|
Arch
| |
| Wednesday, March 08, 2006 - 8:32 pm: |
| 
|
माझ दुःख ह्यावरची postings वाचली आणि वाटल हा नवीन thread उघडूयात. लहानपणापासून प्रत्येकाचा कोणावरतरी crush असतो. म्हणजे infatuation किंवा fascination म्हणा हवं तर. हे काही काळापुरतच असत. मग त्यातील interest कमी होतो आणि व्यक्ति बाहेर पडते. म्हणजे त्यावेळेपुरत ते प्रेम वाटत असत पण ते प्रेम नसत तर नुसता crush असतो. अगदी लहानपणी लहान मुलांचा पहिला crush म्हणजे त्यांचे teacher वगैरे. मी college मध्ये असताना माझ्या मैत्रिणीचा एका Prof वर crush होता. सगळ्या group ने त्यांच lecture cut केल तरी ही जाणार आणि हो अगदी छान कपडे घालून. डोक्यात lecture शिरणार नाही पण खुदुखुदु हसत lecture संपल की बाहेर येणार. असो. बघू कोण काय लिहित ते.
|
मी बारावीत असताना एका मुलावर मेजर क्रश होता माझा. त्याची काळी जुल्फ़ काळेभोर डोळे.. वगैरे वगैरे आणि जाम हुषार पण होता.. तर त्याला बघण्यासाठी फ़क्त कोॅलेजमध्ये जायचे मी अस वागायला लागले. तो दिसला नाही की माझ लक्ष वगैरे लागायच नाही. आणि त्याच्या ग्रुपची आमची ओळख झाली त्यात. मग फ़ोन exchange झाले. एकदा तो मला म्हणाला की मी आज फ़ोन करतो तुला. तर मी फ़ोनपाशीच सतत. प्रत्येक फ़ोन वाजला की धडधड.. मग तो फ़ोन का करत नाही म्हणून त्याला फ़ोन केले आणि त्याचा हॅलो आला की घाबरून फ़टाकन आपटला पण होता फ़ोन. असो, तर एकदा माझ्या बाबांनी थायलंडहून माझ्यासाठी सही पेन आणल होत. तर त्याने ते बघायला मागीतल. आणि संध्याकाळी त्याने ते return केलं तर त्या पेनवर त्याने एक बदामाच स्टीकर लावला होता आणि त्या बदामात KR लिहिल होत. झाल. माझी रात्रीची झोप गायब. पण १२वी नंतर मग फ़ारसा संबंध राहिला नाही. आणि मग तो त्याच्या वाटेने मी माझ्या. नाही म्हणायला TE मध्ये मला भेटायला आला होता पण तोपर्यंत माझा क्रश गायब झाला होता
|
Maanus
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:09 pm: |
| 
|
बापरे... आता ह्या BB वर कमीत कमी १०० पोस्ट तरी माझ्याकडुन. माझ्या infatuation ला सुरवात झाली ८ वीत असताना, ती collage संपले तरी होती... पन हे नंतर सांगेल कारण ती खुप मोठी story आहे. आता latest सांगतो. काही दिवसांपुर्वी marisa माझ्या शेजारच्या desk वर आली, थायी सौदर्य सौदर्य जे मी फक्त ऐकत होतो ते आज प्रत्यकक्षात माझ्या समोर होतो. मला खुप बरे वाटले, तिला जवळ पासच्या सगळ्या hotels मधे घेउन गेलो, एकदम १८-१९ वर्षाचीच दिसत होती ती. तिची एक गोष्ट फक्त मला खटकत होती weekend ला new york भटकायचे सोडुन ती दर weekend ला न चुकता chicago ला जायची, एक दिवस न राहुन मी तिला विचारले बाई chicago ला काय आहे, दर weekend ला तिकडे का जातेस.... Oh! didn't I tell you, my husband is in Chicago तीने हे सांगीतल्यावर जो माझा चेहरा झाला... विचारु नका. अजुनही ती मला त्यावरुन चिडवते, नंतर मी तीला तिचे वय विचारले, २६ वर्षाची होती ती. मधे तीने परत chicago बदली करुन घेतली, न चुकता मी तिला तीच्या happy birthday ला फोन केला. तर म्हणते Saagar, Did I tell you, I am expecting baby in April मी फोन ठेउन दिला. पन काही म्हणा Thai बायकाचे वय guess करने अशक्या गोष्ट आहे.
