Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 10, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through March 10, 2006 « Previous Next »

Divya
Thursday, March 09, 2006 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा हे तुझे किस्से वाचुन बर्याच आठवणी जाग्या झाल्या. नाही माझा नव्हता कुणावर crush पण माझ्यावर असलेल्या येड्याचा येडेपणा राहुन राहुन आठवतोय. रोज मला कॅडबरी आणुन द्यायचा अगदी रोज आणि मला आजिबात आवडायची नाही नन्तर ती कॅडबरी सगळ्या मैत्रीणी खाउन टाकायच्या, फ़ार दिवसानी कळले त्याला तोवर बाकिच्यान्ची मजा..उगीच त्या बिचार्याला छळायच्या तिला हे आवडत ते आवडत म्हणुन पण त्याची कधी हिमत नाही व्हायची डायरेक्ट बोलायची....
सहीच आठवनी आहेत तुझ ते dress लक्षात ठेवण तर ditto


Manuswini
Thursday, March 09, 2006 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस

तुझे मी हे आता वाचले

यार तु पण माझ्याच category तला फरक हाच की मी स्वःता माझे dress repeat होवु द्यायची नाही बारावीला claases ला जाताना आणि म्हणून लिहून ठेवायची. कारण त्या माझ्या बारावितल्या crush ला नेहमी dress वरुन मला compliment द्यायची सवय होती.

त्या दोन महिन्यात मी खुपच कमी Dress repeat केला.
रोज नविन नविन hair style करुन जायची.

you look cute in two ponies असे तो म्हणाला तेव्हा मी रोज दोन pony घालुन जायचे. आई पण आश्च्य्चकित की हिला दोन pony आवडत नाहीत आणि आजकाल दोन pony रोज निराळ्या पिना घेवून pony ला.

मी - काही नाही गरम खुप होते ना आई नाहीतरी summer होता ना तो


Maanus
Thursday, March 09, 2006 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ' दिल चाहता है ' मधला ' सुबोध ' नाहीय.. पन काही क्षण असे असतात जे आपन विसरु शकत नाही.

११ अप्रिल १९९४ वेळ सकाळचे १० वाजुन २ मिनिटे.

class संपवून ती घरी चालली होती. पाठमोरी, तोच पांढरा t-shirt , skirt आठवत नाहीय आता. सायकल असुन, तिला हातात धरुन चालली होती.

तीच्याकडे ती टोपी होती, ' दिल है के मानता नही ' मधे अमिर खानची होती ना तसली. फार comedy दिसायची त्यात ती :-), तो जाड चश्मा आणि टोपी. पन आता दिसण्यावर विचार करण्याच्या पलीकडे गेलेलो मी.

" P..... " तिने मागे वळुन पाहीले.
मला पुढे काय बोलायचे कळत नव्हते... त्यापेक्षा आठवत नव्हते म्हणने उत्तम ठरेल. पहील्यांदाच तिच्या डोळ्यात बघत होतो.
" काय "
" मी एक दोन दिवस english च्या तासाला आलो नव्हतो "
" तर "
" माझ्या मित्रांचे अक्षर मला समजत नाही "
" बर तर "
" मला तुझी वही मिळेल का "
" अम्म्म पन... "
" मी लगेच देतो तुला उद्या "
" बर "

तिच्या त्या काळ्या sack चे एक बक्कल तुटलेले होते. ह्याची मला तेव्हा discovery झाली. तिने वही काढली.

" उद्या नक्की देनार ना "
" हो "

बास तिथुन जी मी धुम ठोकली विचारू नका, हृदय कधी नाही ते इतक्या जोरजोरात ढढडत होते.

घरी आलो, त्या वहीचे किती चुंबन घेतले आठवन नाही.

संपुर्ण वहीची xerox काढली. तिची Y लिहीन्याची एक लकब होती, मी देखील Y मग तसाच काढयला लागलो, अजुनही तसाच काढतोय.


