Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 31, 2005

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through December 31, 2005 « Previous Next »

Ajay
Friday, December 23, 2005 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही केलेला इब्लीसपणा, वात्रटपणा, आचरटपणा आणि जो मायबोलीच्या वातावरणात सांगण्यासारखा आहे( हे महत्वाचं :-)) तो इथे सांगायला आवडेल तुम्हाला?

माझ्या कंपनीत एक पोलंडचा मुलगा आहे तो माझा चांगला मित्र झाला आहे. एक दिवस मी त्याला हा ऋग्वेदातला मंत्र रोमन लिपीत लिहून दिला आणि त्याच्याकडून वदवून घेतला

अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवं ऋत्वीजम् ।
होतारं रत्नधातमम् ॥

हा मंत्र म्हणून झाल्यावर मी स्वतःला धन्य धन्य म्हणून घेतलं. कारण माझ्या पोलिश मित्राचं पहिलं नाव आहे Reda :-)


(ज्ञा. वि. कुळकर्णी मला क्षमा करा. तुमच्या पायाशीही बसण्याची माझी पात्रता नाही याची मला कल्पना आहे. )


Paragkan
Friday, December 23, 2005 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Sandyg15
Friday, December 23, 2005 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

He He He ...

Sashal
Friday, December 23, 2005 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्ञा. वि. कुळकर्णी म्हणजे संत ज्ञानेश्वर का? मला माहित नव्हतं त्यांचं आडनाव कुळकर्णी आहे ते ..

बाकी हा किस्सा वाचून मात्र


Killedar
Tuesday, December 27, 2005 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हसून हसून हसून पुरेवाट :-)

Milya
Tuesday, December 27, 2005 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय : ह. ह. पु. वा. अजुन काही असतिल तर येउदेत की

Badbadi
Tuesday, December 27, 2005 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, ... :-)
बी, अजय ची अजून हि एक वेगळी ओळख आहे.. खास मायबोली करता... :-)


Manuswini
Tuesday, December 27, 2005 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका अमेरिकन मैत्रिणीला indian hotel मधे जेवायला घेवुन गेले तिला फारशी काहीच ओळख न्व्हती indian culture ची specially जेवण style ची
झाले काय जेवण झाले तसे waiter ने लिबू पाणी आणले हात साफ़ करायला
मी गमतिनी म्हटले पी हे पाणी पुढे काही म्हणायच्या आत ह्या बयेने पाणी पिवुन टाकले हावरट बया

तिथे असलेल्या सर्व waiters व ईतर लोक हसुन हा प्रकार पहात होती

मग त्या बयेला मी सागितल की indian culture मधे हात wash करायची पद्ध्त ही अशी आहे
No need to tell ... she was impressed by this treatment that somebody bringing small baisn bowl to wash her hands ....


Manuswini
Tuesday, December 27, 2005 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय

धन्य आहात तुम्ही


Jit
Wednesday, December 28, 2005 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sahI Ajaya ²² Ajauna ilaha kI

Jit
Thursday, December 29, 2005 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

११ वी १२ वी ची गोष्ट आम्ही मित्र अभ्यासाला म्हणुन एकत्र जमलो होतो एका मित्राकडे. त्याचे आइ बाबा बाहेर गेले होते म्हणून रत्री त्याच्याकडेच राहून अभ्यास करतो असे घरी सान्गितलेले. आठवड्यावर परिक्षा म्हणून अभ्यासाचा प्रयत्न चालला होता. १२ वाजले रात्रीचे. पण अभ्यास करायचा होता आणि झोपही येत होती म्हणुन म्हटल जरा break घेऊ. एकाच्या डोक्यात आल काहितरी, उचलला फोन आणि मनात येइल तो नंबर फ़िरवला त्याने आणि विचारल "नल को पानी आता है क्या " समोरुन उत्तर "आता है " इथून परत "पानी नही आयेगा तो क्या thumsup आयेगा " त्यावर त्या माणसाने ज्या शिव्या दिल्या म्हणुन सान्गू

Rachana_barve
Friday, December 30, 2005 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही आठवी नववीत असताना असेच फ़ोन करायचो, हॅलो कांदा किंवा बटाटा आहे का घरात? मग चिडून उत्तर आल कोण बोलतय अस की मग म्हणायचो काही नाही जरा काम होत मी टोमॅटो बोलतो आहे.

