Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मला समजलेलं चुकीचं इंग्रजी ...

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला समजलेलं चुकीचं इंग्रजी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 22, 200620 01-22-06  9:47 am

Birbal
Monday, January 23, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या लंडन मधील ऑफीसमध्ये दोन पाकीस्तानी होते. एकदा त्यातला एक जण गाडी पार्क करायला गेला ( पार्कींग टाईम प्रमाणे जागा बदलायला, तिकीट मिळू नये म्हणून ) दुसर्‍याने मला विचारले तो कुठे आहे.

मी त्याला सांगितले की "
He is gone to park his car"

ह्याला ऐकु आले "
He is gone to Pakistan."

झाले. तो एवढा वैतागला ... असा कसा गेला मला सांगायच नाही का ...... वगैरे वगैरे. आणि मला अजिबात समजेना की हा प्राणी एवढा चिडला कशाला आहे..... मग तो माणुस पार्क करुन आल्यावर सर्व गोंधळ निस्तरला .......

Asmaani
Friday, July 07, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" टिळक तर काय, बोलून चालून ग्रेटच होते." ह्या वाक्याचे एकाने केलेले इंग्लीश भाषांतर--" वॉकींग टॉकींग टिलक वॉज अ ग्रेट पर्सन."

Raina
Friday, July 07, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एका तमीळ colleague ने सांगीतलेला अनुभव...
पहिल्यांदा तो कंपनीच्या कामासाठी अमेरिकेत गेला तेव्हा McDonald मध्ये जाणे अपरिहार्य होते.. McDonald नी त्या दिवसात vegetarian burgers तयार केलेले नसायचे. तर ह्यानी शाकाहारी असल्यामुळे सगळं काढुन नुसता बरगर मागीतला.. तर ती बाई विचारायला लागली- eat here or to go ? हा इतका गोंधळला- to go म्हणजे काय मग एका देशी ने त्याची सुटका केली.


एकदा एक फ्रेंच बुवा/ Scottish बाई आणि मी गप्पा मारत होतो..
संवाद येणेप्रमाणे..

Frenchman: What time do you have ?
मी- Oh I have time. My next meeting is only at 2:00 p.m. so we can go for lunch anywhere.
Scottish girl: Oh . I only have 40 minutes. so lets go somewhere nearby.
Frenchman: no... no what time do you have ? घड्याळ दाखवत..
आता मात्र हद्द झाली... काय म्हणतोस रे बाबा ( स्वगत)
शेवटी Frenchman: I meant what time do you have in your watch. My watch is probably wrong
हुश्श समजलं एकदाचे- त्याला तुझ्या घड्याळात किती वाजले असे विचारायचे होते...


Adtvtk
Friday, July 14, 2006 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Two or three days after joining a company my new chinese boss asked me " Did you take bath yesterday?" I was shocked to hear this .But after seeing my shocked / angry face he pointed at the bus stop and said I saw you there. Then I realised he was asking me " Did you take bus yesterday?".


Aashu29
Saturday, July 15, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm chinese lokanchaa malahi asach anubhav aahe kahi shabd giltat te!!
mala ekane bread cha bhaav वफ़ीती sangitla
khup welane tyala tras dilyawar kalale it was 1 $ 50 cent!!

Bee
Saturday, July 15, 2006 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चायनीज लोकांच्या english वर त्यांच्या मातृभाषेचा खूप प्रभाव असतो. मी जेंव्हा सिंगापूरमध्ये आलो होतो त्यावेळी चल मी तुला तिथे घेउन जाते ह्या वाक्याचे english वाक्य होते come I will bring you there. मला कळलेच नाही ते. नंतर filter ला फ़ितर म्हणायचे कारण त्यावेळी मी Database च्या एका project वर काम करत होतो. Filter हा शब्द खूप उशिरा कळला की ती लोक फ़ितर म्हणतात. तसेच इथे तर लाह लाह खूपच आहे. जसे की come lah... I will take you there lah.. ok laah.. त्याला इथे singlish म्हणतात.

इथे येऊन भाषेचा खूप loss झाला. धड मराठी बोलायला मिळत नाही की english .. and the thing is I love languages.. माझे भाषेवर अफ़ाट प्रेम आहे.. मायबोली नसती तर काय झाले असते ह्याचा मी विचार करू शकत नाही. thanks to HITGUJ indeed!!!!!!


Bepositive
Sunday, July 16, 2006 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kuni bollywood calling baghitlay ka? apratim maja yete tyat om puri cha english aiktana

Prasik
Sunday, July 16, 2006 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॉलीवूड कॉलिग त्या पेक्शा 'चुपके चुपके बघ, एन्ग्लिश ची वात लावलेय

Maitreyee
Wednesday, August 23, 2006 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dont haunt for the job! let the job haunt for you !
Make your carrier stable by doing our course.
limited sits! hurry!

यात अतिशयोक्ती नाहिये आत्ताच हा मजकूर असलेली banner advt पाहिली एका साईट वर:-)

Chaffa
Tuesday, September 26, 2006 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या नेदरलॅन्ड ट्रेनिंगच्या वेळचा हा किस्सा:
आमच्या रेस्टहाउस पासुन ट्रेनिंग हॉलला जायचे होते आमची ट्रेनर (हो आता तिला ट्रेनरच म्हणणार ) म्हणाली we are going on bikes guys आयला म्हंटल चला ईथे bike चालवण्याचा अनुभव मिळणार आम्ही सगळे खुश, मोठ्या आनंदात बाहेर आलो समोर पंधराविस सायकली उभ्या.!!!!! हॉल तिथुन आठ किलोमीटरवर. आता हौसेने हो ऽऽऽऽ म्हंटल्यावर नाही पण म्हणता येईना झक मारत गेलो. त्यात त्या बिना ब्रेकच्या सायकली चालवताना हालत खराब. ते घोडा छाती फुटून मरतो म्हणतात ना तेंव्हा त्याचे नक्की काय होते त्याचा आम्हाला साक्षात्कार झाला.


Deepanjali
Tuesday, September 26, 2006 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US ला नवीन आले तेंव्हा एखादी मुलगी अपल्या मैत्रीणीला Girl friend म्हणायची तेंव्हा मला वेगळाच अर्थ वाटायचा ..
नंतर खूपदा ऐकून कळलं कि ही casual term अहे . :-)
इथल्या ABCD मुलीही सर्रास ladies only party ऐवजी Girl friends party हा शब्द जास्त वापरताना ऐकते इथे .
पण मुलगा मात्र एखाद्या मित्राला Boyfriend म्हणतो तेंव्हा वेगळा अर्थ होतो !


Durandar
Tuesday, September 26, 2006 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय चाफ्फ्या बाईक चालवणार का यापुढे.

Arch
Tuesday, September 26, 2006 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

we are going on bikes gays >> तुम्हाला ती gay म्हणाली आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलत? का तिला guys म्हणायच होय?

Chaffa
Tuesday, September 26, 2006 - 10:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च,
बघ नविन किस्सा झाला की नाही.!!
अग मी ईथे मराठी आणी इंग्लिश दोन्हीवर काम करतोय पण एक गोष्ट खरी की gay किंवा guy दोन्ही आपण मराठी माणसांनी ऐकुन घ्यायला नको. कारण guy चा शब्द्श अर्थ वाईट माणुस किंवा राक्षस असा आहे वाटत.


Kandapohe
Wednesday, September 27, 2006 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो
इथे जावून भन्नाट जंगलीश बघून या. आमच्या हाफीसातला माझा चिनी बॉस काही कामाकरता माझ्या डेस्कपाशी येताना हमखास I will go there म्हणतो.

Vinaydesai
Tuesday, May 22, 2007 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

He is not taking the Name of coming out...

तो बाहेर यायचे नांवच घेत नाही आहे.. चं भाषांतर...


Jaymaharashtra
Tuesday, May 22, 2007 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक मैत्रिण अतिशय आत्मविश्वासने पण चुकीचे इंग्रजी बोलते.एकदा आम्ही एका मैत्रिणिकडे जेवायला गेलो होतो.जेवुन झाल्यावर मैत्रिणीच्या लहान बहिणीने विचारले तुम्ही पेप्सी किंवा कोक काही घेणार का?
त्यावर या बाईसाहेबांची प्रतिक्रिया आली आणि ती पण मारे इंग्रजी मधे काय तर म्हणे we dont drink irritated water . आमची हसुन हसुन मुरकुंडी वळली.तिला बहुतेक airated असे म्हणायचे होते.
आम्ही कधि एकत्र खरेदीला गेलो आणि एखाद्या गुजराथी माणसाच्या दुकानात गेलो कि हिला फ़क्त handle देतो आणि लांब उभे राहुन मजा बघतो मग जी काहि त्या दोघांमधे इंग्रजीची जुगलबंदी चालु होते, ती बघुन फ़क्त हसण्याव्यतिरिक्त आम्ही दुसरे काहिच करु शकत नाहि.


Dakshina
Wednesday, May 23, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज wash room मध्ये एका मुलीने मला request केली, can you look at my perse for 5 minutes ?
मनात विचार केला... look at my perse ???? म्हणजे काय..
मग तिला विचारला... what's so special about it, that, i have to look at it at for almost 5 min, is there anything that is going to pop out of it within that time ? ती म्हणाली... No, i want to go inside मी अणखी चक्रावून गेले... मग कळल की तिला look after म्हणायचं होतं.


Adi787
Wednesday, May 23, 2007 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

look at my purse for 5 mins... I want to go inside...( the purse??????) जबरीच.... purse उघडुन तीला म्हणायचे .. हं जा आता आतमध्ये....



Adi787
Wednesday, May 23, 2007 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कान्दापोहे, काय जबरी आहे website ती...
chinglish photos..amazing...
ह. ह. पु. वा. धन्स...


Runi
Thursday, May 24, 2007 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदापोहे काय जबरदस्त लिंक दिली आहेस तु chinglish ची, मी काल अक्षरशः गडबडा लोळले ती साइट बघताना.

Nandini2911
Thursday, May 24, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बॉसला पाठवलेल्या मेलचे लगेच उत्तर आलं..
"काय सुंदर शब्दरचना.."
एवढ्या स्तुतीने लगेच कॉलर ताठ झाली. खाली माझ्या आर्टीकलमधल्या
पहिल्याच ओळीला बॉसने हायलाईट केलं होतं.
An Article of letter to the editor


Dineshvs
Thursday, May 24, 2007 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

KP मस्तच साईट आहे. दक्षिणा तुझा किस्सा आणि त्यावरचा अदिचा सल्ला, दोन्ही भन्नाट

Hkumar
Monday, September 03, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नव्याने ओळख झालेला एक ब्रिटीश मला म्हणाला,'' या सुट्टीत आम्ही 'फ़ा....इस...' ला जाणार आहोत. मला एकू आले,'' Paris ला''! मग कळाले, ' far east म्हणाला होता तो!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators