|
Dineshvs
| |
| Saturday, December 31, 2005 - 2:49 pm: |
| 
|
माहित असुनहि यात वापरलेल्या रसायनाचे मी नाव देत नाही. पण आता सांगायला हरकत नाही. नायजेरियाला असताना, मला सगळ्या फ़्रेंच मित्रानी आग्रह करुन, पार्टी द्यायला लावली. भरपुर खपुन मी अनेक पदार्थ केले, पण दारु प्यायची नाही अशी अट घातली. एक वेळ मीराबाई गिरिधराला सोडेल, पण फ़्रेंच लोक दारुशिवाय जेवणार नाहीत. मग माझ्या जर्मन मित्राने हि युक्ती सांगितली. तो व्हाईट वाईनची बाटली घेऊन आला, त्याने त्यात लाल रंग मिसळला, आणि दिनेशने तुमच्यासाठी खास रेड वाईन आणली असे सगळ्याना सांगितले. मी केलेल्या पदार्थापैकी फ़क्त एकच पदार्थ जरा झणझणीत होता. मी आधी तो तिखट आहे याची कल्पना दिली होतीच. तसे वाईन पण कमी प्या असे पण सांगितले. सगळे पोटभर जेवले, आणि नेहमीप्रमाणे एक नंबरला गेल्यावर, यमाला भेटुन आल्यासारखे चेहरे करु लागले. कारण वाईनमधे मिसळलेला रंग, आपल्या शरिरात अजिबात अबझॉर्ब होत नाही, तो तसाच बाहेर पडतो.
|
अम्ही 6-7 वीत असू. आमच्या घराच्या पाठीमागे एक शेत होते. बरेचदा शेतात लपून छपून जायचो. एकदा त्या शेतकर्याचा मेंढ्यांचा कळप तिथे जवळपास चरत होता. आम्हाला एक लहानसे गोजीरवाणे मेंढीचे पिल्लु खुप आवडले. त्या शेतकर्याचे लक्ष नाही असे बघून त्या पिल्लाला उचलून घरी आणले. कोणाच्याच घरी कुत्रे पाळणे सुद्धा मुश्किल होते मेंढीचे पिल्लु लांबची गोष्ट होती. मग एका मैत्रीणीच्या बंगल्याचे बांधकाम चालले होते. तर आम्ही त्या पिल्लाला तिथे बांधून ठेवले. समोर खुप सारे गवत आणि पाणी आणून ठेवले. आणि मग उशीर झाला असल्याने सगळे आपापल्या घरी गेलो. ती मैत्रीण तिथेच त्या construction च्या पाठीमागे रहायची. रात्रभर ते पिल्लु बे बे करत होते. आणि मग मध्यरात्री शेतकरी आला दार ठोकत. तिच्या वडीलांशी जाम भांडला. त्यांना कळेचना नक्की काय झाल ते. मैत्रीण आपली घाबरून पांघरूण डोक्यावर घेऊन पडून राहिली होती. मग सकाळी आम्ही परत उत्साहाने गवत आणि पाणी घेऊन तिच्या घरी गेलो तेंव्हा तिच्या वडीलांना कळले. मग जाम ओरडा आरडा.
|
Pendhya
| |
| Sunday, January 01, 2006 - 7:29 am: |
| 
|
शाळेतलाच एक किस्सा आठवतो. शाळेत आम्हाला, Work Experience , नावाचा विषय असायचा. ह्यात, आम्हाला practical गोष्टी करण्यासाठी मार्क दिले जायचे. ऊदा : शाळेच्या आवारात, वाफ़े करुन भाज्या पिकवणे, खेडेगावात camp करणे इ. असाच एक camp होता, सिहगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावात. नेहमी प्रमाणे रहायची व्यवस्था होती तम्बू मध्ये. रात्री camp fire व्हायचा, ज्यावेळी आमचे हेडमास्तर काही typical गाणी, सगळ्यान्चे participation व्हावे, म्हणून म्हणायचे. ऊदा : पवड्याचा म्हातारा, म्हातार्याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची ताई........, वगैरे. Camp fire नन्तर आम्ही आपापल्या तम्बू मधे शिरलो. कुणालाही झोप येईना. आजूबाजूच्या तम्बू मधली काही पोर गोळा केली. त्यावेळी, " कुर्बानी " हा चित्रपट नुकताच प्रदर्षित झाला होता. त्यात झीनत अमान ला तन्ग कपड्यात बघितलेले आमचे निरागस डोळे, मेन्दूला चालना देऊ लागले, आणी सगळ्यानी, त्या तम्बूत, अगदी कमीत कमी कपड्यात, (आता, शाळकरी मुलान्चे कमीत कमी कपडे, काय असू शकतील, हे जाणकारानी, स्वत : च्या मेन्दूला चालना देऊन समजावे), एकाने, ढोलकी म्हणून ऊपयोग केलेल्या, स्वत : च्या सुटकेसच्या तालावर, आणी तितक्याच सुश्राव्य आवाजात गायलेल्या, " लैला ओ लैला.. " ह्या गाण्यावर नाच केला होता... ... नाच करण अपरिहार्य होत, कारण जो नाचणार नव्हता, त्याला त्याच कमीत कमी कपड्यात, तम्बूच्या बाहेर फ़ेकले जाणार होते.
|
Deemdu
| |
| Monday, January 02, 2006 - 6:42 am: |
| 
|
HHPV सगळ्यांचे किस्से ऐकुन मि त्या वेळी ५ ते ६ वर्षंची असेन आणि माझा चुलत भाऊ माझ्यापेक्षा १ वर्षानी लहान. ट्यावेळी आमच्या हातात पैसे असे कधीच देत नसत. जे काही तुम्हाला हव आहे ते आम्ही आणुन देउ पण पैसे नाही. आणि रस्त्यावरच खायला बंदी. एकदा मला आणि माझ्या चुलत भावाला बुढ्ढीके बाल खायच होत. घरातुन काही या गोष्टीसाठी पैसे मीळेनात. आमच्या घरासमोर हुप मोठ्ठ आवार होत, आम्ही दोघांनी त्या अवारात फिरुन लोखंडाचे खिळे, छोटे पत्रे असे गोळा केले, ते भंगार्वाल्याला विकले आणि त्याच बुध्धीके बाल घेउन खाल्ल. संध्याकाळी काका आल्यानन्तर त्यांना हे कळल आणि मग जी धुलाई झाली दोघांची की आजतागायत परत बुढ्ढी के बाल खाल्ल नाही
|
Bhagya
| |
| Friday, January 06, 2006 - 12:12 am: |
| 
|
अजय.... आमच्या लहानपणी तरुण भारत मध्ये का कुठेसं इब्लिस काट्ट' असं सदर यायचं त्याची आठवण झाली बघ.
|
Killedar
| |
| Friday, January 06, 2006 - 3:16 am: |
| 
|
सातवीत असताना आम्ही " नसबंदी नसबंदी " खेळायचो.
शाळा फक्त मुलांची होती. वर्गात दारामागे २-३ जण उभे रहायचे. शाळा सुरु होण्याच्या अगोदर. एखादा मुलगा आत आला कि त्याला काय होते आहे हे कळायच्या अगोदर त्याला उचलायचं आणि मधल्या टेबलावर आडवं करायचं. त्याच्या शर्टाची पोटाजवळची दोन बटन काढायची आणि पोटावर बोटानी नुसती फुली मारायची. की झाली नसबंदी. (पण इथेच थांबायचो.) हे सगळं तो बिचारा दारात आल्यापासून फक्त २०-३० सेकंदात आटपायचं. त्याला काय होतं आहे हे कळायच्या आत. तो भंजाळून हे काय असं म्हणाला की त्याला सांगायचं तुझी नसबंदी केली. तो भडकायचा. आणि मग दुप्पट उत्साहात आमच्यात सामील होऊन नवीन बकरा कोण येतो त्याची वाट पहायचा. हळूहळू आलेला प्रत्येक जण आमच्यात सामील व्हायचा. एकदा एका मुलाचे वडिल त्याच्या बरोबर होते आणि ते आधी वर्गात आले. कुणाच्या लक्षात येईपर्यंत त्यांची नसबंदी झाली होती. त्याना असे काय केले हे कुणीच सांगेना. त्यांनी तातडीने मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. पुष्कळ वेळ आम्ही असे काय करतो हे कुणी सांगेचना. शेवटी या प्रकाराला नसबंदी नसबंदी असे म्हणतात असे कळाल्यावर त्याना इतके जोरात फसकन हसू फुटले कि काय करावे हे समजेना. शेवटी " मी परत कधी कुणाची नसबंदी करणार नाही " अशी देवीसमोर शपथ घेऊन आम्हाला मार न देता सोडून देण्यात आले. आणि तेंव्हापासून महाराष्ट्र ६ भावी डॉक्टरांना मुकला. एकेक काळ असतो. स्व. संजय गांधी हयात असते तर आमचा मानपत्र देऊन सत्कार केला असता.
|
Zelam
| |
| Friday, January 06, 2006 - 1:40 pm: |
| 
|
किल्लेदार, धन्य आहे तुमची.
|
Storvi
| |
| Friday, January 06, 2006 - 6:40 pm: |
| 
|
मी म्हण्णारच होते की संजय गांधींनी दीक्षा दिली होती की काय तेवढ्यात शेवटचे वाक्य वाचले
|
आम्ही शाळेला जायच्या वाटेवर बरेच ट्रक असायचे समोरून येणारे...तर आम्ही उलट्या दिशेनी जाताना अशा प्रत्येक वाहनाला जे पटकन वळू शकणार नाही त्याचे लाईट्स चालू आहेत अशी खूण करायचो हातानी ते बंदच असायचे!) तो असा पटकन स्टेअरींग व्हील कडे पहायचा आणि गोंधळून जायचा
|
कॉलेज मधे वॉटर कुलर च्या वरती आमच्या वर्गातल्या मुली पाणी भारून ग्लास ठेवायच्या आणि वाट पहायच्या लपून कोण येऊन पाणी पितो आणि तो पाण्याचा ग्लास घेताना तो त्याच्या अंगावर पडतो ते... एक नंबर च्या आगाऊ पोरी होत्या ! मी एकदा पाहिलं आणि जाऊन तो भरलेला ग्लास घेउन पिऊन टाकला!
|
Athak
| |
| Sunday, January 22, 2006 - 6:47 am: |
| 
|
मी ८ वीत असतांनाची गोष्ट . शाळेत एका मुलाचे अन माझे भांडण झाले कश्यावरुन तरी , बहुतेक काहीतरी घाणेरड्या शिव्या दिल्या म्हणुन . चांगली मारपीट घोयसाघोयशी ( नागपुरी शब्द ) झाली , मी त्याला चांगला वर उचलुन आपटला , नंतर तो बापाला घेवुन बोंबा मारत आमच्या घरासमोर , बरीच मंडळी जमली . माझ्या वडीलांनी पहीलाच प्रश्न विचारला . काय नांव तुमच्या मुलाचे ? ' मारुती ' . वडीलांनी लगेच पाठ थोपटीत मला ' शाबास बेटा '
|
Maanus
| |
| Friday, February 24, 2006 - 4:58 pm: |
