|
Saanjya
| |
| Tuesday, March 14, 2006 - 12:32 am: |
| 
|
इकडे US ला long term येण्यापुर्वी मी बरेचदा B1 वर एक-दोन आठवड्याकरता meetings/discussions साठी यायचो.. इकडे यायच, airport वर car rent करायची.. hotel गाठायचे.. next weekend ला सकाळि room मध्ये newspaper सोबत room चे bill आले कि, आवरा-आवर सुरु, chocolates etc, last minute shopping करायचे आणि दुपारपर्यंत airport गाठायचे, car परत करायची.. आणि मग ticketing.. सगळ बरयापैकी set झाले होते.. अश्याच एका trip मधे, saturday morning, bill आले, 2pm ची flight होती.. नेहमीप्रमाणे सगळे आवरून airport गाठले, car परत केली.. कमी गर्दी आणि बरयापैकी चेहरा बघुन ticketing साठि Q मधे थांबलॊ.. माझा नंबर आला.. तॊंडभरुन Hi/Hello झाल.. मी passport नी ticket तीला दिले..तिकीटाकडे बघत.. ती हसत म्हणाली: Sir, U R bit early.. मी (गॊंधळुन): Oh.. really? ...is the flight late again? ती (अजुन जास्तिच हसत.. ): No Sir, it's not the flight.., your ticket, it's tomorrows.. मी: ... ती: ..and we R all booked 4 2day.. मी: (स्वत:च्या गाढवपणावर ओशाळलेला पण वरवर हसत..) oh.. really?.. ok.. see you tomorrow then.. ..passport नी ticket परत घेवून तिकीटावर नजर फिरवत.. आणि मनातल्या मनात office च्या travel dept. ला शिव्या देत.. (hotel आणि flight च्या booking मधे एका दिवसाचा gap होता :-( ) मी परत Avis च्या रांगेत..
|
एकदा लहानपणी पप्पांबरोबर देवळात गेले होते शिवरात्रिला. गर्दी होती line मधे उभे होतो. पप्पा म्हणाले जा ही विसाची नोट देवून सुटे आण पेटीत टाकु नसेल तर राहुदे. जवळ हारवाला होता तिथे गेले नोट दिली हातात,म्हटले सुटे आहेत तो म्हणाला नाही, मी म्हटले नसेल तर राहु दे आणी आले परत... पप्पा म्हणाले नोट कुठेय,मी म्हटले दिली हारवाल्याला हारवाला ईतका लुच्चा कबूल झाला नाही साहेब एतक्या गर्दीत ही मुलगी आलिच नाही
|
Soultrip
| |
| Tuesday, March 14, 2006 - 6:22 am: |
| 
|
I was walking down the footpath (senapati bapat rd. mostly)& saw a beautiful girl! I was kind of so mesmerized that looking at her I somehow walked ahead & banged my head to the electricity pole! My friends (& that girl too) laughed & I was totally embarrassed!
|
Amrutabh
| |
| Tuesday, March 14, 2006 - 8:02 am: |
| 
|
मी school मधे असताना माझ्या pen मधली ink सन्पली म्हनुन मी office मधे गेले refill करायला... त्या वेळी तिथे कुणीच नव्हते...आणि भरतना मला जोरात शिन्क आली आणि सगळी ink सन्डली register वर... मग काय तिथे कोणि नाही हे पाहुन हळुच परत class-roomमधे जाऊन बसले मी एकदा cell refill करायला गेलेले ४०० रुपयान्च refill केल त्याला ५०० रुपये दिले आणि १०० रुपये परत न घेताच परत आले...तिथुन मी directपुण्याला गेले आणि ४ दिवसानि परत आल्यावर त्या दुकानात जाऊन पैसे परत घेतले... नशीब तो दुकानदार ओळखीचा होता.. एक्दा मी दुपरचे घरी आल्यावर fridge मधुन थन्ड पाण्याची बाटली काढली आणि सरळ तोन्डाला लावली...पण त्यात vineger भरले होते...सगळ तोन्ड आम्बट आम्बट झाल..
