|
Dineshvs
| |
| Monday, February 06, 2006 - 4:37 pm: |
|
|
या बीबीखाली अंबोलिबद्दल लिहितोय, हे जरा विचित्र वाटेल, काहि जणाना. बट रिड ऑन. खुप पुर्वीपासुन अंबोलिबद्दल वाचत होतो. पण अलिकडे ती अवाक्यात आल्यापासुन, तिथे जायची एकहि संधी सोडत नाही. किंवा असेहि म्हणु शकतो, कि मी संधी निर्माण करतो. कालच काहि सवंगडी जमवले आणि अंबोलि भटकलो. खरे म्हणजे जाताना एकच सवंगडी होता, तिथे आणखी चार भेटले. अंबोलिबद्दल मी पुर्वीच सचित्र लेख लिहिला होता, आता नविन काय, असा प्रश्ण मला तरी पडलेला नाही, ( आणि तो तुम्हालाहि न पडावा हि माफक अपेक्षा ) सकाळी सकाळी सावंतवाडीच्या मोती तलावावर भेटायचे ठरले होते, आमचे. तिथेहि काहि सुंदर दृष्ये टिपता आली. या सावंतवाडीत कधी सुर्यास्तच होत नाही. ( कारण पश्चिमेला नरेंद्र डोंगर आहे, हा हा हा ) तिथुन बाईकने अंबोलिला जायला निघालो. अंबोलिचा घाट सुरु व्हायच्या आधी, डावीकडे एक रस्ता खाली जातो. तिथे एक जुने शिवालय आहे. तिथे काहि कोरीव मुर्ती अश्याच बेवारशी पडलेल्या आहेत. तिथे थोडावेळ बसुन थेट अंबोलि गाठली. सावंतवाडीपासुनचे हे ३० किमीचे अंतर पार करणे, खुपच चैतन्यदायी आहे. हा परिसर भर ऊन्हाळ्यातहि हिरवागार असतो. शिवाय ईथले जंगल बर्यापैकी मूळ रुपात टिकुन आहे. ( म्हणजे वनखात्याने लावलेले वेड्या बाभळीचे जंगल नव्हे. ) ईथे विविध प्रकारची झाडे वेली दिसतात. आणि बाईकवरुन गेल्यामुळे प्रत्येक वळणावर अनोखा सुगंध भारुन टाकत होता. वसंत अजुन यायचाय, पण अनेक झाडे मोहोरलीत. फ़ुले ईवलिशी, पण सुगंध मात्र भारुन टाकणारा. एस्टी स्टॅंडवर चहा घेऊन थेट, कावळेशेत पॉईंट गाठला. आता तिथे थेट डांबरी रस्ता झालाय. पुर्वी त्या सपाट माळावर रस्ता शोधत जावे लागायचे. पुर्वी तो कडा रौद्रभीषण वाटायचा. त्याच्या कडेला जाणे फ़ार भितीदायक होते. सरपटत गेले तरच तिथुन खाली बघता येत असे. शिवाय तिथला भन्नाट वारा, तिथुन पडलेल्या हलक्या वस्तु परत भिरकावुन देत असे. पण आता मात्र तिथे संरक्षक कठडा आहे. त्यामुळे कडेपर्यंत बिनघोर जाता येते. तिथे डाव्या कोपर्यात एक ओहोळ दरित कोसळतो, तिथेहि आता पाईप टाकले आहेत. ऐन पावसाळ्यात ते पाणी परत वर ऊसळते असे ऐकले आहे, पण प्रत्यक्ष अनुभव घेतला नाहि, कारण पावसाळ्यात तिथे जाणे पुर्वी रस्त्या अभावी अशक्यच होते. आता मात्र ते शक्य होईल असे वाटतेय. तिथेच एक चहाची टपरी आहे. त्या टपरितच वुड आर्टचे काम चालते. तिथे चहाभजी खाता खाता, आजर्याहुन आलेल्या दोन तरुण जोडप्यांची ओळख झाली. दोन मिनिटात सुर जुळले आणि मैत्री झाली, मग एकत्र भटकायचे