| 
|
S.Y. B.Com. च्या वेळेची गोष्ट. Oral Exam सुरु झालेल्या. महाविद्यालयातील oral exam हा प्रकार मला नविनच होता. आमच्या वाणिज्य शाखेत असले प्रकार जास्त नसतात. त्यामुळे त्यात नक्की काय असते ते मला माहीत नव्हते. पन exam देऊन लगेच office ला पळायचे, म्हणुन मी सगळ्यांना सांगीतले मी पहीला जातो परिक्षेला मग तुम्ही लोक जा हळु हळु. समोर दोन शिक्षक, एक बाई आणि एक सर. सरांचा पहीलाच प्रश्न: ' मी तुला कधी माझ्या तासाला पाहीले नाही'. मी: ' मी देखिल तुम्हाला कधी पाहील्याचे आठवत नाहीय' सर: ' कोणत्या वर्गात असतोस मी: ' S.Y. B.Com, division C ' सर: ' अरे मग तुला शिकवत कोण मी: ' सर त्या अमुक अमुक बाई' सर: ' अरे बाबा मी तुझा वर्गशिक्षक आहे' मी: ' नाही सर, त्या बाई आम्हाला शिकवतात' luckily त्या बाई आजुन आल्या नव्हत्या... त्यांनी बाकीच्या एक दोन शिक्षकांना बोलावले आणि विचारले तुम्ही याला ओळखता का? नाही. मी गप्प. आता काय बोलायचे. मी एकतर एकदा पन त्यांच्या तासाला बसलो नव्हतो त्यामुळे ते कोण कुठले काहीच आठवत नव्हते. शेवटी सरांनी एक चहा मागवला, मला २-३ प्रश्न विचारले आणि जा म्हनाले. नंतर बाहेर आल्यावर कळाले खरच ते शिक्षक मला वर्गशिक्षक होते. आभ्यास केलेला होता म्हणुन बाकी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निट देता आली आणि त्यांनी पन मला २० पैकी १४ मार्क देऊन पास केले.
|
Storvi
| |
| Friday, February 24, 2006 - 6:37 pm: |
| 
|
आयला काय माणुस आहे 
|
athak.. fantastic ) maanus, kay daring ahe tuze. "mi dekhil tumhala ...... too good )
|
Nalini
| |
| Tuesday, February 28, 2006 - 2:21 pm: |
| 
|
मी डिप्लोमा करत असतानाची गम्मत. आमच्या इलेक्ट्रॉनिक्स लॅबच्या बाहेर एक पाण्याचा माठ ठेवलेला असायचा. प्रॅक्टिकल सुरु असतानाच सरांची परवानगी घेऊन मी आणि माझी मैत्रिण पाणी प्यायला गेलो. पाणी पिऊन झाल्यावर ग्लास पाण्याने भरुन त्यावर झाकण पालथे घालुन माठावर ठेऊन दिला. लॅब मध्ये आल्यावर दुसर्या एका मैत्रिणिला पाणी प्यायला पाठवुन दिले. ती तिथे पोहचण्यापुर्वीच एका सरांनी तो ग्लास उचलला आणि सगळे पाणी त्यांच्या अंगावर सांडले. बिचारे सर बळीचा बकरा बनले.
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, March 01, 2006 - 10:27 am: |
| 
|
आम्ही लहान असताना लई इब्लीसपणा करायचो. रात्री कोणाच्या घरासमोर सायकल उभी दिसली की लगेच त्या सायकलीचे लॉक लावले नसेल तर लॉक लावून किल्ली ठेवून घ्यायचो आणि तो सायकलवाला कधी येतो याची वाट बघायचो. तो आला की त्याला किल्ली मिळायची नाही. तो बिचारा शोधत बसायचा. घरात शोधायचा, बाहेर शोधायचा बरीच शोधा-शोध झाल्यावर मग आम्ही तिथे जायचो आणि विचारायचो काय काका काय झालं? ते सांगायचे किल्ली हरवली आहे. आम्ही शोधायचे नाटक करायचो आणि हळूच किल्ली सायकल जवळ टाकायचो आणि ओरडायचो ३४;सापडली!!३४;. तेव्हा त्या काकांच्या चेहेर्यावर काय आनंदाचे भाव असायचे!! आणि आम्हाला हेच हवे असायचे.
