|
काही खुसखुशीत किस्से असतील ना तुमच्या कडे....मग!! माझा एक किस्सा....पुण्यात मुकुन्द नगर मध्ये गेलो होतो .. फ़क्त आई आणि मुलगा घरात...दार उघडल्य्वर आईसाहेबानी जमीनी पासून २ इन्चावर बोट नेऊन मला सान्गितले "इथे चप्पल काढा"..ऽआम्ही काळजी घेत त्याच दाखवलेल्या जागेत कश्या बश्या चप्पल ठेवल्या...मग मुलगा बाहेर आला...तो मान खाली घालुन बसला होता ...तर मग आईसाहेबानी चहा आणला...ऽआम्ही अजून विचार करतोय तोच काय गम्मत...त्यानी भराभर स्वत:च्या हातातील चहा पिऊन पण टाकला..ऽआम्ही थक्क
|
jaude soda... mudda ha ki tumachya babtit lagna sathi sanshodhna karatana kahi anubhav ale astil mulanche kinwa mulinche...gammatshir te share kara na...
|
Shyamli
| |
| Friday, January 13, 2006 - 12:20 pm: |
| 
|
माझ्या मावशिच लग्न ठरवतानाचा एक प्रसंग, मुलीला लिहायला येत का? हो गायला येत का? हो वीणायला येत का? आता माझे आजोबा वईतागले पुढ्चा प्रश्न मुलीला नाचायला येत का? (काळ लक्शात घ्या १९७५) आजोबा म्ह्नणाले तुम्हि ढोलकीवर थाप टाकलि की मुलगी नाचलिच म्हणुन समजा
|
Meggi
| |
| Saturday, January 14, 2006 - 11:11 am: |
| 
|
माझ्या एका मैत्रिणी ला मुलाने बघायच्या वेळी विचारलेला प्रश्न. माळी समाजाचे पहिले समाज सुधारक कोण? हा मुलगा मुलगी बघायला' आला कि इतिहासाची तोंडी परिक्षा घ्यायला?
|
Supermom
| |
| Monday, January 16, 2006 - 4:33 pm: |
| 
|
माझा नवरा मला बघायला आला तेव्हा त्याने कोणतेच प्रश्न असे विचारले नाहीत. फ़क्त माझ्याच आवडीनिवडी विचारल्या. पण गंमत म्हणजे त्यादिवशी माझी आई पोह्यात मीठच टाकायला विसरली होती. तेही न बोलता त्याने शूरपणे खाल्ले. नंतर तो गेल्यावर अर्थात आम्हाला ते कळलेच. अजूनही तो मला गमतीने मी तुमच मीठ खाल्लेल नाही बरका'' असे चिडवतो.
|
Raahul80
| |
| Tuesday, January 17, 2006 - 8:19 pm: |
| 
|
मधे मी कुठेतरी वाचले होते... बहुतेक हितगुजवरच बहुतेक... त्यातले ते पात्र आलेल्या मुलीला आधी खिडकीतुन पहायचा आणि आवडली तरच खाली यायचा नाहीतर घरी नाही असे निरोप मिळायचा...
|
Jit
| |
| Tuesday, January 17, 2006 - 8:32 pm: |
| 
|
maagacyaaca maihnyaat maaJyaa hÜNaayaa- baayakÜkDo pihlyaaMda gaolaÜ hÜtÜ tovacaI gaÜYT. tI evaZI nervous hÜtI kI cahacaa ek kp pDUna ÔuTlaa tIcyaa hatUna. naMtr itcyaaXaI gaPpa maartanaa maI itlaa mhTla kI evaZI
nervous nakÜ hÜ]sa. %yaanaMtr 2 ca imainaTaMnaI itnao malaa ivacaarlaolaa p`XNa hÜta tulaa college maQao kÜNaI maulagaI AvaDlaI naahI kQaI Æ %yaavar maIca nervous JalaÜ. pihlyaaca BaoiTt ha p`XNa
|
Ramani
| |
| Thursday, January 19, 2006 - 10:15 am: |
| 
|
माझे लग्न मी स्वत्:च ठरविले होते. माझा नवरा जेव्हा माझ्या वडिलांना भेटायला लग्नाला संमती मिळवा वि म्हणुन्)आला तेव्हा त्याला आईने चहा आणि गुड डे बिस्कीटे दिली आणि हा पठ्ठा घरी असल्यासारखा चहात बुडवुन खात होता. आणि नेमके जेव्हा माझ्या बाबांनी त्याला विचारले, ३४;तुझ्या घरी माहित आहे का तुमचे हे अफ़ेअर?३४; एक बिस्कीट नेमके मऊ होउन चहात पडले. त्या प्रश्नाचे उत्तरही ३४;नाही३४; असे होते त्यावेळी. 
|
मस्त किस्से आहेत माझ्या नवर्याचा पहीली मुलगी बघन्याचा आनुभव आजही हसवतो..पुण्यात मुलगी बघायचा कार्यक्रम होता कांद्यापोह्याच्या डिशेस आल्यानतर मुलगी इंजीनीअर येउन बसली..कुठल्या तरी प्रश्नाने शंतता भ.ग करुन गप्पांना सुरवात करायची म्हनुन ह्यांच्य्या वडीलांनी विचारले ३४;बाळ नाव काय तुझे? ३४; त्यवर मुलगी म्हनाली३४; माझ्या बायोडाटात वाचले नाही का? त्यनतर पोहे सम्पुन मंडळी बाहेर पडेपर्यत कोणीच बोलले नाःई नतर कळ्ले की तिने लवमरेज केले म्हणुन....
|
Zelam
| |
| Friday, January 20, 2006 - 2:06 pm: |
| 
|
हा exactly KP अनुभव नाही. पण माझे बाबा एका घरी त्यांच्या मुलाची चौकशी करायला ४ जिने चढून गेले, त्यानी पाणी मागीतले तर मुलाच्या आईने कान फुटक्या कपातून आणून दिले. नंतर त्या मुलाला approach करण्याचा विचार पण आम्ही केला नाही.
|
Pama
| |
| Friday, January 20, 2006 - 8:06 pm: |
| 
|
माझा कांदेपोहे कार्यक्रम लग्नानंतर झाला, म्हणजे लग्नानंतर जवळपास दोन महिन्यानी. तो पर्यत मी स्वयपाक करायचे, पण कांदेपोहे बनवावेच लागले नाही. माझा नवरा आणि सासरे नेहमी चिडवायचे मला, तुझ्या हातचे कांदेपोहे खायलाच नाही मिळाले, अस तुला बश्या घेऊन येताना, लाजताना पहायलाच नाही मिळाल. शेवटी म्हटल आहे काय त्यात, अत्ता बनवते पोहे. पटापट पोहे बनवले आणि छान बशीत सजवून वगैरे दिले. सासुबाईंचा आणि माझा कसलासा उपास होत, तर आम्ही चाखलेही नाही. सासर्यानी खाल्ले, पण कसे झालेत विचारल तर छान म्हणाले. नवर्याला बशी बाजूला ठेऊन देण्याची सवय, त्यानी १० मिनिट तशीच ठेवली आणि मग पुन्हा गरम करूनघेऊन खायला सुरवात केली आणि हसायला लागला जोरात. म्हणाला तरीच लग्नाआधी करून नाही दाखवलेस.. मीठ कुठेय याच्यात. मी म्हटल.. अरेच्चा! राहिल वाटत. मग सासर्यांना विचारल, बोलला का नाहीत? सगळे खाल्लेत की तशेच. त्यावर ते म्हणाले, अग तू इतक्या प्रेमानी बनवलेस आणि मी चुका कसल्या काढायच्या! काय होत एकदा बिनमिठाच खाल्ल तर? त्यानंतरही ते मी बनवलेल कसही झाल असल तरी काहीही तक्रार न करता खातात.
|
Manuswini
| |
| Wednesday, February 22, 2006 - 6:18 am: |
| 
|
हा कांदेपोहे अनुभव नाही पण वराकडील मुलाची आई नकचढेपणा मुलग़ा US मधे आहे. कुठेलीशी pmp exam pass झाला आहे. भारतात येणार आहे दुसर्याच दिवशी, रात्रिचे दहा वाजले आहेत. वधुची आई फोन करते व. आ - कोण आहे जरा तारस्वःरात फोनवर वधु आ - नमस्कर हा मला अमुक तमुक कडून तुमच्या मुलाची माहिती मिळली व. आ - मग तुम्ही कोण तुम्हाला मुलगी आहे का?(नमस्कार चमत्कार वगैरे काही नाही आणि भरभर प्रश्नाची सरबती, वय काय, काय शिकली, उन्ची किती, कुठे असते, US ला आहे का? नोकरी काय करते) वधु आ - व्यवस्थित प्रशनाची उत्तरे घेवून दम घेते literally व. आ - सरळ जातीवर्) जात काय तुमची? आमची उच्च जात आहे, माझ्या मुलिने ब्राह्मण नवर केला आहे(मुलिने basically पळून जावून लग्न केले आहे आणी स्वःता ब्राम्हण नाही आहे). वधु आ - आम्ही सारस्वत. ब्रा आहोत व. आ - जातिवर नाखुश्) हे पहा माझ्या मुलाला भरपुर proposals आली आहेत. आणि तुम्ही नन्तर phone करा. उद्या माझा मुलगा येतोय. वधु. आ - उद्या करु का? sorry हा जरा उशिर झाला व. आ - नाही मी उद्या busy आहे जरा. हवा असेल तर जरा चार पाच दिवासने phone करा.( phone खाली)
|
Savyasachi
| |
| Wednesday, February 22, 2006 - 12:03 pm: |
| 
|
दिप्ती, मस्त.. नवर्याने बोट कपात घालून बिस्कीट नाही ना काढले मंथन करून?
|
Milindaa
| |
| Wednesday, February 22, 2006 - 2:14 pm: |
| 
|
बाकी सगळ्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण ओळख वगैरे नसताना रात्री १० ही फोनची वेळ काही बरोबर वाटली नाही
|
मला पण माझा पहिला आणि एकुलता एक अनुभव शेअर करायची इच्छा झाली आहे.. नुकतच engineering संपल होत आणि नोकरी join करायला वेळ होता..त्यामुळे टवाळक्या करण्यात दिवस जात होते. आमच्या वरच्या काकुंनी माझ्यासाठी एक स्थळ आणल. मुलगा US मध्ये होता आणि माझ्यापेक्षा 5-5|| वर्षांनी मोठा होता. पण स्थळ उत्तम होत इती आई) तो मुलगा भेटायला येणार असे ठरले. तो यायच्यावेळी जरा व्यवस्थीत तयार वगैरे हो हा आईचा उपदेश अपमान वाटल्याने मी जशी आहे तशीच भेटेन अस आईला ठणकाऊन सांगीतले. यथावकाश तो मुलगा आला. मी नेमकी भाजी आणायला बाहेर गेले होते. आल्यावर त्या मुलाच्याच आईने मला बैस ग चहा घे थोडा असा आग्रह केला. थोड्यावेळाने तुम्ही दोघ निवांत बोला म्हणून घरच्या सगळ्यांनी आम्हाला बोलायला स्वयपाकघरात पाठवले. त्याने जरा basic चौकशी केली, कोॅलेज कोणते, काय आवडते, नोकरी कुठे लागली मग बंगलोरला एकटी रहाणार का वगैरे वगैरे.. आता तु पण काहीतरी विचार म्हंटल्यावर मी जी बडबड सुरु केली. आदल्या दिवशीच बघितलेल्या SRK च्या movie ची पुर्ण स्टोरी पण सांगीतली आणि तुम्हाला कोणता hero, heroin आवडते वगैरे पण विचारले.. तो गेल्यावर आईने काय बोललात विचरले, मी सांगीतल्यावर बिचारेने कपाळावर हात मारून घेतला. ईतके करून तो मुलगा मला परत दुसर्यांदा भेटायला आला.. आल्यावर पहिला प्रश्ण अजून कोणते movies बघितलेस SRK चे? ह्यावेळी आईचा उपदेश लक्षात ठेऊन मी movies बद्दल बोलायचे टाळले. मग त्याने अगदी Seriously मला सगळे US बद्दल सांगीतले, मग विचारले तिथे तु एकटी असणार, तु रडणार वगैरे नाहीस ना आई बाबांची आठवण काढून.. मी पण अगदी seriously च विचार केला. म्हंटल की आत्ता मी बंगलोरला जाते आहे तर मला इतका त्रास होतो आहे. US मध्ये मी रडेनच नक्की. तो खूप हसला आणि म्हणाला की अजून लहान आहेस.. ह्या प्रसंगाचे आता मला जाम वाईट वाटते आहे. कारण he was very very cute
|
Supermom
| |
| Wednesday, February 22, 2006 - 10:10 pm: |
| 
|
माझाही एक अनुभव, मुलगा घरच्या मोठ्या माणसांबरोबर येणार म्हणून आईने मला साडी नेसायला लावली.मी खरेतर ड्रेस घालायच्या विचारात होते पण माझे काहीही चालले नाही. त्यामुळे गुलाबी साडी आणि केसांवर भलामोठा गजरा अशा माझ्या तेव्हाच्या मताप्रमाणे काकुबाई वेषात मी बाहेर जाऊन बसले. मुलाकडची माणसे खूपच खेळकर होती. बोलकी होती पण मुलगा काहीच बोलला नाही. एकदम अबोल वाटला. त्यामुले याला आपण पसंत नाही ही मला खात्रीच झाली.त्यात बाबांनी काही विचारायचे आहे का म्हटल्यावर मग मात्र त्याने दोन तीन प्रश्न विचारले. पण साडीमुळे वाटणारं अवघडलेपण नि त्या एकंदर टेन्शन मुळे माझ्या तोंडून शब्दही फ़ुटेना.शेवटी मी मुकी असल्याची खात्री झाल्यावर तो ही बिचारा गप्प बसला. अजूनही मला हसू येतं की येवढी बडबडी मी गप्प का झाले तेव्हा?
|
Manuswini
| |
| Thursday, February 23, 2006 - 12:32 am: |
| 
|
माझा हा आगदी कांदेपोहे' अनुभव नाही तरीही. मी बर्याच वर्षानी भारतात गेले मागल्या वर्षी. आलीच आहे तर मुलगा ही बघ असा आजीने हट्ट धरला. मुलगा ही भारतात होता luckily ज्या दिवशी गेले त्याच दिवशी घरच्यानी सागितले की त्याला आजच तुला भेटायच आहे. २० तास प्रवास करून मी थकले होते. झोपेने खाल्ले होते. मुलाच्या सांगण्यानुसार बाहेर hotel मधे भेटायचे ठरले. सगळी घरची gang including माझी सहा वर्षाची भाची सुद्धा होती कारण ती एकटी कुठे घरी रहाणार. सगळी gang बघून जरासा तो गांगरलाच. कारण तो एकटाच आलेला. हाय हॉलो झाले आणी मी पलिकडेच hotel मधे बसले. he was not seeing my family but I could see मी नुसती गप्प बसून होते. झाले काय की माझी भाचीच्या तिवळ्या बवळ्या बघुन मला हसायला येत होते. he would feel nervous as for anything he said I was smiling. Not knowing that I was smiling at my niece gestures behind him, and he would think why the hell I keep smiling जवळ जवळ दहा वेळा तरी प्रश्ण विचारला की का अशी हसते. मी आपले काही नही काही नाही anyways तोच वैतागला आणी म्हणाला निघुया आता.. अर्ध्या झपेने मला खाल्लेले मी अगदी खुशीत निघाले. शेवटी सरळ म्हणाला तुला interest नाही आहे का समजू? anyways, unfortunately he said I dont want a girl who smiles for no reason जवु दे मला झोपेत तसा तो अवडला ही नव्हता
|
Manuswini
| |
| Thursday, February 23, 2006 - 12:47 am: |
| 
|
एक मजेदार अनुभव माझ्या मोठ्या बहिणिचा( cousin ), तिला US मधिल मुलगा आलेला सात आठ वर्षापुर्वी, मुलगा चक्क एक मोठी list of questions घेवून आलेला. बरोबर त्याची मावशी,काका,आजी. हा program आम्हाला नविनच आणि आम्ही जराशी टवाळ लहान कारटी पडद्या मागून एकत होतो. एक प्रश्नावरुन तेव्हा घरात खुप चरचा झाली. प्रश्ण होता, do you mind PDA? आता PDA काय हेच बहीणीला कळले नाही. सगळ्याना एतक विचित्र वाटले की मोठ्या लोकासमोर चक्क हा प्रश्ण, तोही पहिल्या भेटीत? बघायला येण्याआधी मोठे मोठे email लिहून पाठवायचा with questions आणी मला आठवते ताईला अर्धे अर्धे प्रश्ण का विचारले कळायचे नाही, आम्ही सगळे मिळून उत्तर पाठावायचे. जाम मजा यायची. एकदम वात्रट gang जमा होवून उत्तर लिहयचो. आता वाटते की काय psycho होता तो. शी काय विचित्र प्रश्ण विचारयचा. PDA प्रश्णाने नकर दिला शेवटी. आणखी एक विचित्र प्रश्ण email मधे विचारला, तुला sexy कपडे आवडतील घालायला? मोठ्या लोकासमोर तुला छोटे skirt आवडतेल बघायला यण्याच्या आधीच email मधे असले प्रश्ण मुर्ख माणुस phd वगैरे झालेला आणि डोक काम करत नव्ह्ते वाटते त्याचे
|
Savani
| |
| Thursday, February 23, 2006 - 5:00 pm: |
| 
|
सगळ्यान्चे असे मजेशीर अनुभव ऐकून मला माझा एक अनुभव लिहावासा वाटला.. आमच्याकडे मला बघायला एक मुलगा आणि त्याची आई आले होते. मुलगा architect होता. आल्यानन्तर इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. मुलाची आई सारखी त्याला कोपराने ढकलत त्याला सान्गत होती ते सान्ग ना, ते सान्ग ना.. ऐश्व्रर्या चे सान्ग ना. ४-५ वेळा बघितल्यावर माझे बाबा म्हणाले, तुम्हाला काही विचारायचे आहे का? आणि आई सुरुच झाली..त्या मुलाच्या वर्गात तो architecture ला असताना ऐश्वर्या राय होती. त्याच्या आईला इतर सगळे सोडून ह्या एकमेव गोश्टीचे इतके कौतुक होते.. मग त्यानन्तर पुढची १० ते १५ मिनिट आम्ही ऐश्वर्या राय त्या वेळी कशी त्याच्या वर्गात होती, ती त्यावेळी कशी होती, मग तिने मधे शिक्षण सोडले..सध्याची तिची चित्रपट कारकीर्द ह्यावर चर्चा केली. आणि अर्थात ३४;ह्या३४; विषयापूढे ज्या कारणासाठी ते आले होते ते तितके महत्वाचे न वाटल्याने तो कार्यक्रम तिथेच आटोपला....
|
Supermom
| |
| Thursday, February 23, 2006 - 7:33 pm: |
| 
|
माझ्या बहिणीच्या वेळी एक मुलगा आपल्या आईला घेऊन मुलगी पहायला आला होता. तो काहीतरी वेगळेच बोलतोय असे मला एक दोन दा वाटले.त्याला प्लेट नेऊन देताना तो थोडा पुढे झुकला तेव्हा असा काही वास आला म्हणून सांगू. विचित्र बोलण्याचे कारण मी लगेच ताडले. नंतर त्याच्या आईला फ़ोन केला तेव्हा मी सौम्य शब्दात विचारले.त्यावर उत्तर आले अहो,मुलांना नोकरीची किती टेन्शन्स असतात बाहेर? एखाद्यावेळी घेतो टेन्शन आलं की.' घेणे न घेणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण वेळकाळ एवढी समजत नसणे म्हणजे कठीणच आहे. महाशयांना अर्धचंद्र मिळाला हे सांगायला नकोच.
|
Saanjya
| |
| Saturday, February 25, 2006 - 1:20 am: |
| 
|
maaJaa ek ima~ eka mauilalaa phayalaa gaolaa hÜta.. Aa[ vaDIlaaMcaI baÜlaNaI Jaalyaavar.. maaJaa ima~ AiNa tI maulaiga baÜlat basalao hÜto.. qaÜD\yaaca vaoLat ima~acyaa laxaat Aalao kI ih maulaiga Ôarca caÝkXyaa krto Aaho.. saurvaaitlaa %yaanao
naIT ]<aro idila pNa jaovha p`Xna qaaMbat naaiht Asao idsalao tovha maa~ tÜ jaama vaOtagalaa.. AaiNa
yaatca %yaa mauilanao puZcaa p`Xna ivacaarlaa.. daÉ GaotÜsa kaÆ ima~anao itlaa baoQaDkpNao ivacarlao.. kuzlaI AahoÆ
|
Manuswini
| |
| Saturday, February 25, 2006 - 6:42 am: |
| 
|
मुलिने प्रश्ण विचारले तर तुझ्या मित्राला एवढे कशाला वाटायला हवे? take it easy घ्यायच ना.
|
Meggi
| |
| Saturday, February 25, 2006 - 10:26 am: |
| 
|
दारू घेतोस का? ह प्र्श्न मुलाला विचारणं ठिक आहे.. याच प्रश्नाच थोडं सभ्य ( ?) रुपान्तर करुन, 'Drinks घेतेस का?' अस प्रश्न मला एक मुलाने विचारला होता
|
Moodi
| |
| Saturday, February 25, 2006 - 11:14 am: |
| 
|
संज्याभाव ज्याला मी सांगीतले त्याला सुद्धा राग नाही आला मग तुम्ही एवढे ते पर्सनली घेण्यासारखे काय होते बर? जी वस्तुस्थिती आहे ती मी सांगीतली, माझ्यावर रागवण्याचा अधिकार फक्त पिंकी अन दीपलाच आहे, तुम्हाला नाही. आणी आश्चर्य आहे, माझ हे उत्तर तुम्हाला खटकले पण मित्राचा हा सभ्यपणा तुम्ही बरे पचवु शकला? माझ्या वेळी मी पण एका मुलाला ड्रिंक्स घेता का असे विचारले होते तर तो म्हणाला की कंपनीच्या पार्टीज मध्ये कधीतरी घेतो, नेहेमी नाही अन त्याचे व्यसन पण नाही. त्याने हे नीट उत्तर दिले बर का, मला विचारले नाही बाकी काही. मी वर लिहिले ते मैत्रीच्या नात्यातुन कुणाला दुखवण्याच्या उद्देशाने नाही अन तेवढी मी निर्ढावलेली पण नाही.
|
Athak
| |
| Saturday, February 25, 2006 - 1:49 pm: |
| 
|
मुलिंनाच कांदापोह्याच फार कौतुक दिसते , एक एक क्षण आठवतो . मुलगा कसा दिसतो यापेक्षा कांदापोहे कसे झाले इकडेच जास्ती ध्यान मुल बिचारे बघायला गेल्यावर ते समोरचे ध्यान बघुन मती गुंग झाल्यामुळे तिखट झालेले मिठ नसलेले जास्ती मिठ असलेले कांदापोहे मुकाट्याने खातात मी मीनाला बघायला गेल्यावर तिच्यापेक्षा कांदापोह्याचेच जास्ती गुणगान केले अन इथेच अडकलो लगेच गोड आणा असा काहीतरी आतुन आवाज व गुलाबजामची प्लेट हातात पडली , तेव्हापासुन अजुनही सासरी गेलो की जावईबुवांना गुलाबजाम खुप आवडतात म्हणुन प्रत्येकवेळी फक्त गुलाबजामचाच जाम भडिमार करतात
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|