|
Maanus
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:15 pm: |
| 
|
आमच्या office मधे security check करनारी एक mexican मुलगी आहे, ती पन मला आवडायची, कधी कधी माझ्य sack मधल्या गोष्टी पाहून माला काय काय प्रश्न पन विचारायची, चिकार गप्पा मारायची... मला वाटायची ही तरी एकटी असेल, हि तरी आपली मैत्रिन बनेल.... पन हे काय गेल्या आठवड्यात तिने पन मला मी मामा बननार आहे ह्याची गूड न्युज दिली.
|
Maanus
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:26 pm: |
| 
|
marisa आधी माझ्या समोर एक भारतीय मुलगी आली. वा! माझे हृदय उड्या मारायला लागले. आहाहा... आमच्या team मधे मी एकच भारतीय असल्याने आणि ती नुकतीच US मधे आली होती म्हणुन तिला पन माझ्याशीवाय काही पर्याय नव्हता. मला वाटले, ही बायको category तली मुलगी दिसतेय. तिला संपुर्ण new york फिरवले, in fact तिनेच मला फिरवले... brooklyn bridge, staten island ची फेरी, वैगेरे वैगेरे... रोज lunch पन एकत्र. एक दिवस मुलगी फारच खुष दिसत होती. मी: " क्या रे आज बोहोत खुष दिख रही है? " ती: " हा... " लाजुन " वो आ रहा है! " मी: घाबरुन " वो कौन " ती: " मेरा Fiance" ता.क. crushes मधे पचका वडा झाल्याचे किस्से लिहायला परवांगी असावी.
|
Ajay
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:32 pm: |
| 
|
एकाच चेहर्याला मी आठवू कशाला जखमी करून गेले, बिचवे तर्हेतर्हेचे सुरेश भट
|
Maitreyee
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:33 pm: |
| 
|
माणूस तू आता next time आधी fiance/ husband नाहीय ना ते विचारून मग च New York दाखवायला ने बरं ~D
|
Maanus
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:36 pm: |
| 
|
बर मी आता माझ्या infatuation ला सुरवात करतोय, पन एक लक्षात घ्या मी ह्याच्याशी अजुनही emotionally attached आहे. ७ वर्ष चाललेले ते प्रकरन त्यामुळे असे सहजा सहजी संपनार नाही... तिच्या विषयी माझी बडबड ऐकुन माझ्या शेजारच्याने माझ्याशी बोलने सोडुन दिले होते... आता तुम्ही लोक आग्रह करत आहेत म्हणुन मी माझ्या आठवणिंना परत उजाळा देतोय. तहान भुक वेळ काळ सगळे हरपुन मी जीच्या मागे लागलो होतो ती कहाणी. ७ वीत असताना प्रथम आमचा संबंध आला. मी तर तीला पाहीले पन नव्हते हो, पन माझे नाव आणि तेचे आडनाव एकच असल्याने खुप मुल मला तिच्या नावाने चिडवायचे... आणि ते वय पन तसच असत, ८ वीत गेल्यावर माझ्या पन मनात उकळ्या फुटु लागल्या आणि मी पन कोन ती कोन ती ह्याचा शोध घ्यायला लागलो... क्रमश्:
|
Manuswini
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:59 pm: |
| 
|
