|
वा पापलेट नि कुर्ल्या चे नाव काढताच निलु खुश.. कुर्ल्यांचेच फोटो टाक मग बघ निलुकडुन बक्षिसपण मिळेल प्रवास चांगला वाटला..
|
Chinnu
| |
| Thursday, March 16, 2006 - 9:45 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नीलु अग अजुन कुठे संपलाय प्रवास? अलिबाग ते मुंबई प्रवास येईल बघ पुढच्या भागात. हो क्की नय गो रूप्स?
मज्जा आली वाचुन. अजुन detailed लिहत जा. हे पण छान आहे.
|
Athak
| |
| Tuesday, March 21, 2006 - 11:44 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
रुपाली , छान लिहीलेस . मी अलिबागला ४ वर्षे होतो , वर्णन वाचुन अलिबागला मनोमन परत पोचलो , तो नागांव बीच किहीम बीच रेवदंडा ते वळणाचे रस्ते त्यावरुन भरधाव धांवणारी माझी मोटरसायकल ( double seat ) सगळ आठवले अलिबागच्या समुद्रात एक किल्ला आहे , ओहोटी असली की जाता येते , जावुन आलीस का ? कारण भरती आली की परतणे कठिण
|
रुपाली, अथक नि म्हटल्या प्रमाणे, नेगाव नाहि, त्याच्य नाव नागाव आहे. वर्णन खुप मस्त आहे पण चौल ते बिर्ला तसेच तिथुन किहिम किति तासाचा प्रवास आहे ते नाहि नमुद केलस???
|
नीलुताई, योगी, चिन्नु, अथक,राजा सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल मन:पुर्वक धन्यवाद. हो अथक, राजा मला ते नाव अगदी ठामपणे माहित नव्हते. चुकिबद्दल क्षमा असावी. चौल ते बिर्ला मंदिरचा प्रवास आम्ही ३०-४० मिनिटांत पार पाडला. आणि बिर्लामंदिर ते किहिम बिचचा रस्ता १८-२० (oneway) किलोमीटर आहे.
|
अलिबागच्या किल्ल्यात नाही जाउ शकले कारण दुपारी ११ च्या सुमारास पोचल्यामुळे भरती होती.
|
Rajkumar
| |
| Wednesday, March 22, 2006 - 8:05 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आत्ताच वाचले हे सगळे. मस्त लिहीलयस गं रुपाली. बिर्ला मंदिरापर्यंत आली होतीस तर तिथुन थोडे पुढे यायचे ना.. आमच्या मुरुडपर्यंत. ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
धन्यवाद राकु, तु मुरुडचा का? मुरुड जांजिराची ट्रिप ठरवत आहोत पण वेळ आहे अजुन. ठरली की नक्किच सांगेन तुला..
|
Rajkumar
| |
| Wednesday, March 22, 2006 - 10:18 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो,मी मुरुडचाच. लवकर ठरवा ट्रिप. उन्हाळ्यात पाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो तिकडे.
|
धन्यवाद राकु, आता मी हिवाळ्यातच येईन तिकडे..
|
>>>>> लवकर ठरवा ट्रिप. उन्हाळ्यात पाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो तिकडे. कुमार... याला आमंत्रण म्हणायच की पलायन म्हणायच रुपाली तुम्ही चुकी केलात... बिर्ला मंदिरला जायच तर संध्याकाळी. ते स्वर्गीय वातावरण सर्व ज्ञानेंद्रियांना प्रफ़ुल्लीत करून टाकतं. मी २ वेळा संध्याकाळच्या आरतीला खास थांबलो होतो... मंदिरातील घंट्यांचा मंजूळ स्वर आणि समोर मंगलमुर्ती... बस्सं आणि काय हवं _/\_
|
हो रे इंद्रा चुकी तर केली माझा भाउ पण तेच म्हणत होता. पण दोन दिवसात एवढ सगळ कवर करण खुप कठिण होत रे. पण बिर्ला मंदिरचा काय सुंदर परिसर आहे रे. अगदी शांत, थंड आणि नयनरम्य वातावरण, फ़ार छान वाटल तिथे...
|
Ankt
| |
| Friday, October 13, 2006 - 5:31 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी साधारण १ वर्षा पुर्वी अलिबागला गेलो होतो. सही आहे तो सगळा परीसर. पण पावसामुळे मुरुड जंजिरा नाही पहाता आला, पण beach वर धुमाकूळ घातला. बिर्ला मंदिर तर अति सुंदर आहे. पावसाळ्यात जायची मजाच वेगळी आहे, काय तो गरम चहा आणि भजी. (पण किल्ले पहाण होत नाही.)
|
धन्स अनिकेत, लेख वाचल्याबद्दल. पावसाळ्यात एकदा जाउन बघायच आहे. सही मज्जा आली असेल तिथे, आधीच हिरवागार परिसर त्यात पाउस म्हणजे "सोने पे सुहागा"
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|