सुरुवात BMM चे अध्यक्ष श्री.जगदीश वासुदेव यांच्या भाषणाने झाली. त्यांनी व्यासपीठावरच्या मंडळींची ओळख करून दिल्यावर महाराष्ट्राचे औद्यगिक व सांस्कृतिक मंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी छोटसं भाषण केलं. अशोक चव्हाण हे बरेचसे विलासरावांसारखेच दिसतात.. (कदाचीत नेहेमीच एकत्र फिरल्याने 'वाण नाही पण गुण लागला' असावा असं सर्वांचं मत झालं) .. मग आपले माननीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख (ही अशी सगळीकडे रावजी म्हणायची पद्धत का आहे बरं?? असं कुणी रावजी वगैरे म्हटलं की मला ती 'या रावजी तुम्ही बसा भावजी ' ही लावणीच आठवते. ) बोलायला उभे राहिले.. अतिशय politically correct शब्दात त्यांनी भाषण केलं बर का!!! पुण्याचं डेट्राॅइट (बहुधा आत्ताच्या काळातलं GM ची बर्यापैकी वाट लागल्यानंतरचं) करण्याचा मानस, महाराष्ट्र सरकारकडे पैसा ओसंडून जातोय अश्या थाटात BMM ला ५० लाख देण्याची घोषणा असे बरेच पतंग उडवून झाल्यावरच हे भाषण संपलं. मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण यांना महत्वाची appointment असल्याने अध्यक्शांच्या भाषणाच्या आधीच आपली मुक्ताफळं उधळून ते बाहेर पडले. Finally ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास ते डाॅ. जब्बार पटेल बोलायला उभे राहिले. वक्ता असावा तर असा.. विषयाचा पूर्ण अभ्यास, बोलण्यात कसलाही अभिनिवेश नाही.., डाॅ. पटेलांनी त्यांच्या कारकीर्दीचा overall परामर्श घेताना त्यांनी आणि त्यांच्या पत्नी डाॅ. मणी यांनी समाजाच्या विविध स्तरावर केलेले काम आणि त्यातुन जब्बारना सुचलेले वेगवेगळे विषय आणि या सर्वांतुन निर्माण झालेल्या सामना, मुक्ता, उंबरठा यासारख्या अप्रतिम कलाकृती याबद्दल थोडक्यात सांगितलं. भाषण संपूच नये असं वाटत होतं. पण पुढच्या कार्यक्रमाना उशीर होऊ नये म्हणुन जब्बारनी भाषण आवरतं घेतलं. एव्हाना parellel stage वरचे कार्यक्रम सुरु झाले होते. आम्ही सगळे (मी, आशिष, अनु, समीर) महाराष्ट्र फाउंडेशन च्या 'आयुष्याच्या या वळणावर' असं शीर्षक असणार्या प्रोग्रॅम ला जाउन बसलो. हा प्रोग्रॅम विद्या बाळ, दीपा श्रीराम आणि सोनाली कुळकर्णी यांनी conduct केला. The concept was to form different groups representing the words 'passion','cooperation','peace','strength','love' etc. आणि त्या त्या group मधुन एकेकाने येउन अपल्या आयुष्याच्या ह्या वळणावर आपल्याला काय वाटाय, आपण इथे पोचेस्तोवर प्रवास कसा केला याबद्दल बोलायचं. concept छान होता पण वेळेअभावी आणि थोडासा दीपा लागूंच्या रटाळ होत गेलेल्या गोष्टीमुळे नीट जमला नाही.