|
Kiroo
| |
| Tuesday, March 14, 2006 - 4:55 pm: |
| 
|
एकदा आई आणि आजी दिवाळिच्या फ़राळाची शेव करत होत्या.तेव्हा आमच्याकडे पितळी सोर्या होता वरती handle धरुन गोल फ़िरवायचा. आजी शेव कढईत पाडत होती आणि आई तळत होती तर आजी ला थोडा break द्यावा म्हणुन मी शेव पाडायला घेतली आणि पहिल्या घाण्यातच जी वाफ़ माझ्या हातावर आली की मी तो सोर्या कढईत टाकुन दिला होता.
|
Kiroo
| |
| Tuesday, March 14, 2006 - 5:13 pm: |
| 
|
मी आणि माझी मैत्रिण रेल्वेने पार्ल्याहून मरिन लाइन ला जात होतो आम्ही platform वरचे जिने ऊतरत असतानाच गाडी थोडी चालू झाली होती.लवकर लवकर ऊतरून मी स्वता:ला आपटुन घेवून train मधे चढण्यात यशस्वी झाले होते पण गाडीतून indicator बघीतलं तर एवढ करून मी विरुद्ध दिशेला जाणार्या गाडीत चढले होते.
|
Ldhule
| |
| Tuesday, March 14, 2006 - 9:23 pm: |
| 
|
आमच्या लग्नाचे नवलाईचे दिवस होते. सौ बरोबर सिनेमाला जायच ठरवल. मी सौला म्हंटल की क्रांती चौकात पावभाजीच्या स्टाॅल जवळ उभी रहा. सौ म्हणाली नको त्यापेक्षा मी शेजारच्या बंकेजवळ उभी राहते. आमच हे बोलन अर्थात फोनवर झाल (मोबाईल नव्हते). ठरल्यावेळी मी पावभाजीच्या गाडीजवळ आणि सौ बंकेजवळ वाट बघत उभे. अर्धा तास. दोघांमधे अंतर असेल बस ३० ते ३५ फुट. पण थोड वळन असल्यामुळे एकमेकाना दिसत नव्हतो. अचानक माझी ट्युब पेटली पण बॅन्केजवळ पाहिल तर सौ नव्हती. मग रिक्षा करुन थेटरला गेलो तिकडे शोधल. पण छे. मग सरळ घरी.. तर बाईसाहेब बसल्या होत्या रडत.
|
Manuswini
| |
| Wednesday, March 15, 2006 - 1:50 am: |
| 
|
अच्छा two wheeler का, मग ते कोण लिहिणार काका दिवे घे ग हा माझ्या पप्पाचा किस्सा त्यांना सुद्धा गप्पा मारायची एवढी हौस ना आणी ह्या किस्स्यानंन्तर आईने जवळ्पास काही दिवस आम्हाला त्याच्याबरोबर पाठवायचे बंद केले होते .. एकदा मी पप्पांबरोबर market ला गेले होते त्याना केस ही कापयचे होते म्हणून केस कापुन झाल्यवर ते म्हणाले की तु बस एथेच मनु, मी पटकन भाजी घेवून येतो बाजुलाच market होते, मी तेव्हा Second का third grade मधे होते पप्पानी भाजी घेतली, वाटेत friend भेटले त्यांना ride दिली आणी सरळ घरी आले आई जी घाबरुन गेली वडिलांना आठवलेच नाही की मी त्याच्याबरोबर गेले होते. सुरवातिची १० मिनिटे हीच Argument , ते म्हणाले अग नाही ती आली नाहेच, आई म्हणाली नाही मी तिला गाडित बसताना बघितले तुमच्याबरोबर.. आईला चक्कर आली आणी ३ तास बेशुद्ध. घाबरुन अक्खी मंडई शोधली मग लक्षात आले की saloon मधे तर नाही ना, एथे मी रडून गोंधळ घातला होता. ओळखीच saloon होते म्हणून आता येतिल daddy हा प्रकार. हा सर्व प्रकार आई आजही जेव्हा सांगते आणी अजुन अतिशय रागाने वडिंलाकडे बघते आणी फणकार्याने ह्याच्या गप्पा संपतील ना,माझी मुलगी गेली असती.. पप्पा लगेच हसत हसत.. हो तर मला पर्वा नाही ना तसे म्हटले तर मुंबईत मुले हरवणे म्हणजे dangerous
