Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कर्कवृत्त

Hitguj » My Experience » कर्कवृत्त « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 19, 200620 04-20-06  3:40 am

Giriraj
Thursday, April 20, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखे,काकूंना भेटायला नक्कीच आवडेल!धैर्य मूर्तरुपात पहायला मिळेल आम्हाला!

Maudee
Thursday, April 20, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanx for sharing this with us

Rupali_rahul
Thursday, April 20, 2006 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काकु खरच खुप GR8 आहेत त्या. एवढे सगळे हसतमुखाने निभावुन नेले. त्या काकुंना माझा सलाम सांग.

Mekhla
Thursday, April 20, 2006 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी, छान लिहिलयस.
खूप आठवणी जाग्या झाल्या.
त्या बर्‍या झाल्या पूर्णपणे हे वाचून खरच आनंद झाला.

बाकी तुझं काय चाललय सध्या?


Punyanagarikar
Thursday, April 20, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखीप्रिया, वाचुन काकुंचं फ़ार कौतुक वाटतं आहे.

Dineshvs
Friday, April 21, 2006 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखीप्रिया, छान लेखन.
केमोथेरपीचा त्रास काय असतो ते असं कुणाला सांगुन समजणार नाही.
अनेक पेशंट्स या जीवघेण्या यातना सहन करतात, तेंव्हा त्यांच्या जीवनेच्छेला सलाम करावासा वाटतो.


Hems
Friday, April 21, 2006 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी , हा लेख वाचायची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार तुझे.
काकूंचा आजारावर मात करणारा स्वभाव लेखात किती सहज उतरलाय !


Amrutabh
Friday, April 21, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी फ़ारच छान लिहीलय... cancer हा एक महाभयंकर रोग...शिवाय शारिरीक आजारापेक्षा मानसिक आजार फार...काकू खरच फार धीराच्या आहेत...परवाच chicken soup for the surviving soul हे पुस्तक वाचले... cancer patients चे अनुभव,त्यान्चा जगण्या कडे पाहण्याचा द्रुष्टिकोन त्याना मिळालेली मदत inspiration,courage या बद्दल वाचून मला देखील एक नवीन inspiration मिळालीय. हे पुस्तक मिळाल तर नक्की वाचा...

Aj_onnet
Monday, April 24, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीही COEP ला पहिल्या वर्षी, madam कडुन chemistry शिकलोय. छान शिकवायच्या. त्यांची सगळी lectures वेळेवर असायची अन बहुतेक सगळे chapters शिकवले जायचे. ( COEP त असे खूप कमी विषयाबाबत व्हायचे) तेंव्हाही त्यांची शिस्त अन कणखरपणा जाणवायचा.
हा लेख वाचून त्यान्च्या बद्दलचा आदर दुणावला.
त्यांनी ज्या धैर्याने, सकारात्मक मनोवृत्तीने अन हसतमुखाने ह्या संकटांला तोंड दिले. त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.
सखिप्रिया, त्यांनी ह्या दुर्धर आजाराबरोबरची जिंकलेली झुंज आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल आभार. आमचा नमस्कार अन शुभेच्छा त्यांच्याकडे नक्की पोहोचव.


Ekanath
Tuesday, April 25, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेखन सुंडरच आहे.

मृत्युची शक्यता समोर उभी ठाकली असताना मानसिक संतुलन राखणे, हे कौतुकास्पदच आहे. शुभेच्छा.


Prajaktad
Wednesday, May 24, 2006 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखे!काकुंच्या धिराच आणी एवढ्या त्रासाला हसतमुखाने सामोर जाण्याच फ़ार कौतुक वाटल....त्यांच्या उत्तम प्रक्रुतिसाठी शुभेच्छा!

Rupali_county
Friday, July 14, 2006 - 1:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखे

काकु खरच ग्रेत आहेत.
माझ्या आइला सुद्धा कर्करोग होता, ४ महिन्या पूर्वि तिच्या वर हि शस्त्रक्रिया करन्यात आलि आहे आनि आता ति पूर्न बरि आहे, आजूनहि तिला ट्रीटमेनत ला जायचे आहे. पन माझा पूर्न विश्वास आहे कि ति पूर्न थीक आहे. मि इथे पर्देशात राहून तिच्या कालजित असते पन तिच मला धीर देते.

या वर्शि मी तिला भेतायला जात आहे, पन मल जेव्हा हे समजले तेव्हा मला तिला भेतायला जाता आले नाहि, मलाहि तेव्हा रडुच फूटले होते पन मि स्वताला सावरुन तिलाहि फोन वर सावरले.

आज ति माझि डोळ्यात तेल घालून वाट पहात आहे. कधि एकद तिल भेटेन अस झालय.

देवाजवळ काकु च्या तबेतिसठी नम्र प्रार्थना

रूपाली




Prady
Monday, July 17, 2006 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पर्वाच देशातून परत आले. गेला एक महिना नुसती धावपळ होती. ज्या दिवशी परत यायला निघाले त्या दिवशी बाबांची पहिली केमो आटोपून ते घरी आले. तयारच नव्हते ते सर्जरी साठी पुढच्या treatment साठी. त्यांना तयार करणं पुढच्या सर्व गोष्टी सुरळीत व्हाव्या म्हणून रात्रीचा दिवस करणं सगळं ते पाहात होते. घरी आल्या वर म्हणाले माझी पोरं जिंकली. आता फ़क्त एकंच ध्येय मला बरं व्हायचंय. देशात पोचले त्याच दिवशी बाबांचं operation झालेलं होतं. गलितगात्रं झालेले ICU त झोपलेले बाबा पाहून भडभडून आलं. पण ठरवलं होतं धीर सोडायचा नाही. त्यांच्यात मला जगण्याची नवी उमेद निर्माण करायची आहे. आईला धीर द्यायचा आहे. visa च्या limitations मुळे महिना भरातच परत यावं लागलं. अजून त्यांच्या ५ केमो व्हायच्या आहेत. पण महिना भर त्यांना दुखण्याशी लढा देऊन दुखण्यालाच पुरून उरलेल्या लोकांबद्दल आम्ही सांगत होतो. भेट घडवत होतो. कुठेतरी ह्या गोष्टीं चा परिणामही जाणवला. देवा जवळ हीच प्रार्थना की अजून एक यशस्वी कर्कव्रुत्त इथे लिहायची संधी मला मिळो. रुपाली संधी मिळाली की आधी जाऊन आईला भेट. खरंच खूप बरं वाटतं त्यांना. मानसीक उभारीच जास्त महत्वाची. काळजी नको करूस सगळं नीट होईल.

Moodi
Monday, July 17, 2006 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा मी समजले की बाबांची हृदयशस्त्रक्रिया झालीय, पण आज तुझ्या लेखातुन कळले की परीस्थिती आम्ही समजतो तशी नाहीये. तुझे बाबा म्हणजे आमचे तीर्थस्वरुप काका खडखडीत बरे होवोत ह्या मन : पूर्वक सदिच्छा.
आम्ही सर्व तुझ्या या प्रार्थनेत अन भावनेत सहभागी आहोत. रुग्णाचे मनोधैर्य हे तेव्हा जास्त कणखर बनते की जेव्हा मला काही झालेले नाही, मी यातुन बरा / बरी होईनच ही आशा अन जीवनेच्छा बाळगली जाते.
तुला एकच विनंती की आमच्या भावना अन सदिच्छा आमच्या आदरणीय काका अन काकुंपर्यंत फोनद्वारा जरुर पोहोचव. काळजी करु नकोस.


Rupali_county
Wednesday, July 19, 2006 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा

हो मि जात आहे दिवाळी ला!
बस माझे काम समपले की मी निघालेच, अजून ३ महिने.

प्रज्ञा मल आशा आहे की आपले वडील ठीक आहेत.
खूप काही लिहावस वाटत पण डोळे भरून आलेत.

रूपाली



Kiran
Tuesday, September 05, 2006 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांचे अनुभव वाचले. काकुंची कथा खुपच प्रेरणादायी आहे.
मात्र ह्यातून १ गोष्ट आणखी शिकण्यासारखी आहे. ती म्हणजे patient's education लहानश्या पण घातक रोगांच्या लक्षणांकडेही दुर्लक्ष न करणे.

मात्र योग्य निदान आणि काळजीपुर्वक उपचार करणारा चांगला डॉक्टर मिळायलासुद्धा भाग्य लागते.

माझा ह्याबाबतीत अतिशय वाईट अनुभव आहे.


Kandapohe
Thursday, September 14, 2006 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखे, कालच्या सकाळमधे काकुंचा लेख आला होता.

Maudee
Thursday, September 14, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मी पण वाचला कालचा लेख़.
सकाळच्या मुक्तपीठ मध्ये आलाय. उभारी यासदराख़ाली


Sakheepriya
Thursday, September 14, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन सुरू झाली आहे का ही पुरवणी? e-sakal वर आहे का बघायला हवं!

Badbadi
Friday, September 15, 2006 - 3:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखे, हो नवीन आहे हि पुरवणी.. online नसावी हि पुरवणी...
पण तू टाकलेल्या लेखापेक्षा हा खूप संक्षिप्त होता :-( space अभावी असेल कदाचित..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators