|
Ruma
| |
| Wednesday, July 19, 2006 - 12:25 pm: |
| 
|
गजानन.. लग्नात मुलीची आई मंगलाष्टकं नाही एकत म्हणजे आधीच आईला मुलगी सासरी जायची म्हणून दु:ख असत आणि मंगलाष्टक झाली म्हणजे ती कायम स्वरूपी दुसर्याची झाली ना.. म्हणून.. अर्थात अस माझी आजी सांगते.. आणि अस पण म्हणते की पुर्वी तुमच्या सारख्या मुली उट्सूट महेरी कधीही नव्हत्या येत.. त्यामूळे माय्लेकींची भेट ही महिनोन महिने होत नव्हती.. अजून काही वेगळे कारण असू शकते..
|
Prady
| |
| Wednesday, July 19, 2006 - 12:47 pm: |
| 
|
अजून एक पद्ध्त. लग्नाच्या वेदी वर उभं रहायच्या आधी वधू गौरीहार पुजते. आणी लग्नाचे विधी संपल्यावर हा गौरीहार लग्नायोग्य झालेल्या मुली पळवतात. त्यामुळे त्यांची लग्नं लवकर जमतात अशी समजुत. अजून एक प्रकार म्हणजे झाल.कणकीचे दिवे करून ते एका टोपलीत ठेवले जातात.मुलीचे आई आणी वडील मग मुला कडच्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्या वर मागे उभे राहून ही झाल ठेवतात आणी ती व्यक्ती मग हातातले तांदूळ ह्या झालीवर उडवते. ह्याचा अर्थ असा की झालीच्या रुपाने आई वडील सांगतात की आज पासून आमच्या लेकीचा भार तुमच्या डोक्यावर ठेवलाय. तिला नीट सांभाळा. आणी ह्याला होकार म्हणून ती व्यक्ती तांदूळ उडवते
|
Maitreyee
| |
| Wednesday, July 19, 2006 - 12:58 pm: |
| 
|
हो, तो झाल चा विधी केल्यामुळे सासरच्या लोकांना अगदी actual feeling येते डोक्यावर भार आल्याचे माझ्या लग्नात तर माझ्या सासरच्यांचे या विधीच्या वेळी अगदी रडवेले चेहरे झाल्याचे फ़ोटोमधे स्पष्ट दिसते आहे
|
Savani
| |
| Wednesday, July 19, 2006 - 1:26 pm: |
| 
|
अजून एक म्हण्जे, मुलगी सासरी जायला निघते तेव्हा आंबा शिंपणे. जिथे देवक, गौरिहार मांडलेला असतो तिथे जावई, मुलगी येते. मग मुलिची आई तिची खणा- नारळाने ओटी भरते, लाडूचा डबा देते.(मुलिला माहेरचा खाऊ प्रवासात)आणि मग नवरी मुलगी नवर्याच्या मांडीवर एक पाय देऊन उभी राहते आणि आंब्याच्या पानाने देवावर पाणी शिंपडते. आणि मग तिथे ठेवलेला बाळकृष्ण जावयाने हळूच चोरून खिशात टाकायचा.
|
Savani
| |
| Wednesday, July 19, 2006 - 1:29 pm: |
| 
|
मैत्रेयी LOL . घरी जाऊन झालीचा फोटो परत बघितला पाहिजे
|
Prady
| |
| Wednesday, July 19, 2006 - 1:54 pm: |
| 
|
सावनी मला वाटतं ह्या ओटी मधे मालत्या ( गव्हल्यांचा एक प्रकार) पण असतात. मालत्यांचा significance नाही कळला.