Rachana_barve
Thursday, March 09, 2006 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी कधी मस्करीची कुस्करी होते तसा हा प्रसंग..
नुकतीच ११ वीत Admission घेतली होती. सगळ नविन नविन. आत्तपर्यंत मुलं वर्गात असण्याह्cई सवय नव्हती. पण अचानक भरपूर मुलं वर्गात आली होती.
तर तो रोज मला घरी पोचवायला यायचा. पोहोचवायला म्हणजे मी सायकलवरून कोॅलेजमध्ये जायचे तो आणि त्याचे 2-3 मित्र मागे मागे यायचे. मला आधी वाटल होतं की त्यांच घर पण तिथेच कुठेतरी आहे. एकदा त्याने मला रस्त्यात थांबवले आणि माझी फ़िजीक्स ची वही मागीतली. तो आला नव्हता वाटत आदल्या दिवशी. मी दिली. त्याने त्या वहीत चिट्ठी घालून दिली होती वाटतं. मला काही ती चिट्ठी दिसली नाही. कदाचीत मी ती वही परत घेताना रस्त्यात पडली असेल. गॅदरींगला तो मुद्दाम माझ्याशी बोलायला वगैरे आला. पण आता हे रोजचे झाले होते त्याने मला घरी पोचवणे, उगीच रस्त्यात थांबऊन बोलणे etc त्यामूळे माझी एक मैत्रीण चिडून त्याला बोलली. का आणि कस माहित नाही पण हा प्रसंग आमच्या vice principal कडे गेला. त्यांनी त्या मुलाला तंबी दिली. त्या पट्ठ्याने सांगीतले की आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे
त्या बाई माझ्या आईला ओळखत होत्या. त्यांनी आईला बोलावले. मला ह्या कशाचीच कल्पना नव्हती. घरी आल्यावर आई मला चिडुन बरच काही बोलली. एकतर अपमान आणि आईने विश्वास न ठेवल्याचे दु : ख मी खूप रड रड रडले. त्या मुलाची आई मग माफ़ी वगैरे मागायला आली होती. नशीबाने हा प्रसंग तिथेच संपला. असो, पण हे क्रश वगैरे गंमत म्हणून जोपर्यंत असतात तोपर्यंत ठीक असतात.



Maanus
Thursday, March 09, 2006 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक दिवस luckily ती माझ्या पुढच्या बाकावर बसली. तो गंध... नको त्या आठवनी.

तेव्हा कळाले की तिच्याकडे निळ्या रंगाची point .5 ची pencil आहे. कसेतरी साठवलेले पैसे खर्च करुन जयहिंद मधुन same तशी pecil घेतली. तिला जरा मळवले.

एक दिवस मुद्दामुन तिच्या शेजारच्या बाकावर बसायचा प्रयत्न केला.

शिक्षक बदलतात तेव्हा आम्हाला १० एक मिनिटाचा break असायचा. ती बाहेर गेलेली, कुनाचे लक्ष नाही हे बघुन मी लगेच तीची pencil आणि माझ्या pencil ची आदला बदल केली.

पुढचे रात्री, थोडे काम संपवायचेय...


Maanus
Friday, March 10, 2006 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

back to track

...pencil

सुखाचे दिवस फार काळ टिकत नसतात ना, परत शाळा सुरु झाली आणि आता देवीचे दर्शन फक्त gate मधुनच व्हायचे.

मग आपन फक्त a,b,c,d,e,f,g,h,i,j,k,l,m,n,o,p p p p p पिया.. पिया तुने मेरा जिया ले लिया अशी गाणी म्हनन्यापली कडे काही करु शकत नव्हतो.

आमचा दुधाचा व्यवसाय सुरु झाला होता. अजुन लहान प्रमाणातच होता म्हणुन काही ठिकाणी मी दुध टाकायला जायचो.

एक नविन गिर्‍हाईक मिळाले, एरडंवण्यात. नेमके तीच्या समोरच्या ईमारती मधे. सही, दुध देण्याच्या कामाला मला कधी नाही येवढा हुरुप आला. एक दुध वाटण्यासाठी मुलगा पन सापडला होता. पन मी घरी पटवले की माझा class तिथेच असतो तर सकाळी class ला जाता जाता मी दुध देत जाईल, उगाच त्या मुलाला एका गिर्‍हाईका साठी इतक्या लांब का पाठवता.

तिथे एक झाड होते, बरोबर ७ च्या सुमारास मी तिथे पोचायचो आणि त्या झाडामागे लपुन बसायचो. तेव्हाच ती शाळेत जायला निघायची, आहाहा रोज दिवसाची सुरवात इतकी सुरेख जायला लागली.

परत शाळेच्या gate मधे दुपारी दर्शन व्हायचेच.

असे दिवस सुरु होते. १० वीची परिक्षा आली. तीचा number कर्णाटक हायस्कुल मधे लागला होता, मी अभिनव मधेच. माझा paper कसातरी लवकर उरकुन कर्णाटक ला पळायचो, दिवसभरत दर्शन झालेले नसायचे, त्यामुळे हे महत्वाचे होते


Maanus
Friday, March 10, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१० वी संपली, results घ्यायला शाळेत गेलो.

marksheet च्या xerox attest करायला मुख्याद्यापकांच्या खोली कडे गेलो, नेमकी ती माझ्या पुढे उभी. आपली धडधड येवढी वाढली की काही बोलताच आले नाही.

तरी चोरुन तिची marksheet पाहीली ८९% का ८२% पडलेले. हुशार होती माझी मैत्रिण.

मी मनात म्हटल संपले हे दिवस, हिला येवढे चांगले मार्क मिळालेत, नक्किच ही science ला जानार, आपन राहु ७५% ला कुठे admission मेळतेय का शोधत.

माझा b.m.c.c. मधे नंबर लागला, admission च्या लाईन मधे ऊभा होतो, आमच्या शाळेतला एकपन दिसत नव्हता, बहुतेक मी एकटाच इथे असनार असे दिसले.

तेवढ्यात J.R.D. Tata hall च्या दारातुन कोणतरी एक ओळखीचा चेहरा येताना दिसला.

आईशपथ, ही कसकाय इथे, आकाश ठेंगणे झाले तेव्हा.

बास आपले commerce ला admission घेणे साध्या झाले. आता तरी हिच्याशी मैत्री कर सागर्‍या, एक मन मला बजावत होते.

पन त्या दिवशी पन बोलता नाही आले. आई वडील बरोबर, त्यात माझा number खुप पुढे होता आणि ती खुप मागे, number सोडने परवडनार नव्हते.

कधी नाही ते मला ' मराठी ' विशय घेतल्याचा संताप आल. तिने हिन्दी घेतले आणि त्यामुळे तिचा आणि माझा वर्ग वेगळा झाला.

क्रमश्:


Pendhya
Friday, March 10, 2006 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस,
तेरे नाम पे, गालिब का एक शेर अर्ज है -

दिल - ए - हर कतरा है साज - ए - अनलबहर
हम ऊसके है हमारा पुछना क्या


अनलबहर = मै सागर हूं, मी समुद्र आहे


Pendhya
Friday, March 10, 2006 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या कहें हम अपनी, सिर्फ़ ये अर्ज करते है ------

वो आईने में देख रहे थे बहार - ए - हुस्न
आया मेरा खयाल तो शरमा के रह गये


Maanus
Friday, March 10, 2006 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हितगुज ज्यांनी कुणी चालु केले त्या सर्वांचे आणि arch चा मी सदैव ऋणी राहील.

आताच मला एक message आलाय आणि ती माझ्या तीला ओळखतेय. पुढची माहीती हवी का विचारत आहे. मी तीला हो सांगीतलेय. जर हे झाले ना... आणि मला हे सर्व लिहायला उशिर झालेला नसेल. तर हा crush inflatuation राहनार नाही व खरे खुरे प्रेम बनेल.

private message वाली, घाबरु नकोस, मी काही तिला त्रास वैगेरे देनार नाहिय, ती नाही म्हणाली तरी, पन एकदातरी तिच्याशी बोलायची ईछा आहे.

सर्वांचे त्रिकार धन्यावाद.


Soultrip
Friday, March 10, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Not sure whether this would qualify as 'first crush'! ..I used to like my school teacher very much. She was our class teacher (6th grade!). I used to like her so much (& I being so-called scholar, she used to be nice with me)that sometimes I used to do some mischiefs etc, just to get beaten by her:-)

Detroitkar
Friday, March 10, 2006 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा दहावीत असतानाचा किस्सा. मराठी चित्रसृष्टी अणि TV मधील सध्याची एक नावाजलेली अभिनेत्री माझी classmate (मुला मुलींचे वर्ग एकत्र होते तो पर्यन्त). शाळेतील तमाम मुलांच्या "दिल कि धडकन". इतक कि तिच्या वर crush असण्या साठी सुद्धा token system ठरवली होती. (आमचा नम्बर que मधे मागे अगदी शेवटी.) त्यातुन ति दिसायला सुंदर "गुलाब कि कली" type अणि मी एकदम "गोबी का फ़ुल" type त्या मुळे major complex . तेव्हा द्राक्ष आंबटच असतात अशी मनाची ठाम समजूत. (संदर्भ कोल्ह्याला द्राक्ष ...)

तर किस्सा असा की दहावीत एका class साठी मी आणि माझी एक बाल्-मैत्रिण (ह्याला समानार्थी fashionable शब्द नाही का एखादा?) बरोबर जायचो. class तसा लांब होता, त्यामुळे दुपारी एक च्या चांदण्यात cycle हाणत जायला जाम कन्टाळा यायचा. आपली हिरॉइन सुद्धा त्याच class ला यायची. एकदा तिने class संपल्यावर विचारल कि आपण सगळे जवळपास रहातो, तर एकत्र class ला येत जाउया का. मी cycle च्या सिट वर बसुन (एक पाय खाली टेकवुन अणि दुसरा हवेत तरंगत अश्या अवस्थेत) ऐकत होतो. cycle सकट कोलांट्या उड्या मारण्याची तिव्र इछा झाली. पण तो stunt लोकांसाठी प्रेक्षणीय असला तरी माझ्या साठी फ़ार सुखद नाही हे अनुभवावरुन शिकलो होतो, म्हणुन मनातल्या मनात १०० उड्या मारल्या.

मग नंतर ती corner ला आमची वाट पहात असायची. अणि आम्ही तिघ एकत्र class ला जायचो. थोड्या दिवसात भिड चेपल्यावर मी तिच्याशी गप्पा मारायला लागलो. हिन्दि चित्रसृष्टी, भारतीय राजकारण, जागतीक लोकसन्ख्या, उष्ण कटिबन्धातील रब्बी पिके अश्या रम्य विषयावर चर्चा चाले. romantic बोलणे म्हणजे काय हे जर कळत असते (तेव्हा अणि आता सुद्धा) तर काय. पण Archie's, TinTin comics , Bud Spencer, Terrence Hill चे comedy movies असे बरेच common intereset चे विषय सुद्धा चालत.

शाळेत ही बातमी कळाली आणि माझा भाव एकदम वधारला. "अन्दरकी बात" (म्हणजे तिच्या आवडी-निवडी, तिचा कोणावर crush आहे का ( high hopes ! ), वैगरे) जाणुन घेण्या साठी सगळे माझ्या मागे. (तिला Bud Spencer, Terrence Hills चा crime busters आवडला हे सांगीतल्या वर अख्या वर्गानी तो movie बघीतला.)

तर मुळ मुद्दा असा कि मित्रांना ( token no १ ते ५) मदत करताना माझा crush माझ्या मनातच राहिला. घरी सगळ्यांना हे माहित आहे. बायकोला सुद्धा. त्यामुळे तिचा एखादा movie किंवा कार्यक्रम बघताना सगळे "बिनधास्त" मला चिडवत असतात.


Maanus
Friday, March 10, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रमैत्रिणींनो

काल भावनांच्या भरात बरेच काही लिहुन गेलो. घरी पोचलो तरी त्याच विश्वात होतो.... मग तिच्या मैत्रिणीचे पत्र आले... तिला reply केला... परत तिचा reply आला.

मग सगळे काही बदलले. मिनु ने जे वर लिहीले तसले विचार मनात यायला लागले. माझे ठिक आहे हो, माझ्या घरी आणि सगळ्या मित्रांना हे माहीत आहे. त्यामुळे मी कितीही बडबड केली तरी मला काही फरक नाही पडनार, पन तिचे काय... मला लिहायला उशिर झालाय. तिचे तर लग्न झालेय, दिड वर्षाचा मुलगा आहे. उगाच मी वर दिलेल्या ref मुळे तीला uncomfortable feeling नको यायला. रात्रभर हाच विचार मनात येत होता.

त्यामुळे मी ही कहाणी येथेच संपवतो. तुम्हीपन अधुरी एक प्रेम कहाणी असे समजुन घ्या. पुढे काही फार विषेश असे झाले नव्हते. राहीलेली कहाणी बायकोसाठी राखिव ठेवतो.

Anyway spring has again sprung in New York City; I was able to see a small green leaf on tree across my place. Time for new crush now. Any maaybolikaran staying near-by want a NYC Guide?


Maitreyee
Friday, March 10, 2006 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Detroitkar , विमलाबाई गरवारे प्रशाला का :-)
माणूस, मस्त लिहिलीस तुझी कहाणी!
ही शेवटची २ वाक्ये तर सहीच


Detroitkar
Friday, March 10, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>Detroitkar , विमलाबाई गरवारे प्रशाला का
St. Vimlis indeed

Arch
Friday, March 10, 2006 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाळेतील तमाम मुलांच्या "दिल कि धडकन" >>

अस असेल तेंव्हा आमच्यावेळी एखाद इब्लिस कार्ट उठवून द्यायच अरे तिला BF आहे म्हणून. मग मुलांचा दौरा इतर कोणाकडे वळला की हा तिच्याशी जाऊन मैत्री करायचा. competition तेंव्हा फ़ारच कमी झालेली असायची.

Deepanjali
Friday, March 10, 2006 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

NDA cadets.... हमेशा crush थे हमेशा रहेंगे( आणि ते ही पंजाबी मुंडे असतील तर मग सोन्याहून सोनेरी) .
बाकी In general list endless..
:-)

Sas
Friday, March 10, 2006 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mine is like Hindi Movie

माझा बाल मित्र माझ्या मागे बरिच वर्षे होता,
पण कळलच नाहि कधि त्याच मन .

त्याच वहिवर S गिरवत रहाण, वर्गात माझ्या बाजुच्या
बाकावर बसण, माझ्या पेन्सिलि सारखी पेन्सिल वापरण
शाळेनंतर पुढे माझ्या कोलेज मधे येण , माझ्या वर्गासमोर उभरहाण.

३-४ वर्षे कदाचित त्याहुन जास्तच, कारण मला तो माझ्या मागे आहे हेच (शाळेतल्या)वर्गातल्या मुलिंकडुन कळाल, माझ्या सोबत बसणारि सुप्रिया म्हणालि "तो तुझ्याकडे बघत असतो; तुमच आहे अस मुलि म्हणतात" तेव्हा हे अस काहि चाललय समजल.

इतर मुलिच सांगायच्या "बघ त्याने तुझ्या पेन्सिलि सारखि पेन्सिल घेतलिय, तो बघतोय..."

लहानपणि एकत्र खेळायचो, आम्हि एकाच वर्गात म्हणुन
आजुबाजुचे आम्हाला एकमेकांच्या नावाने चिडवायचे, त्याच्याशि कधि बोललेपण न्व्हते.
अचानक शाळेत हे सार, त्याला राखि बांधलि (मि त्याला राखि बांधतेय हे इतर मुलिंना पहयच होत म्हणून त्या आल्यावर त्यांच्या समोर शाळेत "राखी" च्या दिवशी हा प्रोग्राम पार पाडला)

तरिहि तो बघायचा,१० वि नंतर शाळा सुटलि तो Commerce
ला पण माझ्या कोलेजला यायचा, पण कधि कहि जाणवलच नाहि

अचानक त्याच येण बंद झाल, हे हि खूप नंतर जाणवल.

१० वि त English साठि जोशि सरांचा Class लावला
Class चा पहिला दिवस

त्याला पाहिल आणि "हाच तो, माझा , मला हवा असलेला.."
Love at first sight अस झाल.

त्याच्या कडे बघत रहायचे, त्याच्या शाळेत हिरो होता तो.

नशिबाने १० नंतर एकाच College मधे आलो, त्याचा खुप पिछा केला, त्याच्या साठि खुप रडले, कुढले,
कविता,चारोळ्या केल्या, त्याला एकदा भेट्लेहि, ४ वर्षे Try केल पण No Success at all.

एका संध्याकाळि अचानक जाणवल, तो कुठे गेला, आधि रोज दिसायचा आता दिसतच नाहि ,त्याला मी आवडायचे पण मला उमगलेच नाहि आणि मला दुसरच कोणी तरि आवडु लागल त्यामुळे hmmm

Sas
Friday, March 10, 2006 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ पुक्या (जो मला आवडायचा, त्याला लाडाने मी) प्रकरण इथे नाहि संपत हो,
हा एक Crush/Love triangle झाला, पण अजुन इतर Angle व किस्से बाकि आहेत Share करायचे

पुक्या, त्याच हसण, त्याचे पिंपल,डोळे, तुटकी भुव ई
त्याचा D.D.L.J. type T-shirt, त्याचि Sac, त्याचि सायकल, त्याचा पेन .....सार अजुन आठवत

तो कोणत्या दिवशि कोणता Shirt घालतो watch करण,
त्याचा हा shirt मग माझा हा dress ठरलेल
Dress वेळापत्रकात जास्त बद्ल नाहि व्हायचा

एकदा मी मुद्दाम नवा Dress घालुन गेले म्हटल
बघु हा उद्या काय घालुन येइल तर त्याने सुधा
नवाच dress घातलेला त्यादिवशी, Love Co-incidence

अजुन बरच काहि आहे

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators