा आवाज कोठुन येतो आहे?
मी: शेजारच्या घरामधुन..
सदगॄह्स्थ: नाव काय त्यांचे?
मी: ढमाळ..
सदगॄह्स्थ: कुठला आहे तो ढमाळ?
मी: (माझा पारा हळुहळु वर चढुन माझ्या डोक्यापर्यंत पोचला होता) आता मला काय माहिती..
सदगॄह्स्थ: (आता सरळ येकेरी वर..) तुला माहिती नसले तरी मला माहिती आहे.
मी: असेल..
सदगॄह्स्थ: सांगु काय कुठला आहे तो ते? पारगाव चा आहे तो ढमाळ.. पारगावचा..
मी: असेल.. मग मी काय करु? (मनात विचार करतोय.. हा प्राणि मूर्ख आहे कि दारु बीरु टाकुन आला आहे..)
सदगॄह्स्थ: मी इकडे सातारा भागातला मोठा पुढारी आहे? माझी २५-३० एकर शेती आहे, 2 बंगले आहेत.. मला कोणी फ़सवू शकत नाहि..
मी: हे बघा, आता फ़ार झाले.. मघापासुन मी एकुन घेतोय.. तेहि तुम्हि वयाने मोठे आणि मी पहिल्यांदा तुम्हाला approach केलय म्हणुन.. पटल तर होय म्हाणा, नाहि तर नाहि.. उगाच वायफ़ळ बोलायचे काम नाहि.. समजलं??
सदगॄह्स्थ: बघु..
मी: आता बघायची काहि गरज नाहि.. झाले ते रग्गड होते..

मी phone कट केला..

Storvi
Wednesday, April 05, 2006 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>आता मराठीत नाव सांगा>>अरे त्यांना तुझे नाव सो मेश असे वाटले असणार म्हणुन confirm करायला तुला त्यांनी मराठीत विचारले :-O

Rutu_hirwaa
Thursday, April 06, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

saanjya

bhayanak hasu aale vachun
kaay pan manse astat re!!

Manmouji
Thursday, April 06, 2006 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या बी बी चे नाव कांदे पोह्याचे वाइट अनुभव असे ठेवता का? कारण ह्यावर सर्व अनुभव तसेच लिहिले जात आहेत. नाही तर इतर चांगले अथवा वाइट नसलेले पन अनुभव लिहा. ह्या सगळ्या अनुभावरुन असे वाटते कि वाइट अनुभव हा जर datum असेल तर वाइट न वागणे हे positive side ला जाते. त्यावर पण लिहा. आणि तसे घडत नसेल तर वाइट आलेल्या अनुभवानंतर पण लग्न ठरु शकते आणि ते टिकु शकते. एक कबुली आत्ताच देउन टाकतो की मी पुरुष असल्याने मी हे सर्व लिहिले आहे. सर्व अनुभवी स्त्री वर्गाने आपापले म्हणणे मांडावे ही विनंती


Manuswini
Thursday, April 06, 2006 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनमौजी,
तुम्ही नीट वाचले नाही का?
एथे सर्व mixed feeling आहेत KP वर
लिहिले आहेत ना कुणी मजेशीर अनुभव..
प्रत्येकाने आपल्या नजरेने पहावे :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators