|
Bee
| |
| Monday, July 03, 2006 - 7:01 am: |
| 
|
First year नंतर Ragging चे दिवस संपले तेंव्हा वाटायचे की आता कुठे आपली कुणी ragging घ्यावी. त्यावेळी मुद्दाम तेच seniors आता तुम्ही seniors झालात तेंव्हा वाकून wish करायचे. सुरवातीला ragging ची इतकी धास्ती वाटायची की त्या पायी college मध्ये जावेसे वाटत नव्हते. माझ्या room च्या बाजूला senior students चा घोळकाच होता. सकाळी उठून टपरीवर चहा प्यायला जाताना त्यांची पहिली भेट व्हायची, तिथे दिवसातली पहिली ragging , मग त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या assignments लिहिने, drawing sheets काढून देणे, कधी त्यांच्याकडून topo कसा मारायचा हे शिकून घेणे आणि मग दुसर्यांची drawing sheet topo काढून देणे. संध्याकाळी घरी परत येताना drawing board सोबत असले की sr ओळखायची mini drawing board म्हणजे FY ची जनता. मग त्यांच्या तावडीत सापडलो की रात्रा बारा बारा वाजेपर्यंत सुटका नसायची. त्यांच्याचकडे मन मारून जेवन करणे, त्यांच्या कधीही न विचार केलेल्या प्रश्नांची बेशरमपणे उत्तर देणे हे अगदी कठिण जात असे. ragging चा अतिरेक कसा होतो त्याचा हा एक किस्सा.. एकदा आम्ही weekend ला घरी ट्रेननी चाललो होतो. train मध्ये काही second year students भेटलेत. त्यांची मर्जी होती की आम्ही 'आग लागली इथून पळा' असे सर्व ट्रेनभर ओरडायचे. हे तसे कुणालाच पटले नाही पण senior पुढे नाही म्हणता आले नाही. शेवटी आम्ही ८ १० जनांनी एकत्र ओरडायला सुरवात केली आग लागली पळा पळा.. आणि हे ऐकूण एका बाईनी खाळकन चैन ओढली आणि आम्हा सर्वांना दंड करण्यात आला. पण नंतर त्या ragging घेण्यार्यांनी सर्वांचे पैसे परत केलेत. बर्याचदा असे व्हायचे की कोण मुले आमच्या college मधील आणि कोण समोरच्या arts/commerce मधील हे उमगेना आणि कधीकधी तिच मुले ragging घेत.
|
Maudee
| |
| Monday, July 03, 2006 - 9:51 am: |
| 
|
मी एक ragging चा किस्सा ऐकलाय......कुठल्यातरी hostel मध्ये juniors ना bathroom मध्ये कोंडत असत आणि बरोबर एक lifeboy ची वडी.....तेवढा साबण संपवल्याशिवाय बाहेर यायचं नाही.
|
Senior barch नी आमच्या सगळयांची cinema ची तिकीटे काढली, आणि सगळयांना पडद्याकडे पाठ करून बसवले आम्हाला फ़क्त cinema चे dialogues ऐकू येत होते. आणि मधून मधून विचारपूस केली जात होती " cinema कसा वाटतोय? किंवा आवडतोय का?"
|
mala amachya college madhala iik kissa aathawato. Amhi teva second year madhye hoto and amache juniors nukatech college madhye ale hote. aami sagalyanni milun tyachi ragging ghyayachi tharali. ani amhi 2 jananna without rackets and table, table tennis khelayala sangitala. plus khetanna ball cha honara TOK TOK asa awaj tondane karayala sangitala, jaam maja ali hoti te pahatanna. Of course nantar amhala sagalyanna shiksha zali to bhag wegala...
|
Dakshina
| |
| Wednesday, January 23, 2008 - 1:47 pm: |
| 
|
हा बी.बी. आज पाहीला, आम्ही NCC च्या Camp ला जायचो तेव्हा आम्हाला सिनियर्स छोटे चमचे द्यायचे, आणि बादली भरायला लावायचे. शिवाय, पारले जी चे ६ पुडे एकदम उघडून खायला लावायच्या. ६ बंद पुडे कमी वाटतात, पण उघडून नुसती बिस्किटं खूप दिसतात आणि खाताना टेन्शन यायचं.
|
Supermom
| |
| Wednesday, January 23, 2008 - 8:46 pm: |
| 
|
रॅगिंग नावाने खूप आठवणी जिवन्त झाल्या. माझे केस तेव्हा खूप लांब नि सुन्दर होते.(रम्य तो भूतकाळ...) मला एकदम सगळ्या सिनियर्स मुलामुलींनी घेरलं. केसांना कोणतं तेल लावतेस असं पुन्हा पुन्हा मोठ्या आवाजात विचारत होते. माझी पाचावर धारण बसलेली. मी थरथर कापत 'असं काही नाही. कोणतंही तेल लावते' म्हटलं. यावर एका मुलाचा आवाज आला, 'केरोसीन दिलं तर चालेल का?' मला अगदी रडायला आलेलं. आता मागे वळून पाहिलं की हसू येतं. खरं तर मी तशी बरीच धीट आहे पण ते वातावरण, ते दिवसच वेगळे असतात. माझ्या भावाच्या होस्टेलवर एका मुलाला सिनियर्सनी बनियन, पैजामा, पैजाम्यावर चड्डी घालायला लावून,पाठीवर टॉवेल लावून, सुपरमॅन, सुपरमॅन ...' ओरडत सगळीकडे धावायला लावलं होतं...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|