|
Madya
| |
| Monday, February 27, 2006 - 4:54 am: |
| 
|
मी माझ्या बयकोला विचारले होते तुम्ही मध्यप्राशन करता का म्हणुन, त्यांच्या घरात अजुन माझी चेष्टा होते ह्यावरुन.
|
Manuswini
| |
| Monday, February 27, 2006 - 5:13 am: |
| 
|
मला तर एका मुलाने विचारले तु smoking करतेस का? मी त्याला म्हटले की मला आवडत नाही पण ईलाज नसतो,कराव लागते friends smokers असल्याने. त्याला joke कळला नाही आणी चेहर्यावर आठ्या आल्या बर्याच वेळाने दिर्घ श्वास घेवून म्हणाला आई वडील चालवून घेतात? न चालवायला काय झाले? अजून त्याला माझ्या चेहर्या वरिल हसु बघून कळले नाही. बहुतेक तो विचारात पडल्याने दिसले नाही त्याला. मग मी शांत पणे म्हटले मी passive smoker आहे group मधे
|
Manuswini
| |
| Monday, February 27, 2006 - 5:48 am: |
| 
|
एक exp एका मुलाला विचारले पुढे काय विचार आहे, म्हणजे लग्न कधी करणार असे? तर म्हणतो सध्या MS साठी enroll करणार मी - मग part time का? मुलगा - नाही fulltime ( स्वगत : मग लग्न केल्यावर कोण पोसणार? आणी आता माझ्याशी का बोलतोस? ) हिम्मत करून विचारले मग लग्नाचा विचार का आता, काय उत्तर द्यावे... just तयारी करतोय दोन वर्षे तरी मुलगी शोधण्यात जातील. आणी साधारण market कसे आहे बघ्तोय.. असे वाटले ना मलाच का भेटतात तेच कळत नाही मी काय घोड मारलय कोणाच छे!!
|
Bee
| |
| Monday, February 27, 2006 - 10:53 am: |
| 
|
हे मात्र अगदी खरे आहे की चार दोन स्थळ बघितली की आपल्याला एक अनुभव येतो की आपल्या अपेक्षा काय आहेत, प्रस्ताव कसा ठेवायचा, नकार कसा कळवायचा, भेटी कशा घ्यायच्या, कांदेपोहे करायचे की करू नये बहुतेक ह्यालाच तो market कसे आहे हे म्हणत असेल मनुस्विनी
|
कान्देपोहे अनुभवात कय कय प्रश्न विचारले गेले हा कान्दे पोहे अनुभवाचाच भाग असला तरीही, फ़क्त प्रश्न अणि उत्तरे असे अनुभव आपण येथेच शेअर करुया क की त्यासाठी वेगळा बीबी उघडावा? माझ्यापासूनच सुरुवात करते. एका मुलाच्या आईने मला तू हुषार आहेस का आणि असलीस तर कितपत असा प्रश्न विचारल होता. कदाचित विश्वास्र नाही बसणार पण एका मुलाने मला याहू मेसेन्जर वर तू रात्री दात ब्रश करतेस का? हा प्रस्न विचारला होता आणख़ी पण आहे यादी... टाकीन उद्या परवाकडे... तुमचे काही अनुभव? आग्निशिखा
|
कितपत हुषार आहेस अस सांगीतलस मग?
|
Mitraa
| |
| Friday, March 31, 2006 - 6:34 pm: |
| 
|
माझ्या मावसबहीणीला पहायला तिच्या नवर्याच्या घरच्यानी त्याला घाइघाईत पकडुन आणल होत त्याला बिचार्याला कोण कुठली मुलगी काहीच पत्ता नव्हता. तिला घरात सगळे बेबडी म्हणायचे. पहायला अलेल्यासमोरपण सगळ्यान्च बेबडी बेबडी चालल होत. त्याना दोघानाच जेव्हा वेगळ्या खोलीत बोलायला दिल तेव्हा त्यानी विचारलेला सगळ्यात पहीला प्रश्ण. प्लीज आधी मला तुझ खर नाव काय आहे ते कळेल का लग्नानन्तर तुला बेबडी हाक मारायला मला अज्जीबात आवडणार नाही
|
हा कांदा-पोहे अनुभव ताईचा..मुलगा ६ फ़ूट उंच, ताई ५ फ़ूट १ इंच! मुलाची आई म्हणाली, "मुलगी छानच आहे हो, पण आमचा मुलगा इतका उन्च आणी मुलगी फ़ार ठेंगणी वाटते". तस पाहता हे अगदी खर, पण आमच्या आत्याचे यजमान (थोदे जास्तच स्पष्टवक्ते असल्यामुळे) उत्तरले, "अहो लग्नानंतर काय तीला long jump मारायची आहे का high jump जरा तुमच्या मुलाला देखिल विचारुन बघा त्याला चालेल का कमी उंची "? आणि सांगायच म्हणजे मुलाला त्यबद्दल काही problem नव्हता, आणि आजही नाही गेल्या १७ वर्षांपासून अगदी सुखेनैव संसार करताहेत!!!
|
Junnu
| |
| Friday, March 31, 2006 - 7:09 pm: |
| 
|
बेबडी असा मी असामी ची आठवण झाली.... मनस्विनी, अग बर्याच मुली नाही का लग्न झाल्यावर इकडे येऊन MS/PhD etc करतात. तसच मुलांनी केल तर काय? मला २-३ couples माहीती आहेत की जिकडे नवरा शिकतोय आणि बायको job करतेय. अर्थात full-time MS/MBA/PhD students त्यांना RA/TA/GA or other campus job आहे.
|
जुन्नु porblem काहीच नाहे ग जर मुलाचा ego नसेल तर किंवा त्याला insecure वाटत नसेल तर पण असे फार कमि आहेत ना
|
Junnu
| |
| Friday, March 31, 2006 - 8:06 pm: |
| 
|
बरोबर आहे तुझ म्हणण, असे खुप च कमी लोक असतात. कदाचित तुझ स्वगत तु त्याने म्हंटल त्या नंतर लिहीलस तर जास्त बरोबर होईल. कारण market पहायचय अस तो म्हणाला म्हणजे दीड शहाणा च वाटतोय.
|
रचना कय सान्गणार मी त्याना? जगात कोणत्याही परिस्थितीमधून मार्ग काढून आनन्दात रहण्या एव्हढी हुषार मी आहे असे उत्तर दिल्यामुळे मी बहुदा नापास झाले आणि त्या आचरट मुलाला मला दातच नाहीत असे सान्गितले. आणखी एका माणसाने मला तुझ्या आई बाबाना व्रुद्धाश्रमात रहायला लागेल म्हातारपणी याची त्याच्या मते सुस्पष्ट कल्पना दिली होती. म्हणे, "कारण तुला भावन्डे नाहीत आणि मला जबाबदार्या वाढवायच्या नाहीत" चला झोपते आता. उद्या चेरी ब्लॉसम पहायला जायचा विचार आहे. मग आल्यावर टाकते थोडे आणखी अनुभव अग्निशिखा
|
Prasadp77
| |
| Saturday, April 01, 2006 - 9:36 am: |
| 
|
Manuswini, I am not too sure what you really wanted to point at with MS / PhD planning to get married because your answer to Junnu's point doesn't make sense either!!! Certainly that the answer given buy the 'man'(?) under question was totally idiotic but that generalised statement of yours doesn't make sense either or I failed to understand the yardstick. Take this discussion off the BB if you want
|
Naatyaa
| |
| Saturday, April 01, 2006 - 2:21 pm: |
| 
|
बेबडी असा मी असामी ची आठवण झाली.... >>> असामीला घरात बेबडी म्हणतात का??
|
Junnu
| |
| Saturday, April 01, 2006 - 5:51 pm: |
| 
|
अरे त्यात बेमट्या आहे ना आणि उखाणा भयंकर घेते त्यांची बायको बेमटेरावांच नाव घेते माझा नम्बर पहीला. मला बेबडी वाचुन एकदम त्याची आठवण झाली. पण तु अर्थ काहीतरी भलताच लावलस रे 
|
Meggi
| |
| Sunday, April 02, 2006 - 5:07 am: |
| 
|
जुन्नू, तु उखाणा असा आहे, घराच्या कोनड्यात उभी हिंदमाता, बेमटेरावांचं नाव घेते, माझा नंबर पहिला
|
Meggi
| |
| Sunday, April 02, 2006 - 5:20 am: |
| 
|
मला बघायला एक मुलगा घरी आला होता... त्याने बोलायला सुरुवातच office या विषयावर केली.. मला म्हणाला की २ वर्षात तो team leader झाला.. इथ पर्यन्त ठिक होतं... पुढे म्हणाला company च्या potential CEOs च्य list मध्ये माझ नाव आहे. ५००० लोकांच्या company मध्ये २ वर्ष exp असलेल्या मुलाचं नाव potential CEO म्हणुन.. असेल पण खर.. पण मला कंटाळा आला त्याच्याशी बोलायचा. अजुन कहर म्हणजे, मला त्याने प्रश्न विचारला where do you rate yourself in your team? interview ल गेल्याचं feeling आलं मला
|
Puru
| |
| Tuesday, April 04, 2006 - 5:31 am: |
| 
|
काही तरी नवीन येऊद्या इकडे पोरा-पोरींनो
|
Aarti
| |
| Tuesday, April 04, 2006 - 7:47 am: |
| 
|
मेॅगी... कुठे राहिलीस... येउदेत तुझे अनुभव..