|
Megha16
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:01 pm: |
| 
|
खुप छान आहे हा बीबी याच नाव खरच बदलुन लग्नातल्या गमती जमती थेवल पाहीजे. बी डोक आपटण्याची पद्धत मी पहिल्याद एकली बिचारया त्या नवरीचे हाल. बुद्ध लोकाच लग्न कोणी पाहील का? मी एकदा पाहील होता. त्याच्या मधे लगन झाल्या नतर जेव्हा दुसरया दिवशी नवरा नवरीला आंघोळ घालतात त्या वेळी दोघांना आधी ओल खोबर खायला देतात आणी मग दोघांनी ते एकमेकाच्या अंगावर फवारायच (थुंकायच ). हा प्रकार पाहुन आम्ही तर अचंबित च झालो होतो. कोणी पाहीला आहे का अस?
|
Supermom
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:06 pm: |
| 
|
माझ्या लग्नात सासरी जाताना मला तिकडून खूप सुरेख फ़ुलांचे दागिने आले होते. त्यात आम्हा दोघांसाठी फ़ुलांच्या मुंडावळ्या देखील होत्या.फ़क्त त्या इतक्या मोठ्या बनवल्या गेल्या होत्या की आमच्या दोघांच्याही चेहेर्याला बर्याच अवजड दिसत होत्या. पाठवणीच्या वेळी मी खूपच रडत होते.सर्वांनी मला खूप समजावून पाहिले. अगदी माझ्या जिजाजींनी "तू का रडतेस बेटा,आता तर त्याचे रडायचे दिवस सुरू झालेत." वगैरे म्हणून पण माझे रडणे थांबेचना. तेवढ्यात माझी लहान बहीण खूप हसत बाहेरून आली.काय झाले विचारताच म्हणाली, 'मुलाकडचे म्हणताहेत की उशीर होतोय. खिल्लार्या बैलांची जोडी पाठवा लवकर." हे वाक्य आमच्या दोघांच्या मुंडावळ्यांना उद्देशून होते. मला इतके हसू आले कि बस. नन्तर लक्ष्मीपूजनाच्या वेळीही ते वाक्य आठवून प्रचंड हसू येत होते.
|
Savani
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:07 pm: |
| 
|
मला आठवत नाही हे प्रज्ञा, पण मालत्यानी विहिणीची ओटी भरतात असे मला वाटते.
|
Savani
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:10 pm: |
| 
|
विहिणींची पंगत सुद्धा खाशी असते अगदी. आणि तेव्हा विहिण म्हणतात. ते गाणं किती छान असते ना. माझ्या ८० वर्षांच्या आजीने माझ्या लग्नात विहिण गायली होती. .
|
Megha16
| |
| Wednesday, July 19, 2006 - 3:23 pm: |
| 
|
सुपरमॉम, आमच्या कडे ही आधी फुलाच्या नाही पण कागदाच्या मोठ्या मुडवळ्या बांधायचे. त्या बांधल्यावर नवरा-नवरी ला दिसत च नव्हते. त्याची पण अवस्था बैल गाडीला जुंपण्या सारखी होत असे.
|
Arch
| |
| Wednesday, July 19, 2006 - 7:05 pm: |
| 
|
नवरीच्या भावाने त्याच्या भावोजीच्या मांडीवर बसून चक्क त्याच्या कानाखाली आवाज काढला होता! >> बापरे!काय हसले. झक्कि अगदी बरोबर वर्णन केलत. पण ते bottoms up shots , मुला मुलिला त्यांचे मित्र उचलून नाचतात वगैरे लिहायच राहिल न.
|
Zakki
| |
| Wednesday, July 19, 2006 - 7:32 pm: |
| 
|
अरे हो, ते पण होते. बहुधा त्या वेळेपर्यंत मी झोपलेला असतो!