ठरले. कावळेशेतकडे जाताना, एक छोटीशी नदी लागते, तिथे मी बर्याचवेळा डुंबलो आहे. तिथेच फ़ळाला आलेल्या केवड्याचे बने आहे. त्या भागात ऊस लागवड केली जाते. तिथुन थेट हिरण्यकेशीच्या ऊगमाकडे गेलो. हा बर्यापैकी चढणीचा रस्ता, बाईकने काहि मिनिटात पार पडतो, पण याच रस्त्यावर मी पायी भटकंती केली आहे. वाटेत अनोखी झाडे दिसतात. ऊगमाच्या ठिकाणी, नदीवरचा एक अरुंद पुल पायी ओलांडावा लागतो, तिथुन पुढे अगदी अरुंद वाट होती. त्या वाटेवर जांभळाची झाडे होती आणि काहि फ़ुलझाडेहि होती, हो होतीच म्हणायला हवेय, कारण आता ती सगळी झाडे तोडुन रुंद रस्ता झालाय. तो पुल अजुनतरी आहे, पण आता फ़ार टिकेलसा वाटत नाही. थेट ऊगमापर्यंत गाडीरस्ता होईल असे वाटतेय. ज्याला हि जेमतेम पाऊण किमीची वाट चालवत नाही, त्याने ईथे यावे का, हाच खरा सवाल आहे. प्रत्यक्ष ऊगम मात्र अजुनहि तसाच आहे. तिथे एका कपारीखालुन पाणी येते. पुढे एक छोटे बांधीव कुंड, एक गोमुख आणि एक मोठे कुंड आहे. अगदी शंखनितळ पाणी आहे तिथे. त्या पाण्यात पाय सोडुन बसले ना कि पार मस्तकापर्यंत गारवा जातो. तिथुन ऊठावेसेच वाटत नाही. तिथे थोडेसे खाल्ले, भरपुर पाणी प्यायलो, आणि परतीच्या वाटेला लागलो. वाटेत आपल्या म्हाराष्ट्र देशीचे वैभव असलेली अंजनीची झाडे अजुनतरी तग धरुन आहेत. या दिवसात हे हिरवेगार झाड, गुलाबी निळ्या पुष्पगुच्छानी भरुन गेलेले असते. दुरुम तर हे साजरे दिसतेच आणि जवळुन बघितले तर खिळवुनच ठेवते. कुंदाची फ़ुले पण भरपुर आहेत पण जुनी परिचीत जांभळाची झाडे मात्र आता नाहीत. या दिवसात त्याच्या मोहोराचा मधाळ सुगंध मधमाश्यांनाच नव्हे तर आपल्यालाहि मोहावतो. गेल्या अनेक भेटींच्या वेळी ओंजळी भरभरुन जांभळे खाल्लीत तिथे, हे कर्ज कधी फ़िटायचेच नाही. ती वाट संपता संपता एक फाटा भरतदास महाराजांच्या समाधीकडे जातो. आता ते निर्वतले आहेत, पण मी त्याना बघितले आहे. त्यावेळी माझ्यासोबत एक चिमुरडी मैत्रिण होती. ते ध्यानाला बसले होते, त्या चिमुरडीने त्याना, आजोबा तुम्ही एकटेच राहता ? तुम्हाला जेवण कोण करुन देतं ? असले प्रश्ण विचारुन भंडावुन सोडले होते. त्यानी तिला कौतुकाने प्रसादहि दिला होता. आता तिथे त्यांची समाधी आहे, एक स्वयंभु गणपतिची मुर्ती आहे. बांधीव घाट आहेत. पाण्याचा ओहोळ आहे. तेहि ठिकाण खुप रम्य आहे. दुपारचे साडेबारा झाले होते, भुक पण लागली होती. तरिही जरा महादेवगडावर जाऊन येऊ, म्हणुन सगळ्यानी बाईक्स तिकडे नेल्या. तिथला रस्ता तर किर्र जंगलातुन जातो. तिथे अस्वले आहेत असे रिक्षावाले सांगतात. ( BTW कधी अस्वल मागे लागले तर ऊताराच्या दिशेने पळत सुटावे. ऊतारावर त्याला जोरात पळता येत नाही, शिवाय त्याच्या झिपर्या डोळ्यावर आल्याने त्याला नीट दिसतहि नाही, असा सल्ला मारुती चितमपल्लीनी दिला आहे. ) त्या पॉईंटवरुन बराच मोठा भुभाग नजरेच्या टप्प्यात येतो. मनोहर गड दिसतो आणि पायथ्याचे हिरवेगार खोरे पण दिसते. तिथे बसायला एक बाक आहे आणि पुढे संरक्षक कठडा आहे. त्यापुढे खाली एक माची दिसते, तिच्यावर पायवाटा दिसतात. तिथे कसे जाता येईल असा विचार करत असतानाच, माझ्या मित्राने डाव्या बाजुला कड्याखाली एक भगवा झेंडा दाखवला. त्याने फोन करुन तिथे कसे जायचे ते विचारुन घेतले. आणि आम्ही तिथे निघालो. त्या महादेव गडाच्या रस्त्यावरच ऊजवीकडे एक श्री आदिनाथ सिद्धेश्वर अशी लोखंडी कमान दिसते. मजा म्हणजे तो झेंडा कड्याच्या डाव्या बाजुला दिसत असला तरी वाट मात्र ऊजवीकडुन सुरु होते. त्या वाटेला तीव्र ऊतार आहे. सुरवातीला आधाराला तारा बांधल्या आहेत. पुढे मात्र एकमेकांच्या आधारानेच जावे लागते. एका बाजुला ऊभा कडा आणि दुसरीकडे खोल दरी असा थरारक प्रवास आहे तो. बरिचशी वाट दाट जंगलातुन जात असल्याने, ऊन्हाचा त्रास होत नाही. आमच्यापैकी फ़क्त मीच एकटा सॅक आणि ट्रेकिंग शुज घातलेला होतो. मुली तर हाय हिल्स आणि पंजाबी ड्रेसमधे होत्या. पण त्यांचा ऊत्साह ऊतु जात होता. त्यांच्या पर्सेस वैगरे घेऊन पुढे जाणे जरा अवघड झाल्यावर, अतिरिक्त वस्तु तिथल्याच एका कपारीत ठेवल्या आणि पुढे निघालो. साधारण वीस मिनिटाने आम्ही वरच्या कड्याच्या खाली असलेल्या माचीवर आलो. वरुन जरी ती माची समोरच खाली दिसत असली, तरी तिथुन ऊतरणे शक्यच नाही, कारण तो खुपच ऊभा कडा आहे. त्या माचीच्या टोकापर्यंत न जाता एक पायवाट डावीकडे ऊतरते, त्याने आणखी खाली ऊतरू लागलो. ईथे आधाराला फ़ार काहि नव्हते, तरिहि आता त्याचा काच जाणवत नव्हता. मधे कड्याच्या पोटात एक बिळासारखे काहितरी दिसले, तिथे एक पेला ठेवलेला होता. मला शंका आलि आणि मी जरा वर चढुन तिथे डोकावलो. तिथे चक्क एक झरा होता. मस्त चवदार, थंडगार पाणी होते तिथे. सगळे पोटभरुन प्यायलो. डोक्यावर ओतुन घेतले. तिथुन परत तशीच दहा मिनिटाची अवघड वाट चालुन आल्यावर आम्ही एका टपरीत शिरलो. तिथे काहि मुर्त्या आहेत. सुंदर समया तेवत होत्या. जेवणाची भांडी, चटया सगळे आहे. तिथेहि पाण्याची सोय आहे. पण ते ऊघड्यावर असल्याने फ़ार स्वच्छ नाही. तिथे हातपाय धुतले, आणि थोडे खाऊन घेतले. जरा आराम केला, गप्पा मारल्या. मग परतीच्या प्रवासाला लागलो. येताना खरे तर धाकधुक होती, कारण आमच्यापैकी कुणीच तिथे गेलेले नव्हते, शिवाय किती दुर जायचे आहे त्याचा अंदाज नव्हता. परतीच्या वाटेवरहि परत त्या झर्याचे पाणी पोटभर प्यायलो. हि वाट चढणीची होती तरी आता परिचयाची झाली होती. वाटेत ठेवलेले सगळे सामान व्यवस्थित परत मिळाले. आमच्यापैकी एक जोडपे गुजराथी, मी मुंबईचा, दोघेजण आजर्याचे आणि एक कानडी. त्यामुळे एकमेकांच्या शब्दोच्चाराची यथेच्छ टिंगल करत होतो. परत कड्यावर आलो. आता मात्र खुपच भुक लागली होती. मग सरळ लाड हाऊसची वाट पकडली. अंबोलितील हि माझी आवडती जागा. तशी हॉटेल्स बरिच आहेत, पण त्या सगळ्यांकडे एकाच पद्धतीचे जेवण मिळते. तेहि मालवणी मसाल्याचे. आणि हा मसाला काहि मला फ़ारसा आवडत नाही. त्यापेक्षा लाडांचे जेवण कितीतरी चविष्ठ असते. वांगी बटाटा भाजी, मसुर भाजी, पापड, चपात्या, भात, श्रीखंड आणि सोलकढी असा मस्त बेत होता. तिथला परिसरहि अगदी रम्य आहे. आजुबाजुला अनेकविध फ़ुले ऊमलेली असतात. जरा वेळ असला तर लाडांच्या घरचे वुड आर्टचे नमुने बघत त्यांच्याशी गप्पाहि मारता येतात. तिथुन निघालो ते थेट धबधब्यावर गेलो. आता तिथे अगदी चिंचोळा प्रवाह आहे. एका बाजुने अगदी वरपर्यंत जायला पायर्या आहेत. तिथेहि पाणी पिऊन घेतले. मला दिवसभरात एरवीहि पाच सहा लिटर पाणी प्यावे लागतेच. सुर्यास्ताची वाट न बघता परत फ़िरलो. एका दिवसात सगळ्यांची घट्ट मैत्री झाली होती. परत भेटायचे वायदे करुन निघालो. हि माझी अंबोलिला गेल्या चार वर्षातली, सहावी का सातवी भेट होती. अंबोलि तुम्हाला प्रेमात पाडल्याशिवाय रहात नाही. तिची नागमोडी ७२ वळणे, परत कधी येणार असे विचारत राहतात. अंबोलितली हवाहि आता पुर्वीसारखी थंड राहिली नाही, आणि पाऊसपण कमी झालाय. ( ईति तिथलेच एक रहिवासी. ) शिवाय अंबोलितील पुर्व बाजु, खास करुन शासकिय विश्रामगृहाचा परिसर वैगरे, भुताटकिने भारलेला आहे, असे अनेकजणांकडुन ऐकले आहे. ( झक्किसाहेब, प्लीज नोट ) आता तिथे जरा जास्तच बांधकामे होताना दिसताहेत. केवळ दारु प्यायच्या ऊद्देशाने आलेले ग्रुप्सहि बरेच दिसतात. अर्थात त्यांचा धुमाकुळ फ़क्त गावातच. त्यांची धाव फ़क्त धबधब्यापर्यंतच. आणखी कुठे जाण्याची रसिकता त्यांच्याकडे अजिबातच नसते. शिवाय सुधारणेच्या नावाखालीहि नको ते प्रकार आता तिथे होवु लागलेत. ते सगळे असह्य व्हायच्या आत अंबोलिला परत जायला हवेय. तिथलि खासियत असणारी सोनघंटा नावाची फुले मला अजुनहि दिसलेली नाहीत. झळाळता पिवळा आणि निळा रंग ल्यालेली हि जास्वंदीची एक जात आहे. निदान पुढच्या भेटीत तरी ती शोधायचीच, असा निर्धार करुनच मी नेहमी अंबोलिचा निरोप घेतो. ता. क. मित्रमंडळीना फोटोज रवाना होतीलच.
|
Moodi
| |
| Monday, February 06, 2006 - 5:07 pm: |
|
|
दिनेश अहो ही पण भटकंतीच नाही का. रसाळ वर्णन केलेत, पहाण्याची उत्सुकता इतकी झालीय बस. योग येईल तेव्हा होईल. पण आता एक आग्रह करते. तुम्ही आता तुमचे काम संपले की चाफळ, सज्जनगड अन नृसिंहवाडी करुन या. हे सर्व मी फार लहानपणी पाहिलेय पण अजुनही डोळ्यासमोर तेच शांत श्रीराम मंदिर, त्या संगमरवरी मूर्ती, सज्जनगडाची भव्यता, राममंदिरामागची हनुमान टेकडी, मंदिराजवळची नदी अन कृष्णेचा अथांग परिसर वेड लावतो. ही ट्रीप कराच अन मग मला सांगा. अन हो अजुनही त्या चाफळच्या श्रीराम मंदिरामागे एक घरगुती शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे का ते ही बघा. तिथले चविष्ट जेवण, अहाहा!!! उसळ तर एकदम झक्कास बघा. याच जाऊन.
|
Bhagya
| |
| Tuesday, February 07, 2006 - 3:26 am: |
|
|
काय हे! दिनेशदा, काही treks तर आमच्याबरोबर करण्यासाठी ठेव की! सगळंच आत्ताच बघितलस तर कसं? पिसोळा किती सुन्दर! बाकीचे फ़ोटो पण सुंदर!
|
Zelam
| |
| Tuesday, February 07, 2006 - 1:48 pm: |
|
|
खूप छान दिनेश. अहो मी १५ वर्षांपूर्वी गेलेय आंबोलीला. आमच्या driver काकानी झाडावर चढून मस्त जांभळं काढून दिलीत. आणि तेव्हा solid पाऊस पडला होता नंतर. त्या पावसात मनसोक्त भिजल्यानंतर मग आम्ही चहा आणि कांदा भज्यांचा फराळ केला. मस्तच आहे आंबोली, परत परत भेट देण्यासारखं.
|
Milindaa
| |
| Tuesday, February 07, 2006 - 11:05 pm: |
|
|
तर अंबोलीच्या किल्ल्यावर जाऊन आलात तर.. छान छान...
|
Ashbaby
| |
| Wednesday, February 08, 2006 - 11:58 am: |
|
|
आम्बोली हे माझे गाव, माझे आई-वडील दोघेही आम्बोलीचे त्यामुळे माझे आम्बोलीवर डबल प्रेम आहे. आताही दोन्ही आजोळची मंडळी सुखाने तेथे नान्दताहेत. लहानपणी बरेचदा जाणे होत असे, त्यावेळि खाल्लेल्या रानमेव्याच्या आठवणी अजुनही मनात आणि जिभेवर आहेत. अर्थात नेहेमीप्रमाणे, पुर्वीची आम्बोली आता राहिली नाही, असे उसासे माझी आई मधून मधून टाकत असते. आणि ते खरेही आहे. आम्बोलीत आता बरेच परप्रान्तीय घरे बान्धून राहु लागले आहेत. माझ्या लहानपणिचे आम्बोली आता खुपच बदलले आहे, लोकसंख्या वाढल्यामुले पुर्विचा ऐसपैसपणा जाऊन घरे जास्त जवळ आली आहेत. पुर्वी जिथुन ट्र्क जात असे तिथुन आता रिक्शा ही जाणे अवघड झाले आहे. तरिही आम्बोलीवरचे प्रेम कमी झालेले नाही. मीही आम्बोलीत घर बान्धते आहे. पुर्ण होईपर्यंत डिसेम्बर उजाडेल बहुतेक. मग मात्र माझ्या लाडक्या आम्बोलीत माझ्या नेहेमी फ़े-या होतील. आणि एके दिवशी तिथेच स्थायिकही व्ह्यायचा बेतही आहे.
|
Moodi
| |
| Thursday, March 16, 2006 - 11:34 am: |
|
|
दिनेश इथे बघा जमल्यास. http://www.loksatta.com/daily/20060316/viva04.htm .
|
Dilippwr
| |
| Tuesday, April 18, 2006 - 2:04 pm: |
|
|
१९९० ला अंबोलीला गेलो होतो.तेंव्हा. घाटाच्य्या प्रथम उजवि कडे जरा आत सांवंतवाडिकर भोंसल्यांचा पड्का रजवाडा आहे.तिथुन दरि छान दिसते. अंबोलिवरुन बेळ्गव कडे जाताना. नांगरतास चा धबधबा मस्त आहे
|
Dilippwr
| |
| Tuesday, April 18, 2006 - 2:07 pm: |
|
|
१९९० ला अंबोलीला गेलो होतो.तेंव्हा. घाटाच्य्या प्रथम उजवि कडे जरा आत सांवंतवाडिकर भोंसल्यांचा पड्का रजवाडा आहे.तिथुन दरि छान दिसते. अंबोलिवरुन बेळ्गव कडे जाताना. नांगरतास चा धबधबा मस्त आहे
|
Ashbaby
| |
| Saturday, January 12, 2008 - 8:05 am: |
|
|
दिनेश, आम्बोलीचे वर्णन मी परत परत वाचते इथे येउन. खुप बरे वाटते. खूप छान लिहिले आहे. पुढच्याच आठवड्यात जाणार आहे आम्बोलीला. घर बांधुन होतय आता महिनाभरात. तेव्हा पुढच्या वेळेस याल तेव्हा मुक्कामालाच या... (१. हिरण्यकेशीचा तो पुल माझ्या लहानपणापासुन आहे त्याच स्थितीत आहे. त्यामुळे मला वाटत नाही इतक्या लवकर त्याला काही होइल म्हणून.. देवळापुढिल तळे आणि गायमुख माझ्या पणजोबांनी बांधलेले आहे. गायमुख आता खुप खराब झाले आहे. २. कावळेशेत ला ह्या गणपतीला गेलो होतो. तिथले दृश्य वर्णनातीत आहे. आणि पाणी खरेच वर उलटे उडुन येत होते. असला जबरी प्~ओइन्ट मी तरि कुठे पाहिला नाही.)
|
Dineshvs
| |
| Sunday, January 13, 2008 - 6:46 am: |
|
|
साधना, अंबोलीला बर्याचवेळा गेलोय, पण मला अजुनही सोनघंटा बघायला मिळाले नाही. ते फक्त नानापाणी भागातच दिसते. जास्वंदीसारखेच पण पाच पाकळ्या अलग झालेल्या, आणि चमकदार सोनेरी निळ्या, रंगाचे फुल असते ते. कधी मिळाला, तर त्याचा फोटो मला हवा आहे.
|
Ashbaby
| |
| Monday, January 14, 2008 - 5:29 am: |
|
|
येस, आता गेले कि नानापाणीत जाइन आणि फुलाची चौकशी करेनच..
|
Ashbaby
| |
| Saturday, February 02, 2008 - 8:06 am: |
|
|
दिनेश, फुलाचा फोटो पाठवत आहे. हेच जर सोनघंटा असेल तर अजुन काही फोटो माझ्या मोबाइलवर आहेत ते पाठवेन. साधना.
|
Ashbaby
| |
| Saturday, February 02, 2008 - 8:47 am: |
|
|
|
Ashbaby
| |
| Saturday, February 02, 2008 - 8:49 am: |
|
|
|
Ashbaby
| |
| Saturday, February 02, 2008 - 8:50 am: |
|
|
|
Ashbaby
| |
| Tuesday, February 19, 2008 - 11:58 am: |
|
|
अहो दिनेश साहेब, वेळात वेळ काढून कधीतरी या बीबी वर पण या.. साधना
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 19, 2008 - 2:18 pm: |
|
|
सॉरी साधना, मला हेवा वाटतोय. पण हे सोनघंटा नाही, याचे नाव मदन. फ़ोटो खुप छान आहे पण माझ्या मते याचा रंग आणखी पिवळा असावा. सोनघंटा जास्वंदीच्या कुळातले आणि तसेच दिसते, अंबोलीत एक खास प्रकारची निळी जास्वंददेखील दिसते.
|
Ashbaby
| |
| Wednesday, February 20, 2008 - 4:54 am: |
|
|
ठिक आहे. मला निदान नाव तरी कळले. होळीला जायचा विचार आहे आंबोलीला, तेव्हा शोधेन परत.... रंग अगदी तेजस्वी पिवळा आणि मध्यभाग सोनेरी झाक असलेला आहे हे खरेच आहे. त्या दिवशी खुप अंधारुन आले होते, त्यामुळे कदाचित निट दिसत नाहियेत रंग. साधना.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|