|
मी बी. एस्सी. च्या शेवट्च्या वर्षाला होतो. पेपर अपेक्षेविरुध्द अतीशय वाईट जात होते. तणावापोटी जेवण, झोप काही सुचेनासं होत होतं. एव्ह्ढंच नव्हे, स्वयंपाकघरात घुसून माझ्या जागरणासाठी चहा बनवताना साखरेऐवजी आईने फोडणीसाठी काढ्लेली मोहरी माझ्या आधणात घातली. फ़िसिक्स च्या पेपर चा दिवस उजाडला. " ही पावनखिन्ड" सर झाली तर 'विशाळगडावर पोचलोच'" अशी परिस्थिती होती. आधीच पोचायला उशीर झाला होता. सेन्टरवर पोचलो. सगळीकडे शुकशुकाट. "उशीर झाला का?" म्हणत घड्याळात पाहिलं तर खरंच वेळेवर पोचलो होतो!!! मग दुसरी शंका डोक्यात आली... "अभ्यासाच्या नादात आपण एक पूर्ण दिवस उशिरा तर पोचलो नाही ना?". माझी 'शिवण उसवली !!!'. कोरडा पडता घसा आणि भरून येत्या डोळ्याचं काय करायचं असा विचार करत असताना मला 'टोण्या' (एक वर्गमित्र... अर्थातच!!) दिसला. टोण्या, रेणू, वीरू इ.इ. कंपनी मला पाहून घाबरलेली आणि मी तर मुळातच 'फाटलेला'!!! मग खुलासा झाला की केमिस्ट्रीचा पेपर सोडवायला आलेली मंडळी वेळपत्रकावर दिलेल्या तारखेसच पोचली होती, आणि एक दिवस आधी पोचलेला भौतिक्शास्त्राचा उम्मेदवार पाहून बुचकळ्यात पडली होती. 'जास्त वेन्धळा कोण?' ह्या विषयावर माझ्या सुदैवाने नंतर कधीही 'परिसंवाद' झाला नाही ह्याच ग्रूप मधल्या रेणूने ह्याच परीक्षेदरम्यान अभ्यासाच्या तंद्रीत पुस्तकं फ़्रिजमध्ये ठेवली होती, आणि जीवन मरणाच्या पेपरच्या आदल्या दिवशी 'सापडत नाहीत' म्हणून जीव देण्यापासून ड्रॉप घेण्यापर्यंत सगळे बेत आखले होते. आता तीच पोरगी 'टॉपर' आहे हा भाग अलाहिदा 'बेवकूफ़ो की कमी नही. एक ढूढो हज़ार मिलते है' !!! Cheers !!! Yogesh Damle P.S:- 2 names in this post have been fictionalised to honour their anonymity. Actually, nothing's left to 'honour' after throwing my identity to winds ;)
|
Shriramb
| |
| Thursday, March 16, 2006 - 3:26 pm: |
| 
|
आमच्या काॅलेजात देशपांडे आडनावाचे प्रोफेसर फार. पण त्याना नावाने कोणी हाक मारत नसत. एक A. P. देशपांडे म्हणून होते त्याना APD म्हणत. दुसरे एक D.P. देशपांडे होते, त्याना DPD म्हणत. माझ्या भावाचं काॅलेजचं पहिलंच वर्ष होतं. त्यामुळं त्याला सगळं काही नवीन होतं. हळूहळू त्याला हे APD, DPD वगैरे समजायला लागलं होतं. तशात त्याला कसलातरी फाॅर्म भरायचा होता. कोणी तरी सांगितलं की त्यावर फिजिक्सच्या HOD ची सही घेऊन ये. हा गेला फिजिक्स डिपार्टमेंट मध्ये आणि तिथल्या प्युनला विचारलं, " H.O. देशपांडे कुठे भेटतील?"
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|