BNP Paribas ची कमाल.
एका महीन्यापुर्वी बिएन्पी पारीबा ने त्यांना २ बिलीयन डॉलर्स चा हिशोब लागत नसल्याचे जाहीर केले अन सार्या जगात Credit Crunch Crisis चे वारे वाहु लागले. खर तर bnp ने पहीले जाहीर केले इतकेच. त्यांनी जाहीर करन्याची कोंडी फोडली की सर्व जगातल्या अनेक banks ने लिक्वीडीटी प्रॉब्लेमस असल्याचे जाहीर करायला सुरु केले अन त्यामुळे त्याचा परिनाम सर्व जगातील शेअर मार्केटस वर व्ह्यायला सुरु झाला. भारतही त्याला अपवाद कसा असेल? कारण अनेक बिलीयन डॉलर्स ची उलाढाल FII करत असतात त्यांनाही तो प्रॉब्लेम जानवु लागला व त्यांनी मार्केट पाडायला ( पक्षी त्यांचा क्डे असलेले शेअर्स विकायला) सुरु केले. त्यामुळे आपण परत एकदा ऑगस्ट च्या मध्यावर १४००० कडे आलो.
सर्वजन परत एकदा रोज शेअर मार्केट वर बोलायला लागले. ( तस ही आपल्या क्डे पुल नी सांगीतल्या प्रमाने टक्सी वाले मत देत असतात) त्यामुळे अनेक पंडीत रोज सांगु लागले की शेअर बाजार परत एकदा १२००० कडे जानार, हे विका ते विकु नका वैगरे जाहीराती परत एकदा चालु झाल्या. सर्वच बाजारातुन बाहेर पडन्याची घडपड करु लागले.
अचानक सप्टेबर मध्ये US gov ने रेट कट केले. त्यांना करावे लागले. बाजारासाठी ही बातमी आनंददायी ठरली व सर्व जगातील indexes नव्या उंची कडे झेपावु लागले. गेल्या आठवड्यात DOW ने परत तिन महीन्यापुर्वीचा उच्चांक गाठला.
भारत यात पिछाडीवर राहीला तर नवल. आपण ही आधी १५००० नंतर १६००० व आता १८००० कडे धावु लागलो. ही किमया फक्त दिड महीन्यात. या सर्वात रिलायन्स पक आघाडीवर आहे. रोज एका रिलायन्स कंपनी च्या बाजारभावात २० - २० टक्याने वाढ होत आहे. (बहुतेक रिलायन्स ने युवराज अन धोनी ला हायर केले वाटते). जर रिलायन्स १८०० वर गृहीत धरला (आज २२५०) तर मार्केट परत १६००० कडे जाईल. काही analysis करायचा आधीच चढ उतार होत आहेत. अशा मार्केट मध्ये कुठल्याही ब्रोकरच्या सुचनांकडे पाहाने धोकादायक ठरेल. (जो पर्यंत तेजी आहे तो पर्यंत काही वाटनार नाही पण ही तेजी रोज चालु राहानार नाही).
असे काय झाले की एका महीन्यात valuation बदलले. काहीही नाही. काही मोठ्या कंपन्या जसे LNT, BHEL, Reliance पुढील तिमाहीत मोठा नफा दाखवनार यात वाद नाही पण p/e ratio २००९ च्या अर्नींग कडे जात आहे त्यामुळे जर मार्केट पडले तर खुप तोटा होउ शकेल. माझ्यामते तरी १६५०० ला चांगला सपोर्ट आहे. एक मोठे करेकश्न ड्यु आहे व येत्या काही दिवसात ते होइल.
मी सध्या दोन्ही बाजुने खेळत आहे. माझ्या काही F&O strategies
Nifty Nov Call 5250 - sale around 180+ , purchase again for 150 or less. Extreme bearish strategy - which paid of hadsome money to me in recent days. Range for last 3 days 90 to 192.
Buy- Nifty 5350 call for insurance.
Rel petro - Sale oct call of 160 , buy when Relpetro comes to 154-155
rel petro - buy 170 call for insurance
Rel cap Futures - sale Oct or Nov 1800, buy again around 1760
हे काही सध्या साठी फॉर्मुले देतो. माझ्या साठी हे चालले पण यात खुप मोठी रिस्क आहे त्यामुळे रिस्क घेन्याची तयारी असेल तर्च पुढे जा (ता का मी आज ते येता नोव्हे यात मार्केट पडेल अशा गृहीतावर हे सर्व दिले आहे).
बाजार पडेल काय? नक्की सांगता येत नाही पण मी जर फंड manager असेल तर मी नफा बुक करनारच त्यामुळे येत्या काही दिवसात सेल लागनार आहे असे वाटते.
जर मार्केट पडले तर तुम्ही काय करनार. त्या दिवशी बाजारातुन, आइ वडीलाकंडुन वा मित्रा कडुन जितके पैसे उभे करता येतील तितके करा व खरेदी करायला सुरु करा. ( गेला मे, यावेळचा ऑगस्ट या दोन्ही वेळेस मी योग्य ते स्टॉक मार्केट पडल्यावर लगेच खरेदी करायला सुरु केले त्याचा फायदा झाला तसाच तो तुम्हालाही होअओ कारण पुढील वर्षी आपण २०००० क्रॉस करनार आहोत.
मार्केट पडल्यावर खरेदी करायचे काही शेअर्स.
Reliance, Rel Energy, Rel petro, Rel Capital, Rel Comm, Bhel, LNT, M&M, Escorts, Tata Steel, SAIL, NTPC, SBI, ICICI, India Cements, Suzlon
शेअर्स वाचताना लक्षात आले असेलच की infra, banks v power हे सेक्टर out perform करनार आहेत. मागे मी LNT,BHEL, Relcap va Sail बद्दल लिहीले होते. आज त्यांचे रीटर्न्स ११० टक्या पेक्षा जास्त आहेत.