ही एक crush माझी मी college ला असतानाची गोष्ट आहे ही. मी तेव्हा भारतात होते. मी आणि माझे एक best friend प्रिया आम्ही computer classes NIIT मधे जायचो. एक faculty एतका cute and handsome होता ना पण unfortunately तो माझ्या दुसर्या मैत्रिणिला शिकवायचा आम्हाला होता तो टकल्या faculty . रोज मी आणि प्रिया म्हणयचो काय च्यायला हा टकल्या आजारी का नाही पडत आणी तसच झाले. प्रियाने मला एकदा खुशीत phone केला मनु अरे आज class बिलकुल miss नहि करना मुझे खबर मिलि है की राजेश तकलू के बदले class लेगा. घरी त्या दिवशी मी बरे नाही सांगून college ला पण गेले न्हवते घाईत तयार होवून गेले. पण काय तो फक्त एक दिवसच होता दुसर्या दिवशी परत टकल्या. आम्हाला मात्र रोज दूरून दर्शन व्हायचे. प्रियाने तर कळस केला माझ्या पेक्षा ती एवढी Crazy की चक्क तिने तिथे फुकट part time lab instrcutor म्हणून नोकरी पकडली ते पण ४ त ८ एतक्या उशीरा का तर राजेश संध्याकाळच्या batches घ्यायचा. मी आळशी एतके कशाला मरा. मी म्हटले कर तुच. रोज रात्री ९ वाजता हिच्या गप्प यार मनु क्या दिखता है वोह, pink shirt डाला था. एक दिवस असच दुःखी होवून फोन केला मनु पता है राजेश की girlfriend है. एकदम काली कलुटी मी तिला हसून म्हटले यार तेरा ४ से ८ का नोकरी पे पानि
|
Bhagya
| |
| Wednesday, March 08, 2006 - 11:23 pm: |
| 
|
माणूस! काय माणुस आहे यार! ह्याने तर माझ्या नवर्याच्या मित्राला पण मागे टाकले. माझ्या नवर्याच्या मित्राचे ७-८ मुली बरोबर infatuation होते. पण एकिने ही त्याची दखल घेतलि नाही. तो पण अगदी आनंदाने "मैने किसी को नहि छोडा यार, उन्होनेही मुझे छोड दिया" असं सांगतो!"
|
Giriraj
| |
| Thursday, March 09, 2006 - 7:34 am: |
| 
|
ऐ वाइज ऐ नादाँ करता है तू एक क़यामतका चर्चा यहाँ रोज़ निगाहे मिलति है यहाँ रोज़ क़यामत होती है!
|
Jayavi
| |
| Thursday, March 09, 2006 - 1:26 pm: |
| 
|
हाय हाय..........मार डाला रे
|
Jaaaswand
| |
| Thursday, March 09, 2006 - 1:48 pm: |
| 
|
वाह वा.. गिरी क्या बात हें चला एक किस्सा माझा... ( एकदम दहावीचा सांगतोय ) मी अभिनव मराठीचा.. आणि आमच्या समोर अभिनव इंग्लिश ज्यात ८वी ते १०वी च्या batches होत्या.. त्यातली १० वीच्या batch मधली... नाव नाही माहित..पण आडनाव " दशरथ " असे काहितरी होते... ..मला अफ़ाट आवडली होती ती... ( अर्थात मी काही एकटा नव्हतो ) एकदा मी vollyball खेळत असताना तिने हसून पाहिले होते समोरून..त्यानंतर काय झाले काय माहीत...पळता पळता आणि ball control करता करता.. सायकलच्या बॅरिकेडस वरून ऊडून पडलो होतो त्यानंतर मी एक गोष्ट सोडून दिली...................... जास्वन्द...
|
Meenu
| |
| Thursday, March 09, 2006 - 2:05 pm: |
| 
|
मला माझ्या office मधला एकजण तूफान वगैरेच आवडायचा...या वयातही : ( . इतका की तो समोर असला कि मला बोलताही येईना घशाला एकदम कोरड.... : ) मामला खूपच गंभीर बनता बनता राहीला पण एकंदरीत काय कामाच्या ठिकाणी अस काही झालं तर फारच पंचाईत होते...... लग्नाआधीचे crush ठिक रे पण लग्नानंतर अस काही होणं म्हणजे खूप मोठं संकटच झालं... अजूनही मला मनातुन भिती वाटते की तो समोर आला तर काय होईल याची. वेड्यासारखच craze आहे मला त्याचं!!!
|
Maitreyee
| |
| Thursday, March 09, 2006 - 2:53 pm: |
| 
|
आमच्या कॉलेज मधे असाच एक अगदी सही ss , Handsome Hunk वगैरे म्हणता येईल असा मुलगा होता! अर्थात आमच्या ग्रुप सकट अनेक पोरीन्चा major crush होता तो कुठल्या class मधे हे तर अगदीच प्राथमिक झाले पण, तो केव्हा येतो, तो केव्हा जातो, त्याचे practs केव्हा कुठे असते सग्गळे आम्हाला (म्हणजे बहुधा कॉलेज च्य आर्ध्या पोरींना!)ठाऊक असायचे! मग काय त्याला पहायला जाणे, त्याची एकमेकीत चर्चा हे इतके obvious झाले होते की दोन पोरी एकमेकीला भेटल्या की नुस्ते " आज आला नाही का गं " , किन्वा " आज yellow shirt! मस्त दिसतोय! " अशी वाक्ये बोलताना कुणाबद्दल बोलत आहोत हे पण सांगायची गरज पडायची नाही!! आता हे आठवून असलं funny वाटतय!! आणि आता एक प्रश्न पण पडतोय की तो कधीच कुठल्याच मुलीबरोबर साधे बोलताना पण दिसला नाही! आमच्या माहितीप्रमाणे तरी कोणीच gf नव्हती हे कसे काय
|
Arch
| |
| Thursday, March 09, 2006 - 3:30 pm: |
| 
|
अरे वा! सगळ्यांच्या शाळेच्या - college च्या आठवणी उजळल्या की. college मध्ये असताना आमच्याच group मध्ये एक मस्त दिसणारा आणि तरिही? अभ्यासात हुषार असलेला मुलगा होता. group मध्येच होता म्हणून कोणाला सांगताही यायच नाहे की त्याच्यावर crush आहे म्हणून. आणि ह्याची एका arts च्या सुंदर मुलीवर line . हा IIT ला निघून गेल्यावर तिच एका army officer शी लग्न झाल college मध्ये असतानाच. तो IIT हून सुट्टिवर आल्यावर जेंव्हा भेटला तेंव्हा मी त्याला पहिल्यांदा काय सांगितल असेल तर अरे त्या तुझ्या हिच लग्न झाल की. मग काय available आहे म्हटल्यावर असेल पण माझाही interest खतम झाला 
|
Champak
| |
| Thursday, March 09, 2006 - 3:32 pm: |
| 
|

|
Seema_
| |
| Thursday, March 09, 2006 - 4:44 pm: |
| 
|
मला तर पाण्यात डुबक्या मारल्यासारखे वारंवार crushes व्हायचे . म्हणजे मोजलेच तर ५६ झाले असतील . प्रत्येकवेळी आपल वाटायच हाच ' तो ' . मग ५७ व्या crush ला मी सोडलच नाही . वाण्याकडुन पुडाचा दोरा आणला आणि त्याला वडाच्या झाडाला बांधुन टाकल . आणि मी ७ फ़ेरे घातले . तेव्हापासुन माझा तो crush ५ वर्ष झाली आमच्या घरीच राहतो . निदान ह्या जन्मात तरी crush होण्याची माझी हौस फ़िटली . पुढचे ६ जन्म बघु आता काय काय होत ते .
|
Manuswini
| |
| Thursday, March 09, 2006 - 6:17 pm: |
| 
|
चला आता मी अगदी पहिल वहिला Crush लिहिते माझा.. तेव्हा मी बाराविच्या vacation claasess ला agrawal ला जायचे. जवळपास हा मूंबईतील famous clasS , अगदी हुशार, दिसायला छान मुले यायची. सुरवातिलाच मला एक मुलगा आवडला. उंच,बोलके डोळे,गोड smile आणि important म्हणजे हुशार असुनहि आगावू नाही वाटला. रोज वाटायचे की त्याच्या बरोबर शेजारच्या row मधिल bench वर बसायचे. पण मी एक notice केले की एक जाडी नेहमि अगदी त्या bench वर बसलेली असायची. आणि हा सहसा कुणाशी नाही बोलायचा पण जाडीबरोबर हसुन बोलत असायचा. मला वाटयचे काय ह्याने अक्कल गहाण टाकली काय? एक दिवस जाडी नव्हती, मी अगदी आंन्दाने ती seat मिळवली. तो काहीतरी खाली मान घालून लिहित होता. मी माझ्याकडे pen नाहीचा बहाणा केला, त्याने हसून pen दिले. आणि लगेच म्हणाला you are manuswini ..right (मी एकदम उडाले ्याला कसे माहित?). त्याचे पुढे चालुच.. you are from xyz school?, stay in xyz? खुपच गोंध्ळलेली पाहुन म्हणाला my cousin stays in your complex . आता ह्याची cousin कोण? oh ... मी मनात ती जाडी ह्याची cousin चला एक खात्री पटली ह्याला सुद्धा मी आवडते, त्या जळकट जाडीने मनुस्विनिशी ज्यास्त मैत्री करु नकोस जरा आखडू आही सांगितले. bottomline त्या दोन महिन्यात आमची छान दोस्ती झाली. पण काय ना त्या वयात बारावी नंन्तर काय करणार, physics किति आवडतो ह्याच्याशिवय गप्पा झाल्या नाहित. पण तो नेहमी आवडीने गप्पा मारायचा class सुटल्यावर. नंतर vacation claasees संपला. आम्ही नंतर असेच भेटायचो कारण तो ruia चा आणि मग काय 12th मधे busy झालो. पण काय न ते असे झाले हम तुमसे ना कुछ कह पाये तुम हमसे ना कुछ कह पाये.
|
Maanus
| |
| Thursday, March 09, 2006 - 6:53 pm: |
| 
|
८ वीत गेल्यावर माझ्या पन मनात उकळ्या फुटु लागल्या आणि मी पन कोन ती कोन ती ह्याचा शोध घ्यायला लागलो. मुलींची शाळा सकाळी असायची, व मुलांची दुपारी. आमच्या अभिनव मधे सायकल आत न्यायला व बाहेर काढायला एकच gate होते. त्यामुळे प्रथम सकाळच्या शाळेतल्या सगळ्या मुलींने सायकली बाहेर काढेपर्यंत आम्हाला gate बाहेत थांबावे लागायचे. माला पन आता कोण ही मुलगी हे पहायचेच होते त्यामुळे मी सगळ्यात आधी जाऊन बरोबर एकदम gate समोरच waiting spot पकडायचो. काही मित्रांना ती कोण हे माहीत होते, त्यांना पन यायला सांगीतले. म्हणजे मला तरी कळेल " वो कौन है " अजुनही मला शाळेतली ती आठवते, purple color ची Lady Bird घेउन येतानाची... तीचे साधना cut style चे केस... डोळ्यावरचा जरा जास्तच number चा चश्मा... पाठीवरची काळी sack ... शुभ्र blouse निळा skirt ... जीव गेलेले socks आणि निळे canvas चे बुट... आणि मग तिचा तो स्मित हास्य असलेला चेहरा... आता त्या वयात काय कळतय... पन मी भुरळुन गेलो. मग ते रोजचेच झाले, दुपारच्या शाळेसाठी सर्वात प्रथम मी शाळेबाहेर असायचो.... ती पन हळु हळु लगेच सायकल वर टांग टाकुन न जाता थोडा वेळ सायकल हातात घेउन चालत जायची.... ८ वीचे वर्ष असेच संपले. मग आली ९ वी आली, आमच्या गणवेशात बदल झाला full pant आली, पन ९ वी पन फक्त तीला gate मधुन बघण्यात गेली... त्यापलीकडे काही करण्याची हिम्मत नव्हती... तीला पाहीले तरी आजुबाजुचे सगळे आवाज बंद व्ह्यायचे आणि माझ्या तोंडातुन पन काही बाहेर नाव्हते येत. क्रमशः
|
Maanus
| |
| Thursday, March 09, 2006 - 7:23 pm: |
| 
|
ए अरे मी आता control नाही करु शकत, म्हणुन पुढचे लगेच लिहीतोय. नाही म्हणायला ९ वी मधे तिची चिकार माहीती काढली. एरंडवण्या मधे कुठेरती रहायची ती. माझे भावी सासरे, त्यांच्या व्याह्या प्रमाणे bank manager होते. घरी एकदा असेच काहीतरी बोलता बोलत कळाले की रत्नागीरी मधे आमच्या शेजारी ' समुद्र ' रहायचे. तेव्हा मी दिड एक वर्षाचा असेल. झाले मला वाटले की जगात ही एकच ' समुद्र ' family आहे आणि हेच आमच्या शेजारी रहायचे... छ्या ह्या लोकंनी बालविवाह पध्दती का बंद केली... शेजारी शेजारी म्हणुन तेव्हाच आमचे लग्न झाले असते ना. रत्नागीरीचे ' समुद्र ' म्हणजे ही नव्हे हे माला खुप खुप ऊशिरा तिच्याकडुनच collage मधे गेल्यावर कळाले. माझ्या एक दोन मोठ्या मावस बहीनींना पन मी तिच्या बद्दल सांगीतले, ओह... कसकाय सांगीतले हे तुम्हाला सांगायलाच पाहीजे की. वरती मनू ने उल्लेख केलेल्या अगरवाल क्लास मधे ते physics चे अणु table लक्षात ठेवायची एक idea सांगीतली जाते... माला आता नक्की नाही