|
Supermom
| |
| Tuesday, July 18, 2006 - 2:46 pm: |
| 
|
आई ग, केवढे वादविवाद चालू आहेत काही बी बी वर. वाचूनच जीव दमला. मित्रांनो,आपण सारे जरी मराठीच, तरी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहोत.सर्वसाधारण लग्नाची पद्धत जरी एकच असली,तरी काही वेगळ्या चालीरीती,मजेशीर पद्धती प्रत्येक भागात असतात. त्यावर एक बी बी असावा असं वाटलं, म्हणून हा खटाटोप. आमच्या नागपूरकडे मुलीला सासरी पाठवतानाची साडी पांढरी असते.म्हणजे पूर्णपणे नाही, काठपदर रंगीत असतात.पांढर्याशुभ्र साडीला लाल वा हिरवे जरीचे काठ फ़ारच खुलून दिसतात. अन त्यावर सारे फ़ुलांचे दागिने घालून मुलीला पाठवतात. अगदी बिन्दीपासून ते कमरपट्ट्यापर्यन्त. अशा नाजूक फ़ुलांच्या दागिन्यांनी सजलेली वधू फ़ारच गोड दिसते. अन हो, हे दागिने मात्र खास मुलाकडच्यांकडूनच येतात. माझ्या बहिणीचे लग्न पुण्याला झाले तेव्हा तिथली एक नवीन पद्धत कळली.ती म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशीच्या जेवणात कढी भात असायलाच हवा. नागपूरकडे हे सीमान्त पूजनाचे जेवण असतेच,पन त्या मेनूत कढी भात असतोच असे नाही. अशा आणखी काही पद्धती माहिती असल्यास जरूर लिहाव्यात. मॉड,हा बी बी अजून कुठे हलवायचा आहे का?या प्रकारचे लिखाण मला अजून कुठे सापडले नाही म्हणून इथे लिहिलेय.
|
Zakki
| |
| Tuesday, July 18, 2006 - 4:13 pm: |
| 
|
अमेरिकेतील महाराष्ट्रीय लग्न: इथे महाराष्ट्रीय लोकांच्या लग्नात (मग वधू वर दोघेही महाराष्ट्रीय असोत किंवा नसोत), लग्न जास्तीत जास्त एक तास, अगदीच तयारी करून ठेवली नसेल, आयत्या वेळी हव्या त्या गोष्टी सापडल्या नाहीत, तर दीड तासात होते. आदल्या दिवशी मेंदी काढणे हा कार्यक्रम असतो. सीमांत पूजन, देव देवक इ. काही ऐकले नाही कुठे. एक अत्यंत 'महत्वाचा कार्यक्रम असा की लग्न झाल्यावर, एक दोन तास, वधू वर कपडे बदलतात, प्रोफेशनल फोटोग्राफर फोटो काढतो, नि मग एक्-दीड तास कॉकटेल, नि अपेटायझर्स होतात. नि मग हॉल मधे लोक जेवायला बसले, की डीजे एकदम सर्वांना शांत व्हायला सांगून, ड्रम रोल, म्युझिक वगैरे लावतो, नि वधू चे आई वडिल, मग वधू वरांच्या करवल्या नि प्रत्येकीबरोबर एक मुलगा, वराचे आईवडील, असे नाचत नाचत प्रवेश करतात. मग सगळ्यात शेवटी, पुन: एकदा शांतता, डीजे ची अनाउन्समेंट नि जोरदार म्युझिक बरोबर खुद्द वधू वर प्रवेश करतात. मग पहिला डान्स वधू वरांचा. नंतर सगळे जण पंजाबी गाण्यावर वेगवेगळे अंगविक्षेप करतात, अगदी सत्तर वर्षाचे म्हातारे म्हातार्या सुद्धा. त्याला "डान्स' म्हणतात. मग कधीतरी जेवण वाढतात, जेवण होते, जमेल त्याप्रमाणे वधू चे आई वडील सर्वांना भेटून धन्यवाद देतात लग्नाला आल्याबद्दल. नि जेवण झाल्यावर रात्री बारा पर्यंत डान्स चालू असतो, पण हळू हळू एक एक जण जण काढता पाय घेतो. झाले लग्न. हे संपल्यावर वधू वर लगेच पळून जातात. पाठवणी, पाठराखीणि, पांढरी साडी असले काही नाही! सत्यनारायण करायचा असला तरी तो आपला घरच्या घरी! टीप: माझी मुलगी व जावई यांना 'डीजे, डान्स इ.' मुळीच नको आहे. लग्न सुद्धा फक्त घरच्या जवळच्या नातेवाईकांसाठी. मग कॉकटेल नि जेवण नि जा. नंतर सहा दिवसानी लास व्हेगासच्या लग्नात सगळे त्यांचे मित्र जमतील नि हवा तो धिंगाणा घालतील. मोठ्या माणसांचे तिथे काऽहीहि काम नाही. प्रथम नाही आलात तरी चालेल म्हणाले होते, पण आम्हालाच हौस!
|
या bb चे नाव लग्नातल्या गमती जमती असेही असायला हरकत नाही असे वाटते पण एकुणात हा bb पळायला हरकत नाही,सुपर्मोम कल्पना मस्त आहे. झक्किंच्या गमतीदार वर्णनाने सुरवात तर झाली.
|
Storvi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:25 pm: |
| 
|
>>अगदी सत्तर वर्षाचे म्हातारे म्हातार्या सुद्धा>>बापरे प. पु. झक्की पंजाबी गाण्यावर नाचत प्रवेश करताहेत.. ही image डोक्यातुन घालवायला आता मला थेरपिस्ट गाठावा लागणार बहुदा : O झक्की लोभ आहेच.. 
|
Asami
| |
| Tuesday, July 18, 2006 - 9:00 pm: |
| 
|
नंतर सगळे जण पंजाबी गाण्यावर वेगवेगळे अंगविक्षेप करतात>> desi community कोणतिही असो, गाणे नेहमी पंजाबीच असते
|
Zakki
| |
| Tuesday, July 18, 2006 - 10:20 pm: |
| 
|
पंजाबी गाण्यात जोश असतो, नि इथल्या डान्स बरोबर त्या ट्यून्स चांगल्या जातात. बर्याच नॉन्-देशी लोकांना पण ती गाणी आवडतात नि ते मुद्दाम तशी गाणी लावायला सांगतात. storvi , मी 'नाचलो' तर निदान भूकंप तरी होत नाही. आता आरोहीच्या लग्नात तू नाचत प्रवेश केलास तर .. .. . माझे भाग्य असेल तर त्या वेळेपर्यंत मी स्वर्गात रंभा नि उर्वशी यांचे नाच बघत सोमरस पीत बसलो असेन! कदाचित् इंद्राचेहि आसन डळमळेल, थोडेसे तरी!

|
Asami
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:24 am: |
| 
|
storvi , मी 'नाचलो' तर निदान भूकंप तरी होत नाही. आता आरोहीच्या लग्नात तू नाचत प्रवेश केलास तर >> हो ना पंजाबी भांगड्याच्या तालावर शिल्पा भरतनाट्यम करणार
|
Mepunekar
| |
| Wednesday, July 19, 2006 - 3:52 am: |
| 
|
Amchya kade Punyala, lagnachya divshi, Navra mulga ani tyache javalche 10,15 natevaikana sakali Rukhvatache jevan aste(Lagna lagnyaadhi). Mazi ek maitrin Jalgaon chi ahe, tikde ha prakar nasto ase kalle....
|
Bee
| |
| Wednesday, July 19, 2006 - 4:55 am: |
| 
|
विदर्भात, मंगलाष्टक म्हणून झाल्यानंतर वरवधु जेंव्हा आसनावर बसतात त्यावेळी सुलग्न लावायची प्रथा आहे. सुलग्न म्हणजे प्रत्येक जण हातात थोडे तांदूळ घेतो आणि एखादे नाणे. ते तांदूळ आणि नाणे घेऊन दोघांना ओवाळायचे आणि नंतर दोघांचे डोके जोरात एकमेकांना लावायचे. खरच हा प्रकार मला अजिबात पटत नाही. माझ्या बहिणीच्या लग्नात तिचे एकानी इतक्या जोरात डोके लावल्या तिच्या नवर्याशी की तिला छोटे टेंगूळ आले होते आणि मानेला जोरात झटका बसला होता. खरे सुलग्न लावताना अगदी हलक्याच हाताने वरवधुची डोकी जवळ आणायची असतात. अजून एक पद्धत शेवया भरविण्याची. सुलग्न संपले की वरवधु एकमेकांना शेवयाचा घास भरवितात. जर शेवयाच्या ताटाला सव्वा रुपयाचे वडगन नसेल तर नवरा तोवर घास भरवत नाही. रुसुन बसतो. तिसरी पद्धत वर वधुकडच्या देवघरातील देव चोरुन आपल्या देवघरात ठेवतो. मग सासर्याकडुन त्याला काही द्याव लागतो तेंव्हा आपला देव आपल्याला परत मिळत. सगळे लुबडे प्रकार आहे वरांकडचे.
|
Manuswini
| |
| Wednesday, July 19, 2006 - 5:31 am: |
| 
|
विधर्भातील काही पदध्ती म्हणजे मुलिकडील लोकांना त्रास द्यायचा प्रकार ज्यास्त वाटतो मला तरी हे वाक्य एकदम personal घेवु नका लोकहो पण मी माझ्या एका जवळील मैत्रिणीच्या लग्नात एकुण प्रकार बघुन टरकलेच होते लग्न म्हणजे मानापमान ची संधी अश्या विचाराने नवर्याची माणसे hall मधे हजर होतात प्रकार सांगायचा म्हणजे मी ७-८ वर्षापुर्वी india ला गेले असताना हा प्रकार माझ्या मैत्रिणीच्या लग्नात बघितला आम्ही ७-८ friends गम्मत म्हणुन नागपुरला पहायला गेलो होतो लग्न्याच्या आदल्या दिवशी का काय तिथे 'गोंधळ' म्हणुन प्रकार असतो. तिथे चक्क पुरुष साड्या नेसुन काय तरी नाचायचा प्रकार करतात ओरडत्तात वगैरे... अंगात वगैरे येते. म्हणे देव जागवतात. सर्व घरातील एकुण एक पुरुष साड्या नेसुन, बागड्या घालुन, जवळपास स्त्री सारखे सजुन एतके विचित्र दिसतात ना no offense to anybody here but It was new for me so li'l terrified . मग काय ते अक्खा बोकड हो बोकडच घट्दिशी मानेवर घाव घालुन देवळात कापतात. त्याचे रक्त मग प्रसाद मह्णुन वाटतात. आणी टिळा डोक्याला लावतात. मग तो शिजवुन खातात. काही म्हाटारी लोक म्हणे रक्त पितात. मला तो प्रकार पाहुन मळमळ आली. माझी मैत्रिण कोकण्स्थ ब्रह्म्हन मुळची रत्नगिरिची पण मुम्बईत पैदाईश. पण love marriage ना आलिया भोगासी. २) बी, ते डोक आपटायचे पधत सुद्धा एथे बघितली. काही टवाळ लोकं डोक जोरात आपटतात .. :-) बरे काही खास कोकणी पधद्ती १)आमच्याक्डे 'मणीमंगळ्सुत्र' घालायचा प्रकार आहे. तो आम्ही ३ दिवस आधी ४-५ सव्हाश्ण बायका संध्याकाळी पुजा वगैरे करुन .. 'घाणा' भरतात. आणी तो भरताना आई मुलिला माहेरचे मंगळ्सुत्र घालते. २)लग्नाअधी ३ दिवस बाहेर पडत नाही नंतर हे झाल्यावर (आता कोण हे पाळत नाहे म्हणा):-) ३)मुलगी लग्न लागताना माहेरची रेशमी पिवळी साडी नेसुन गळ्यात मणीमंगळ्सुत्र घालुन उभी रहाते. ४) तो घाणा भरल्यावर रोज रात्री लग्न लागेपर्यन्त उशाशी चाकु घेवुन झोपायच देवास ठावुक का ते. माझी बहीन आई काय ते सांगत होती ते blindly करत होती आणी मी गम्मत म्हणुन बघत होते. मी मेरा chance आयेगा तेव्हा विचारेन म्हणतेय :-) ५) मुलिची आई लग्न लागताना hall मधे रहात नाही का ते माहीत नाही even if she is सवाष्ण. ६) बाकी बर्याच काही आहेत. ... ७) पाच परतावणं हा प्रकार असतो जिथे नवर्याकडील लोकांन non-veg dish करुन घालायची. ८) मग काय ते हलद काढणं वगैरे वगैरे..
