|
Gs1
| |
| Monday, June 26, 2006 - 2:11 pm: |
|
|
मल्हारगड हा महाराष्ट्रात बांधला गेलेला शेवटचा किल्ला. पेशव्यांनी बांधलेला. ईथे जाणेही तसे सोपे आहे. रविवारी २५ जूनला सौमित्र, कूल, गिरी, मी आणि दीपस्तंभने पाठवलेली शर्ली नावाची त्याची मलेशियन सहकारी असे पाच जण साडेसहाला निघालो. हडपसरनंतर सासवडकडे जाणारा दिवेघाट चढुन गेलो. घाटात एक मस्त धबधबा कोसळत होता. सासवडच्या अलिकडेच डाव्या हाताला रस्ता एक फाटा दिवे गावाकडे जातो, त्याआधीच्या झेंडेवाडीकडुनसुद्धा वाट आहे. पण आम्ही दिवे मार्गे सोनोरी या गावाला पक्क्या रस्त्याने येऊन पोहोचलो. पानिपतच्या युद्धात आपल्या तोफखान्याने शौर्य गाजवणार्या पानसेंचे हे गाव. त्यांचा मोठा वाडा पाहिला आणि किल्ल्याच्या पायथ्याकडे चालू पडलो. वीस मिनिटात पायथा गाठला आणि किल्ल्याची बर्यापैकी शाबूत असलेली तटबंदी डोळ्यात भरली. किल्ला मात्र काहीच ऊंच नव्हता. दाराकडे जाणारी वाट वळसा घालत सावकाश उत्तरेच्या दाराकडे चढत गेली होती. आम्ही मात्र सरळ उभे वर चढायला सुरूवात केली आणि अर्ध्या तासात तटाला पडलेल्या खिंडारातून गडावर दाखल झालो. गडावरून एका बाजूला सासवड दिसते तर दुसरीकडे खाली म्हातोबाची आळंदी. गडावर दोन देवळे आहेत. पाण्याची कुंडे आहेत आणि दोन दरवाजेही आहेत. तिकडेच न्याहारी करून मुख्य रस्त्याने खाली उतरलो. वेळ होता म्हणून दिवेघाटावर लक्ष ठेवून असलेल्या कानिफनाथाला गेलो. तिथे एका जेमतेम ९ बाय ९ इंचाच्या खिंडारातून शरीर पुढे ढकलत सरपटत गाभार्यात जाण्याचा प्रयोग केला.मी जवळ जवळ अडकलोच होतो. पण कसाबसा गेलो. कानिफनाथाहून मात्र पुण्याचे छान दृश्य दिसते. शिवाय एका बाजूला पुरंदर - वज्रगड तर त्याच्या बाजूला कात्रजपर्यंत गेलेल्या टेकड्याही दिसतात. कात्रज कानिफनाथ वा दिवेघाट कानिफनाथ असाही ट्रेक करता येईल. विशेषत : धो धो पाऊस पडत असतांना कात्रजहून डावीकडे पुणे बघत बघत टेकड्यांवरून यायला मजा येईल. परत येतांना दिवेघाटातला तो धबधबा दिसला मग यथेच्छ अभिषेक करून घेतला. आमचे बघुन इतरही लोक घाटात थांबायला लागले. एकुण अगदीच छोटा ट्रेक. दोन वाजता पुण्यात परतलो सुद्धा. सर्वांनीच कॅमेरे आणल्याने फोटो मात्र बरेच काढले गेले. गिरी टाकेलच.
|
Jo_s
| |
| Tuesday, June 27, 2006 - 10:54 am: |
|
|
gs मस्तच लिहीलयस नेहमी प्रमाणेच. आता गिरीच्या फोटोची वाट पहातोय. बरय बाबा भटकत असता मस्त.
|
Aj_onnet
| |
| Tuesday, June 27, 2006 - 12:12 pm: |
|
|
गोविंद, सहीच! प्रत्येक शनिवार रविवार, निसर्गाच्या सानिध्यात! मजा आहे तुझी. शनिवारी सातार्याला जाताना कात्रज घाट बंद झाल्याने आमची बस पण सासवड मार्गे गेली. तेन्व्हा हा कानिफनाथाचा डोंगर सारखा डोळ्यासमोर येत होता. मस्त हिरवागार आहे हा परीसर. पुढे पुरंदर तर इतका पावसात अन धुक्यात नाहताना दिसला की गाडीतून उतरून एक trek करूनच पुढे जावेसे वाटत होते. फोटो लवकर येवू देत!
|
Gs1
| |
| Wednesday, July 05, 2006 - 12:10 pm: |
|
|
सुधीर, पुण्यात असतोस का तू ? असशील तर हो सामील आम्हाला. अजय, आता तू जोडीनेच यायला हरकत नाही आम्च्याबरोबर.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|