आठवत पन काहीतरी असे आहे ते ' ह, हे, ली, बे, ब, क, न, स ' तर हे माझी मावस बहीन मला सांगत होती. तर त्यातला एक अणु sp असा आहे. मी उगाच तो अणु पाठ करताना खुप blush करतोय हे बहीनीच्या लक्षात आले. काय काय म्हणुन विचारले तर मग सांगीतले. जानकारांना तीचे नाव P पासुन सुरु होते हे लक्षात आलेच असेल. दरम्यान ' डर ' आला होता... त्यातला तो क्षण आठवतो का, जुही एकदा शहारुक च्या घरी लग्नाची पत्रिका द्यायला येते, आणि शहारुक आतल्या खोलीत होता तरी त्याला नुसते वासावरुन कळते की जुही येउन गेली... हे असले काहीतरी व्हायला लागले माझ्याबरोबर... उगाच कोणीही घरी आले तरी तिच आली असे वाटायचे. बास, पुढचे रात्री लिहीतो, नाहीतर काम संपनार नाही.
|
Maanus
| |
| Thursday, March 09, 2006 - 9:01 pm: |
| 
|
उगाच कोणीही घरी आले तरी तिच आली असे वाटायचे... ९ वी मधे आमचा खानापुर ला ४ दिवस camp जात असतो, त्यात पन मुलींचा आधी मग त्या जेव्हा त्या घरी जात असतात तेव्हा आम्ही तिथे पोचतो. किती ती माझी धावपल चालली होती ती बस मधे चढताना दिसतेय का बघायला. कोणत्या camp मधे ती राहीली असेल... ९ वीची उन्हाळ्याची सुट्टी आली. सगळे जन आता १० वी हे सारखे बजावु लागले... पन आपले मन मात्र आजुनही रत्नागिरीत आम्ही एकत्र खेळत असु का ह्या विचारात? मग तिची birthdate कळाली, २५ डिसेंबर १९७९... माझ्यापेक्षा मोठी आहे. मन थोडे हिरमुसले, आठवडाभर कशात लक्ष लागेना. पन तरीदेखील तिचा विचार काय मनातुन जात नव्हता. स्वाध्याय मधे १० वीचा summer class लावला. खर्या अर्थाने १० वीचा पहीला दिवस होता तो. Bata च्या शेजारच्या parking मधे सायकल लावली, आणि वर जानार तेवढ्यात.... ती दिसली. स्वाध्यायच्या मागच्या बाजुला गर्द हिरव्या झाडींचा रस्ता आहे... तिथुन ती चालत येत होती, पांढरा t-shirt आणि पांढरा skirt . आज पहील्यांदाच तिला शाळेच्या गणवेशा व्यतीरिक्त दुसर्या कोणत्या तरी dress मधे तीला बघत होतो... सगळ जग थांबले होते हो तेव्हा. पन जशी जशी ती जवळ आली तसे माझे हृदय फारच जोरजोरात धडधडायला लागले मी लगेच classroom मधे पळालो. English च्या क्लास साठी ती सकाळी ६ च्या batch ला यायची, मी पन माझ्या English च्या तासची वेळ ६ वाजताची करुन घेतली. तुम्हाला सांगतो, अक्षरशः तीने त्या summer batch मधे रोज कोनता dress घातलेल हे देखील मी लिहुन ठेवले होते. एक सिल्क सारखा निळा सल्वार कमिज, एक गुलाबी, तो पांढरा t-shirt येवढे आता आठवतेय. पन त्यावेळेस मी ती आज काय घालुन येईल हे पन guess करायला लागलो होतो. १-२ वेळाच माझा guess खरा ठरला. anyway अजुनही तिच्याशी बोलायची मात्र हिम्मत झाली नव्हती.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|