Rmd
| |
| Tuesday, May 16, 2006 - 7:23 am: |
| 
|
madira chhaye? mug te gana nakkich HH sathi banavala asel!
|
Rucha285
| |
| Thursday, May 18, 2006 - 6:28 pm: |
| 
|
अहो Mumbhai , ते I'm rebel नाही Be a Rebel आहे.
|
Mumbhai
| |
| Friday, May 19, 2006 - 5:16 am: |
| 
|
तसं न्हाई ... ते गाण वेगळ आहे ..इथे बघा ... Original As In Movie and हे तुम्ही म्हणताय ते
|
Zakki
| |
| Friday, May 19, 2006 - 10:36 pm: |
| 
|
उडे जब जब जुल्फे तेरी या गाण्यात सारखे जिंद मरिये असे म्हणतात. त्याचा अर्थ काय? मला वाटत होते की काहीतरी 'मुडदा बशिवला' म्हणतात तशी प्रेमाने दिलेली शिवी असेल. पण बरेचदा (१५ वेळा) गाणे ऐकल्यावर तसे वाटत नाही.
|
ते 'जिंद मरिये' नसून 'जिंद मेरिये' म्हणजे 'माझ्या जिवा' आहे. (जीव की प्राण असलेला तो 'प्राणी').. K3G मध्ये नाही का?... "तू ही मेरी जिंद, मेरी जान रे...." (हाय शावा शावा)... उगम= ज़िंदगी शब्द तोडून गायल्यामुळे होणार्या अनर्थांचं अजून एक उदाहरण... गणपतीबाप्पाच्या आरतीत घोड्याच्या तोंडाला बांधायचा तोबरा कुठून आला हे मला कळेना (तेव्हा वय वर्षे १०). आरतीची छापील प्रत वाचल्यावर लक्षात आलं की ते "शोभ तोबरा" नसून "शोभतो बरा" आहे!!!! )
|
Zakki
| |
| Sunday, May 21, 2006 - 2:58 pm: |
| 
|
योगेश, धन्यवाद. आता, K3G म्हणजे काय? नि 'हाय शावा शावा' हा सिनेमा असेल तर तोहि मी पाहिला नाही. किंवा असेलहि, पण हिंदी सिनेमांच्या बाबतीत, पाहिला तरी कळत नाही नि लक्षात रहात नाही. पण अर्थ नक्की कळला. धन्यवाद. 'शोभ तोबरा'! ह. ह. पु.वा.!
|
Arun
| |
| Monday, May 22, 2006 - 4:32 am: |
| 
|
झक्की : K3G हा कभी खुशी कभी गम या चित्रपटाच्या नावाचा short form आहे ...............
|
मला वाटतं 'ह. ह. पु.वा' सुद्धा 'मला चुकीचं एकू आल्याचं' 'kind of' एक उदाहरण आहे, कारण 'पुरेवाट' हा एक सलग एकसंध शब्द आहे. असो. मी चुकीचे interpret केलेले शब्द हा सुद्धा एका bb च विषय बनू शकतील. Choreographer सुबल सरकार एका मराठी गाणं बसवताना त्यातील 'माझ्या झाडावरती चढू नका' ह्या ओळीवर गवत उचलल्याची action करत होते. दिग्दर्शकाने त्यांना ह्यासंदर्भात विचारलं तर त्यांनीच उलट विचारलं "वो कहता है ना, 'झाडावरती चरू नका' ?" मी सुद्धा लहानपणी 'परदेसिया यह सच है पिया' एकून विचार करायचो, "ती आपल्या boyfriend साठी गातांना मधूनच 'पडदे शिवायचं' का म्हणत आहे?"
|
Shanky
| |
| Friday, May 26, 2006 - 11:18 pm: |
| 
|
maza ek mita ek june marathi gaane ase mhanaaycha "Ranga phulancha gela saangun tuze aani maze zale nidhan" Aamhi aikun mhatle ki bahutek dhagat basun gaat astil 
|
Moodi
| |
| Sunday, June 04, 2006 - 8:59 pm: |
| 
|
हे हिमेशचे गाणे मला कायम डान्स दिखलाजा असे ऐकु यायचे. आता बघा काय त्या गाण्याचे हाल झालेत ते. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1612641.cms 
|
Raina
| |
| Wednesday, June 07, 2006 - 3:40 am: |
| 
|
हा BB मी आत्ता पाहीला- आणि इतकी हसले की Office मधे अनावस्था प्रसंग नको म्हणून Restroom मधे जाउन चोरुन हसायची वेळ आली. :-)))) ही मी चुकीची ऐकलेली गाणी- अरे अरे ज्ञाना झाला सीपावन (सीपावन म्हणजे काय बरे असेल ?) ते खरं तर ""झालासी पावन "" आहे.... मानसीचा चित्रकार तो तुझे मी नंतर चित्र काढतो (ते "निरंतर चित्र काढतो" आहे- हे मला अनेक वर्षांनी कळले..
|
Junnu
| |
| Wednesday, June 07, 2006 - 8:45 pm: |
| 
|
मानसीचा चित्रकार तो तुझे मी नंतर चित्र काढतो >> 
|
Aashu29
| |
| Sunday, June 11, 2006 - 4:04 pm: |
| 
|
te paakizaa tale gane aahena yuhi koi mil gayaa hai sare raah chalate chalate tar mi engineering sampeparyant mhanat hote saDeraal chalte chalte nantar mazyaa eka maitrinine sangitli maazi chuuk }
|
Dhani
| |
| Friday, June 16, 2006 - 6:10 am: |
| 
|
munnabhai MBBS मधले 'देखले आंखो मे..' गाण्यात जी गम का प्यारे गम मत करना हि ओळ मला आतापर्यंत गम का प्यारे गम्मत करना अशी आहे असे वाट्त होते..
|
hello हि माझी इथली पहीली भेट आहे मि लहान असताना चाफ़ा बोलेना च्या ऐवजी काका बोलेना आणि तुझ्या गळा माझ्या गळा गुम्फ़ू मोत्याच्या माळा च्या ऐवजी भू भू मोत्याच्या माळा असे म्हनायचे(लॉजिक असे की चाफ़ा कधी बोलतो का आणि मोति म्हनजे कुत्रा)
|
लहान असताना मी 'रोते हुए आते है सब हसता हुआ जो जायेगा' ला ओशेतुमे आशेतुमा रस्ता हुआ रो जायेगा असे म्हनायचे चालीत म्हणून बघा
|
Maudee
| |
| Tuesday, June 27, 2006 - 12:00 pm: |
| 
|
राधा logic लक्षात घेतल्यावर तर hhpv
|
Radha_gd1
| |
| Wednesday, June 28, 2006 - 6:18 am: |
| 
|
कहदो के तुम हो मेरी वरना,जीना नही मुझे है मरना, हे तेज़ाब मधल्या गाण्यात तो 'हो मेरी' ला 'मे' नन्तर अस पॉज घेतो कि मला ते' कहदो के तुम हो मे रीवरना' असे ऐकू यायचे.मि माझ्या ताईला विचारले होते की रीवरना म्हणजे काय?
|
Radha_gd1
| |
| Wednesday, June 28, 2006 - 6:22 am: |
| 
|
आणि माझा मुलगा आता,'आ आ आशिके मे तेरी जा जा जायेगी जान मेरी ' ला 'आ आ आशिके मे तेरी जा जा तॉमेमी तॉमेमी' असे म्हनतो
|
Radha_gd1
| |
| Wednesday, June 28, 2006 - 7:07 am: |
| 
|
एक हिन्दी गाणे-- तन मन धन तो पे वारू' हे मला तन मन धन 'टोपे' वारु असे वाटायचे कारण तेंव्हा शाळेत धडा होता तात्या टोपेंचा त्यात होते कि त्यांनी तन मन धन देशाला अर्पण केले
|