|
राहुल६, मी काही खोटे लिहिले नाही मी स्वःता बघितले. माझ्या मैत्रिणीचे सासर तेली आहेत नागपुरचे त्यांच्याकडे हा प्रकार असतो. जवळपास साधारण ते mp च्या काही पध्द्ती उचलातात असे वाटते कारन काही लोक हिंदी बोलत होते. देवळात बोकड कापतात कापला सुद्धा आणी ते देवुळ रोजचे देवुल असे न्हवते म्हणे त्यांच्या कुलदेवताचे जिथे असे प्रकार चलातात विचर कोणा नागपुरच्या तेली लोकांची पद्धत ते लोक मुस्लिम लोकांना पण मानतात काय कळतच न्हवते आम्हाला माझ्या मैत्रिणीच्या सगळे त्रासले होते लग्नात पण त्यांचे विचित्र मानापन प्रकार बघुन. काय ते नवर्याला ओवळायचे वेशीवर सासुला ओवाळायचे आणी काय काय..
|
Maudee
| |
| Thursday, July 20, 2006 - 5:05 am: |
| 
|
माझ्या एका मित्राच्या लग्नाला मध्यंतरी मी गेले होते.... तो राजस्थान कडचा कुठलातरी आहे... त्यांच्यात एक मोठा रांगोळीचा गालीचा काढतात चौकोनी. त्यच्या मधोमध नवरी मुलगी पाटावर बसते. आणि मग नवरा तिच्या समोर पण गालिच्याच्या बाहेर उभे राहून तिला बाण मारतो....एक बाण मारल्यावर त्या चौकोनी गालिच्याला एक फ़ेरी. असे एकूण ७ बाण मारयचे... त्याने तरी तो जत्रेत मिळतो ना लहान मुलांचा ख़ेळण्याचा बाण तो घेतला होता... पुर्वी काय करत होते कोण जाणे. आणि गम्मत म्हणजे नवरी goggle लावून बसलेली. डोळ्याना बाण लागू नये म्हणुन. आणख़ी एक म्हणजे त्यांच्यात नवरा नवरीला लाडा लाडी असं म्हणतात. म्हणजे घोषणाच करतात mike वर लाडालाडीला घेऊन या म्हणुन
|
Rahul16
| |
| Thursday, July 20, 2006 - 6:15 am: |
| 
|
baghawe lagel kontya lokanmadhe bokad kaptat.... bare ajun boot choranybaddal koni kase lihile nahi?.. Ya prakarat far manapaman chaltat. Mulikadache awwachay sawwa (10K wagaire) magani karatat. mulakadache det nahi. mag pudhache rusawe fugawe aalech. Mazya lganat mi wegali idea keli. Honarya baykola sangitale ki tuzya sagalya bahinina sang ki jar Boot chorale nahi tar paise milatil, chorale tar kahich milanar nahi. Tymule tynna pan bare zale kahi na karata paise milale aani mala pan (5-10K) dyayachi garaj padali nahi.... . maze boot baykochya bahininnich sambhalale... (dusayra koni choru naye mhanun...nahitar tyanche paise jatil.... ) Ek mala na aawadanari paddat (sagalikade nasate) ti mhanaje mulala aani mulila muhurtachya weli mal ghalatanna unch uchalane jenekarun mal takata yenar nahi. kay vichitra pddat aahe. . aani tyamdhe honarya dukhapati wegalyach. punyamdhe ek prakar pahila. sakshgand sakharpudyala mulichya kapalala 1 rupaya chitakawane. bichari mulgi kay vichitra disate itakya changalya prasangi....
|
वेळेवर लग्न लागणे हे सांभाळ्ण्यासाठी काय काY करावे लागलेय... अगदी गमतीशिर प्रकार आहेत..लग्नात मुलाकडची मंडळी नाचुन वरात मंडपापर्यंत यायला खुप वेळ जातो आणि त्यामुळे पत्रिकेत दिलेल्या वेळेनुसार लग्न लागत नाही पाहुणे मंडळी वैतागतात लांबुन आलेल्या लोकांचे तर फ़ार हाल होतत्त, लग्न उन्हाळ्यात असले तर फ़ारच हाल, आमच्या काही भागत तर १२ च्या मुहुर्ताचे लग्न.. दुपारी तीन ला ही लगलेय बर्याचदा लोक लग्न्काय वेळीवर लागते का म्हणुन उशीराच घरुन निघतात..म्हणुन घरातले लग्न वेळेवरच लागले पाहिजे.. अशा प्रयत्नात माझ्या मावसबहिणिच्या लग्नात मंडली नाचुन थकत्च नव्हती वरात पुढे सरकायलाच तयार नव्हती.. दोन तीनदा सांगुन बघितले उशिर होतोय.. पण कोणी लक्षच देइना.. मुलाकडच्यांना काहीही सांगण म्हणजे अपमान समजला जातो.. मंडली अजुनच जोरात नाचु लागली.. नवरदेवही त्यांना नाचु द्या म्हणु लागला..,मग आजोबांनी नवरदेवाच्या घोड्याचा लगाम हातात धरला.. आणि नाचणार्या मंडळींच्या बाजुने रस्ता काढत घोडा मंडपाच्या दारशी नेउन उभा केला, नवरदेवाला म्हटले... चला मुहुर्ताची वेळ झालिये.. नवरदेव बिचारा बघतच राहिला..,गुपचुप घोड्यावरुन उतरला.. माझ्याही लग्नात हेच झाले... असाच प्रकार होउन पत्रिकेत दिलेल्या वेळेला(मुहुर्ताला) लग्न लागले. गोरज मुहुर्ताचे लग्न आणि उन्हाळायाचे दिवस ४ ते ५००० लोक एव्हढे सांभाळुन लग्न म्हणजे(प्रत्येक मुलीच्या वडीलांची)वडीलांची कसरतच होती.. त्यामुळे इलाज नव्हता.. पण नंतर नवर्याची मित्र मंडळी मला त्या प्रसंगाची बरेच दिवस.. आठवण करुन देत होती..
|
या BB चे नाव बदलले म्हणून पंजाबी लग्नां विषयी लिहिल्या वाचून रहावत नाहीये . पंजाबचे rich colorful culture तिथल्या लग्नं पध्दती , लग्नां मधली पिढ्यान पिढ्या चालत आलेली पारंपारीक गाणी या बद्दल लिहायला घेतले तर एक BB अपुरा पडेल म्हणून 1-2 pre wedding functios बद्दल थोडे ( थोडे नाही जरा जास्तच lengthy होतय खरं )..!!! पंजाबी लोकगीते , मेहेन्दी गीते , भंगडा , गिध्दा , लुड्डी , किकली सगळ्यां मधे जबरी जोश केवळ अशक्य असतो , खरोखर या सगळ्या गोष्टी पंजाबी लोकांच्या दिलदार - खुषमिजास , खेळकर image चेच एक प्रतीक आहे . नाच गाण्यां शिवाय एखदी गोष्ट celebate नाही केली तर ते पंजाबी कसले ? त्यांच्या culture मधे अनेक समारंभ celebrate करण्यासाठी अगणित पारंपारीक गाणी आहेत ' सगन गीत ' वाचून कुठलेही शुभ प्रसंग अधुरे असतात आणि त्यात साथील पंजाबदा ढोल असेल तर सोने पे सुहागा ! त्यांची मेहेन्दी - संगीत समारभां साठी गायली जाणारी लोकप्रिय गाणी कित्त्येक वर्षांपासून गायली जात आहेत . कीतीही Punjabi pop, bhangra rock च्या new entries आल्या तरी मेहेन्दी च्या वेळी घरातल्या सवाश्णीनेईए स्वत : ढोलक घेउन गायलेली पारंपारीक गीते झाल्या शिवाय हा समरंभ पूर्ण होतच नाही . एक बाई ढोअल्क वाजवते तर दुसरी ढोलका च्या कडेला चमच्यानी ताल देते ! मथ्थे ते चमकण वाल लठ्ठे दि चादर सुवे वे चिरे वालेया मेहेन्दी तां सजदी मेहेन्दी नी मेहेन्दी दिलादे मोहे राजा सगनादी मेहेन्दी नि अज कोई जोगी आवे काला शा काला काला डोरीया बारी बन्सी खटक गया सी ही गाणी मेहेन्दी च्या वेळी हमखास गायली जातात . मूळात परंपरा आहे कि नववधूची मेहेन्दी ही सासर कडचे लोक शगुन घेउन येतात त्याबरोबर त्यांनीच द्यायची असते होणार्या सुनेला . भिजवलेली मेहेन्दी एका decorative थाळी मधून छान सजवून आणून द्यायची पध्दतही मूळात पंजाबी culture मधे आहे , आपल्या मराठी लोकां मधे मेहेन्द्नी रंगली कि गमतीने नवर्याचे प्रेम खूप आहे म्हणतात . पण या सासरच्या बायकांनी मेहेन्दी पाठवन्याच्या custom मुळे पंजाबी पोरी मात्र मेहेन्दी गडद झाली तर सासूचे प्रेम भरपूर आहे असे म्हणतात . आज काल सगळ्याच नव वधू professional artists बोलावतात , तरी शगुनाच्या kit मधे सासरकडून आलेली मेहेन्दी शास्त्रापुरती एक dot कुठे तरी लावायची पध्दत आजही बरेच लोक पाळतात . तर आजही काही हौशी सासरवाले ' मेहेन्दीकि थाल ' मस्त सजवून पाठवतात , थाल मधे छोटे tea lights/ पणत्या लावून सासरच्या शगुन घेउन आलेल्या बायका ती थाल turn by turn डोक्यावर घेउन नाचतात , मग दूल्हन ला ओवाळून मेहेन्दीचा शगुन करतात . चूडा भरणे पण वेगळेच असते , दूल्हन ने म्हणे idealy स्वत : च्या लग्नाचा चुडा घालून होई पर्यन्त पहायचा नसतो . दूल्हन ला मामा मामी असतील तर तिला चुडा भरायचा त्यांच्या मान असतो . लग्नाच्या दिवशी त्या red and white चुड्याला ' कलीरे ' बांधतात , कलीरे हे एखाद्या hanging ear ring सारखे , साधारण तीन ते चार इंचा पासून कितीही मोठी बांधता येतात . बरेचदा golden किंवा आज काल दूल्हन च्या लेहेंग्या बरोबर matching कलीरेही मिळतात . कलीरे बांधणे म्हणजे काहींच्या मते नव वधूला संपूर्ण विश्रांती !! एवढे मोठे कलीरे लोंबत असताना आणि हाता वरची लाल भडक मेहेन्दी असताना कोणाची इच्छा होत नाही नव वधूला काही काम सांगायची . हे कलीरे ' डोली ' च्या वेळी दूल्हन एखाद्या विवाहयोग्य करवली च्या डोक्यावर टाकते ( पंजाबी लोक बिदाई रसम ला ' डोली ' म्हणतात , जरी आज काल दूल्हन actual डोली मधे बसून सासरी नाही गेली तरी ) जिच्या डोक्यावर शुभ कलीरे पडतात तिचे म्हणे लवकरच लग्न होते अजुन एक खूप Interesting प्रकार मला इथे होणार्या बर्याच सीख - पंजाबी लग्नां मधे पहायला मिळतो , तो म्हणजे ' जागो '!!' मूळात पंजाबी vilage culture मधे लग्नाच्या आदल्या रात्री ' जागो ' हा अतिशय खुसखुशीत कार्यक्रम रात्र भर करतात . यात लग्न घरातल्या बायका एक decoratve घागर तयार करून त्यात कणकेचे दिवे तुपाच्या वातींनी लावतात . ती डोक्यावर घेउन घरातल्या बायका , नाते वाईक गल्लोगली ' जागो ' ची पारंपारीक गाणी गात फ़िरतात . गाता गाता हा ' जागो कलश ' एकमेकींच्या डोक्यावर देतात . त्या बायका गल्लोगल्ली , अगदी गाव भर फ़िरतात . शेजारी पाजारी आणि गावातील इतर घरां मधल्या बायका त्या ' जागो कलश ' मधे तेल टाकतात , आणि त्याही यात सामील होतात . असे करत करत जागोची वरात मोठी मोठी होत जाते . यात म्हटली जाणारी गाणी ही खट्याळ असतात , नातेवाईकांची थट्टा मस्करी करणे , खुल ए - आम त्यांना नावे ठेवणे अशी या गाण्यांची वात्रट concept असते . बर्याच बायका या वेळी गावातल्या रस्त्यां वर group नी गिध्दा करतात . ' बोलीया ' म्हणण्या साठी एक बाई फ़ेर धरलेल्या बायकांच्या circle च्या मधे येउन तालावर काही चुरचुरीत rap सारखे गद्य म्हणते . या rap ला च ' बोलीया ' म्हणतात . या ' बोलीया ' ही बरेचदा नाते वाईकांचा उध्दार करणार्या , थट्टा करणार्या असतात . इथे US मधेही कित्येक सरदार कुटुंब आस पासच्या street वर रहाणार्या गोर्या लोकां सकट सगळ्यांच्या permission नी ही ' जागो ' रसम करतात , अगदी धमाल असते ! जागो मधे commonly म्हंटले जाणारे गाणे ' शावा वे हुण जागो आयीया ,' असे काहीतरी असते . असो , मझी माहिती US मधे बघितलेल्या अनेक पंजाबी लग्नां वरून आणि पंजाबी friends कडून ऐकलेली आहे , I'm sure अजुन बरेच details, sigificance नक्कीच असतील .. पण एक नक्की पंजाबी लोकां चे pre wedding समारंभही डोळे दीपवून टाकणारे असतात , नुसते Bollywood मधे पाहून feel येणार नाही या गोष्टी actual live पहाणे is an experience!!!
|
Rahul16
| |
| Thursday, July 20, 2006 - 11:17 am: |
| 
|
South india madhe (Tamilnadu)madhe lagnachi mulichi sadi aapalyakadchya pekshya 3 te 4 patine mahag asate. Andra madhe 'Hunda' ha prakar khup aahe. garibatlya garibala sudhya mulichya lagna sathi bharur hunda dhywa lagato.
|
Prady
| |
| Thursday, July 20, 2006 - 1:46 pm: |
| 
|
हो हे खरं आहे. गुल्टींमधे भरपूर हुंडा द्यावा लागतो. माझ्या नवर्याच्या मित्राचं मधे लग्न झालं ८० लाख हुंडा घेऊन. परत मुलगी सावळी म्हणून तो कटकट करत होता तर घरच्यांनी सांगितलं की इतक्या पैशात तिला गोरं करण्यासाठी अमेरिकेतच तुला treatment घेता येइल आणी पैसे उरतील. गुपचुप लग्नाला उभा रहा. आणी झालं देखील लग्न.खरंच किती sick mentality असते ह्या लोकांची. आणी दुसरं म्हणजे कुठून आणतात एवढा पैसा. इथे लग्न करून आलेल्या बर्याच गुल्टी मुली दहावी बारावी च शिकलेल्या असतात पण Dawry takes care of everything .त्यांना स्वत:च्या मात्रुभाषे शिवाय काहिही बोलता येत नाही. इंग्रजी काय हिंदी पण नाही येत. pregnant असल्या की भाषेच्या अडचणी मुळे pregnancy classes ला पण नाही जात. मला वाटतं एकूणच ही community स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. ईथे एका गुल्टी ला मुलगी झाली तर ती दर महिन्याला जाऊन तिच्या साठी सोनं खरेदी करते. अजून मुलगी वर्षाची पण नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|