|
desi community कोणतिही असो, गाणे नेहमी पंजाबीच असते <<<<<<<अर्थातच ! कणेकरांनी add केले पाहिजे लता मंगेशकर - सचिन तेंडुलकर - आयुर्विमा आणि लग्नात पंजबी music ला पर्याय नाही . इथे लोक लग्नाची तारीख जवळ आली कि भंगडा classes लावतात . यात family members आणि american गोरेही असतात . मेहेन्दी , संगीत किंवा लग्नाच्या dance party मधे जरा जास्त charm टाकायला असेल तर DJ-music बरोबर 3-4 live ढोलक वाजवणारे पंजाबी artist ही बोलावतात . एका मराठी लग्नात DJ नी जुनी आणि पारंपारीक मंगळागौरीची मराठी गाणीही add केली होती . चुडा भरणे समारंभ जरा western पध्दतीचा असतो . संगीत आणि काॅकटेल पार्टीला आलेल्या बायकांसाठी एका टेबलावर हिरवा चुडा आणि लग्नाच्या गाण्यांची CD एका सुशोभित बटव्यात मांडून ठेवलेल्या असतात . ज्यांना हवे असेल ते हे बटवे उचलतात .
|
ही पद्धत इतरत्र आहे की नाही माहीत नाही पण सांगली कोल्हापूराकडे आहे. लग्नात मुलीच्या भावाने तिच्या नवर्याचा कान धरून पिळायचा. मग तिचा नवरा याला आहेर करतो. (हा घे बाबा पण माझा कान सोड!) पूर्वी एकदा माझ्या आतेबहिणीच्या मैत्रिणीच्या (बहुदा मारवाडी आहेत ते)लग्नाला मी गेलो तेव्हा त्यांच्यात नवरीच्या भावाने त्याच्या भावोजीच्या मांडीवर बसून चक्क त्याच्या कानाखाली आवाज काढला होता! अशीच रीत आहे म्हणे! (सॉरी महाराष्ट्रीय लग्नाचा BB आहे पण मी लिहिलेल्याशी similar वाटले म्हणून लिहिले.)
|
Bee
| |
| Wednesday, July 19, 2006 - 7:53 am: |
| 
|
नाही मनु मी हा साड्या नेसन्याचा प्रकार कधीच बघितला नाही. तो काही ठिकाणी असेल पण संपूर्ण विदर्भात तशी पद्धत नाही. अजून एक पद्धत. लग्न झाल्यानंतर दुसर्या किंवा तिसर्या दिवशी जेंव्हा मुलीचा भाऊ मुलीला आणायला जातो त्यावेळी सोबत परतपाटी घेऊन जावी लागते. तो प्रकार मला सर्वात अधिक आवडला. परतपाटीमध्ये मुलाकडच्या सर्व वर्हाड कंपनीचा विचार करून शृंगाराचे साहित्य घेऊन जावे लागते. ती एक makeup kit च असते. मग त्यात लहानांपासून थोरांपर्यंत सर्व जण सजतात आणि धुळवळ खेळतात. ते झाले की मग सासरकडून मुलीची बिदाई माहेरी होते. तेंव्हा नवरीन रडत नाही तर हसते कारण ती माहेरी निघालेली असते. आणि जर ह्या परतपाटीमध्ये काही कमी पडले तर सासू नंदा जावा जेठ चुलत सासू, आजद सासू सगळे जण तिथेच अगदी सुनेला टोचून बोलतात, टोमणे देतात.
|
हो हो आमच्याकडे पण अशी पद्धत आहे की, लग्नातली पहिली मंगलाष्टका वधुवरांच्या आईवडलांनी ऐकायची नसते. हे एक माझ्यासाठी कुतूहल आहे. माहीतंय काय कुणाला? (पहिली मंगलाष्टका.. काही तरी चुकतेय वाटते... मंगलाष्टकातला पहिला श्लोक जास्त बरोबर वाटेल. )
|
Bee
| |
| Wednesday, July 19, 2006 - 8:44 am: |
| 
|
मंगलाष्टकातील पहिले कडवे म्हणू शकतोस गजानन..
|
ही पद्धत इतरत्र आहे की नाही माहीत नाही पण सांगली कोल्हापूराकडे आहे. लग्नात मुलीच्या भावाने तिच्या नवर्याचा कान धरून पिळायचा. मग तिचा नवरा याला आहेर करतो. (हा घे बाबा पण माझा कान सोड!) >>>>>>>>>>.गजानन बरोबर आहे मी पण सातारचा आहे पण ही पध्द्त बरेच ठिकाणी आहे even पुण्यात पण आहे. त्याला कानपिळीचा विधी म्हणतात. एकंदरीत माझ्या माहीतीनुसार खालील विधी लग्नात आमच्याकडे असतात १. वाड़अनिश्चय आदल्या दिवशी २. सिमांत पुजन do ---- ३. हळद लावणे दुसर्या दिवशी ४.घाणा भरणे ५. देवक बसवणे ६. actual लग्न म्हणजे मंगलाष्टका ७. लज्जा होम ८ सप्तपदी ९. लक्ष्मीपुजन काहि राहीले असल्यास add करणे
|
Rahul16
| |
| Wednesday, July 19, 2006 - 10:57 am: |
| 
|
Manuswini...tu rakt aani kapakapi kuthe aani kuna kade pahilis kunas thauk. Mi pan he pahilyanadch ekat aahe. itake lagna attend kele tari ashi paddat kadhi pahili nahi. aani koni ya baddal sangitale pan nahi. Lagna konachehi aso. tyat kunacha jiw ka ghyayacha. kanpilani vidarbhat pan asate.
|
Maudee
| |
| Wednesday, July 19, 2006 - 11:42 am: |
| 
|
कानपिळणीला मला माहिती असलेला अर्थ असा - भावाने बहिणीच्या नवर्याला कान पिळून सांगायचे की माझी बहीण तुला देत आहे तिचा नीट सांभाळ कर म्हणुन मला तरी ही पध्हत फ़ार आवडते. पुर्वीच्या लग्नांचे म्हणजे आपल्या आधीच्या पिढीच्या लग्नाचे जर फोटो जर बघितले तर कानपिळीच्या फोटोतच फ़क्त वधू ख़ळख़ळून(ख़र तर दात काढून) हसताना दिसते.
|
मला तरी ही पध्हत फ़ार आवडते. >>>>> अग मुडी काय आवडते ? माझ्या लग्नात माझ्या मेव्हण्याने एवढ्या जोरात कान पिळ्ला की नंतर २ दिवस दुखत होता !!!
|
Moodi
| |
| Wednesday, July 19, 2006 - 12:04 pm: |
| 
|
अरे मंगेश मूडी मी आहे, ती माऊडी आहे रे.. 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|