|
Malati
| |
| Tuesday, April 04, 2006 - 12:42 pm: |
| 
|
eka mulani mala bhetlyawar pahilach prashna vicharla ki tula lagna ka karaycha ahe :D nantar prashnanchi malikach chalu zali. barech prashna lagnashi kahi sambandh naslele hote. e.g. tuza political view kay ahe? tyachyashi ajun bollyawar mala lakshat ala ki to khupch confused hota. bahutek tyala swatalach kaLla navta ki lagna kashasathi karaycha mhanun to mulinna vicharun ya prashnacha uttar shodhat hota. ;)
|
Prady
| |
| Tuesday, April 04, 2006 - 1:00 pm: |
| 
|
हा तसा प्रत्यक्षात न आलेला कांदेपोहे अनुभव. मी pharmacist आहे. आई बाबा मुलं बघत होते तेव्हा एकदा एका बाइंचा फ़ोन आला. त्यांच्या मुलाचं पुण्यात medical store होतं आणी नुकत्याच आलेल्या नविन कायद्यामुळे कि दुकानात B.Pharmacy झालेला pharmacist च हवा, यामुळे ते गोत्यात आलं होतं.पूर्वी diploma holder ना पण दुकान काढता येत असे. मग बाइंचं डोकं चाललं. मुलाला मुलगीच B. Pharm. शोधुन काढायची. कुठलिही भीड न बाळगता नमनालाच त्यांनी आपला हेतु पण सांगितला. अर्थात अशा स्थळाला हो म्हणण्यात काही अर्थ नव्हता पण बाबांना सुद्धा मजा बघायची लहर आली. ते त्यांना म्हणाले " अहो पण माझी मुलगी एका मोठ्या कंपनी मधे इतक्या महत्वाच्या पोस्ट वर काम करते मुंबई ला ती कशी तुमच्या दुकानासाठी तिने सोडायची." त्यावर बाइंचं उत्तर तयार " अहो ज्याचा license घेऊन दुकान सुरु केलं त्याला देतोच कि आम्ही दर महिन्याला हजार दोन हजार. आता ते तुमच्या मुलिला देऊ. आहे काय अन नाही काय"
|
Sunidhee
| |
| Tuesday, April 04, 2006 - 5:36 pm: |
| 
|
चला माझा पण थोडा हातभार ह्या बीबी ला... पुर्वी मला एक स्थळ आले होते पुण्याचे.. मि भारतात गेले तेव्हा त्यान्च्याकडे जायचे ठरले. मुलगा भारतात नव्ह्ता तेव्हा.. मी कूरकूर केली कि जर मुलगा नसेल तर आपण कशाला जायचे? पण मग बाकी नातेवाइकाना पण भेटता येइल असा विचार करुन मी-आइ-बाबा आम्च्या गावाहुन मामाकडे पुण्याला गेलो,त्याना फोन्-बीन केला.. दुसर्या दिवशी ११ वाजता बोलावले होते... बरोबर ११ ला गेलो... दारातुनच काय हव आहे, अस विचारल्यावर, बाबा - आपण आम्हाला भेटायला बोलावल होतत.. मुलाचे वडील - तुम्हाला ११ चा वेळ दिली का? बर बर, तुम्ही देशपान्डे ना? बाबा - नाहि, आम्ही कुलकर्णी (तिथेच माझा थोडा इन्टरेस्ट कमी झाला).. मुलाचे वडील - या आत या.. आत गेलो तर अजुन एक मुलगी तिच्या आइ-वडीलांसह आत बसली होती.. मुलाचे आइ-वडील त्या लोकाना आत घेउन गेले आणि काहि बोलून ती मुलगी आणि तिचे लोक निघुन गेले.. (माझा इन्टरेस्ट अजुन कमी).. मग जुजबि बोलणे झाल्यावर, सुरुवात. मुलाचे वडील - तु H1 वर असतेस का? मी - हो ते - मग कुठे असतेस तु? मि - अमुक ठिकाणी. ते - (एकदम फटकन) मग काय उपयोग तुझ्या H1 चा.. माझा मुलगा तर शिकागो ला असतो... तुला job सोडून द्यावा लागेल. आम्ही सर्व चुप आइ-बाबा तसेही साधेच.. ते - मग कसलि आवड आहे तुला? मी उत्तर देण्याआधिच त्यानी त्यान्च्या मुलाचि record सुरु केली - माझ्या मुलाला शास्त्रीय सन्गीत फ़ार आवड्ते. तो उत्तम सतार वाजवतो. तुला classical आवड्ते का? मी हो म्हणायच्या आधिच पुन्हा सुरु - त्याला बाकि कसल्याही गाण्याची आवड नाही. ती हिन्दि सिनेमातली गाणी त्याला आवडत नाहीत.. त्याच्या साठी मी सर्व काही केले आहे तो सतार शिकावा म्हनुन.. २५००० रुपये खर्च करुन विमानानि सतार पाठवली त्याला.. मी हे केले, मि ते केले, त्यानी हे केले, त्याच्या आइनी अस केल... त्याल देवाचे करायची खूप आवड आहे. फक्त २ गोश्टी त्याला आवडतात, सतार आणि देवाचे कराय्ला.. त्याला फिरायला जायला आवडत नाही.. हे आवडत नाही, ते नाही... सम्पेचना त्यान्चे.. बोलण्यात सरळ सरळ गर्व भरलेला.... मला तर त्यानि काही विचारले नाही.. (एका अर्थी बरेच झाले) .. आणि हे पण कळले कि मुलाला २ गोश्टी सोडुन बाकी काहीच आवडत नाही. शेवटी असाच त्यान्चा मोठेपणा ऐकुन ऐकुन... निघालो तर बाबा म्हणाले, मुलाचा एखाद फोटो आहे का? तर एक फोटो दाखवला त्यानि.. तोच तो सतार घेउन बसलेला फोटो, चेहरा अत्यन्त गम्भीर.... त्यानि एका छोट्या चिठोर्यावर त्या मुलाचा नम्बर लिहुन दिला आणि म्हणाले - गेलीस कि त्याला फोन कर, त्याला भेटायला जा... वगैरे. मी गेले नाही. पण ही मजा मात्र लक्शात राहीली. आम्हाला बोलुच दील नाही की हो. देशपान्डे ची मुल्गी यायची वेळ झाली असावी.
|
Yog
| |
| Tuesday, April 04, 2006 - 6:45 pm: |
| 
|
खि खि खि.... काय एक एक नग असतात (पुण्यात)? 
|
Junnu
| |
| Tuesday, April 04, 2006 - 7:01 pm: |
| 
|
सुनिधी, जबरीच अनुभव आहे. मला कळत नाहीये हे कुठे लिहु ते, इकडे की मुलगा / मुलगी पहायचे कर्यक्रम ह्या बीबी वर: माझ्या नवर्याच्या मित्राची अट होती की बायको उत्तम गाणारी आणि संस्कृत मधे fluent असलेली हवी. तो स्वत : संस्कृत छान बोलतो. त्याला तशीच बायको मिळाली ही.
|
माझा हा आणखी एक अनुभव मी मुलाला बाहेरच dunkins coffeeshop मधे भेटायचे ठरवले होते कारण आम्ही दोघं एथेच nj ला होतो. बर्याच वेळ थांबुन मुलगा आलेला सुरवातिला मलाच प्रश्ण पडला की हा असावा का. .. weekend चा Saturday ला अर्ध्या झोपेत चक्क उठुन तो आलेला डोळे लाल, केस विस्कटलेले, पायत slippers ,.. आणी आल्या आल्या हे त्यानेच सांगितले की तो झोपेत होता आणी मग लक्षात आले. एक तास थांबुन मी कंटाळले होते. बाहेर थंडी ही होती. मी म्हटले coffe पियुया तर म्हणाला नको एथेच थोड्यावेळ बोलुया ह्या थंडीत? मग म्हणाला आत जावुया dunkins मधे. coffee घेतली त्याने स्वःताची आणी सरळ जावुन बसला मी मग स्वःताची coffee घेतली. पहिला प्रश्ण काय विचारावा तु एथे नोकरी करतेस ना? मी - हो मग financial saving किती आहे तुझे? का असेच पैसे खर्च करतेस? मी - असेच म्हणजे? तो - ही एथे coffee किती महग आहे. आपण घरी छान चहा करुन पिवु शकतो. मी - hmmm.. १५ मिनिटात निघाले. च्यायला coffee घेताना एतका विचार? तेही एथे ५ वर्षे काम करुन? नंतर कळले की त्याची आई explanation देत होती स्वःताहुन मझ्या आईला जरा(?) कटकसरी आहे माझा मुलगा वगैरे?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|