नमस्कार!
admin च्या कृपेने मायबोलीवर हे हक्काच छोट घर मिळालय तेव्हा मनासारख काही वेगळ (मनमानी ?) इथे करता येईल.
अर्थात नेहेमि प्रमाणेच तुम्हि इथेहि भेट द्याल व आपल्या प्रतिक्रीयान्मार्फ़त प्रोत्साहन व मार्गदर्शन कराल ही आशा करतो.
हा गृह प्रवेश मात्र कथा, कविता, ललित या नेहेमी पेक्षा थोड्या वेगळ्या वाटेने...
सदर : वेगळ्या वाटा : Ambigram
हा प्रकार तसा नविन नाही. किम्बहुना अनेक लोकानी अनेक प्रकारे वैविध्यपूर्ण असे ambigrams बनवले आहेत. काहीन्साठी हा फ़क्त छन्द आहे तर काहिन्साठी आजीवन ध्यास. या लेखात ambigrams किती कुणी कसे बनवलेत वा तत्सम आकडेवारी पेक्षा ambigram या कलेविषयी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून लिहायचा विचार आहे.
ambigram ची संकल्पना :
तस थोडक्यात सांगायच तर ambigram हा ambigramist ने मान्डलेला एक प्रकारे अक्शर वा शब्दखेळ आहे पण ambigram बनवणे व त्याची मान्डणी यात कलाकाराची प्रतिभा व कलप्नाशक्ती, दोन्हीला आव्हान दिले जाते. आकाशात उडणारे पक्षी आपण सर्वच पहातो पण फ़ारच थोड्या जणाना त्या पन्खांच्या फ़डफ़डीचे, त्या धनुष्याकार रचनेचे कुतुहल असते तर त्यातील प्रत्त्येक बारकाव्याचे निरीक्षण करून त्यावर काव्य वा चित्र रेखाटणारे ही मोजकेच.
ambigram चे ही तसेच म्हणता येईल. लहानपणी आपण अ ब कड ही अक्षरे गिरवतो मग हळू हळू स्वर, व्यंजन, काना, मात्रा, इत्यादिंचि ओळख झाली की शब्द व वाक्य रचना करू लागतो. या रोजच्याच वापरातील शब्दात काही वेगळे आकार, प्रतिमा, वा आकृतीबंध शोधणारा कलाकारही तसा विरळाच! ambigramist नेमके तेच शोधतो.
अर्थात ambigram हा शोध वा शब्द खेळ काही सोपा नाही पण गम्मत म्हणजे या विषयाशी माझी जवळून ओळख एका खेळातूनच झाली. Michigan State University मधिल पुनिया मिश्रा नामक अध्द्यापक आमच्या क्रीकेट लीग सन्घात शामिल झाला अन त्याच्यातील छुप्या Ambigrammist ची जवळून ओळख होताच या एकन्दरीत ambigram प्रकाराबद्दल अधिक कुतुहल निर्माण झाल. त्याची <a href="http://punya.educ.msu.edu/PunyaWeb/ambigrams" target=_top>website</a>पाहील्यावर मात्र या अजब प्रकाराची व या अवलियाची खरी ओळख पटली.
आश्चर्य म्हणजे जगात जे काही थोडे फ़ार ambigramist आहेत, त्यातही भारतातील हा तसा <a href="http://web.mid-day.com/smd/play/2003/may/53845.htm" target=_top>पहिलाच </a>. शक्य तितके सर्व व वेग वेगळ्या प्रकारचे ambigrams त्याच्या website वर पहाता येतील.
आणि मग इथूनच माझ्या मराठी ambigram चा शोध किव्वा प्रवास सुरू झाला. किम्बहुना कुठल्याही भारतीय भाषेतील ambigram कुठे सापडतात का ते पाहिले पण निदान नेट वर तरी फ़ारसे आढळले नाहीत. म्हटले पहावा प्रयत्न करून, पुनियाच्या त्या अफ़ाट विश्वातून माझ्यातील छोट्या चित्रकाराला छोटीशी प्रेरणाच मिळाली जणू.
रोजच्याच अक्षराना व शब्दाना वेगळ्या दृष्टीकोनातून पहाणे किव्वा लिहीणे हा एक वेगळाच अनुभव. तेच अक्षर वा तोच शब्द वेग वेगळ्या पध्दतीने लिहीला तर त्यातून किती वेग वेगळे सुन्दर आकार, बन्ध, घडवता येतात हा अनुभव मला तरी नवखा आहे किव्वा त्या दृष्टीने मुद्दामून विचार करणे यातही एक नाविन्य वाटते.
बहुतेक वेळा आपणा सर्वांच आयुष्य थोड्या फ़ार फ़रकाने इतक चाकोरी बध्ध असत की त्याबाहेर विचार करण्याचा वा त्या चौकटीला भेदण्याच आपण विसरतो किव्वा रोजच्या धकाधकीत वेळ मिळत नाही.
मराठी ambigram बनवताना प्रत्त्येक अक्षराकडे वेगळ्या अन्गाने पाहाण्याचा व त्यातून एक वेगळी निर्मिती करताना वेगळाच आनन्द मिळतो पण त्याच बरोबर आपल्या मनाची कवाडं सताड उघडतात असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. किम्बहुना कल्पनेतील किव्वा सुचलेला ambigram प्रत्यक्ष लिहीताना तर काही वेळा मेंदूच्या शिराही आपसूक ताणल्या जात असाव्यात.
ambigram एक कला :
माझ्या मराठी ambigram चा श्रीगणेशा मी गेल्या गणेश चतूर्थीला केला तो असा :
in ambigramic langugage: this is 180 degree ambigram with a shape.(अर्थात 180 अंशातून फ़िरवल्यास किव्वा खाली वर अशा उलट्या अंगाने पाहिल्यास, एकदा श्री अक्षर व एकदा गणपतीचे चित्र, खाली पोस्ट केल्याप्रमाणे दिसेल किव्वा दिसावे ही अपेक्षा आहे. )
सर्व कला, बुद्धी व रिध्धी सिद्धी दात्या विनायकाचे स्मरण रहावे म्हणून माझ्या पहिल्या ambigram मधे अशी श्रींची स्थापना केली. अर्थात हा पहिलाच प्रयत्न आणि upload केलेल्या image मधेही तितकी सुबकता दिसणार नाही पण मुद्दामून file जशी च्या तशी इथे टकतोय, पुढे जावून या धडपडीच महत्व लक्षात रहाव म्हणून.
श्रीन्च्या नन्तर श्री गणेशाय नमः लिहीण अगदी स्वाभाविक होत. पण हा ambigram बनवताना मात्र बरेच फ़ेरफ़ार करावे लागले. हा दुसरा प्रयत्न ही बरच काही शिकवून गेला. हा सुध्दा 180 degree ambigram आहे, पण या ambigram मधे नमः चा विसर्ग मात्र, नमः शब्दाच्या दोन्ही बाजूना ठेवावा लागला. शिवाय हा वेगळ्या प्रकारे 180 degree ambigram आहे काराण यात एकदा गणेशाय नमः तर एकदा नमः गणेशाय असे वेगळे वाचले जाते
after 180 degree rotation
गम्मत अशी असते की ambigram तयार झाल्यावर तो वरकरणी बनवायला व काढायला सोपा आहे अस वाटत पण बरेच वेळा आजवरच्या अक्षरे व शब्द लिहीण्याच्या ठरावीक सवयीमूळे म्हणा, तितके सहजपणे ते सुचत नाही. वरील ambigram मधिल काही ठ्ळक गोष्टी :
1: ग व शा या दोन अक्षरात ण अक्षर मुद्दामून पिवळ्या (फ़िक्या) रन्गात दडवल आहे. डावीकडून उजवीकडे नेहेमीसारखे वाचताना लाल रन्गाच्या तीव्रतेमूळे तो " ण " पटकण डोळ्यात येणार नाही किव्वा येवू नये म्हणून मुद्दामून रन्गसन्गती तशी केली आहे.
2: नमः वाचताना ही फ़क्त विसर्ग शेवटी आहे हे वाटावे यासाठीच काळी पिवळी रन्ग सन्गती निवडली.
3: ग चा य after 180 rotation दिसावा म्हणून एका ठराविक लयित व curves मधे ते अक्षर लिहीले आहे (ध चा मा करणार्या आनन्दी बाइना ही कला खास अवगत असणार)
4: श अक्षराच्या खालच्या शेपटीचा वापर ण वरील मात्रे साठी करून घेतला आहे
हे असे का केलेवा करावे लागले याचे अधिक स्पष्टीकरण पुढिल विवेचनात येईलच.
माझ्यातील नवशिक्का कलाकार आता असा जागा झाल्यावर मग अर्थातच, आपल्या दैनन्दीनीचा भाग बनलेल्या मायबोलीचा ambIgram बनवायचे मनात आले. पुन्हा एकदा आपल्याच प्रोत्साहनाच्या बळावरच इथे पोस्ट करतो आहे :
This one is also 180 degree ambigram
यात पुन्हा य आणि ल ही अक्षरे व वेलान्टी लिहीताना मुद्दामून एक अन्तर राखले आहे. य ला रफ़ार असल्यागत वाटणार्या अशा मुद्दामून वापर केलेल्या चिन्हाना Props म्हणतात. एखादे अक्षर ठराविक पध्दतीने वाचले जावे म्हणून त्यान्चा वापर करता येतो, विशेषतहा आपल्या मायबोलीत त्यान्चा फ़ार उपयोग होतो, जसे इथे हा य चा रफ़ार वाटला तरी तो " ल " म्हणून वाचता यावा यासाठी त्याचा उपयोग आहे.
तर असा सुरू झाला माझ्या मराठी ambigrams चा प्रवास. आजवर बहुदा एक 50-100 ambigrams तरी खरडले आहेत, सर्वच अजून finished product बनवले नाहीत पण पुनिया मिश्रा म्हणतो ती प्रत्त्येक ambigram बनवताना ची धुन्दी मात्र अनुभवली. कधी असच office मधे तर कधी कुठे गाडीतून जाताना तर कधी कुठले जाहीरातीचे पोस्टर बघताना असेच काही ambigrams आपसूक सुचतात अन मग ते कागदावर उतरवण्याची खरी धड्पड चालू होते, अन तोच भाग अधिक कठीण असतो.
याच धड्पडीतून हा दिवाळीचा ambigram जुळला. This one is mirror reflection ambigram. खर तर mirror reflection style ambigram बनवावा असा मूळीच विचार नव्हता पण जस जसा हा 180 degree ambigram बनवत गेलो तस तस mirror reflection ची कल्पना साकार होत गेली. आणी मग मुद्दामून थोडे फ़ार बदल करून तसा ambigram बनवला.
गम्मत पहा, हा ambigraam vertical or horizontal mirror reflection with 180 degree असा दोन्ही प्रकारे होतोय. म्हणजे उजवी बाजू ही डाव्या बाजूचे प्रतिबींब तर खालची बाजू ही वरच्या बाजूचे प्रतिबिंब. शिवाय दोन्ही बाजूने वाचले तरी दिवाळि शब्द दिसतो किव्वा दिसावा अशी अपेक्षा. दोन्ही प्रकारे वर पोस्ट केला आहे. बाकी वेलान्टीवर ती चक्र नन्तर add केळी, दिवाळी च्या सन्दर्भाने.
हाताने कच्चे रेखाटलेले ambigrams, software वापरून अधिक सुबक करावे वाटू लागले तेव्हा हा दिवाळीचा ambigram, word and excel वापरून बनवला. पण software वापरताना मात्र freehand ला जी एक लय बध्धता असते ती जरा हरवल्या सारखी वाटते. अर्थात प्रत्त्येक software चा learning curve असतो व आपल्याला ते कितपत व कसे अचूक वापरता येते यावरही finshed product अवलम्बून असते. पण आधि म्हटल्या प्रमाणे आपल्या मायबोलीत अक्षर वळणे व आकार इतके सुंदर आहेत की software मधे त्यांना न्याय देणे कठीण आहे. असेच एक उपयूक्त software- macromedia freehand . यातील "Trace" function वापरून आपण आपल्या ambigram-jpeg file वर सुबक लय, रेषा, व आकार काढू शकता. म्हणजेच freehand ची लय पण रहाते व सुबकताही येते आणी फ़ाईल jpeg वा तत्सम format मधे upload करता येते.पुनिया ने त्याचे जवळ जवळ सर्व ambigram हेच software वापरून बनवले आहेत, आणि त्यातली सुबकता अतीशय लक्षणीय आहे!
मराठी ambigram बनवताना हे निश्चीत जाणवल की कदाचीत english मधून ambigram बनवण सोप आहे पण मराठीत (आणि इतर भारतीय भाषातूनही) ते बनवण जास्त अवघड आहे. याच कारण आपल्या मायबोलीतील ह्रस्व, दीर्घ, अनुस्वार, वेलांटी, काना, मात्रा, रफ़ार, विसर्ग इत्यादी english मधे नसतात. त्यामूळे अक्षरान्ची रचना व मांडणी करताना त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यातही पुन्हा जोडाक्षरे वगैरे आली की अजून अवघड होते. पुन्हा काही अक्षरांच्या sequence मधून बनणारा शब्द सोपा असतो तर काही अवघड. english ambigram पाहिलेत तर मि काय म्हणतोय हे लक्षात येईल तुमच्या.
माझ अस प्रामाणिक मत झाल की english मधे ambigram बनवण किव्वा फ़क्त अक्षरान्ची फ़ेर रचना करण तितक अवघड नाहिये पण तेथे आपली कल्पनाशकती, शैली व मान्डणी यात वैविध्य साधण हे खर आव्हान आहे, या उलट मराठीत प्रथम ambigram बनवण हेच कदाचित अवघड आहे, कल्पनाशक्ती, शैली, मान्डणी, इत्यादी बाबी ही अजून एक वरची पायरी आहे. माझ्या या अजाण मताला जेव्हा पुनिया मिश्रा ने दुजोरा दिला तेव्हा मात्र मला मराठी ambigram मधिल आव्हान अधिकच जाणवल. गप्पा मारताना पुनिया म्हणला :
It is infinitely difficult to construct ambigrams in indian languages, let alone the artistic representation of it.
अर्थात हाही एका कलाकाराने या कलेबद्दल व्यक्त केलेला एक प्रकारे आदरच आहे व यात श्रेष्ठ कनिष्ठ भावना नाहीये.
किंबहुना वर बनवलेले ambigram आपल्यातील कितीतरी कलावंत, आपल्या कल्पना शक्तीच्या सहाय्याने अधिक सुबक व सुंदर व वेगळ्या प्रकारे बनवू शकतात. त्यामूळे ambigram बनवण हे अशक्य मूळीच नाही किव्वा तो ठराविक प्रकारे बनवायला हवा असेही नाही पण त्याचा वापर, योग्य presentation , कलाकुसर, व त्यातून निर्माण होणारे आकृती वा अक्षरबंध व त्यामागची संकल्पना हे दर वेळी मनाला सुखावतीलच असे नाही व इथेच कलाकाराच्या प्रतिभेचा व संपन्नतेचा खरा कस लागतो.
ambigram चे नियम, वा पध्दती, अडी अडचणी :
तसे ambigram अमूक एक पद्धतीनेच काढावा असे काही नियम नाहीत पण जरा खोलात विचार व प्रयोग करून पाहिले तर जाणवेल की ज्या भाषेत आपण ambigram बनवू त्या भाषेचेच काही अंगीभूत नियम वा लिपीक बन्धने ambigrams मधे अपोआप येतात.
उदाहणा दाखल, आपली अक्षरावर वा शब्दावर रेघ माराण्याची पध्धत, ambigram
बनवताना अडचणीची ठरू शकते. पुन्हा काना, मात्रे, रफ़ार हे लपवता येतात पण शब्दात काही विशेष चिन्हे जसे विसर्ग, अर्ध चंद्र, अनुस्वार इत्यादी असेल तर त्याचे ambigram बनवणे तितकेच अवघड होवून बसते. यावर चित्रकला वा रंगाचा योग्य वापर हा उपाय ठरू शकतो, जसे वरील गणेशाय नमः या ambigram मधे करण्याचा प्रयत्न केलाय. थोड्क्यात चित्र, चिन्ह व रंगाचा असा वापर करणे जेणे करून ambigram सहज वाचनीय होईल.
माझ्या अनुभवानुसार ग्राफ पेपर हा पहिल्या प्रयत्नान्साठी उपयुक्त ठरतो कारण ambigram मधे लागणारी symmetry वा proportions आपल्याला ग्राफ पेपर वर सहज काढून बघता येतात. मग एकदा कच्चा आराखडा वा अक्षर रचना तयार झाली की तुम्हाला सोपे वाटेल ते software वापरून तो ambigram तुम्ही अधिक सुबक बनवू शकता.
google वा तत्सम search engine वर अनेक प्रकारचे ambigrams <a href="http://www.ambigram.com" target=_top>सापडतील </a>. काही महान ambigramist नी तर 3d, interactive, animated, cartoon वगैरे ambigrams ही बनवले आहेत. एका अर्थाने ambigram ही मुक्त कला free art आहे पण त्याच बरोबर प्रत्त्येक शब्द समूहाचा ambigram बनवता येईलच असेही नाही.
शेवटी ambigram हा खटाटोप कशासाठी? :
नेहेमीची अक्षरे वा शब्द असे उलट सुलट लिहीण्याचा वा वाचण्यचा हा अट्टहास का असे कुणीही म्हणेल. तस पाहिल तर कुठलाही छन्द वा कला ही आपल्याला आनंद देते, काहींना त्याची नशा चढते तर काहींसाठी तो एक विरंगुळा असतो. पण कलाकाराच्या भाषेत म्हणायच तर ambigram काय कुठल्याही कलेचा नसता खटाटोप कशासाठी? या प्रतिप्रश्णातच याच उत्तर आहे.
पण जरा वैज्ञानिक वा सामाजिक द्रुष्टीने विचार करुन पहा. ब्रेल लिपी किव्वा sign language नसती तर? किव्Vआ programming languages नसत्या तर? किव्वा विविध शिलालेख, लिपी इत्त्यदी नसते तर? किव्वा कशासाठी हा खटाटोप असेच म्हणून आपण ते सोडून दिले असते तर?
ambigrams बनवताना असा विचार येवून गेला की आपण ज्या कही प्राचीन लिपी, शिलालेख, मोडी वा हेमाड्पंती लिपी वगैरे पहातो, ऐकतो, त्यातही निव्वळ शब्दान्खेरीज काही चित्र किव्वा आकृती बंध किव्वा गूढ नकाशे अस काही दडल नसेल ना किव्वा पूर्वीच्या काळात अशा अनेक गुप्त लिपींचा वापर हा खलिता, हेरगिरी अशासाठी केला जात असणारच ज्या काळी, दौत, बोरू, पत्र, हेच फ़क्त लिखाणच वा सन्देश वहनाच माध्यम होत त्या काळी बहुदा वापरली जाणारी लिपी ही निशीतच अधिक सम्पन्न व श्रिमंत असणार. अगदी लोकप्रीय झालेल्या अलिकडच्या युगातील sherlock homes च्या कथेतील dancing men या गोष्टीत, भिन्तीवरील त्या नाचणार्या मानवी चित्रागत दिसणार्या अक्षरातून त्याचे ते गुन्ह्याचे कोडे सोडवणे वगैरे हे पाहीले की असे वाटते की दुर्दैवाने आपल्याकडे या प्राचीन साहित्त्यीक विषयावर संशोधन करणारे फ़ारच कमि लोक असतात. असतात ते फ़क्त गूढ कथेत, बखरीत, कहाणीत वा कल्पनेत. या अशा विषयावर पदवीक्रम किव्वा शिक्षण देणारी विद्यापीठेही तशी कमीच, अर्थात याला कारणही आपणच.
आजच्या बदलत्या instant technology बरोबर आपण आपल्याच भाषेच हे गर्भ श्रीमंतपण, त्याच महत्व, कदाचित विसरत चाललो आहोत किव्वा झपाट्याच्या e- युगात या शब्द सम्पत्तीकडे आपण दूर्लक्ष करत आहोत.
आज तीव्रतेने जाणावतय की दसर्याच्या निमित्ताने शाळेत पाटीपूजनाला जाताना ते श्री अक्षराच्या एका बाजूला एक व एका खाली एक अशा मान्डणीतून, आजीने पाटीवर काढून दिलेली देवी, सरस्वती, ही एक प्रकारे या ambigram ची जननीच होय. ती लिपी वा ते आकृतीबन्ध आपल्या संस्क्रुतीचा एक भाग होतेच पण बदलत्या काळानुसार आम्हाला तिचा विसर पडला अन आता ambigram च्या नव्या नाव रुपात ती आम्हाला पुन्हा गवसली
पण निदान ambigram च्या निमित्ताने का होईना या सारख्या अनेक लोक कला, गूण, परंपरा ज्या आपल्या संस्क्रुतीतून नष्ट होत आहेत, त्यांच जतन करण आपल्याच हातात आहे याची जाणीव होते.
या नविन वर्षाच्या निमित्ताने व श्रीन्च्या कृपेने माझ्या परीने ही एक छोटीशी सुरुवात..
(पुढे जसे जमेल तसे इतर अनेक व अधिक सुबक मराठी ambigrams इथे पोस्ट करीन.)