|
Amrutabh
| |
| Wednesday, March 01, 2006 - 5:49 pm: |
| 
|
२ वर्षा पुर्वीची गोष्ट... आमच्या बिल्डीन्ग मधे एका मुलाचे लग्न होते..मी आणि माझ्या मैत्रीणी जेवण घेण्यासाठी line मधे उभे होतो.. आमच्या पुढे एक टकला माणुस उभा होता... आम्ही बोलत होतो,तेव्हड्यात माझी एक मैत्रीण म्हणली.... अरे...ये तो व्यास का टकला लगरहा है आणि आम्ही हसलो त्या माणसाने मागे वळुन म्हट्ले हा बेटा मै ही हु... आमची अशी वाट लागली आणि त्या दिवसापासुन आम्ही कोणीही त्यान्च्या समोर फ़िरकलो नाही..
|
एकदा माझ्या शेजारच्या पिसीवर घोस्ट नावाचे software run होत होते. Hardware मधले कुणीतरी machine ची proxy घेऊन करत असावे. ते software run होत असताना screen वर अगदी चांदोबात असतात तसल्या cute भुताची image एका चौकोनात दिसत रहाते. मी माझ्या डावीकडच्या) शेजार्याला विचारले की तुला ती भुताची इमेज दिसतेय का? तो म्हणाला हो. मी म्हटलं मला वाटलं मला एकटीलाच दिसतेय. आणि आम्ही आपापले कीबोर्ड बडवायला लगलो. थोड्या वेळाने माझी एक मैत्रीण तिथं आली. आणि त्या भुताकडे बघून म्हणाली काय cute भूत आहे ना गं हे. मी म्हटलं कुठलं भूत. ए असं काय करते? त्या चौकोनात बघ ना. मी म्हटलं मला फक्त चौकोन दिसतोय. मग तिनं माझ्या शेजार्याला विचारलं. आणि मला सांगितलं की तू त्याच्याकडे बघू नको. आमचे आधी बोलणे झाल्यामुळे आणि त्याचा IQ above average असल्यामुळे मला खाणाखुणा करायची गरजच नव्हती. आम्ही छान २ मिनिटे नाटक केले तेवढ्यात अजून एक ध्यान तिथे आले आणि त्याने declare केले हां मुझे तो दिख रहा है. मग त्या यडपटने आमचे आणि आम्ही त्या मैत्रिणीचे फटके खाल्ले.
|
Chinnu
| |
| Friday, March 03, 2006 - 2:56 pm: |
| 
|
एक काहीतरी s/w होते. नाव आठवत नाहि त्याचे. ते वापरुन, pc चा address अनि कुठल्या time ला काय रन करायचे ते द्यायची सोय होती. अस्मादिकांनी, ते वापरुन TL ची system, main app's compilation ऐन भरात असतांना shutdown केली! दुसर्या दिवशी तोंड वर करुन सांगितले पण, कि ते मीच केले म्हणुन! विचारु नका पुढे काय झाले ते!!!!
|
Nalini
| |
| Thursday, March 09, 2006 - 8:16 pm: |
| 
|
मी डोळ्याच्या डॉक्टरीण बाईंकडे दर वर्षी डोळे तपासायला जायचे. दरवेळेस त्यांचे एकच उत्तर, काहीच प्रोब्लेम नाही. मला भलाता राग यायचा. दर वेळी यांची फी द्यायची आणि वरुन हे उत्तर ठरलेले. मी मात्र माझी जिद्द सोडली नाही पुन्हा चौथ्यांदा गेले. मग त्या म्हटल्या ह्या वेळी तुला चष्मा द्यावाच लागेल. पण नंबर नाही हे सांगायला त्या विसरल्या नाही. किती बरे वाटले, शुन्य नंबरचा का होईना पण शेवटी चष्मा दिला. योगायोगाने दोनदा वैद्यकीय तपासणीत डोळे तपासुन झाले. अजुनही नंबर नाही हे पण चला चष्मा तर आहे ना तेवढेच समधान.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|