|
Sunidhee
| |
| Wednesday, April 26, 2006 - 7:50 pm: |
| 
|
पेन्ढ्या चा किस्सा वाचुन जाम म्हणजे लयीच हसू आल. आता हा किस्सा, ऐकलेला.. खरा की खोटा काय की.. शाळेत हिन्दि च्या मास्तरानि निबन्धाचा विशय दिला ' नदी के किनारे एक घन्टा ' ... आणी एका मुलानी अशी सुरुवात केलि, - सुबह हो गयी थी, लोग उठ गये थे... और उस वक्त नदी के किनारे एक घन्टा बज रही थी... टण टण टण
|
Mrinmayee
| |
| Wednesday, April 26, 2006 - 8:50 pm: |
| 
|
हा किस्सा रामटेकला आमच्यासमोर घडलेला. ३-४ आज्यांचा एक group आपली नातवंड घेऊन आला होता. मुलं water bottle मधलं पाणी पिऊन चुळा भरत होती आणि तेच पाणि तोंडातून एकमेकांच्या अंगावर उडवत होती. शेजारी एक पंडितजी आणि यजमान कसलीशी पूजा करत होते. पोरांचं पाणी उडवणं बघून पंडितजी आज्यांना म्हणाले, "अपने बच्चोसे कहो की वो अपना कुल्ला (म्हणजे गुळणी) उधर करे, इस तरफ नही. हम पूजा कर रहे है". ह्यावर एक आजी उत्तरल्या, "हमारे बच्चोके कुल्लेसे भटजी, तुम्हे क्यो इतनी परेशानी, सब चड्डी पहेने है"! तो बाबा बिचारा खजील! वर ह्या आजी इतर आजांना म्हणतात, "पाहीलं, पूजेत लक्ष नाही भटजी बुवाचं"!
|
Mrinmayee
| |
| Wednesday, April 26, 2006 - 9:53 pm: |
| 
|
आर्च, दिव्या तुम्हाला वाचूनच हसू आलं. आम्ही तिथे हजर होतो, आता कल्पना करा. बरं, चोंम्डेपणा तरी कसा करणार "अहो आजी कुल्ला म्हणजे गुळणी म्हणताहेत ते!" असं सांगायचा? कारण आजी जरा रुसलेल्या आणि भटजीबुवा नाराज!
|
Suniti_in
| |
| Wednesday, April 26, 2006 - 10:10 pm: |
| 
|
माझ्या नव-याच्या मित्राची आजी. तिचा हा गावाकडचा किस्सा. एक टोपली विकणारा दारासमोर आला. तो हिंदी बोलणारा होता. थोडी घासाघासी झाली आणि भैया म्हणाला "लेना है क्या?" यावर आजीबाई म्हणाल्या, "हम घेंगे तो घेंगे नही तो नही भी घेंगे" एका लहान मुलाचा किस्सा. खानदेशात आईला माय म्हणतात. एक फकीर त्या मुलाच्या दारासमोर आला आणि म्हणाला " दानापानी मिलेगा क्या बेटे?" मुलगा -" मुसकी माय घरमें नही तो तुसको कोन दाना देंगा?"
|
Kandapohe
| |
| Thursday, April 27, 2006 - 1:34 am: |
| 
|
मृण्मयी!! नुकतेच कणेकरांच्या एका पुस्तकात वाचलेला हिंदी संवाद `घर मै माजी है|` `यहां माजी कोइ नही, बहेनजी हई` पत्नीचे फणकार्यात उत्तर. `बहेनजी, आप साबुन कौनसा इस्तेमाल करती हो?` `मेरेकू ईंपोर्टेड पिअर्स पसंद है, लेकिन परवडता किसको है? ये कवडीचुंबक का घर है` `तो आपका परिवार कौनसा साबुन इस्तेमाल करता है?` `परीवार तो घरके मालिक जैसाही बेशरम है. तीन दिन से मै घसा खरवडके चिल्ला रही हुं के साबुन संपा है, लेकिन किसीको ढीम्म नही है. महागलीच्छ परीवार है. मेरे माहेरकू हर आदमी का वेगळा वेगळा साबुन था. एक दिन चुकीसे मेरी माँने टायगर का साबुन लिया तो भडक के मेरे पिताने पूरी साबुनकी वडी गिळी थी. उससे उनका आतडा स्वच्छ हुआ. इतने स्वच्छ परिवारसे मै इस गलिच्छ परिवार मे आ गयी क्यों के मेरा नशीब फ़ुटका था...` `तीन दिनसे पहेले आप कौनसा साबुन इस्तेमाल करती थी?` `ये कार्यक्रम करने बाहरगाव गये थे ना, वहां के हॉटेलसे चुराके लेके आये वही छोटी वडी इस्तेमाल करते थे. इनका की नाई नवस है के साबू विकत आणनेका नही, हॉटेलसे चोरनेका........ गडाबडा लोळलो मी.
|
Mrdmahesh
| |
| Thursday, April 27, 2006 - 6:39 am: |
| 
|
मी F.C. रोडवरच्या टेलिफोन बूथवर गेलो होतो. तिथे २ U.P. वाले भैय्ये तिथल्या operator शी बिलावरून भांडत होते. bill जास्त आले आहे हे त्यांचं म्हणणं. ती म्हणत होती तुमच्या pulse rate प्रमाणे bill आले आहे pulse rate जास्त आहे. असे म्हणून तिने त्यांना ते गणित समजवून सांगताना असे म्हणले "अब तुम्हारे total time को ये pulse rate से भगाओ." (तिला म्हणायचे होते pulse rate ने भागाकार करा.)
|
आत्ताच घडलेला विनोद्: आमच्याकडे एक छोटी party झाली. मी नाही जाउ शकलो. Colleague ला वीचारले: काय होते खायला? Colleague : Dont worry तेरे वाट का खाया मै.
|
माझा एक U.P. वाला रूममेट नवीन कपडे घालून फिरायला निघाला त्याला वाटेत आमच्याच बिल्डिंग मधला आणखी एक मराठी मुलगा भेटला. तर ह्या मराठी मुलाने त्याला प्रश्न केला: अबे तू नवे कपडे घालकर कुणीकडे हिंडरा? (नवे कपडे घालून तू कुठे हिंडतोय?). त्या U.P. वाल्या मुलाचा चेहरा एकदम blank झाला.
|
माझा हा U.P. वाला रूममेट (त्याला आम्ही भैया म्हणायचो) आणि शेजारच्याच रूम मध्ये रहाणारा विजय यांची चांगली जुगलबंदी चालायची. अशीच एक्: भैया: आज मेसवाली ने क्या खिलाया था यार...मुंह के taste की पूरी वाट लगा दी. वो क्या था white..white सा कटोरी में? विजय्: उसको कढी कहते है... भैया: (?? चेहरा....) विजय्: अरे कढी मतलब वो ताक रहता है ना...ताक... भैया: ताक...(?? चेहरा.... continues.. ) विजय्: अरे वो दही रहता है ना...उसको घुसळ घुसळ के बनाते है...( action करून दाखवतो). भैया: छांछ विजय्: हां हां छांछ.... भैया: तो ऐसे बोलो ना यार....तो उसको क्या करते है? विजय्: उसको फोडणी देते है. भैया: (परत चेहरा....) विजय्: अरे उस दिन तू नही बोला क्या...वो कढाई में खूप तेल डाला है वो बंदे ने..तब वो बंदा जो कर रहा था ना उसको फोडणी बोलते है. भैया: अरे तो तडका बोलो ना... विजय्: हां तडका...(नवीन शब्द कळाल्याचा आविर्भाव) भैया: हां तो छांछ को तडका देते है... विजय्: हां वही.. भैया: तो ऐसे बोलोना सीधे सीधे.... विजय: (लक्ष दुसरी कडे.....)
|
Psg
| |
| Friday, April 28, 2006 - 11:29 am: |
| 
|
मी हा किस्सा एका मासिकात वाचला आहे.. मराठी कुटुंबाची मध्य प्रदेशातल्या गावात बदली झाली. बाई ला हिंदी येत नव्हते, पण शेजारणींशी बोलायची हौस. शेजारणीनी विचारल: दोपहर मे क्या करती हो? उत्तर: घर का काम होगया ना, तो थोडा "गिरती" हूंॅ!!! -हे दुपारी थोड "पडते" च शब्दश: translation ! शेजारीण: क्या? गिरती हो? उत्तर्: हां उस्मै क्या है? हमारे गाव्मे रोज ही हम सब बाई लोग दोपहर को थोडा थोडा "गिरते" है!!!!!!! हे वाचून मीही हसून हसून "गिरले" होते!!!
|
Dineshvs
| |
| Friday, April 28, 2006 - 4:44 pm: |
| 
|
मृणमयी, महेश, Psg छान करमणुक झाली. टिव्हीवर पाककला दाखवणारी बाई जर हिंदी भाषिक नसली तर हटकुन, नमक अंदाज से, असे म्हणते. माझी शेजारीण म्हणायची, अरे नमक डालनेकाभी कोई अंदाज होता है क्या ?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|