Ajay
Friday, December 30, 2005 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

manuswini, jit, rachana,

वा येऊद्यात. :-)
आपल्यासारखा कोणी समानधर्मा आहे हे वाचून छान वाटलं


Pama
Friday, December 30, 2005 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय.. सही आहेस!
रचना, जीत.. असले फोन आमच्या घरी यायचे.. तुम्हीच का ते करणारे.. बरे सापडलात..


आम्ही नागपुरला असताना बिल्डींगच्या मागच्या गल्लीत खेळायचो. तिथे २ भाऊ एका घरात वर खाली रहायचे. वरच्यांची मुलही आमच्यात खेळायची. आणि खेळताना बॉल घरात गेला कि खालच्या काकू तो विळीवर चिरून परत द्यायच्या. सॉलिड वैतागायचो आम्ही. एका दिवाळीत, वरच्या पोरांच्या मदतीने लांब दोर लावून खाली ५००ची माळ लावली आणि त्यांच्या गच्चीतून bedroom च्या खिडकीत सोडली. नंतर आमच्या बिल्डींगच्या गच्चीत येऊन लपलो. त्यापुढे काय धमाल आली. आम्ही सगळे ८-१० कर्टे- कार्ट्या इकडे पोट धरधरून हसतोय आणि त्या काकू जाम चिडल्या. त्यांना माहित होत हे आमचे उद्योग ते. आणि हे सगळ रात्री १२वाजता हे सांगायच राहिलच!
१२ला रात्री आमच्या सगळ्यांच्या घरच्यांनी अस फैलावर घेतल कि काही विचारता सोय नाही. त्या नंतर आम्हाला त्या गल्लीत खेळायलाच ban केल :-(


Shankasoor
Friday, December 30, 2005 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१० वीच्या परिक्षेनतरच्या सुट्टीतली गोष्ट -
माझ्या मित्राचे आई, वडील गावाला गेले होते आणि मी त्याच्या घरी झोपायला जात होतो.
एका रात्री एक काळ मांजर घरी आल आणि kitchen मधली भांडी पाडून पळून गेल.
दुसर्‍या रात्री पण ते मांजर घरी दर्शन देवून गेल. मग आम्ही त्या काळ्याला फटकवायचं ठरवल. नेहमी प्रमाणे ते मांजर आल, माझ्या मित्राने पटकन खिडकी बंद केली, मी थोडा जवळ गेलो, तर ते मांजर भिंतीच्या जवळ सरकल. मग माझ्या मनात एक क्रूर विचार आला, ठरवल एक जोरदार लाथ हाणावी म्हणजे ते मांजर भिंतीवर जोरात आपटेल. मी जोरात लाथ मारली, त्या मांजराची reflex action जबरी होती आणि ते मांजर तिथून पटकन सटकल आणि माझा पाय भिंतीवर जोरात ...
नतर एक आठवडा मी लगडत चालत होतो. :-(


Gajanandesai
Saturday, December 31, 2005 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवी नववीत असताना आमचे क्लासेस पहिल्या मजल्यावर असायचे. आणि आधीची बॅच सुटेपर्यंत आम्हाला गच्चीत थांबावे लागायचे. मग टाईमपास म्हणून आम्ही खालच्या रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या लोकांकडे बघून शुक् शुक् करायचो आणि लगेच लपून खाली बसायचो. ते ऐकल्यावर ती लोकं वर खाली मागे पुढे उजवीकडे डावीकडे बघत पण कोणीच नाही म्हटल्यावर पुढे निघून जात.

Moodi
Saturday, December 31, 2005 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा इब्लीसपणा माझ्या बहिणीच्या मैत्रिणीने ती ३ रीत असताना केला अन आम्हाला तो अजुन आठवतो. परिक्षेत सर्वात मोठे अंडे कोणाचे हे विचारल्यावर तिने माकडाचे अंडे मोठे असते असे लिहिले होते.

Dakshina
Saturday, December 31, 2005 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोनवरून आठवलं, आमच्या Group मधल्या मुलांनी पोखरणच्या आणूचाचणीच्या वेळी केलेला वात्रटपणा आठवला. असंच रात्री बेरात्री कोणाच्याही घरी फोन केले. बर्‍याच जणांकडून शिव्या खाऊन घेतल्या आणि शेवटी एक बकरी सापडली, ती मुलगी बिचारी Engineering चा अभ्यास करत रात्री जागत होती. ह्या पोरांनी तिला सांगितलं की आम्ही दूरदर्शन वरून बोलतोय, आणि आमचा म्हणे Survey चाललाय, तर पोखरण इथे झालेल्या आणूचाचणीबद्दल आपलं मत काय? दरम्यान हे विचारण्या आगोदर ती काय करते? कोणत्या College मधे जाते हे Smartly विचारून घेतलं होतं. त्या बिचारीने फ़र Sincerely उत्तरं दिली आणि स्वःतचा Ph. No. वगैरे पण दिला. दुसर्‍या दिवशी या पोरांनी तिला College मध्ये गाठून हार घातला आणि वर्गभर पेढे वाटले.

Dakshina
Saturday, December 31, 2005 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याच पोरांनी केलेली अजुन एक धमाल म्हणजे, असंच कोण्या एका देशपांडे नामक माणसाच्या घरी भर मध्यरात्री फोन केला.... तो माणूस झोपेत चाचपडत आला असेल बिचारा, फोन उचलल्या उचलल्या ह्यांनी त्याला फ़ैलावर घेतला.. की म्हणे तुम्हाला कुत्रं सांभाळता येत नाहीतर पाळता कशाला? त्याने आमच्या मोटारीवर घाण केली. असं आणि तसं.. तो माणूस बुचकळ्यात पडला आणि म्हणाला पण आमच्याकडे कुत्रं कुठंय..? ही पोर वर म्हणाली आमच्याकडं तरी कुठं मोटार आहे?

Bkashish
Saturday, December 31, 2005 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या शाळेच्या गेट जवळ सोनू सावजी नावाच्या एका म्हातार्या माणसाची गोळ्या बिस्किटे खाउची दुकान होती. खाउ वगैरे बांधुन देण्यासाठी त्याना नेहमी रद्दी लागायची. मग आम्ही रद्दी पुस्तक, वह्या, इ. देवून काहीतरी विकत घ्यायचो.

आमच्या गल्लीतील आम्हा ७-८ मुलांमध्ये मी सर्वात लहान होतो. त्या दुकानात एकदा क्रिमच्या बिस्किटासारखे बिस्किटे आली. आम्ही सर्वानी मिळून काही रद्दी गोळा केली. त्यात विविध आकाराचे जुने मासिके वह्या आदी होते. पण एवढे करूनही सर्वाना पुरतील एवढे बिस्किटे येणे शक्य नव्हते. बरीच शोधाशोध करूनही काही जमले नाही. मग रद्दीचे वजन कसे वाढवावे यावर चर्चा झाली. मी गमतीने सहज म्हणालो आत एक दगड घालावा. त्या खडूस चिकट म्हातार्याची कशी गम्मत येइल या विचाराने आम्ही खुप हसलो व असेच करायचे ठरले. त्यावेळी परिणामाचा विचारही केला नाही की आपल्याला रोज या दुकानासमोरूनच जावे लागते. दोन्ही बाजूनी मोठी पुस्तके नन्तर पेपर नन्तर वह्या असा अस्ताव्यस्त गठठा बांधला मध्ये कागदात गुंढाळून एक मध्यम पन वजनदार दगड ठेवला. वरून सुतळीने तो गठठा घट्ट बांधला. दुकानदाराला आमच्यातल्या सर्वात मोठ्या मुलाने देताना तो गठठा आडवा धरून दिला. दुकानदाराने तो तराजूत ठेवला तरीही त्याला संशय आला नाही. पण त्याने तराजूतुन गठा काढतांना उभा धरला त्याबरोबर त्यातील दगड त्याच्या पायावर पडला. हे पाहिल्या बरोबर सगळे जण पळत सुटले. नंतर एकत्र जमून आम्ही खुप हसलो. दुसर्या दिवशी शाळेत जाताना दुरुनच दिसले कि तो म्हातारा अगदी गेटजवळच उभा आहे. माझ्यासोबतचे बाकीचे मागच्या मागेच घरी गेले पण मला ते शक्यच नव्हते. मी थोडा वेळ विचार केला आणि शाळेकडे जोरात पळत सुटलो पण त्या म्हातार्याने मला पाहिलेच. त्याने पकडण्याचा प्रयत्न केला, मी त्याला चुकवून आत गेलो पण त्याने मी कोणत्या वर्गात जातो ते पाहिले आणि वर्गात येवून आमच्या सरांना सांगितले. आधी आमची धुलाइ झाली. नन्तर माझ्याकडून दुसर्या मुलांची नावे घेतली गेली व दुसर्या दिवशी त्यांची सुध्धा धुलाइ झाली. विशेष म्हणजे म्हातारा दुसर्या दिवशीही नेटाने Follow Up घ्यायला आला होता.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators